chavat galli Archives | News 24 Tass Marathi

चव्हाट गल्लीतील आगीच्या घटनेला कलाटणी
संशयास्पद व्यक्तीच्या हालचालींमुळे गूढ वाढले

आगीचे कारण शोधण्यासाठी तीन पथकांकडून तपास

सीसीटीव्ही फुटेज, विद्युत यंत्रणा आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीची छाननी

बेळगाव : चव्हाट गल्ली येथे झालेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेचा तपास पोलिसांनी अधिक व्यापक केला आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीसह विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

घटनेच्या दिवशी परिसरात एका संशयास्पद व्यक्तीचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या हालचालींच्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरुवातीला विद्युत बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता अन्य शक्यतांचीही पडताळणी केली जात आहे.

घरातील फ्रिज तसेच अन्य विद्युत उपकरणांमध्ये काही बिघाड झाला होता का, वायरिंगची स्थिती कशी होती, याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर चव्हाट गल्ली आणि परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज पोलिसांकडून संकलित केले जात आहे.

संशयास्पद व्यक्ती परिसरात कुठून आली, किती वेळ तेथे होती आणि घटनेनंतर कोणत्या दिशेने गेली, याचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळाकडे येणारे आणि तेथून बाहेर जाणारे मार्ग, दुकाने, घरे तसेच इमारतींवरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

तपासासाठी नियुक्त तीन पथके स्वतंत्रपणे काम करत आहेत. एका पथकाकडून घटनास्थळावरील पुरावे आणि विद्युत यंत्रणेची तपासणी केली जात आहे. दुसरे पथक सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत आहे, तर तिसरे पथक प्रत्यक्षदर्शी, शेजारी आणि संबंधित व्यक्तींकडून माहिती घेऊन घटनेपूर्वीच्या परिस्थितीची पडताळणी करत आहे.

आगीचे नेमके कारण आणि सीसीटीव्हीत दिसलेल्या संशयास्पद व्यक्तीचा घटनेशी काही संबंध आहे का, हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

The post चव्हाट गल्लीतील आगीच्या घटनेला कलाटणी appeared first on News 24 Tass Marathi.

उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी संदीप पाटील यांची ‘बेळगावच्या राजा’ला सदिच्छा भेट
चव्हाट गल्लीतील गणेश मंडळाला भेट देत श्री गणरायाचे घेतले दर्शन

उत्सवातील सुरक्षा व नियोजनाबाबत चर्चा

बेळगाव : उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमंडपाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्था, शांतता आणि उत्सवाच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप पाटील यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

The post उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी संदीप पाटील यांची ‘बेळगावच्या राजा’ला सदिच्छा भेट appeared first on News 24 Tass Marathi.

चव्हाट गल्ली आग दुर्घटनेतील बाप-लेकाचाही अखेर मृत्यू
मृतांची संख्या सहावर ; एकाच कुटुंबावर काळाचा घाला

ऐन गणेशोत्सवात शहरात हळहळ

बेळगाव : ढोरवाडा, चव्हाट गल्ली येथील आग दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकाचाही अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय असला तरी दुर्घटनेचे निश्चित कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

गजानन राजाराम धमोणे (वय ५८) आणि त्यांचा मुलगा रोशन गजानन धमोणे (वय २१) अशी मृत बाप-लेकाची नावे आहेत. गजानन हे पेंटिंगचे काम करत होते, तर रोशन उद्यमबाग येथील खासगी कारखान्यात काम करीत होता.

सोमवारी मध्यरात्री सुमारे २.३० वाजता शेडवजा घराला आग लागली होती. या दुर्घटनेत गजानन आणि रोशन गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

या दुर्घटनेत यापूर्वी शारदा गजानन धमोणे (वय ४८), प्रिया गजानन धमोणे (वय २७), गंगा गजानन धमोणे (वय २४) आणि भारती राजाराम धमोणे (वय ५०) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. जखमी बाप-लेकाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

या दुर्घटनेमुळे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. बुधवारी उत्तरीय तपासणीनंतर गजानन आणि रोशन यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या दुर्घटनेमुळे चव्हाट गल्ली परिसरासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असली तरी सहा जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

The post चव्हाट गल्ली आग दुर्घटनेतील बाप-लेकाचाही अखेर मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

चव्हाट गल्ली अग्निकांडातील पीडितांना तातडीची मदत देणार
पालकमंत्री सतीश जारकीहोळींचे आश्वासन

उपचाराचा खर्च, झालेली हानी आणि पुनर्वसनाबाबत सरकारकडून निर्णय

असुरक्षित घरांना घरकुल योजनांत प्राधान्य देण्याचा विचार

बेळगाव : चव्हाट गल्ली परिसरातील ढोर गल्ली येथे झालेल्या भीषण अग्निकांडातील पीडित कुटुंबीयांना शासनाकडून शक्य ती तातडीची मदत मिळवून देण्यात येईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आश्वासन दिले. दुर्घटनेनंतर घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. उपचाराचा खर्च, झालेली हानी आणि कुटुंबीयांना भविष्यात आवश्यक असलेली मदत याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केल्यानंतर मध्यरात्री सुमारे २.३० वाजता घराला आग लागली. या दुर्घटनेत शारदा दमोने, प्रिया दमोने, गंगा दमोने आणि भारती दमोने या चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला. गजानंद दमोने आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजानंद दमोने हे सुमारे ८० टक्के, तर त्यांच्या मुलाला सुमारे ४० टक्के भाजल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली.

