Shri Ganesh Chaturthi Archives | News 24 Tass Marathi

आगामी गणेशोत्सवासाठी मूर्तींना पंधरा फुटांची मर्यादा
गणेशमूर्तींच्या उंचीबाबत प्रशासनाकडून निर्बंध

यावर्षी सहा महिन्यांपूर्वीच गणेशमूर्तींच्या उंचीबाबत प्रशासनाकडून निर्णय

बेळगाव / प्रतिनिधी

दरवर्षी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशमूर्तींच्या उंचीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. उंच मूर्तींमुळे विसर्जनावेळी अडचणी निर्माण होत असल्याने प्रशासनाने यंदा आगाऊ निर्णय घेत सर्व गणेशमूर्ती १५ फुटांपेक्षा कमी उंचीच्या ठेवाव्यात, अशी सूचना केली आहे. ही माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

सामान्यतः मंडळांकडून गणेशमूर्तींची उंची तीन-चार महिने आधीच निश्चित केली जाते. त्यामुळे यंदा सहा महिने आधीच हा निर्णय जाहीर करून नियोजन सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांचे पदाधिकारी, महामंडळाचे प्रतिनिधी आणि मूर्तिकार यांची बैठक पार पडली. या बैठकीत उंच मूर्तींमुळे विसर्जन प्रक्रियेला विलंब होत असल्याचे निदर्शनास आले. काहीवेळा मिरवणुका ३६ तासांपर्यंत लांबत असल्याने प्रशासनावर ताण वाढतो. उंची मर्यादित ठेवल्यास विसर्जन वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त एन. व्ही. बरमनी यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू होणे महत्त्वाचे आहे. मूर्तीची सुंदरता उंचीत नसून भक्तीत असते, असे सांगत त्यांनी वेळेचे नियोजन करण्यावर भर दिला.

बैठकीत मूर्तिकार संजय किल्लेकर, विनायक पाटील यांनी आपली भूमिका मांडली. तसेच महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, विजय जाधव, नेताजी जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही सूचना केल्या. शहरातील विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण मंडळांच्या प्रवेशावरही निर्बंध :

गणेशमूर्तींची उंची शहराबरोबरच ग्रामीण भागातही वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागात विसर्जनाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे काही मंडळे शहरात विसर्जनासाठी येतात. मागील वर्षी हिंडलगा, पिरनवाडी, कंग्राळी परिसरातील काही मंडळांनी कपिलेश्वर येथे विसर्जन केले होते, ज्यामुळे मोठा विलंब झाला. यामुळे यंदा ग्रामीण भागातील मंडळांना शहरात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्तांनी मंडळांना केलेल्या सूचना :

गणेशमूर्ती १५ फुटांपेक्षा लहान असावी

डीजे लावण्यावर निर्बंध

विसर्जन मिरवणुकीला वेळेत सुरुवात करा

विसर्जनावेळी मोठे डेकोरेशन नसावे

नवीन मंडळांना परवानगी मिळणार नाही

ग्रामीण भागातील मंडळांना शहरात येण्यास निर्बंध

The post आगामी गणेशोत्सवासाठी मूर्तींना पंधरा फुटांची मर्यादा appeared first on News 24 Tass Marathi.

आगामी गणेशोत्सवापूर्वी बेळगाव शहरातील विसर्जन तलावांचे विस्तारीकरण करा
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे महापालिकेला पत्र

विसर्जन व्यवस्थेबाबत प्रशासनात हालचालींना वेग

बेळगाव / प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश विसर्जन व्यवस्थेबाबत प्रशासनात हालचालींना वेग आला आहे. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून प्रमुख विसर्जन स्थळांची खोली वाढविणे व त्यांचे विस्तारीकरण तातडीने करण्याची मागणी केली आहे.

शहरात दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत असून भव्य मूर्तींची उंची आणि आकारही वाढत आहेत. मात्र त्या मानाने विसर्जन तलावांची क्षमता मर्यादित असल्याने विसर्जन प्रक्रियेत मोठा विलंब होतो. परिणामी वाहतूक कोंडी, गर्दी आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात.

