water supply Archives | News 24 Tass Marathi

तिलारीचे पाणी राकसकोपकडे वळविण्याच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील तिलारी जलविद्युत प्रकल्पातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळवून त्याचा शेतीसाठी वापर करण्याच्या प्रस्तावाने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या संदर्भात मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या प्रस्तावामागील कल्पना अशी आहे की, तिलारी विभागातील देवनाला, भांडोराणा आणि पानिपरमार कालव्यांमधून वीज निर्मितीनंतर पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात सोडण्याऐवजी, ते मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळवण्यात यावे. या पाण्याचा वापर चंदगड तालुक्यातील ८ गावांसह बेळगाव तालुक्यातील सुमारे २० ते २२ गावांमध्ये शेतीसाठी केला जाईल. ते फायदेशीर ठरेल असे बैठकीत कळवण्यात आले.

जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावतीने मलगौडा पाटील यांनी हा मुद्दा मांडला. माजी आमदार राजेश पाटील म्हणाले की, तिलारी प्रकल्पातील पाणी कोकणात सोडण्याऐवजी ते मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात आणल्यास दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना फायदा होईल. त्याचप्रमाणे, कर्नाटकातील म्हैसाळ प्रकल्पातून महाराष्ट्रातील जत तालुक्याला पाणीपुरवठा करण्याचा मुद्दाही याच्याशी जोडला जाऊ शकतो. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला हा प्रकल्प संयुक्त उपक्रम म्हणून हाती घेण्याचे आवाहन केले. या कल्पनेला यापूर्वी दिवंगत नरसिंगराव पाटील आणि माजी खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांनी पाठिंबा दिला होता. त्यांनी स्पष्ट केले की, आता खासदार जगदीश शेट्टर आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यामार्फत हा प्रकल्प पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी खासदार जगदीश शेट्टर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते.

माजी महापौर शिवाजीराव सुंठकर म्हणाले की, जानेवारी ते एप्रिल-मे या कालावधीत हिंडलगा पंपिंग स्टेशनमधून पाणी उपसून लक्ष्मी टेकडीकडे वाहून नेले जाईल. त्यामुळे, हा प्रस्तावित प्रकल्प शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि शेतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या प्रस्तावावर सखोल अभ्यास करून दुसरी बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले आहे.

या बैठकीला चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील, बेळगावचे माजी महापौर शिवाजीराव सुंठकर, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील इतर संबंधित पदाधिकारी आणि आजी – माजी नगरसेवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post तिलारीचे पाणी राकसकोपकडे वळविण्याच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपमध्ये वळविण्याची मागणी
बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन

चंदगड : बेळगाव शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. यासंदर्भात बेळगाव महापालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळविण्याची योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजाही प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतील, असा दावा शिष्टमंडळाने केला आहे.

बेळगावच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील पाणीपुरवठा लक्षात घेऊन या योजनेचा गांभीर्याने विचार करून आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

The post तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपमध्ये वळविण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावच्या पाणीपुरवठ्याबाबत जनतेने चिंता करू नये ; मंत्री सतीश जारकीहोळी
जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक

बेळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रगती आढावा बैठक पार पडली. यावेळी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीनंतर बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी, पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत जनतेने चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. पुढील पाच ते सात दिवस समाधानकारक पाऊस झाल्यास पुढील चार ते पाच महिन्यांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, सध्या राकसकोप जलाशयात ०.०४ टीएमसी पाणीसाठा असून पाणीपातळी हळूहळू वाढत आहे. आणखी तीन दिवस पाऊस सुरू राहिल्यास जलाशयाची पातळी १ ते १.५ फूट वाढण्याची शक्यता आहे. शहरातील सर्व प्रभागांना नियोजनानुसार पाणीपुरवठा केला जात असून, एकूण ३३ झोनपैकी ६ झोन पूर्णपणे कार्यरत आहेत, तर २७ झोनमध्ये आळीपाळीने दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी मार्कंडेय नदीवरील जलाशयात ०.००७८ टीएमसी पाणीसाठा झाल्याची माहिती दिली. पाऊस न पडला तरी २५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी पाणीपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना वेळेत माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यापूर्वी केवळ तीन दिवसांच्या बंदमुळे नागरिकांना तब्बल १५ दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याचा उल्लेख करत त्यांनी भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा टाळण्याचे निर्देश दिले.

