procession Archives | News 24 Tass Marathi

विकास कलघटगी यांचे पोलीस विभागाकडून कौतुक
प्रशंसापत्र प्रदान

बेळगाव : बेळगावशहरातील शिवजयंती उत्सव आणि भव्य चित्ररथ मिरवणूक यंदा उत्साहात आणि पूर्णतः शांततेत पार पडली. या यशामागे अनेकांचे योगदान असून, त्यामध्ये शिवजयंती मंडळ आणि प्रशासनात समन्वय साधणारे विकास आर. कलघटगी यांची भूमिका विशेष ठरली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पोलीस विभागाने त्यांचे कौतुक करत प्रशंसापत्र प्रदान केले आहे.

२१ एप्रिल २०२६ च्या सायंकाळपासून २२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात विविध ठिकाणी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वय साधला.

विशेषतः स्थानिक परिस्थितीबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करून विकास कलघटगी यांनी पोलीस यंत्रणेला मोलाचे सहकार्य केले. पोलिस आयुक्त बोरसे यांनी कलघटगी यांना यावेळी प्रशस्तीपत्र पुस्तिका देऊन गौरव केला आहे. यापूर्वीही गणेशोत्सव काळात त्यांनी अशाच प्रकारे सहकार्य केल्याचे नमूद करत पोलीस आयुक्त बोरसे भूषण गुलाबराव (आयपीएस) यांनी त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले आहे. तसेच पुढील काळातही असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

The post विकास कलघटगी यांचे पोलीस विभागाकडून कौतुक appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त
सुरक्षेसाठी २२०० पोलीसांचा ताफा तैनात

ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे सर्वत्र करडी नजर

बेळगाव : बेळगावात आज मंगळवारी पारंपारिक शिवजयंती मिरवणूक संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी शहरात तब्बल २२०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. तसेच शिवाजी जयंती सोहळ्याचा एक भाग म्हणून, विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी बंदोबस्ताबाबत योग्य मार्गदर्शन केले.

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त बोरसे म्हणाले, शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके वाहतूक विभाग, गुन्हे शाखा तसेच तणाव नियंत्रण पथके सज्ज ठेवण्यात आले आहेत.

मिरवणूक मार्गा बरोबरच शहरात कोणताही अनुचित प्रकार घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. मिरवणूक मार्ग व शहरातील विविध महत्त्वाचे चौक याठिकाणी एक हजार पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय दहा ड्रोनची नजर मिरवणुकीवर असणार आहे. तसेच १४ के एसआरपीच्या तुकड्या आणि आठ राखीव दलाच्या तुकड्या मिरवणुकीच्या मार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. अन्य पोलीस ताफा मिळून एकूण २२०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेले आहेत.मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नाही पोलीस आयुक्त बोरसे यांनी केले.

The post बेळगावात शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त appeared first on News 24 Tass Marathi.

चव्हाट गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाचा सजीव देखावा एकाच ठिकाणी सादर होणार
शिवभक्त व जनसामान्यांच्या मागणीनुसार निर्णय

बेळगाव : शिवजयंती उत्सवानिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळातर्फे यंदा एक विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवभक्त व जनसामान्यांच्या मागणीनुसार, छत्रपती शिवरायांचा वैभवशाली सजीव देखावा यावर्षी एकाच ठिकाणी सादर करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

मिरवणुकीदरम्यान फिरता देखावा सादर करण्याऐवजी, संयुक्त महाराष्ट्र चौक येथे हा देखावा सतत सादर केला जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शिवरायांच्या इतिहासाचे जिवंत दर्शन घडवणारे देखावे येथे पाहायला मिळणार आहेत.

या उपक्रमामुळे शिवभक्तांना एकाच ठिकाणी शांततेत आणि सविस्तरपणे देखावे अनुभवता येणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मंडळाचे अध्यक्ष अनंत बामणे, कार्याध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस रोहन जाधव, उपाध्यक्ष भरत काळगे, चिटणीस मारुती सुतार, खजिनदार आकाश धुराजी, माजी अध्यक्ष मोहन किल्लेकर तसेच गल्लीतले पंच प्रताप मोहिते आणि उत्तम नाकाडी यांनी हे आवाहन केले आहे.

