maratha samaj Archives | News 24 Tass Marathi

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन
बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तरी बेळगाव शहर व बेळगाव तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता व व्हाटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळ कार्यालय, मेलगे गल्ली, शहापूर(वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत) मधू कणबर्गी, शंकर बेकरीच्या बाजूला, किर्लोस्कर रोड तसेच धनश्री सोसायटी, अनगोळ रोड, अनगोळ येथे दि. ३१ मे पर्यंत आणून द्यावी. अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील  (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

The post मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी संस्कृतीने आपले सामर्थ्य ओळखावे !
डॉ. सागर देशपांडे यांचे प्रतिपादन

वा. च. मंडळाचा साहित्य पुरस्कार सोहळा

बेळगाव : मराठी ही भारतातीलच नव्हे तर जगातली एक प्रमुख भाषा आहे. आज जगात मराठी बोलणारे १५ कोटी लोक आहेत. ही संख्या जपानच्या लोकसंख्ये एवढी आहे. ज्या भाषेला ९४ बोली भाषा आहेत, ज्या भाषेत दरवर्षी २५० साहित्य संमेलने होतात, ज्या भाषेत दरवर्षी ३००० हून अधिक पुस्तके प्रकाशित होतात त्या भाषेने आणि भाषिकांनी न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे यानी केले. ‘कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात मराठीचे महत्व आणि भविष्यवेध’ या विषयावर ते आपले विचार मांडत होते- वाङ्मय चर्चा मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष विजय देशपांडे, प्रमुख नीता कुलकर्णी, जगदीश कुंटे व स्वाती कुलकर्णी या होत्या.

डॉ. सागर देशपांडे पुढे म्हणाले,” नवी पिढी इंग्रजी माध्यमाकडे वळली याला आपणच जबाबदार आहोत. पण अजून वेळ गेलेली नाही. मुलांशी आपण आपल्या भाषेतून संवाद साधायला हवा. आपण आपल्या मुलांना, नातवंडाना मराठी शिकवलं पाहीजे. जमतील तेवढे व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. इंग्रजीला आमचा विरोध नाही. पण इंग्रजीतून शिक्षणाला विरोध आहे. “

कृत्रिम प्रज्ञा म्हणजे एआयच्या युगात मराठीला अधिक संधी उपलब्ध आहे. एआय मुळे माहितीचे संकलन सोपे होत आहे. कवितांचा अन्वयार्थ लावणे सुलभ होणार आहे. जे सच्चे आहे त्याला एआय जमान्यात मरण नाही, उलट त्याला जास्त मान मिळेल. आपल्या कवितांचे, लावण्यांचे, ओव्यांचे आणि म्हणीचे वैभव आपण नव्या पिढीपर्यंत सहज पोचवू शकू.

सर्व तऱ्हेच्या गाण्यांचे, साहित्याचे पॅटर्न आता एआयमुळे मिळू शकतील. आपल्या भाषेचं, आपल्या गावाचं, आपल्या संस्कृतीचं महत्व शाळा कॉलेजीसनी त्याच प्रमाणे ग्रंथालय आदि संस्थांनी जपलं पाहिजे. जिथं जिथं मराठी भाषिक लोक आहेत तिथं तिथं मराठीचे पुनरुज्जीवन होत आहे. गेल्या एकाच वर्षात अमेरिकेत ५० नवे मराठी वर्ग सुरु झाले- ज्ञान ही अमेरीकेची ताकद आहे. ही ताकद आपण जेव्हा ओळखू तो सुदिन असे ते पुढे म्हणाले.

त्यानंतर वर्ष २०२४ व २०२५ या दोन वर्षांकरीता साहित्य पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. सर्वश्री संतोष आळंजकर, अनंता सूर, विजय माळी, नवनाथ गोरे, डॉ. माधव पुराणिक आणि नंदन हेर्लेकर थाना २०२४ चे तर २०२५ साठी संगीता अरबुने, कल्लाप्पा पाटील, बाळासाहेब नागरगोजे, संजय आंग्रे, प्रा. सुहास बोबडे आणि उदय लवाटे याना पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी संगीता अरबुने यांनी वा. च. मंडळाला देणगी दिली.