गेल्या काही वर्षांपासून विसर्जनाच्या दिवशी तलावांची अपुरी खोली व रुंदी ही समस्या ठरत आली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाची धावपळ सुरू होते; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी पाठविलेले पत्र महत्त्वपूर्ण मानले जात आहे. महापालिकेने याची तातडीने दखल घेऊन विसर्जन तलावांचे खोलीकरण व विस्तारीकरण आत्तापासूनच हाती घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

The post आगामी गणेशोत्सवापूर्वी बेळगाव शहरातील विसर्जन तलावांचे विस्तारीकरण करा appeared first on News 24 Tass Marathi.

बाप्पांना भक्तिभावाने निरोप…!
गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष

तब्बल ३० तासांहून अधिक वेळ मिरवणूक

बेळगाव / प्रतिनिधी

बाप्पा मोरयाचा गजर, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशा आणि बंदी असूनही डीजेचा गजर तसेच पुढच्या वर्षी लवकर या… अशी साद घालत जल्लोषी पण तितक्याच भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा श्रींची विसर्जन मिरवणूक तब्बल ३० तासांहून अधिक वेळ चालली आणि अकरा दिवस आनंद, उत्साह ,चैतन्याने बहरलेल्या गणेशोत्सवाची बाप्पांना निरोप देत सांगता झाली.

प्रारंभी हुतात्मा चौक येथून विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापालिका आयुक्त शुभा बी., आमदार आसिफ सेठ, माजी आमदार अनिल बेनके, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, गणेशपुर येथील रुद्रकेसरी मठाचे हरिगुरु महाराज, महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण – पाटील, ॲड. हनुमंत कोंगाली, विजय जाधव आदी उपस्थित होते. श्री गणेशाची आरती केल्यानंतर श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला होता.

मिरवणूक मार्ग सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते व गणेशभक्तांच्या वर्दळीने गजबजला होता. रात्री नऊनंतर मिरवणूक मार्गावर गर्दी वाढली. पहिला गणपती संयुक्त महाराष्ट्र चौकाचा शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमूर्तीचे कपिलेश्वर तलावात सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले. त्यानंतर विसर्जनस्थळी यंत्रणा सज्ज असूनही श्रीमूर्तीची प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या एकेक श्रीमूर्ती दाखल होऊ लागल्या.

मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर आणि डीजेचीही साथ असल्याने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. शनिवारी रात्री विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी झाली होती. शहराबाहेर विविध ठिकाणी बॅरिकेडस् लावून वाहनांना मिरवणूक मार्गाकडे येण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे वाहने दूरवर थांबवून चालत येत श्रीमूर्ती पाहण्याचा आनंद घेतला जात होता. मिरवणूक मार्गावर शहरासह परगावच्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होती.

घरगुती गणेश विसर्जन :

शनिवारी सकाळपासूनच नागरिकांनी घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी गर्दी केली. कपिलेश्वर तलाव, जक्कीन होंड तलाव, शहापूर तलाव, वडगाव तलाव, अनगोळ तलाव, नाथ पै तलाव, जुने बेळगाव येथील विसर्जन तलावात घरातील श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. भाविकांनी कार, रिक्षा, टेम्पो बैलगाडी, सायकल ट्रॅक्टर दुचाकी यादी इतर खाजगी वाहनांतून श्रीमूर्ती विसर्जनासाठी आणल्या. या मार्गावर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. तर काही ठिकाणी साऊंड सिस्टम लावून वाजत – गाजत मूर्ती आणण्यात येत होत्या. भाविकांनी गुलालाचीही उधळण केली.

हुतात्मा चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर काही मोजकीच गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाली. मारुती गल्लीमध्ये एकही गणेश मूर्ती दाखल न झाल्याने सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक मार्गावर शुकशुकाट जाणवत होता. सुरुवातीला सहभागी झालेल्या मंडळाचे लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगावच्यावतीने श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते.

माळी गल्लीच्या मनाच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करून या मंडळांनी सर्वप्रथम श्रीमूर्ती विसर्जन करण्याचा मान मिळवला. त्यानंतर संथगतीने अन्य मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन सुरू झाले.

रात्री १० च्या दरम्यानच मिरवणुकीला प्रारंभ

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरातील श्रीमूर्तींचे विसर्जन प्रथम केले. आणि नंतर सार्वजनिक त्रिमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मंडपात दाखल झाले. त्यामुळे खऱ्या अर्थाने रात्री १० च्या दरम्यानच मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोलताशा पथकांचे सादरीकरण पाहण्यासाठी लोकांनी आवर्जून गर्दी केली होती. त्यामुळे या पथकांना प्रोत्साहन मिळाले. याशिवाय करेला,लाठीकाठी, लेझिमचे प्रात्यक्षिकही पहावयास मिळाले. काही नागरिकांनीही सहभागी होऊन या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.