बैठकीत जिल्ह्यातील पीक आणि मालमत्तेच्या नुकसानीचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापालिका आयुक्त कार्तिक एम. तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post बेळगावच्या पाणीपुरवठ्याबाबत जनतेने चिंता करू नये ; मंत्री सतीश जारकीहोळी appeared first on News 24 Tass Marathi.

चव्हाट गल्लीतील नागरिकांच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग
मोर्चा तात्पुरता स्थगित

बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती नळांद्वारे दूषित व गटारमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या गंभीर समस्येचे तातडीने निराकरण न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चव्हाट गल्लीतील नागरिकांनी दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली.

आज पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करून प्रशासनाला आठ दिवसांचा अवधी देण्याची विनंती केली. या कालावधीत दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाचा मान राखत, आज शुक्रवारी आयोजित करण्यात आलेला नागरिकांचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय चव्हाट गल्लीतील सर्व नागरिकांनी एकमताने घेतला.

मात्र, प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत समाधानकारक व कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, तर चव्हाट गल्लीतील सर्व नागरिक लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून निश्चित मुदतीत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

The post चव्हाट गल्लीतील नागरिकांच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग appeared first on News 24 Tass Marathi.

राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ
तरीही डेड स्टॉकमधूनच पाणीउपसा

गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २४ फूट कमी पाणीसाठा

शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता कायम

बेळगाव : गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एका फुटाची वाढ झाली असली, तरी जलाशय अद्यापही डेड स्टॉकच्या पातळीखाली असल्याने शहरासाठी डेड स्टॉकमधूनच पाणीउपसा सुरू आहे.

गतवर्षी जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे राकसकोप जलाशय वेगाने भरू लागला होता. मात्र यंदा मान्सून उशिराने सक्रिय झाल्याने जलाशयातील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत आहे. गतवर्षी याच दिवशी जलाशयाची पाणीपातळी २,४७१.७० फूट होती, तर यंदा ती केवळ २,४४७ फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २४ फूट कमी पाणीसाठा जलाशयात आहे.

गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे पाणीपातळीत काहीशी वाढ झाली असली, तरी ती अद्याप डेड स्टॉकच्या वर पोहोचलेली नाही. त्यामुळे शहराचा नियमित पाणीपुरवठा सध्या डेड स्टॉकमधील पाण्यावरच अवलंबून आहे.

हवामान खात्याने येत्या काही दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, राकसकोप जलाशयाच्या पाणीसाठ्यात लवकरच लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तोपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

The post राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ appeared first on News 24 Tass Marathi.

चव्हाट गल्लीतील दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न शुक्रवारपर्यंत सोडवा
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

स्थानिक रहिवाशांचा इशारा

बेळगाव : शहरातील चव्हाट गल्लीत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत, येत्या शुक्रवारपर्यंत समस्या निकाली काढावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा महिन्यांपासून परिसरातील मुख्य गटार वाहिनी फुटल्याने सांडपाणी पिण्याच्या पाणीपुरवठा वाहिनीत मिसळत आहे. त्यामुळे विष्ठामिश्रित दूषित पाणी नळांद्वारे घरांपर्यंत पोहोचत असून, नागरिकांना आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आजारी पडत असून, अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा दावा रहिवाशांनी केला.

यापूर्वी महानगरपालिकेकडून नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा होत होता. मात्र, पाणीपुरवठ्याची जबाबदारी खासगी कंपनीकडे गेल्यानंतर ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दूषित पाण्याचे व्हिडिओ पुरावे तसेच लेखी तक्रारी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना देऊनही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दरम्यान, परिसरातील भूमिगत गटार (यूजीडी) प्रकल्पाचे कामही रखडले असून, त्यामागे भ्रष्टाचार आणि कमिशनखोरी असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या कामासाठीचा निधी चार महिन्यांपूर्वी मंजूर झाला असतानाही अधिकारी आणि कंत्राटदार एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने कामाला गती मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या महिन्यातून केवळ दोन ते तीन वेळाच पाणीपुरवठा केला जात असून तेही दूषित असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांच्या तीव्र संतापाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास महिला आणि नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

The post चव्हाट गल्लीतील दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न शुक्रवारपर्यंत सोडवा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यात आजपासून ६० टक्के कपात
बेळगाव : राकसकोप जलाशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे बेळगाव शहरातील पाणीपुरवठ्यात शुक्रवारपासून ६० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. पाणीपातळी घटल्याने मृतसाठ्यातील पाण्याचा उपसा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

सद्यस्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ १५ दिवस पुरेल इतका असल्याचे स्पष्ट झाले आहे. जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास शहरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टंचाईमुळे यापूर्वी आठ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता दहा दिवसांच्या अंतराने करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार राकसकोप जलाशयातील पाणी ७ जुलैपर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा मंडळाने दिली आहे.