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुणे येथे नुकताच ज्यांचा सत्कार करण्यात आला त्या बेळगावच्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांचा वाङ्‌मय चर्चा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.

वरेरकर नाटय संघाच्या सभागृहात रविवार दि. १० मे रोजी पार पडलेल्या या समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. अनिल पाटणेकर यांनी केले. जगदीश कुंटे यानी डॉ. सागर देशपांडे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर पाटणेकर यांच्याहस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचा परिचय स्वाती कुलकर्णी आणि नीता कुलकर्णी यांनी करून दिला. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या वतीने डॉ. माधव पुराणिक यानी मनोगत व्यक्त केले. माधव कुंटे यानी सूत्रसंचालन करून आभार मानले.

The post मराठी संस्कृतीने आपले सामर्थ्य ओळखावे ! appeared first on News 24 Tass Marathi.

कृतीशील मराठा समाजाची आज महत्त्वाची बैठक
बेळगाव : कृतीशील मराठा समाजाची बैठक आज बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी जत्ती मठ बेळगाव येथे संध्याकाळी ५ वाजता बोलविण्यात आली आहे. मराठा समाजा समोरील विविध आव्हाने आणि मराठा समाजातील होतकरू तरुणांसाठी मराठा संस्थेत उपलब्ध होण्याऱ्या संधी हे बैठकीचे प्रामुख्याने विषय असतील असे समन्वयक अमित देसाई यांनी कळविले आहे. या बैठकीला समाजातील जुन्या जाणत्या, तरुण होतकरू मंडळींनी आवर्जून उपस्थिती दर्शवून आपले विचार मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

The post कृतीशील मराठा समाजाची आज महत्त्वाची बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव सकल मराठा समाजातर्फे आज गुरुवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहापूर येथील शामाप्रसाद मुखर्जी रोडवरील उद्यानात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमाला समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समन्वयक किरण जाधव यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना शिवरायांचे कार्य आणि त्यांचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. प्रशासनाने सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन शिवजयंती अधिक व्यापक स्वरूपात साजरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वर्षी भव्य आयोजनाची ग्वाही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो स्वाभिमानाचा सण म्हणून साजरा व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.

साहित्यिक गुणवंत पाटील यांनी शिवजयंती वर्षातून एकदाच नव्हे तर वर्षभर आचरणात आणण्याची गरज अधोरेखित केली. शिवचरित्र हे जीवन जगण्याची दिशा देणारे असल्याचे सांगत त्यांनी शिवरायांच्या कार्यातून संकटांवर मात करण्याची, समाजघटकांना एकत्र बांधण्याची आणि स्वराज्य उभारणीची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन केले. प्रत्येक घरात शिवचरित्र असावे आणि नव्या पिढीने त्यातून बोध घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, महादेव पाटील, सुनील जाधव यांच्यासह समाजातील पदाधिकारी, महिला नेत्या आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

The post बेळगाव सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी appeared first on News 24 Tass Marathi.

जात सर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे
खासदार जगदीश शेट्टर

जिल्हा विकास समन्वय आणि पर्यवेक्षण समितीची बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

जात सर्वेक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासात खंड पडू नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले. ते जिल्हा विकास समन्वय आणि पर्यवेक्षण समिती (दिशा) बैठकीत बोलत होते.

खासदार शेट्टर म्हणाले, “जात सर्वेक्षणाची मुदत वाढल्यामुळे शाळांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडत असून शैक्षणिक नुकसान होत आहे.”

यावर जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) लीलावती हिरेमठ यांनी सांगितले की, सर्वेक्षणात प्राथमिक शिक्षकांचा ९८ टक्के वापर करण्यात आला आहे. फक्त शहरी भागात माध्यमिक शिक्षकांची मदत घेतली गेली असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत विशेष वर्ग आयोजित केले जात आहेत.