रात्री ११ नंतर मिरवणुकीत नागरिकांची गर्दी :

घरगुती गणपतीचे विसर्जन केल्यानंतर नागरिक सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत होते. रात्री ११ नंतर मिरवणुकीत नागरिकांनी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या साथीने यंदाची मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ढोलताशा पथकांच्या वादकांनी आपल्या वादनाने उपस्थित त्यांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक पाहण्यासाठी प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये गर्दी झाली होती तसेच रस्तेही गर्दीने फुलले होते.

शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स :

दरम्यान वाहनांची गर्दी रोखण्यासाठी आणि नागरिकांना सहजपणे श्रीमूर्तींची विसर्जन मिरवणूक पाहता यावी यासाठी पोलीस प्रशासनाने मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या आडव्या रस्त्यांची बॅरिकेड्स लावून अडवणूक केली होती. याची कल्पना नसल्याने वाहनदारांना मात्र लांबचा फेरा मारावा लागत होता. यामुळे नागरिकांना समस्या निर्माण झाल्या होत्या. पोलिसांकडून शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते.

पावसाने उघडीप दिल्याने उत्साहाला उधाण :

अधून मधून होत असलेल्या पावसाने श्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान उघडीप दिल्याने उत्साहाला उधाण आले होते. पावसाचा व्यत्याने आल्याने मिरवणूक योग्यरित्या पार पडली. पावसाच्या उघडी पिंमुळे नागरिकही मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. लहान मुलांसह वृद्धांपर्यंत सर्वजण मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून प्रसादाचे वाटप :

बेळगावची श्री विसर्जन मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी विविध राज्य व भागातून नागरिक सहभागी होत असतात. यामुळे मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध ठिकाणी प्रसाद बनवून ते पाकीट बंद करून वाहनांच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. याचा लाखो भाविकांनी लाभ घेतला.

ग्रहणामुळे श्रीमूर्ती विसर्जन दोन तासांसाठी थांबविले :

दरम्यान, ग्रहण लागले म्हणून साडेदहापासून श्रीमूर्ती विसर्जन दोन तासांसाठी थांबविण्यात आले. ११.३० वाजून गेले तरी अद्याप चौदा श्रीमूर्तींचे विसर्जन करावयाचे शिल्लक होते.

विसर्जनाला उच्चांकी वेळ :

यंदा विसर्जन मिरवणूक उच्चांकी वेळ म्हणजे तब्बल ३० तासांहून अधिक वेळ चालली. कपिलेश्वर जुन्या व नव्या तलावावर नऊ क्रेनची सोय करण्यात आली होती. श्रीमूर्ती विसर्जनस्थळी आल्यानंतर आरती करून क्रेन लावण्यात वेळ जात होता. प्रशासन व महामंडळाने दक्षता घेऊनही विसर्जन प्रक्रिया संथगतीने सुरू राहिली. शनिवारी सायंकाळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी विसर्जन तलावाची पाहणी करून गर्दी व गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या. रात्री एक वाजता विसर्जन तलावावर गर्दी झाल्यानंतर बोरसे यांनी स्वत: तीन तास थांबून नियोजन केले.

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवले होते. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. जलद कृती दलाचे जवानही लक्ष वेधून घेत होते. गणेशभक्तांचा उत्साह आणि संथगतीने सुरू असलेले श्रींचे विसर्जन यामुळे सार्वजनिक श्रीमूर्तींना रांगेत थांबावे लागले. रविवारी सकाळी सातपर्यंत कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ तलावावर ११० श्रीमूर्तीचे विसर्जन झाले होते.

दोन्ही तलावावर नऊ क्रेन सेवेत होत्या. विसर्जन सुरू असताना दुर्घटना घडू नये, यासाठी लाईफ जॅकेट व जलतरणपटू तैनात होते. रविवारी रात्री आठ वाजता पंधरा गणेशमूर्ती विसर्जन होणे बाकी होते. यानंतर रात्री दहा वाजता महापालिकेच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर विसर्जनाची सांगता झाली. एकूणच यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला दरवर्षीपेक्षा अधिकच विलंब झाला.

The post बाप्पांना भक्तिभावाने निरोप…! appeared first on News 24 Tass Marathi.

