tree plantation Archives | News 24 Tass Marathi

नेताजी युवा संघटनेच्यावतीने येळ्ळूरमध्ये वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

येळ्ळूर : येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने नेताजी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजेत यावेळी बोलताना प्रा. सी. एम गोरल म्हणाले, झाडे सजीवांसाठी आणि पर्यावरणातील घटकासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत असतात. प्राकृतिक संतुलन अबाधित ठेवण्यासाठी वृक्षारोपण फार महत्त्वाचे आहे. यावेळी बोलताना मुख्याध्यापक संजय मजूकर म्हणाले, नैसर्गिक परिसंस्था टिकून ठेवण्यासाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे. झाडामुळेच पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन मिळतो त्यामुळे झाडांची लागवड व संगोपन करणे खूप महत्त्वाचे आहे. यावेळी रवींद्र गिंडे, रघुनाथ मुरकुटे, कृष्णा पाटील, शंकर मुरकुटे, सी एम उघाडे, पांडुरंग घाडी, जोतिबा पाटील, अनिल मुरकुटे, जोतिबा गोरल उपस्थित होते. यावेळी आंबा, काजू , बदाम, चाफा, व निलगिरी आदी रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

The post नेताजी युवा संघटनेच्यावतीने येळ्ळूरमध्ये वृक्षारोपण appeared first on News 24 Tass Marathi.

‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे गणाचारी रुद्रभूमीत वृक्षारोपण मोहीम
‘ग्रो-ग्रीन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : शहरातील हरित आच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या वतीने ‘वीरशैव समाज सेवा समिती’च्या सहकार्याने सदाशिवनगर येथील गणाचारी रुद्रभूमी परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

यावेळी श्री. शिवाजी कागणीकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करत उपक्रमाचे कौतुक केले आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

वृक्षारोपणासाठी मोफत रोपे उपलब्ध करून देत मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या वतीने आरएफओ प्रशांत गौराणी यांचे आभार मानण्यात आले. तसेच योग्य वेळी निर्णय घेऊन मोहीम यशस्वी करण्यासाठी सातत्याने सहकार्य केल्याबद्दल रमेश कळसन्नावर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमात सहभागी झालेल्या ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या सदस्य आणि स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सातत्य ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

The post ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे गणाचारी रुद्रभूमीत वृक्षारोपण मोहीम appeared first on News 24 Tass Marathi.

फ्रेंडशिप डे निमित्त पाही व्हाईब्स फाउंडेशनचा ‘ग्रो ग्रीन’ उपक्रम
श्री भगवान महावीर गोशाळेत २०० देशी वृक्षांची लागवड

स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव : फ्रेंडशिप डेचे औचित्य साधत पाही व्हाईब्स फाउंडेशनने ‘श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना – अखिल कर्नाटक जिल्हा जनजागृती वेदिके ट्रस्ट’च्या सहकार्याने बेळगाव येथील श्री भगवान महावीर गोशाळा परिसरात ‘ग्रो ग्रीन’ उपक्रमांतर्गत २०० देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

गोशाळेच्या हिरव्यागार परिसरात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात फाउंडेशनचे स्वयंसेवक, सदस्य आणि हितचिंतकांनी उत्साहाने सहभाग घेत २०० स्थानिक वृक्षांची लागवड केली. मैत्री दिन एका वेगळ्या पद्धतीने साजरा करत भविष्यात पर्यावरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वृक्षांच्या रूपाने मैत्रीची आठवण जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी पाही व्हाईब्स फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका रक्षा यू. यांनी सर्व सहभागी, मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या उपक्रमासाठी श्री. सतीश नाईक (जिल्हा सचिव), श्री. जी. आर. सोनर (अध्यक्ष), श्री. सुभाष पी. सी. , श्री. शंकर अरगोळ तसेच अखिल कर्नाटक जिल्हा जनजागृती वेदिके ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे फाउंडेशनतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

तसेच, पाही व्हाईब्स फाउंडेशनचे सदस्य शिवानंद हिरेमठ यांच्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. श्री. राजेंद्र कथारिया आणि श्री भगवान महावीर गोशाळेचे अध्यक्ष मनोज संचेती यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल तसेच लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

‘ग्रो ग्रीन’ हा पाही व्हाईब्स फाउंडेशनचा महत्त्वाकांक्षी पर्यावरण संवर्धन प्रकल्प असून, अधिक हरित आणि पर्यावरणपूरक समाज घडविण्याचा त्यामागील उद्देश आहे. लागवड करण्यात आलेले २०० देशी वृक्ष भविष्यात बेळगावच्या पर्यावरणात हिरवाई आणि सावलीची भर घालतील तसेच पुढील पिढ्यांसाठी अधिक आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास हातभार लावतील, असा विश्वास फाउंडेशनने व्यक्त केला आहे.