घटनेनंतर पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उत्तरचे आमदार असिफ सेठ, महापौर प्रीती खामकर, मनपा आयुक्त एम. कार्तिक, उपमहापौर तसेच भाजप नेते किरण जाधव यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माजी आमदार अनिल बेनके यांनीही दमोने कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

आगीचे कारण तपासानंतर स्पष्ट होणार

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी फॉरेन्सिक विशेष तज्ज्ञांचे पथक दाखल झाले असून, एचईएसकॉम अधिकाऱ्यांकडूनही तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक पाहणीत शॉर्टसर्किटचा संशय असला, तरी फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. फ्रिजमधून स्फोटासारखा आवाज आल्याचे जखमी मुलाने सांगितल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

दुर्घटनेतील चारही मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. तपास अहवालात कोणाची चूक किंवा जबाबदारी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

असुरक्षित घरांच्या पुनर्वसनाचा विचार

ढोर गल्लीसारख्या परिसरातील असुरक्षित घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचा प्रश्नही यावेळी उपस्थित झाला. अशा कुटुंबांना सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्यासाठी घरकुल योजनांमध्ये प्राधान्य देण्याबाबत सरकारकडे सूचना केली जाईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले. शहरी भागातील कुटुंबांना घरकुल योजनांचा लाभ मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी स्वतंत्र प्राधान्य किंवा आरक्षणाच्या माध्यमातून मदत करण्याबाबत महापौर, उपमहापौर, आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चार महिलांच्या मृत्यूने ढोर गल्ली परिसरावर शोककळा पसरली असून, गंभीर जखमी दोघांच्या उपचारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post चव्हाट गल्ली अग्निकांडातील पीडितांना तातडीची मदत देणार appeared first on News 24 Tass Marathi.

गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री चव्हाट गल्लीतील घराला भीषण आग
एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू ; दोघे गंभीर जखमी

बेळगाव : गणेश चतुर्थीच्या दिवशी बेळगावच्या चव्हाट गल्लीतील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मध्यरात्री घरातून अचानक आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या आणि काही क्षणांतच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. घरातील व्यक्तींना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनेत शारदा दमोने (४५), भारती दमोने (५०), प्रिया दमोने (२८) आणि गंगा दमोने (२५) यांचा मृत्यू झाला. तर गजानन दमोने (६५) आणि रोशन दमोने (२१) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दमोने परिवारासाठी गणेश चतुर्थीचा दिवस आयुष्यभर न विसरता येणाऱ्या दुःखद आठवणीत बदलला. ज्या दिवशी घरात गणरायाच्या आगमनाचा आनंद असायला हवा होता, त्याच दिवशी चार जणांचे मृतदेह बाहेर काढावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने चव्हाट गल्लीसह संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. ही हृदयद्रावक घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आगीचे नेमके कारण तसेच दुर्घटनेबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

The post गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री चव्हाट गल्लीतील घराला भीषण आग appeared first on News 24 Tass Marathi.

‘बेळगावचा राजा’ चा भव्य आगमन सोहळा उत्साहात
हजारो भाविकांची उपस्थिती

ढोल-ताशांचा गजर आणि आकर्षक रोषणाईने शहर दुमदुमले

बेळगाव : ढोल – ताशांचा गजर, आकर्षक रोषणाई आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शुक्रवारी बेळगाव शहराचा परिसर भक्तिमय झाला. चव्हाट गल्लीतील ‘बेळगावचा राजा’ गणेशमूर्तीचा यंदा प्रथमच आयोजित करण्यात आलेला भव्य आगमन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

धर्मवीर संभाजी सर्कलपासून सुरू झालेली गणेशमूर्तीची मिरवणूक चव्हाट गल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भव्य गणेशमूर्ती, आकर्षक सजावट आणि झगमगणारी विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईचा उत्साह

मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह विशेष पाहायला मिळाला. ढोलासह विविध वाद्यांच्या तालावर तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लहान मुलांनीही ढोल वाजवत मिरवणुकीत रंग भरला. कुटुंबासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी गणेशमूर्तीचे दर्शन घेत हात जोडून बाप्पाला वंदन केले.