नाथ पै चौक मंडळांने लोकमान्यांना अभिप्रेत उत्सव साजरा केला ; प्रकाश नंदीहळी
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव अलीकडच्या काही वर्षात डॉल्बी म्हणजे गणेशोत्सव असे एक समीकरण बनलेले पाहायला मिळते.उत्सवातून प्रबोधनात्मक विधायक कार्य घडणे आवश्यक आहे. मात्र असे कार्य कमी घडताना दिसत आहे. मात्र, बॅरिस्टर नाथ पै चौक मंडळांने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा केला आहे असे प्रतिपादन, विश्व भारत सेवा समितीचे कार्यकारी प्रकाश नंदीहळी यांनी बोलताना केले.

बॅरिस्टर नाथ पै चौक गणेशोत्सव मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाने अनेक सामाजिक सांस्कृतिक विधायक आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिकेचे शहापूर विभागातील आरोग्य निरीक्षक हनुमंत पाटील, महापालिकेच्या सेवेतून नुकतेच निवृत्त झालेले श्याम चौगुले तसेच शहापूर पोलीस स्थानकाचे एएसआय धनकवडे यांचाही मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष सचिन रंगरेज परशुराम घाडी , प्रदीप मुजूकर, लक्ष्मण छत्र्याण्णावर,हिरालाल चव्हाण, यल्लाप्पा बसरीकट्टी, अण्णाप्पा मुगळीकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने सायंकाळी प्रकाश नंदीहळी, शेखर करंबळकर, दीपक धामणेकर, किरण कदम, एम. एन. पाटील, एम.बी बाचीकर, वासुदेव कदम, शंकर चव्हाण आदी शिक्षकांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्याहस्ते शाल भेटवस्तू आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित सन्माननीय शिक्षकांनी मंडळांने सुवर्ण महोत्सवी वर्षात राबविलेल्या विधायक उपक्रमांची प्रशंसा केली. मंडळाने बेळगावातील इतर मंडळांसमोर कार्याचा आदर्श निर्माण केल्याचेही मान्यवर शिक्षकांनी मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी शेखर करंबळकर यांनी मंडळाला ५०००१ रुपयांची देणगी दिली.

The post नाथ पै चौक मंडळांने लोकमान्यांना अभिप्रेत उत्सव साजरा केला ; प्रकाश नंदीहळी appeared first on News 24 Tass Marathi.

नऊ तलावांत आज ३७० हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन
बेळगाव / प्रतिनिधी

आठ – दहावेळा विसर्जन मार्गाची पाहणी केल्यानंतर महापालिका शहरातील गणेशमूर्ती विसर्जन सुरळीत पार पडावे, यासाठी प्रयत्न करत आहे. शहरातील ९ विसर्जन तलावांत गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. विसर्जनावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी चोवीस तास तत्पर असणार आहेत. गणेश विसर्जन काळात कचरा समस्या निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आरोग्य स्थायी समितीची विशेष बैठक घेण्यात आली आहे.

याआधीही गणेशोत्सवासाठी महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. आता विसर्जन केवळ काही तासांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे, बेळगावची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी महापालिकेनेही कंबर कसली आहे. महापालिकेच्या आरोग्य, बांधकाम, महसूल आणि इतर विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना कामे नेमून देण्यात आली आहेत. महापालिकेला पोलिस, हेस्कॉम, पाणीपुरवठा मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांची साथ लाभणार आहे. महापालिकेने विसर्जनासाठी तलावांवर १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याठिकाणी मूर्ती विसर्जनाला मदत करणे, आवश्यक खबरदारी घेणे, लोकांना सूचना करणे, स्वच्छता राखणे, अशी कामे त्यांना नेमून देण्यात आली आहेत.

दिवसा आणि रात्री दोन टप्प्यांत हे कर्मचारी काम करणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २४ तासांची सेवा बजावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रेक्षक गॅलरीची सोय महापालिकेच्या वतीने गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्याची सोय व्हावी, यासाठी कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अधिकाधिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी मिरवणुकीने जात असतात. त्याठिकाणी स्वागत कक्ष आणि प्रेक्षक गॅलरीची सोय करण्यात आली आहे. २४ क्रेन मदतीला शहरात प्रामुख्याने कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ या दोन विसर्जन तलावांत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. यंदा मूर्तीची उंची अधिक असल्यामुळे महापालिकेने विसर्जनावेळी कोणताही अडचण होऊ नये यासाठी क्रेनची सोय केली

आहे.