फाउंडेशनतर्फे भविष्यातही शहर व परिसरातील विविध भागांत अशाच वृक्षारोपण मोहिमा सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

The post फ्रेंडशिप डे निमित्त पाही व्हाईब्स फाउंडेशनचा ‘ग्रो ग्रीन’ उपक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

गुरुपौर्णिमेनिमित्त पाही व्हाईब्स आणि अमूल्य बूंद फाउंडेशन तर्फे ‘गुरुवनम्’ उपक्रम
४५ वृक्षांची लागवड ; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बेळगाव : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पाही व्हाईब्स आणि अमूल्य बूंद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील निडगळ (बरगाव) येथील माध्यमिक विद्यालयात ‘गुरुवनम्’ या विशेष वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणालाही गुरु मानण्याचा संदेश देत विविध प्रकारच्या ४५ वृक्षांची लागवड करण्यात आली.

उपक्रमाअंतर्गत स्थानिक हवामानाला पूरक सावलीची झाडे, कुंपणासाठीची झाडे, फुलझाडे, शोभेची झाडे आणि इतर विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः एक रोप लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली. वृक्षारोपणाचा उद्देश केवळ अधिकाधिक झाडे लावणे नसून, लावलेले प्रत्येक रोप जगविणे हा असल्याने प्रतीकात्मक स्वरूपात ४५ रोपांची लागवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी शाळेतील शिक्षकांच्या निस्वार्थ सेवेलाही विशेष गौरव करण्यात आला. अत्यल्प मानधनावर, तर काही शिक्षक विनामोबदला विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत असल्याचे पाहून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समाजासाठी समर्पितपणे कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींचा सन्मान होणे ही काळाची गरज असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

या उपक्रमाला पाही व्हाईब्स फाउंडेशनचे शिवानंद हिरेमठ, विश्वनाथ हिरेमठ तसेच संस्थेच्या संस्थापक-संचालिका रक्षा यू उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमूल्य बूंद फाउंडेशन, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

The post गुरुपौर्णिमेनिमित्त पाही व्हाईब्स आणि अमूल्य बूंद फाउंडेशन तर्फे ‘गुरुवनम्’ उपक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा सेवाभावी उपक्रम
व्हॅक्सिन डेपो येथे रोटरी परिवाराच्या सहभागातून वृक्षारोपण अभियान

बेळगाव : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे व्हॅक्सिन डेपो, बेळगाव येथे ‘रोटरी परिवार वृक्षारोपण अभियान’ उत्साहात पार पडले. रोटरी सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून, अधिक हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण घडविण्याचा सामूहिक संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या अभियानाद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदवावा, असा संदेश देण्यात आला. रोटरी परिवारातील सदस्यांनी एकत्र येत विविध ठिकाणी वृक्षांची लागवड केली आणि त्यांचे संगोपन करण्याचाही निर्धार व्यक्त केला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अभय पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल क्लबतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच रोटेरियन अनुपमा कल्लोळ, रोटेरियन रेणुका मोत्रे, रोटेरियन सविता वेसणे, रोटेरियन स्मिता पाटील आणि रोटेरियन सुजाता हुनकुंते यांच्या सक्रिय सहभागाचे आणि मोलाच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल इव्हेंट चेअर रोटेरियन रक्षिता उपाध्ये यांचा विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी म्हणाल्या, “आज लावलेले प्रत्येक रोपटे हे उद्याच्या हिरव्यागार भविष्यासाठी दिलेले एक वचन आहे. भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे ही रोटरीची दीर्घकालीन बांधिलकी आहे.”

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा विश्वास आहे की, अशा सेवाभावी उपक्रमांमुळे केवळ हरित क्षेत्रात वाढ होत नाही, तर समाजात पर्यावरणपूरक आणि जबाबदार जीवनशैलीची जाणीवही निर्माण होते. समाजावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम घडविणारे उपक्रम राबविण्यासाठी क्लब भविष्यातही कटिबद्ध राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

The post पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा सेवाभावी उपक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा संदेश ; विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

बेळगाव : पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात अधिक दृढ व्हावी आणि भावी पिढ्यांसाठी हरित व शाश्वत भविष्य घडावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली येथील शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या मोहिमेचे नेतृत्व क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांनी केले. क्लबच्या सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर प्रकल्पाच्या अध्यक्षा म्हणून रोटेरियन सविता हेब्बार यांनी संपूर्ण उपक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे समन्वयन क्लबच्या चार्टर अध्यक्षा रोटेरियन शीतल चिलमी यांनी प्रभावीपणे पार पाडले.