खासदार शेट्टर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी आणखी उपाययोजना करण्याची सूचना केली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही प्राथमिक शिक्षकांसोबत इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाही सर्वेक्षणासाठी नियुक्त केल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, बीआयएमएस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केएलईच्या डॉक्टरांकडून सध्या तात्पुरती सेवा दिली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) गडाद यांनी सांगितले. त्यांनी कायमस्वरूपी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी माहिती दिली की, हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून टप्प्याटप्प्याने भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

बैठकीला चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी, अधिकारी आणि समिती सदस्य उपस्थित होते.

The post जात सर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे appeared first on News 24 Tass Marathi.

‘दसरा कर्नाटक केसरी’ विजेता कामेश पाटील – उपनिरीक्षक श्रुती पाटीलचा मराठा समाजतर्फे सत्कार
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावचा अभिमान ठरलेल्या पैलवान कामेश पाटील यांनी म्हैसूर येथे पार पडलेल्या दसरा कुस्ती स्पर्धेत ‘दसरा कर्नाटक कंटीराव केसरी २०२५’ हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या ऐतिहासिक यशासह इतर दहा युवा पैलवान आणि कर्नाटक राज्य पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवणाऱ्या श्रुती पाटील यांचा सत्कार सकल मराठा समाज, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आला.

रविवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता श्री शंभू जत्ती मठ येथे हा गौरव समारंभ पार पडला. यावेळी नुकतेच काडा अध्यक्षपदी निवड झालेले युवराज कदम यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी पोलिस निरीक्षक म्हणून निवड झालेल्या श्रुती पाटील म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचे योगदान मोलाचे असते. शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन दिल्यास आणि विद्यार्थी ते मनापासून आत्मसात केल्यास निश्चित यश मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आज परदेशातही पसरत आहेत, मग आपल्या देशात तसे का घडू नये?” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तर काडा अध्यक्ष युवराज कदम म्हणाले, समाजातून स्पर्धात्मक परीक्षातून यश मिळून युपीएससी सारखे अधिकारी बनले पाहिजेत, मराठा समाजातील तरुणाई व्यसन आणि मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली आहे त्यांना परत मार्गावर आणण्याची गरज आहे. समाज म्हणून आपले हे कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात किरण जाधव यांनी मराठा समाजातील खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील काळात त्यांना आर्थिक सहाय्य देण्याची ग्वाही दिली. अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व उद्देश स्पष्ट करत तरुणांना मोबाईलवर वेळ वाया न घालवता अशा यशस्वी व्यक्तींमधून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

म्हैसूर दसरा कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे पैलवान कामेश पाटील (कंग्राळी खुर्द), प्रेम जाधव (कंग्राळी खुर्द), महेश बिर्जे (तीर्थकुंडये), विनायक पाटील (येळ्ळूर), समर्थ डुकरे (किणये), स्वाती पाटील (कडोली), प्रांजल तुळजाई (अवचारहट्टी), भक्ती पाटील (कंग्राळी), सानिका हिरोजी (आंबेवाडी) आणि अनुश्री चौगुले (अततगा) या सर्वांचा तसेच कर्नाटक राज्य पोलीस उपनिरीक्षक श्रुती पाटील आणि काडा अध्यक्ष युवराज कदम यांचा सत्कार किरण जाधव, प्रकाश मरगळे, गुणवंत पाटील आणि नागेश देसाई यांच्याहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला किरण जाधव, शरद पाटील, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, महादेव पाटील, नगरसेविका रेश्मा पाटील, समाजसेविका माधुरी जाधव, सुनील जाधव, गुणवंत पाटील आणि नागेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद पाटील यांनी केले.