The post नऊ तलावांत आज ३७० हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन appeared first on News 24 Tass Marathi.

वेळ आता निरोपाची…तयारी श्री विसर्जन सोहळ्याची
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर आणि उपनगर मधील वडगाव, टिळकवाडी, अनगोळ, शहापूर आणि ग्रामीण भागात अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. उद्या शनिवार रोजी होणाऱ्या या मिरवणूक कार्यक्रमासाठी गुरुवार आणि शुक्रवार पासूनच धर्मवीर संभाजी महाराज चौक परिसर सजू लागला आहे. येथे विविध राजकीय पक्ष, मंडळे आणि संस्थांतर्फे श्री मूर्तीचे स्वागत मंडप उभारण्यात येत आहेत. आकर्षक सजावटीसह या मंडपांमधून श्रींचे स्वागत करण्यात येणार आहे. गणेश भक्तांनी या स्वागत मंडपांच्या उभारणीला सकाळपासूनच सुरुवात केली होती. धर्मवीर संभाजी चौक हा मिरवणुकीतील प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. शहर व परिसरातील सर्वच गणेशमूर्ती या मार्गांनी पुढे जात असल्याने भक्तांची प्रचंड गर्दी येथे लोटते. नागरिकांना मिरवणूक सुरळीत व आरामात पाहता यावी, यासाठी महापालिकतर्फे प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येते. याशिवाय चौकाभोवती सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात येणार असून वाहतुकीचेही नियोजन पोलिस विभागाकडून करण्यात येणार आहे.

मिरवणुकीत विविध ढोल – ताशा पथकांसह दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीला सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक रंगत लाभणार आहे. बेळगावात उद्या शनिवारी दि. ६ गणपती विसर्जन मिरवणूक आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गणपती विसर्जन मिरवणूक नरगुंदकर भावे चौकातून सुरू होणार असून मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, टिळक चौक, हेमुकलानी चौक, शनिमंदिरमार्गे कपिलेश्वर उड्डाणपूलवरुन कपिलेश्वर तलावात गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक वाहतुकीत अडथळा येऊ नये यासाठी शनिवारी दुपारी दोनपासून मिरवणूक संपेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील एक पदरी व दोन पदरी रस्ते पूर्ण मिरवणुकीसाठी राखीव असतील. दुपारी २ पासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असणार आहे. चन्नम्मा चौक,काकतीवेस, गणपती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, हुतात्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक, कपिलेश्वर उड्डाणपूल तसेच कॅम्प परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहन पार्किंगला बंदी असेल. सर्व वाहनधारक आणि नागरिकांनी सहकार्य करावे. पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे. ९ तलावांसाठी २४ क्रेन असणार आहेत. मूर्ती विसर्जन क्रेनच्या साहाय्याने होणार असल्यामुळे अधिक वेळ लागणार नाही, असा महापालिकेचा अंदाज आहे.

The post वेळ आता निरोपाची…तयारी श्री विसर्जन सोहळ्याची appeared first on News 24 Tass Marathi.

कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळातर्फे प्रा. आनंद आपटेकर यांचा सत्कार
बेळगाव : येथील छत्रपती शिवाजी रोड कोनवाळ गल्ली, सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ, श्री राजा शिवछत्रपती युवक मंडळाच्या वतीने गुरूवार दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने रुग्णसेवक प्राचार्य आनंद अरुण आपटेकर वैद्यकीय समन्वय, म. ए. समिती व कार्यकारी सचिव मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेळगाव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी व लक्ष्मण किल्लेकर यांनाही मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

गतवर्षी ५ सप्टेंबर २०२४ रोजी कोनवाळ गल्लीतील प्रशांत हांडे यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. यासाठी विविध प्रसार माध्यमांमधून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. तेव्हा प्रशांत यांना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी विलंब न करता दोन लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. यंदाच्या गणेशोत्सवात त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. आता प्रशांत हांडे यांची प्रकृती पूर्वीप्रमाणे ठीक असून ते आपल्या व्यवसायात कार्यरत आहेत.