रात्रीच्या वेळी मिरवणूक मार्गावर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. बाप्पाच्या दर्शनासाठी जमलेला जनसागर, मोबाईलमध्ये मिरवणुकीची छायाचित्रे आणि व्हिडिओ टिपणारे तरुण तसेच सतत सुरू असलेला ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष यामुळे उत्सवाचे वातावरण अधिकच भारावून गेले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मिरवणुकीसाठी झालेली मोठी गर्दी लक्षात घेऊन शहर पोलिसांकडून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी वाहतुकीवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले.

चव्हाट गल्लीतील ‘बेळगावचा राजा’च्या भव्य आगमनाने यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आणखी एका आकर्षणाची भर पडली आहे. भक्ती, सांस्कृतिक उत्साह आणि तरुणाईचा जल्लोष यांचा सुंदर संगम घडवून आणणारी ही मिरवणूक बेळगावकरांसाठी विशेष आकर्षण ठरली.

The post ‘बेळगावचा राजा’ चा भव्य आगमन सोहळा उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

‘बेळगावचा राजा’चा आगमन सोहळा ४ सप्टेंबरला
बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालय येथे आज ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पोलीस प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवातील विविध धार्मिक, सांस्कृतिक, मिरवणूक, वाहतूक व शिस्तीच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी DCP नारायण बरमनी, ACP संतोष सत्यनायक तसेच मार्केट CPI C.N. कालीमिरची यांच्यासह पोलीस अधिकारी आणि मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाला बेळगाव शहरातील गणेशभक्तांमध्ये विशेष आकर्षण असून, मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बैठक आयोजित केली होती.

४ सप्टेंबरला आगमन सोहळा

बैठकीत ‘बेळगावचा राजा’ गणेशमूर्तीचा आगमन सोहळा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या आगमन सोहळ्यासाठी आवश्यक परवानगी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे यंदाच्या वर्षी चव्हाट गल्ली मंडळाच्या वतीने अनंत चतुर्थी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे जतन करण्याच्या उद्देशाने यंदा ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

चव्हाट गल्लीला बेळगावच्या गणेशोत्सवाच्या परंपरेत विशेष स्थान आहे. अनेक वर्षांपासून या परिसरात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य सुरू आहे. आधुनिकतेसोबतच आपल्या पारंपरिक वाद्यांचा, संस्कृतीचा आणि धार्मिक परंपरांचा वारसा जपण्याचा संदेश यंदाच्या निर्णयातून देण्यात येणार आहे.

अनंत चतुर्थीला वेळेत विसर्जन मिरवणुकीत सहभाग

याशिवाय अनंत चतुर्थीच्या दिवशी ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करून नियोजित वेळेत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मिरवणुकीला होणारा विलंब टाळून प्रशासनाने आखून दिलेल्या नियोजनाला सहकार्य करण्याची भूमिका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळ यांनी एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

पोलीस प्रशासनानेही या निर्णयाचे स्वागत केले असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाला प्रशासनाकडून विशेष सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

चव्हाट गल्लीच्या शिस्तबद्ध परंपरेचे कौतुक

बेळगाव शहरातील गणेशोत्सवात चव्हाट गल्लीचे विशेष महत्त्व असून, या परिसराने आजपर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा शिस्तबद्ध पद्धतीने जपल्या आहेत. चव्हाट गल्लीतील गणेशोत्सवाचा प्रभाव संपूर्ण बेळगाव शहरावर उमटत असल्याने या गल्लीतील गणेशोत्सव आणि मिरवणुकीचे नियोजन इतर मंडळांसाठीही आदर्श ठरावे, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, मिरवणुकीमध्ये शिस्त राहावी, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि धार्मिक-सांस्कृतिक वातावरण कायम राहावे, यासाठी प्रशासन आणि मंडळांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीस मान्यवरांची उपस्थिती

यावेळी माजी आमदार ॲड. अनिल बेनके, ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, उपाध्यक्ष प्रशांत कुडे, ज्योतिबा पवार, उमेश मेनसे, सरचिटणीस प्राचार्य आनंद आपटेकर, कार्याध्यक्ष सुनील जाधव, विनायक पवार, ऋषभ मोहिते, प्रियेश गोंडाडकर, निखिल पाटील, निलेश गुंडकल, पवन किल्लेकर, अभिषेक नाईक, अनंत हंगेरगेकर, प्रसाद पवार, रोहन जाधव, संदीप कामुले, गिरीश पाटील, शुभम तुडेकर, हरीश ताशिल्दार ,गौतम पाटील यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस प्रशासन आणि ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव शिस्तबद्ध, पारंपरिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पाडण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

The post ‘बेळगावचा राजा’चा आगमन सोहळा ४ सप्टेंबरला appeared first on News 24 Tass Marathi.

