market Archives | News 24 Tass Marathi

बेळगावमधील फूल मार्केटचा वाद अखेर संपुष्टात
व्यापारी पुन्हा सरकारी मार्केटमध्ये परतले

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील फुलांच्या घाऊक बाजारपेठेवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला असून व्यापारी पुन्हा अधिकृत सरकारी मार्केटमध्ये परतले आहेत. आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे या वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅन्टोन्मेंट परिसरात सुरू झालेल्या खासगी बाजारपेठेवर ‘एपीएमसी’ कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप व्यापाऱ्यांनी नोंदवला होता. यानंतर आमदार सेठ यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नियमबाह्य व्यवहार सहन केले जाणार नाहीत आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असा स्पष्ट निर्णय बैठकीत घेण्यात आला.

व्यापाऱ्यांना अधिकृत परवाने देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, घाऊक व्यापारी आयेशा सनदी यांनी खासगी बाजारात गेलेल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांना पुन्हा सरकारी मार्केटमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला.

जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले की, अधिकृत बाजारपेठ उपलब्ध असताना खासगी घाऊक बाजारांना परवानगी दिली जाणार नाही. उद्यानविद्या विभागाच्या नियंत्रणाखालील मार्केटमध्ये गाळ्यांची संख्या वाढवून अधिकृत ‘सब-मार्केट’ सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला माल विनाअडथळा अधिकृत बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार असून व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

The post बेळगावमधील फूल मार्केटचा वाद अखेर संपुष्टात appeared first on News 24 Tass Marathi.

बाप्पांच्या आगमनासाठी शहर सज्ज
बेळगाव / प्रतिनिधी

गणपतीबाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करत आणि वाजत-गाजत गणेशमूर्ती घरी नेण्याचा सोहळा बुधवारी साजरा होणार आहे. त्यासाठी गणेश भक्तांच्या उत्साहाचा झरा अखंडपणे वाहताना दिसून येत आहे. मागच्या वर्षी केलेल्या विनंतीला मान देऊन बाप्पांचे आगमन लवकरच झाले असल्याने भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. वर्षातून एकदा घरी येणाऱ्या श्री गणेश देवाच्या आगमनासाठी प्रत्येक घराघरांमध्ये सुसज्ज तयारी करण्यात आली आहे. घरोघरी बाप्पांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

काही गणेश भक्तांकडून मंगळवारीच श्री मूर्तीना घरी आणण्यात आले आहे. काही भक्तांनी उद्या होणाऱ्या गर्दीत मार्ग काढताना अडचण येते, याचा विचार करून परंपरेनुसार आज मंगळवारी श्री गणेश मूर्ती घरी नेण्यास प्रारंभ केला होता. मूर्ती, पूजा साहित्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी उसळली होती. बाप्पांच्या स्वागतासाठी आबालवृध्द उत्सुक झाले आहेत. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची तयारीदेखील पूर्ण झाली आहे. दरम्यान, उत्सवकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

वाढती महागाई, रस्त्यांवर पडलेले खड्डे नित्याची वाहतूक कोंडी या साऱ्या चिंता आता विघ्नहर्त्यावर सोडून देत पुढचे काही दिवस बेळगावकर उत्सवाचा आनंद लुटणार आहेत. अनेक दिवसांच्या दमदार पावसामुळे काहीसे चिंतेचे वातावरण होते. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेतही गर्दी वाढली आहे. बुधवारी घरोघरी आणि श्रींच्या मंडपातून बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह नागरिकही ढोल- ताशांच्या निनादात गणरायांचे स्वागत करणार आहेत. मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरीक मंगळवारी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.

एरवी मंगळवार हा बाजारपेठेच्या सुट्टीचा दिवस असला तरी गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठ ओसंडून वाहताना दिसून येत होती. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठ भागासह शहापूर, टिळकवाडी, अनगोळ उपनगरांत गणेशमूर्ती सजावटीच्या साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. अनेकांनी सायंकाळी आपल्या खासगी वाहनातून, तर काहींनी रिक्षा, टेम्पो अशा वाहनांमधून गणरायाला आपल्या घरी नेले. रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक गणेश मंडळांनी मनमोहक कमानी उभारल्या आहेत.