तेव्हा प्रा. आनंद आपटेकर यांनी केलेल्या सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना प्रा. आनंद आपटेकर म्हणाले, घरातील प्रमुख व्यक्तीवर संकट आले म्हणजे पूर्ण घरावर संकट आल्यासारखे असते, म्हणून असे संकट कोणावर येऊ नये अशी प्रार्थना त्यांनी विघ्नहर्त्याकडे केली. तसेच संकट आलेच तर त्या रुग्णाला मदत करून संकटाला सामोरे जाण्यासाठी त्याला धैर्य देऊ असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रा. आपटेकर यांनी समिती नेते रमाकांतदादा कोंडुसकर, तज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने,मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांचे आभार मानले. याप्रसंगी छत्रपती शिवाजीरोड मंडळाचे अध्यक्ष विनायक पवार, मदन अष्टेकर, कुंज नावगेकर, महेश नावगेकर, कुणाल हांडे, आकाश हांडे, प्रदीप किल्लेकर, शिवम उरणकर व महिला मंडळ उपस्थित होते.

The post कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळातर्फे प्रा. आनंद आपटेकर यांचा सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

आंबेवाडीत साकारला जगन्नाथ मंदिराचा देखावा !
मण्णूर / वार्ताहर

गणेशोत्सव मोठ्या उत्साह आणि मंगलमय वातावरण साजरा केला जात आहे. शहराबरोबरच बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातही श्री गणेशाची मोठ्या थाटात स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त गावातील घरोघरी आकर्षक आरास करण्यात आली आहे. यानिमित्ताने आंबेवाडी घळगेश्वर गल्ली येथील ओमानी भावकू तरळे यांच्या निवासस्थानी साकारलेल्या जगन्नाथ मंदिराच्या आकर्षक देखाव्याची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.

The post आंबेवाडीत साकारला जगन्नाथ मंदिराचा देखावा ! appeared first on News 24 Tass Marathi.

टोकियोत मराठमोळ्या कोळी नृत्याची रंगत
टोकियो : येथील मराठी मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले मराठमोळं कोळी नृत्य सादरीकरण. महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याच्या संस्कृतीचा ठसा उमटवणारे हे नृत्य प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरले.

हे नृत्य श्रद्धा गजानन पाटील यांच्या कुशल नृत्यदिग्दर्शनाखाली सादर करण्यात आले. समुद्राची लय, कोळी समाजाचा जल्लोष, आणि भक्तिभावाचा उत्साह यांचा संगम या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. पारंपरिक वेशभूषा, जोशपूर्ण हालचाली, तालबद्ध पावले आणि सामूहिक एकात्मतेतून गणरायाला वाहिलेली ही अनोखी कलांजली होती.

या नृत्यात श्रद्धा गजानन पाटील ,सुशील डी कदम, अभिनाश साहू, अपेक्षा घोलप, तुषार चासकर , नेहा गुप्ता, विक्रांत दयाल, अक्षता कुलकर्णी, आकाश कनसे, सपना कनसे (गायकवाड) यांनी सहभाग घेतला.

परदेशी भूमीत असूनही मराठी बांधवांनी आपल्या परंपरा, संस्कृती व कलेचा ठसा उमटवून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात उत्सव अधिकच अविस्मरणीय केला.

The post टोकियोत मराठमोळ्या कोळी नृत्याची रंगत appeared first on News 24 Tass Marathi.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयजीपी संदीप पाटील बेळगावात
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील बेळगावात आले असून, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. बेळगावमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. शेवटच्या दिवशी लाखो भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. यात बेळगाव, धारवाड, बागलकोट, विजापूर तसेच कर्नाटकच्या इतर जिल्ह्यांसोबतच महाराष्ट्र आणि गोव्यातील भाविकही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे सरकारने संदीप पाटील यांची बेळगावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

आयजीपी संदीप पाटील यांनी बेळगाव शहरात आल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि यापूर्वी ते बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक असताना शहरासह जिल्ह्यात कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था हाताळत होते, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी बेळगावातील कपलेश्वर मंदिराला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. तसेच, गणेश विसर्जन तलाव आणि मिरवणुकीच्या मार्गांची पाहणी केली. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी त्यांच्यासोबत होते. बेळगावला आलेल्या संदीप पाटील यांचा दलित नेते मल्लेश चौगुले यांनी सत्कार केला. यावेळी मनोहर मुंचडिकर, आनंद कोलकार, पांडू गिडन्नवर, संतोष तळवार, बाबू दोडमनी, सुरेश तळवार, कल्लप्पा कांबळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

The post गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयजीपी संदीप पाटील बेळगावात appeared first on News 24 Tass Marathi.