kagwad Archives | News 24 Tass Marathi

शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण
कागवाड : पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज ओळखून येथील शिवानंद महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालय परिसर स्वच्छता, पर्यावरण जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीसी कॅडेट्सनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्ती याविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणांसह परिसरातून फेरी काढली. या फेरीला विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आर. आलगोंडी यांनी उपस्थितांचे स्वागत करून जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार यांच्याहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती या समस्यांमागे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.” त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही केले.

कार्यक्रमास डॉ. चंद्रशेखर वाय., एनएसएस कार्यक्रम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात महाविद्यालयातील ५० हून अधिक एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची शपथ घेतली. पर्यावरण संरक्षणाचा दृढ संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरण रक्षणाचा संकल्प आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

The post शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण appeared first on News 24 Tass Marathi.

कागवाड तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू
एक जण गंभीर जखमी

कागवाड : कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एका व्यक्तीवर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत.

पहिला अपघात कागवाड – शेडबाळ मार्गावरील उप्पारवाडी परिसरात घडला. शेडबाळकडून कागवाडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची समोरून जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारला मागील बाजूस जोरदार धडक बसली. या अपघातात मिरज तालुक्यातील सावळी येथील रहिवासी महानंदा सचिन चौगुले (वय ३८) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवत असलेले त्यांचे पती सचिन चौगुले (वय ४४) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसरी घटना मिरज-चिकोडी मार्गावरील शिरगुप्पी गावाजवळ घडली. विठ्ठल बसप्पा अक्कीमरडी (वय ५०, रा. निडगुंदी, ता. रायबाग) हे दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाची राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरून धडक बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन्ही घटनांची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे. ए. सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी कागवाड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

The post कागवाड तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

ऐनापूरमधील तरुणाच्या खुनाचा अवघ्या काही तासांत छडा
कागवाड दोघांना पोलिसांकडून अटक

क्षुल्लक वादातून घडली घटना

कागवाड : तालुक्यातील ऐनापूर येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी कागवाड पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

याबाबत ऐनापूर येथील ललिता सिद्धप्पा कमते यांनी कागवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मंगळवारी दुपारी दीड ते सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान गोविंद शंकर देवल यांच्या शेताच्या बांधावर ही घटना घडली होती. शेतातील नारळ विक्रीच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी संतोष सिद्धप्पा कमते यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि अथणीचे डीएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. अथणी वर्तुळाचे सीपीआय संतोष हल्लार आणि कागवाडचे पीएसआय राघवेंद्र खोत यांच्या पथकाने संशयितांचा माग काढत ऐनापूर येथील बाहुबली बाळासाहेब भोसगे आणि श्रीशैल कल्लाप्पा मडीवाळर या दोघांना अटक केली. या प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

The post ऐनापूरमधील तरुणाच्या खुनाचा अवघ्या काही तासांत छडा appeared first on News 24 Tass Marathi.

शेडबाळ येथे पोहायला गेलेल्या विद्यार्थिनीचा तलावात बुडून मृत्यू
कागवाड : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर पोहण्यासाठी तलावात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कागवाड तालुक्यातील शेडबाळ गावात घडली आहे. प्रतीक्षा रामू माळी (वय १४ रा. शेडबाळ) असे मृत मुलीचे नाव आहे. ती इयत्ता सातवीत शिकत होती.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ही तिच्या पाच मैत्रिणींसोबत संजू बागाणे यांच्या मालकीच्या जमिनीत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेली होती. यावेळी पोहत असताना अचानक घडलेल्या घटनेत ती पाण्यात बुडाली आणि तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलीच्या पश्चात तिची आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणाची नोंद कागवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

The post शेडबाळ येथे पोहायला गेलेल्या विद्यार्थिनीचा तलावात बुडून मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची आजही समाजपरिवर्तनासाठी गरज – प्रा. बी. डी. दामन्नवर
शिवानंद महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

कागवाड : एका वर्तुळात अडकलेले शिक्षण महात्मा फुल्यांनी सर्वांसाठी खुले करून बहुजन आणि स्त्रियांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडले. त्यांच्या या क्रांतिकारी कार्यामुळे आज समाजातील विविध घटकांचा शिक्षणात सहभाग वाढला असून समाज अधिक एकजिनसी बनला आहे. शिक्षणामुळेच विकास साधता येतो, ही जाणीव आज दलित, आदिवासी, भटके आणि तळागाळातील समाजघटकांमध्ये निर्माण झाली आहे. तळातून झालेली राजकीय घुसळण, धर्मसत्तेला दिले गेलेले आव्हान आणि शेतकरी आंदोलनांचा उदय हे सर्व फुल्यांच्या विचारांवर आधारलेले परिवर्तनाचे टप्पे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विचार पुन्हा एकदा जनमानसात रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. बी. डी. दामन्नवर यांनी केले.

येथील शिवानंद महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या द्वीशताब्दी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. दामन्नवर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक करताना मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी फुल्यांच्या कार्याचा आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल रिस्थितीतही फुल्यांनी शिक्षण घेऊन समतेचा, सत्यशोधाचा, स्त्री सन्मानाचा आणि शिक्षणाचा वस्तुपाठ घालून दिला. स्त्री-पुरुष समानता हा फुलेंच्या विचाराचा केंद्रीभूत मुद्दा आहे. ज्योतिबांनी सामाजिक-धार्मिक रितीरिवाजांसह कुटुंबपद्धतीची पुनर्रचना करण्याचे ठरवले. सुरुवातीला फुले यांनी पर्यायी विवाहपद्धतीविषयी विचार करायला सुरुवात केली व सत्यशोधक विवाहपद्धती मांडली. असे ते म्हणाले.