The post बाप्पांच्या आगमनासाठी शहर सज्ज appeared first on News 24 Tass Marathi.

गणेश चतुर्थी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
सजावटीच्या आकर्षक साहित्याने सजली बाजारपेठ

गणेशोत्सव दोन दिवसांवर ; प्लास्टिक माळा, मोत्यांचे हार, मखर, पाट, चौरंगांची रेलचेल

बेळगाव / प्रतिनिधी

गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू असून, बाप्पाच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. – गणेशोत्सवदेखील अवघ्या दोन  दिवसांवर आला आहे. त्यामुळे मखर, सजावट, बाप्पाची आरास, सजावटीसाठी लागणारी तोरणे, फुलांच्या माळा, पडदे , झालर, इलेक्ट्रॉनिक्स तोरणे, लाईट्स, धूप, पूजा साहित्य (कापूर, अगरबत्ती) यांसह गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्याने शहर आणि उपनगरी भागातील सर्वच बाजारपेठा सजल्या आहेत. ऐन गणेशोत्सवात या साहित्याची चढ्या दराने विक्री केली जाते. त्यामुळे आतापासूनच या साहित्याची खरेदी केली जात आहे.

शहरात गणपत गल्ली , पांगुळ गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, शनिवार खूट आदी ठिकाणी मखर विक्रीसाठी ठेवले आहेत. मखराच्या प्रकारातही विविधता दिसून येत आहे. बाजारात थर्माकोलसह कापडी आणि पत्र्यांवर नक्षीकाम केलेले  मखरही आले असून  ग्राहकांना ते आकर्षित करत आहेत. साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. बाजारात प्लास्टिक माळा, मोत्यांचे हार, थर्माकोल आणि पाट, चौरंग यांची रेलचेल आहे.

गणरायाच्या स्वागतामध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी भक्तांची धडपड दिसून येत आहे. बेळगावसह आसपासच्या भागातील आणि गोवा येथील गणेश भक्तांची देखील वर्दळ शहरात वाढल्याचे दिसून येत आहे. पावसाने उघडीप दिली असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे.

सध्या घरगुती गणेशोत्सवा बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. श्री गणेश चतुर्थीच्या अगोदर दोन दिवस खरेदीसाठी बाजारपेठेत नागरीकांची मोठी गर्दी होणार आहे. विविध प्रकारचे शोभीवंत साहित्य खरेदीकडे ग्राहकांचा ‘ओढा दिसून येत आहे. बाजारात एलईडीचा वापर करून तयार केलेले झुंबर, रंगीबेरंगी फुलांच्या विद्युत रोषणाईच्या माळा, एलईडी क्रिस्टल, चक्र, लोट्स बल्ब, स्टार मिनी लॅम्प अशा विविध प्रकारच्या माळा विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. तसेच एलईडी समया, पणत्या, झालर लाईट्स, मल्टिकलर फोकस माळा, रोप, विद्युत रोषणाई माळा वजनाने हलक्या आणि स्वस्त असल्यामुळे अशा माळांना यंदा अधिक मागणी आहे. सध्या मंडप उभारणी सुरू आहे. मंडळेही लायटिंग करण्यावर अधिक भर देत आहेत. शहराच्या मुख्य बाजारपेठेत प्रत्येक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर सजावटीचे साहित्य लावले आहे. या साहित्यामुळे बाजारपेठेत झगमगाट दिसून येत आहे.

श्री गणेशमूर्ती शाळांमध्येही श्रींच्या मूर्तीचे रंगकाम जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गणेश भक्तांचा महाउत्सव श्री गणेश चतुर्थी सण बुधवार २७ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. घराघरांत आणि सार्वजनिक स्वरूपात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. सध्या घराघरांत गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. घराची साफसफाई, रंगकाम, डेकोरेशन आदी कामे सुरू आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप उभारणी आणि इतर कामांनी देखील गती घेतली आहे. गणेश चतुर्थीच्या अगोदर चार दिवसांपासून दूरवर नेल्या जाणाऱ्या श्रींच्या मूर्ती शाळांमधून नेल्या जातात. त्यामुळे मूर्ती शाळांमध्ये गणेशमूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आहे.

The post गणेश चतुर्थी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी appeared first on News 24 Tass Marathi.