उपक्रमात रोटेरियन शिवलीला कांपळी, रोटेरियन रक्षा उपाध्ये आणि रोटेरियन सविता वेसणे यांनीही सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण केले. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळी आणि कार्यक्रम समन्वयक सौ. प्रवीणा यांचा रोटरी क्लबतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांनी वृक्षारोपण ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने चालणारी चळवळ असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी लावलेल्या प्रत्येक रोपाची जपणूक करून त्याचे संगोपन करावे आणि निसर्गाचे जबाबदार रक्षक बनावे, असे त्यांनी आवाहन केले.

पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक बांधिलकी आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी व सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूरमध्ये समाज सारथी संघटनेचे वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

येळ्ळूर : येथील समाज सारथी सेवा संघटनेच्या वतीने रविवारी (दि. १२) रोजी नेताजी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. संघटनेचे अध्यक्ष प्रा.सी. एम. गोरल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी संघटनेचे सदस्य अनिल हुंदरे यांनी वृक्षारोपणामागील उद्देश स्पष्ट करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. प्रकाश आष्टेकर यांनी परिसर स्वच्छ, सुंदर व हिरवागार ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे सांगितले. अभियंते हणमंत कुगजी यांनी, निसर्ग हाच जीवनाचा खरा आधार असून वृक्षारोपण म्हणजे निसर्गाची जोपासना असल्याचे प्रतिपादन केले. मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांचे अस्तित्व निसर्गावर अवलंबून असल्याने पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले. निवृत्त शिक्षक गोविंद काळसेकर यांनीही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी शिवाजी सायनेकर, दुद्दाप्पा बागेवाडी, सतीश पाटील, यल्लुप्पा पाटील, डॉ. तानाजी पावले, बळीराम देसुरकर, हणमंत पाटील, प्रकाश पाटील, सुभाष मजुकर, सुरज गोरल, कृष्णा टक्केकर, कृष्णा बिजगरकर, गंगाधर पाटील यांच्यासह समाज सारथी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंबा, काजू , बदाम, चाफा, व निलगिरी आदी रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

The post येळ्ळूरमध्ये समाज सारथी संघटनेचे वृक्षारोपण appeared first on News 24 Tass Marathi.

शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण
कागवाड : पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज ओळखून येथील शिवानंद महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालय परिसर स्वच्छता, पर्यावरण जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीसी कॅडेट्सनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्ती याविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणांसह परिसरातून फेरी काढली. या फेरीला विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आर. आलगोंडी यांनी उपस्थितांचे स्वागत करून जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार यांच्याहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती या समस्यांमागे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.” त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही केले.

कार्यक्रमास डॉ. चंद्रशेखर वाय., एनएसएस कार्यक्रम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात महाविद्यालयातील ५० हून अधिक एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची शपथ घेतली. पर्यावरण संरक्षणाचा दृढ संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरण रक्षणाचा संकल्प आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

The post शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण appeared first on News 24 Tass Marathi.

सुळगा (हिं.) येथे युवकांकडून स्मशानभूमीत वृक्षारोपण
सुळगा (हिं.) / वार्ताहर

पर्यावरण संवर्धनाची जागृती व्हावी, मोकळ्या स्मशानभूमी परिसरात वृक्ष वाढ व्हावी, या उद्देशाने पर्यावरणप्रेमी युवकांकडून सुळगा (हिं.) येथील स्मशानभूमीत रोपांची (वृक्ष) लागवड करण्यात आली. देवस्की पंच कमिटी अध्यक्ष बाळू मोनाप्पा पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते परशराम यल्लाप्पा पाटील यांनी ही रोपे उपलब्ध करून दिल्याबद्दल गावच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

या मोहिमेत विलास जांबोटकर, सुभाष अधिकारी, ग्रा. पं. सदस्य इराप्पा (पप्पू) भरमा पाटील, मंजुनाथ सुतार ,भरमा कोवाडकर, यल्लाप्पा कोवाडकर, मोहन पाटील, बाळू पाटील, परशराम पाटील यांच्यासह युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

The post सुळगा (हिं.) येथे युवकांकडून स्मशानभूमीत वृक्षारोपण appeared first on News 24 Tass Marathi.