rakaskop dam Archives | News 24 Tass Marathi

राकसकोप जलाशयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

बेळगाव : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शहरासमोरील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी राकसकोप जलाशयाची पाहणी करत उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेतला.

बेळगाव शहराला मुख्यतः राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या तापमानात होत असलेली वाढ आणि वाढता पाण्याचा वापर यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जलाशयातील विद्यमान पाणीसाठा, मे महिन्याच्या अखेरपर्यंत लागणारी संभाव्य पाण्याची गरज तसेच हिडकल जलाशयातून मिळणाऱ्या पूरक पाणीपुरवठ्याची माहिती घेतली.

सध्याचा पाणीसाठा योग्य नियोजन केल्यास काही काळासाठी पुरेसा ठरू शकतो, मात्र पाण्याचा अपव्यय टाळणे आणि काटकसरीने वापर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागरिकांनीही पाणी बचतीबाबत सजग राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

The post राकसकोप जलाशयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी appeared first on News 24 Tass Marathi.

राकसकोप जलाशय यंदा चारवेळा तुडुंब
धरणाचे दरवाजे सात इंचाने उघडून मार्कंडेय नदीत विसर्ग सुरू

बेळगाव / प्रतिनिधी

दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राकसकोप जलाशय रविवार (दि. १७) सायंकाळी चौथ्यांदा तुडुंब भरले आहे. जलाशयाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होऊन ती २४७६ फुटांवर पोचली. त्यामुळे, दोन दरवाजे सात इंचाने उघडून मार्कंडेय नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदा राकसकोप जलाशय चारवेळा तुडुंब झाले आहे.

रविवारी सायंकाळी जलाशय तुडुंब झाल्याने दोन आणि पाच क्रमांकाचा दरवाजा उघडून सात इंचाने विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या पावसाची संततधार कायम असून आणखी जोर वाढला तर इतर दरवाजेही उघडण्याची वेळ पाणीपुरवठा मंडळावर येणार आहे. गेल्यावर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जलाशय तुडुंब झाले होते. त्यावेळी, तीन दरवाजे दहा इंचाने उघडण्यात आले होते. सध्या विसर्ग पुन्हा सुरु झाल्याने मार्कंडेय नदीला पूर येण्याची शक्यता असून शेतकर्‍यांनी सतर्क राहावे, असे आवाहन कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाने पत्रकाद्वारे केले आहे.

The post राकसकोप जलाशय यंदा चारवेळा तुडुंब appeared first on News 24 Tass Marathi.

महापौर – उपमहापौर यांच्याहस्ते राकसकोप जलाशयावर गंगापूजन
राकसकोप / वार्ताहर

बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून आज महापौर व उपमहापौर यांच्याहस्ते विधिवत गंगापूजन करण्यात आले. गेल्या काही दिवसात बेळगाव जिल्हा, पश्चिम घाट आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नद्या प्रवाहित होऊन पाण्याची पातळी वाढल्याने राकसकोप यंदा जुलैमध्येच हे जलाशय तुडुंब भरले आहे.

याप्रसंगी बोलताना महापौर मंगेश पवार यांनी यंदा धरण पूर्ण भरल्यामुळे बेळगावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

तर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनीही पाणीपुरवठा प्रकल्पाची माहिती दिली. शहराच्या ५८ वॉर्डांमध्ये राकासकोप जलाशयातून पाणीपुरवठा करण्यासाठी एल. अँड टी कंपनीला ४८ वॉर्डांमध्ये जलवाहिन्या बसवण्याचे काम देण्यात आले होते. त्यापैकी २ वॉर्डमध्ये काम पूर्ण झाले आहे. उर्वरित वॉर्डमध्ये काम पूर्ण करण्यासाठी २६ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. एक विशेष पथक तयार केले जात आहे आणि पाण्याची गळती होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महापौर मंगेश पवार आणि , उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध अधिकारी आणि पालिका कर्मचारी उपस्थित होते.

The post महापौर – उपमहापौर यांच्याहस्ते राकसकोप जलाशयावर गंगापूजन appeared first on News 24 Tass Marathi.

राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे उघडले
दोन्ही दरवाजे ७ इंचाने उघडल्याने मार्कंडेय नदीला पुराचा धोका

तुडये / वार्ताहर

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दुपारपासून संततधार पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी २४७३.५० फूट पाण्याची पातळी स्थिर राहिल्याने शुक्रवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी २४७३.५० फूट इतकी नोंद झाली. पाणीपातळी कमी करण्यासाठी सकाळी वेस्टवेअरचे दोन आणि पाच क्रमांकाचे दोन दरवाजे तीन इंचाने उघडण्यात आले.

दुपारी १ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. पाणीपातळी २४७३.७० पर्यंत वाढल्याने सायंकाळी सात वाजता दोन्ही दरवाजे ७ इंचाने उघडल्याने पाण्याचा प्रचंड विसर्ग मार्कडेय नदीतून वाहू लागल्याने नंदीला पुराचा संभाव्य धोका उद्भवणार आहे.

शुक्रवारी सकाळी ३५.१ मि.मी. व एकूण १३६५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाची पूर्ण क्षमता ही २४७५ फूट आहे. ती पूर्ण करण्यास अजूनही फूटभर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र जलाशयाकडील दोन दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पाणीपातळीही स्थिर आहे. जलाशयाने आपली पातळी शुक्रवारी पूर्ण केली असती. जलाशयाकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ आणि वाढणारी पाणीपातळी यावर जलाशय व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. आणखी दरवाजे उघडण्याच्या तयारीत आहेत.

विसर्ग :

मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पाणीपातळी स्थिर

वाढणाऱ्या पाणी पातळीवर जलाशय व्यवस्थापनाचे लक्ष

The post राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे उघडले appeared first on News 24 Tass Marathi.

राकसकोप जलाशय भरले..पाणीटंचाईचे संकट दूर झाले
बेळगाव / प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता शहरात सर्वत्र पाणी पाणी झाले आहे त्याचबरोबर शहराची तहान भागवणाऱ्या राकसकोप जलाशयात पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे त्यामुळे धरणाची दारे देखील उघडण्यात आली आहेत. त्यामुळे राकसकोप भरले आणि पाणीटंचाईचे संकट दूर झाले अशी भावना व्यक्त होत आहे.

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप पाणलोट क्षेत्रातील जलाशयाला मिळणाऱ्या नदी व नाल्यातून पाणी दुथडी भरुन वाहू लागले आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाह जलाशयाला येऊन मिळत असल्याने पाणीपातळीत वाढ झाली. बुधवारी सकाळी पाणीपातळी २४७१.७० फुटावर गेल्यानंतर सायंकाळी ही पातळी २४७२.५० फुटावर गेली. राकोसकोप जलाशय आता काठोकाठच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून ते पूर्ण भरण्यासाठी केवळ अडीच फुट पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर जलाशय व्यवस्थापनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता जलाशयाच्या वेस्टवेअरच्या सहा दवाजांपैकी दोन क्रमांकाचा दरवाजा दोन इंचाने उचलण्यात आला आहे. जलाशयात येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेत अन्य दरवाजेही उचलण्यात येणार आहेत. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याची पाणीपातळी ही २४७५ फुट आहे. येत्या दोन दिवसांत ती पूर्ण होईल. बुधवारी सकाळी ४१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली तर यावर्षीचा एकूण पाऊस १२६.९ मि.मी. झाला आहे. त्यापैकी १५ जून पासून ३० जूनपर्यंतच्या १५ दिवसांत ९०० मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत २० फुट पाणीपातळीत वाढ झाली आहे.

मागील वर्षी याच दिवशी पाणीपातळी ही निच्चांकी २४५२.८० फुटावरच स्थिर होती. पाऊस ही ४२९ मि.मी. इतका कमी होता. मागील वर्षी संपूर्ण जून महिन्यात २४८ मि.मी. पाऊस झाला होता. जलाशयाचा दरवाजा उचलण्यात आल्याने पाणी मार्कंडेय नदीतून प्रवाहित झाले आहे. पुढील काळात जलाशयातील येणाऱ्या प्रवाहाची पाहणी करुन दरवाजे उचलण्यात येणार असल्याने मार्कंडेय नदी पात्राशेजारील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

The post राकसकोप जलाशय भरले..पाणीटंचाईचे संकट दूर झाले appeared first on News 24 Tass Marathi.