The post बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यात आजपासून ६० टक्के कपात appeared first on News 24 Tass Marathi.

डी. के. शिवकुमार आणि देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक
बेळगावच्या पाणीप्रश्नावर दोन मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार

बेळगाव : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या २० जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत दोन्ही राज्यांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे बेळगाव शहराच्या पाणीटंचाईचा प्रश्नही या बैठकीत उपस्थित केला जाणार असून, महाराष्ट्र सरकारकडे दोन टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, यंदा मान्सूनने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नसल्यामुळे बेळगाव शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. काही ठिकाणी मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पर्यायी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

बेळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून दोन टीएमसी पाणी मिळवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन पाणीप्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आगामी बैठकीकडे बेळगावकरांचे लक्ष लागले असून, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत कोणता निर्णय होतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

The post डी. के. शिवकुमार आणि देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

मुख्य जलवाहिनीला गळती
बेळगावातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बाधित

बेळगाव : राणी चन्नम्मा चौक परिसरातील प्रमुख जलवाहिनीला गळती लागल्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये बुधवारी (दि. ३) पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गळती दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याने संबंधित परिसरांमध्ये नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा करता आला नाही.

महापालिका प्रशासन आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना या परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात आधीच कमी आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांसमोर आता या नव्या अडचणीमुळे अधिक गैरसोय निर्माण झाली आहे.

शहरातील अनेक भागांत पहाटेच्या सुमारास पाणीपुरवठा केला जातो. मात्र, बुधवारी नियोजित वेळेत नळांना पाणी न आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. गळती दुरुस्तीच्या कामामुळे बागवान गल्ली, खडे बाजार, दरबार गल्ली, भोई गल्ली, पांगुळ गल्ली, मोमीन गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, रविवार पेठ, कलईगार गल्ली, कामत गल्ली, कसाई गल्ली, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोनवाळ गल्ली, शेरे गल्ली, मठ गल्ली, मुजावर गल्ली, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, महाद्वार रोड परिसर, संभाजी गल्ली, आठवले चाळ, एसपीएम रोड, वीरभद्रनगर, गुड्स शेड रोड, फारुकिया कॉलनी, अहमदनगर आणि पोलीस क्वार्टर्स परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवरील प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

The post मुख्य जलवाहिनीला गळती appeared first on News 24 Tass Marathi.

कृष्णा नदीकाठच्या गावांवर पाणीटंचाईचे संकट
चिक्कोडी : वाढत्या उन्हामुळे चिक्कोडी आणि रायबाग तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून, नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चिक्कोडी तालुक्यातील येडूर, कल्लोळ, मांजरी आणि इंगळी तसेच रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती, दिग्गेवाडी, भिरडी आणि चिंचली परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीत सध्या अत्यल्प पाणी शिल्लक असल्याचे चित्र आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सद्यस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात खड्डे खोदून पाणी काढावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून घेतलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तीव्र होत चालला आहे. या परिसरातील अनेक गावे पूर्णपणे कृष्णा नदीवर अवलंबून असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

कृष्णा नदीतील घटत्या पाणीसाठ्याचा परिणाम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांवरही होत आहे. कंचकरवाडी, दिग्गेवाडी, बिरडी, जलालपूर आणि यड्रॉव या गावांना पाणीपुरवठा करणारी योजना तसेच बेंडवाड, मेखळी, हुब्बरवाडी, मंटूरसह ११ गावांचा समावेश असलेली दुसरी योजना बंद पडण्याच्या स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.

सौंदत्ती परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमधील जलपातळीही लक्षणीयरीत्या घटली असून, कूपनलिकांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे.

या पार्श्वभूमीवर नदी पूर्णपणे आटण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारशी समन्वय साधून तातडीने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

The post कृष्णा नदीकाठच्या गावांवर पाणीटंचाईचे संकट appeared first on News 24 Tass Marathi.