The post चव्हाट गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाचा सजीव देखावा एकाच ठिकाणी सादर होणार appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावमध्ये परंपरेनुसार रविवारी १९ एप्रिल रोजी शिवजयंती
मंगळवारी २१ रोजी चित्ररथ मिरवणूक

बेळगाव : बेळगावमध्ये वैशाख शुद्ध द्वितीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते,तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते.

यावर्षीही रविवार दि.१९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी होणार असून मंगळवार दि २१ रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. गेल्या आठवड्यात जत्तीमठ येथे मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रविवार दि १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजल्यापासून विविध गडकिल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे मध्यवर्तीच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ठीक ९.०० वाजता नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन- आरती करण्यात येईल.

मध्यवर्तीच्या वतीने सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात येईल. मंगळवार दि २१ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता नरगुंदकर भावे चौकात मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार असून त्यानंतर पालखी आणि चित्ररथ मिरवणूक मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, डॉ राजेंद्रप्रसाद चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, किर्लोस्कर रोड, जत्तीमठ मार्गे सम्राट अशोक चौक,रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, मुजावर गल्ली, पाटील गल्ली कपिलेश्वर उड्डाणपूल मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून यावर्षी १०७ वी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्यवाह मदन बामणे शिवराज पाटील आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

The post बेळगावमध्ये परंपरेनुसार रविवारी १९ एप्रिल रोजी शिवजयंती appeared first on News 24 Tass Marathi.

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी
पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा

बेळगाव : वडगाव परिसरातील श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी भव्य पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत एकूण ७ जिवंत चित्ररथ (लाईव्ह देखावे) सादर करण्यात येणार असून, मिरवणूक रात्री ८ वाजल्यानंतर सुरू होऊन वडगावमधील सर्व गल्ली बोळांमधून फिरणार आहे.

या संदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १५) सायंकाळी ६ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन मिरवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी पोलीस आयुक्तांनी मिरवणुकीच्या उद्घाटन पूजेसाठी उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली आहे. यावेळी उपायुक्त नारायण बरमणी यांचीही भेट घेण्यात आली. या भव्य मिरवणुकीमुळे वडगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बैठकी दरम्यान वडगाव -जुने बेळगाव शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी श्री. मनोहर हलगेकर, श्री. महेश जुवेकर, श्री. अमोल देसाई, श्री. ज्ञानेश्वर मन्नूरकर, श्री. विजय हलगेकर, श्री. भाऊराव पाटील, श्री. मंगेश नागोजीचे, श्री. निलेश कुंदेकर, श्री. सुशांत यल्लुपाचे, श्री. सचिन आजरेकर, श्री. हरी यलजी तसेच मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळचे जनसंपर्क प्रमुख श्री. विकास कलघटगी, त्याचबरोबर पाटील गल्ली, कारभार गल्ली, विष्णू गल्ली, वझे गल्ली, सोनार गल्ली, दत्ता गल्ली मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

The post वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी appeared first on News 24 Tass Marathi.

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या नियोजनासाठी महामंडळाची बैठक
चित्ररथ मंडळांच्या समस्या सोडवण्याचा बैठकीत निर्धार

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता शिवजयंती चित्ररथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर शिवजयंती चित्ररथ महामंडळाने नियोजनाला गती दिली आहे. रविवारी धर्मवीर संभाजीराजे चौक येथील जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत चित्ररथ मंडळांच्या समस्या सोडवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.

महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यंदाचा उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि अभूतपूर्व पद्धतीने साजरा करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा उत्सव घडविण्यासाठी विविध मंडळांच्या सूचना आणि अडचणींवर विचारविनिमय करण्यात आला.

मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेतच पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. कोणताही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करत शिस्तबद्ध वातावरणात मिरवणूक पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

यंदापासून उत्कृष्ट चित्ररथ स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, प्रसाद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि मानपत्र देण्यात येणार असून, भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे.

प्रत्येक मंडळाने आपला चित्ररथ वेळेत मिरवणूक मार्गावर आणावा, व्यसनांपासून दूर राहावे आणि परस्पर सन्मान राखत कोणताही संघर्ष टाळावा, असे आवाहन करण्यात आले. प्रशासनाकडून मदत कक्ष उभारण्यात येणार असून, त्याद्वारे मंडळांच्या समस्या सोडवण्यात येतील.

बेळगावची शिवजयंती ही देशभरात विशेष ओळख असलेली परंपरा असून, येथे सादर होणारे चित्ररथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनदर्शनाचे दर्शन घडवतात. त्यामुळे सर्व मंडळांनी सहकार्याची भावना ठेवून उत्सव यशस्वी करावा, असे मत साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शिवप्रेमींनी पोशाख आणि वर्तनात सभ्यता राखावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, साहित्यिक गुणवंत पाटील, प्रसाद मोरे, रंजीत हवळणाचे, चेतन किल्लेकर, शिवम गंधवाले, अरुण पाटील, चंद्रकांत माळी, अनंत बामणे, बसवंत मुतकेकर यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

The post शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या नियोजनासाठी महामंडळाची बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भव्य उत्सवासाठी पोलिस आयुक्तांचे सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन
शिवजयंती उत्सवाच्या तयारीसाठी पोलीस आयुक्तांसोबत मध्यवर्ती मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगावच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शहराचे पोलीस आयुक्त श्री भुषण गुलाबराव बोरसे (IPS) यांची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेऊन येऊ घातलेल्या श्री शिवजयंती उत्सवाच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.

यावेळी अध्यक्ष अंकुश केसकर यांनी पोलीस आयुक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक भेट दिले. बैठकीत तीन दिवस चालणाऱ्या पारंपारिक शिवजयंती उत्सवाच्या विविध बाबींवर तसेच मंगळवार, २१ तारखेला सायंकाळी होणाऱ्या मिरवणुकीच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.

पोलिस आयुक्त बोरसे यांनी मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेत संपवावी, दोन चित्ररथात अंतर असू नये, आवाजाची मर्यादा पाळावी अशा सूचना केल्या तसेच शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता शहर व उपनगरातील उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले.

या बैठकीस अध्यक्ष अंकुश केसरकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सल्लागार माजी महापौर मालोजी आष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्यवाह मदन बामणे व शिवराज पाटील उपस्थित होते.

The post सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भव्य उत्सवासाठी पोलिस आयुक्तांचे सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन appeared first on News 24 Tass Marathi.

डॉ. आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गाची महापौर-उपमहापौरांकडून पाहणी
१४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती निमित्त शहरात भव्य मिरवणूक

बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगळी यांनी आज मिरवणूक मार्गाची पाहणी केली. जयंती सोहळ्यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

महान बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाणार आहे. त्या अनुषंगाने महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत तयारीचा आढावा घेतला.

महापौर प्रीती कामकर यांनी सांगितले की, जयंती महामंडळासोबत प्राथमिक बैठक पार पडली असून, सोहळा थाटामाटात पार पाडण्यासाठी महापालिका सज्ज आहे. उपमहापौर हनुमंत कोंगळी यांनीही दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणत्याही अडथळ्याविना मिरवणूक पार पडण्यासाठी सर्व व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी उद्यानातील जुना पुतळा काढून त्याजागी नवीन पुतळा लवकरच बसवण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

दरम्यान, दलित नेते मल्लेश चौगुले यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी विविध विभाग आणि महापालिका सहकार्य करत असून, यासाठी सर्वतोपरी तयारी सुरू आहे.

The post डॉ. आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गाची महापौर-उपमहापौरांकडून पाहणी appeared first on News 24 Tass Marathi.