‘बेळगावचा राजा’ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

बेळगाव : येत्या १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज, १ सप्टेंबर २०२६ रोजी ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे यांची पोलीस आयुक्तालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी आगमन सोहळा, गणेश चतुर्थी आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासंदर्भात पोलीस आयुक्तांसोबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

सामाजिक प्रबोधनावर भर देण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन :

भेट घेतली असता पोलीस आयुक्त श्री. बोरसे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. “गणेश उत्सव साजरा करत असताना सर्वच मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. उत्सवाच्या काळात सामाजिक उपक्रम राबवून समाजाला दिशा देणारे प्रबोधनपर कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले. मार्गदर्शन करतानाच त्यांनी बेळगावमधील विविध गणेश मंडळांच्या आजवरच्या शिस्तबद्ध आणि कौतुकास्पद कार्याचा गौरवही केला.

उद्या महत्त्वाची बैठक :

उत्सवाचे नियोजन अधिक काटेकोर आणि शांततेत पार पाडण्यासाठी उद्या एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बेळगावचे डीसीपी (DCP) श्री नारायण बरमनी, माजी आमदार अनिल बेनके आणि ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून, यामध्ये सुरक्षितता आणि आगामी नियोजनावर विस्तृत चर्चा केली जाईल.

या सदिच्छा भेटीप्रसंगी ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीनाथ पवार, सरचिटणीस प्राचार्य आनंद आपटेकर, उपाध्यक्ष उमेश मनसे, कार्यवाह निखिल पाटील, खजिनदार ऋषभ मोहिते, तसेच गणेश मोहिते, हरीश तहसीलदार आणि मंडळाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

The post ‘बेळगावचा राजा’ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट appeared first on News 24 Tass Marathi.

चव्हाट गल्लीत अडीचशे वर्षांची श्रावण सोमवारची परंपरा कायम
बेळगाव : चव्हाट गल्ली येथे गेल्या अडीचशे वर्षांपासून चालत आलेली श्रावण सोमवारची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने जपली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही चव्हाट गल्लीतील नागरिकांनी आपल्या पूर्वजांनी जपलेल्या हिंदू धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचा वारसा कायम ठेवला आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासूनच गल्लीतील देवस्थान मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा व धार्मिक विधी* सुरू केले जातात. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गल्लीतील देव दादा मंदिरात ज्योतिर्लिंगाच्या मूर्तीची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर भक्तिभावाने *महाप्रसाद तयार करून त्याचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले.

पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर गल्लीतील भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी *माजी आमदार अनिल बेनके यांनी चव्हाट गल्लीतील या अडीचशे वर्षांच्या परंपरेचे कौतुक केले. ते म्हणाले की, आज आपण आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयच्या युगात प्रवेश केला असला, तरी चव्हाट गल्लीतील नागरिकांनी आपल्या पूर्वजांनी जपलेल्या हिंदू धार्मिक परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा वारसा आजही तितक्याच निष्ठेने पुढे नेला आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

चव्हाट गल्लीतील ज्येष्ठ नागरिक, भाविक, महिला व युवकांच्या सहभागामुळे हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. *परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा आदर्श चव्हाट गल्लीतील नागरिकांनी निर्माण केला आहे.

The post चव्हाट गल्लीत अडीचशे वर्षांची श्रावण सोमवारची परंपरा कायम appeared first on News 24 Tass Marathi.

‘बेळगावचा राजा’च्या नव्या रथाचे चव्हाट गल्ली येथे उत्साहात अनावरण
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बेळगावचा राजा’ नवसाला पावणाऱ्या गणरायाच्या आगमनाची तयारी मोठ्या दिमाखात सुरू असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी नव्या रूपात साकारण्यात आलेल्या भव्य रथाचे **उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, सुनील जाधव, विनायक पवार, प्रज्वल पाटील, कुशल पाटील आणि प्रीतम चौगुले प्रशांत कुडे उमेश मेणशे सत्यम नाईक निलेश गुंडकल यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात पूजन करून उत्साहात अनावरण करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाला देणगीदार प्रज्वल रमेशराव पाटील आणि कुशाल रमेशराव पाटील या बंधूंनी तब्बल अडीच लाख रुपये खर्च करून आकर्षक व भव्य रथ तयार करून दिला.त्यांच्या या योगदानाबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रीफळ, पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

रथाच्या अनावरण सोहळ्यावेळी परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात तसेच मंगलमय वातावरणात रथाचे पूजन व अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्यास चव्हाट गल्लीतील नागरिक, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. बेळगावचा राजा’च्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली असून, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी मंडळाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

देणगीदार प्रज्वल रमेशराव पाटील व कुशाल रमेशराव पाटील यांच्या या सामाजिक व धार्मिक योगदानाबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

The post ‘बेळगावचा राजा’च्या नव्या रथाचे चव्हाट गल्ली येथे उत्साहात अनावरण appeared first on News 24 Tass Marathi.