The post ‘दसरा कर्नाटक केसरी’ विजेता कामेश पाटील – उपनिरीक्षक श्रुती पाटीलचा मराठा समाजतर्फे सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

वडगावमध्ये कुणबी पोटजात नोंदीसाठी जनजागृती बैठक
बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक सरकारच्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणात मराठा समाजाने योग्य नोंदी कराव्यात यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागात जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक गणेश मंदिर, संभाजीनगर येथे पार पडली.

बैठकीत जयराज हलगेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वेक्षणादरम्यान धर्म – हिंदू, जात – मराठा, पोटजात – कुणबी आणि मातृभाषा – मराठी असा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच सर्वेक्षण फॉर्मातील ६० कॉलमची सविस्तर माहितीही त्यांनी दिली.

समाजसेविका माधुरी जाधव यांनीही आवाहन केले की, मराठा समाजातील बांधवांनी पक्षभेद विसरून एकत्र येत सर्वेक्षणात पोटजात ‘कुणबी’ असा उल्लेख करावा. समाज एकसंध राहिला तरच सामूहिक शक्ती वाढेल, असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी शिवानी पाटील, प्रतिभा सडेकर, उमेश पाटील, अमोल देसाई यांसह मंगाई भजनी मंडळाच्या अध्यक्षा रेणुका पाटील, उपाध्यक्ष नीता चंदगडकर, खजिनदार विजयालक्ष्मी बगाडे, वैशाली जाधव आदी महिलांची उपस्थिती होती.

The post वडगावमध्ये कुणबी पोटजात नोंदीसाठी जनजागृती बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर परिसरात जातीय जनगणनेला प्रारंभ
सतीश पाटील यांनी मांडली सकल मराठा समाजाची भूमिका

येळ्ळूर / वार्ताहर

कर्नाटक सरकारतर्फे २२ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात जातीय शैक्षणिक सामाजिक जनगणना सुरू झाली आहे. या कामाची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांकडे देण्यात आली आहे.

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातही गणनेला सुरुवात झाली असून माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी गणतीसाठी नियुक्त शिक्षकांना सकल मराठा समाजाची भूमिका समजावून सांगितली. येत्या काही दिवसांत संपूर्ण येळ्ळूर गावाची जनगणना पूर्ण होणार आहे.

संपूर्ण तालुक्यातील सर्व गावांमध्ये प्राथमिक शिक्षकच गणनेचे काम पाहत असून गावकऱ्यांशी नियमित संपर्कामुळे समन्वय साधणे अधिक सुलभ झाले आहे.

The post येळ्ळूर परिसरात जातीय जनगणनेला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

दुर्गामाता महिला मंडळांमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती
समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांचा पुढाकार

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक सरकारतर्फे २२ सप्टेंबरपासून राज्यात जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिकांनी जनगणना फॉर्म भरताना धर्म – हिंदू, जात – मराठा, उपजात – कुणबी आणि मातृभाषा – मराठी असा तपशील नोंदवावा, याबाबत सकल मराठा समाजातर्फे जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी शहर व उपनगरातील श्री दुर्गामाता महिला मंडळांना भेट देऊन महिलांना जनगणना प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी फॉर्म अचूक कसा भरावा, कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कनका कोकणकर, अश्विनी लाड, प्रियंका जाधव, संजना सातेरी, सुचित्रा सुतार, धनश्री कोरगावकर, रेखा धामणेकर, सुमित्रा कणबर्गी, अश्विनी बेडरे, गंगा पाटील, चंद्रकला परब आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

The post दुर्गामाता महिला मंडळांमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती appeared first on News 24 Tass Marathi.

जातनिहाय जणगणनेबाबत जनजागृतीसाठी सकल मराठा समाजातर्फे आज वडगाव येथे बैठक
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून केल्या जाणाऱ्या जातनिहाय जणगणनेबाबत जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला वडगाव आणि परिसरातील मराठा बांधवांनी अधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

The post जातनिहाय जणगणनेबाबत जनजागृतीसाठी सकल मराठा समाजातर्फे आज वडगाव येथे बैठक appeared first on News 24 Tass Marathi.