यावेळी मराठी विभागाच्या वतीने महात्मा फुलेंच्या द्वीशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम, व्याख्यान आयोजित करण्याचा संकल्प केला गेला. कार्यक्रमाला हिंदी विभाग प्रमुख डॉ. अमोल पाटील यांच्यासह मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची आजही समाजपरिवर्तनासाठी गरज – प्रा. बी. डी. दामन्नवर appeared first on News 24 Tass Marathi.

कागवाडमधील रिक्षाचालकाच्या हत्येचा छडा
अवघ्या काही तासांत तीन संशयितांना अटक

पोलिसांनी उघडकीस आणला आरोपींचा बनाव

रिक्षा स्टँडवरील किरकोळ वादातून केला होता खून

कागवाड : बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यात मंगसुळी गावात रिक्षा स्टँडवर नंबर लावण्याच्या किरकोळ वादातून रिक्षाचालक अशोक वड्डर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत अवघ्या काही तासांत तीन संशयित आरोपींना अटक करून त्यांना हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

मंगसुळी गावात रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून भाऊबंदकीतील जुना वाद पुन्हा उफाळून आला होता. सागर संभाजी वड्डर, शिवा संभाजी वड्डर आणि विनोद संभाजी वड्डर यांनी अशोक वड्डर यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनीच पोलीस ठाण्यात जाऊन ‘भांडण सुरू आहे’ अशी खोटी माहिती दिल्याचे उघड झाले.

मृताच्या नातेवाईकांपूर्वीच आरोपी तक्रार देण्यासाठी पोहोचल्याने पोलिसांना संशय आला. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी करण्यात आली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रिक्षा नंबर लावण्यासारख्या शुल्लक कारणावरून तरुणाचा बळी गेल्याने कागवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण करत आरोपींना जेरबंद केल्याबद्दल पोलीस पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

The post कागवाडमधील रिक्षाचालकाच्या हत्येचा छडा appeared first on News 24 Tass Marathi.

मंगसुळीत रिक्षा रांगेच्या वादात रिक्षाचालकाची हत्या
तिघे अटकेत

कागवाड : बेळगाव जिल्ह्याच्या कागवाड तालुक्यातील मंगसूळी येथे रिक्षा उभ्या करण्याच्या रांगेवरून झालेल्या वादातून एका तरुण रिक्षाचालकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत तीन संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव अशोक वडर (वय २७, रा. मंगसूळी) असे आहे. रिक्षा थांब्यावर गाड्या लावण्याच्या क्रमावरून अशोक आणि इतर चालकांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. या वादातूनच परस्परांमध्ये वैर निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर आरोपी शिवा वडर, सागर वडर आणि विनोद वडर यांनी अशोकवर डोक्यात प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना उशिरा उघडकीस आली. माहिती मिळताच कागवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

या प्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या घटनेमुळे मंगसूळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

The post मंगसुळीत रिक्षा रांगेच्या वादात रिक्षाचालकाची हत्या appeared first on News 24 Tass Marathi.

भानामतीच्या भीतीने मुलीवर अमानुष अत्याचार
अनेक वर्षे घरात साखळीने बांधून ठेवले

कागवाड तालुक्यातील मूळे गावात धक्कादायक घटना

कागवाड / वार्ताहर

कागवाड तालुक्यातील मूळे गावात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्राय नावाच्या व्यक्तीने आपल्या बुद्धिमंद मुलीला अनेक वर्षे घरात साखळीने बांधून ठेवले, असे समजते.

माहितीनुसार, ही तरुणी दहा वर्षांपूर्वी नियमित कॉलेजला जात होती, परंतु तिच्या विचित्र वर्तनामुळे कुटुंबीयांना भानामतीची भीती वाटू लागली. त्यांनी एका स्वामीजींचा सल्ला घेतला, ज्यांनी भानामती दूर करण्यासाठी मोठा खर्च लागेल असे सांगितले. त्यामुळे उपचार न करता तिला घरात कैद करून ठेवण्यात आले.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, “साखळी काढल्यास ती लोकांवर दगड फेकते किंवा पळून जाते,” म्हणून तिला असे बांधले होते. हा अमानुष प्रकार कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून, पोलीस तपास सुरू आहेत.

The post भानामतीच्या भीतीने मुलीवर अमानुष अत्याचार appeared first on News 24 Tass Marathi.

वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास – डॉ. विनोद गायकवाड
शिवानंद महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा

मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे आयोजन

कागवाड : साहित्य म्हणजे वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रतिभेचा प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास असतो. सुखाचा त्याग, दुःखाचा भोग, विसंगतीचा योग खऱ्या प्रतिभेला जाग आणत असतात. माणसाला दुःख अटळ आहे. ते कुणालाही चुकलेले नाही. परंतु त्या दुःखाला केवळ कवटाळून बसण्याला काही अर्थ नाही. सुखाचा त्याग आणि दुःखाचा भोग ही कोणत्याही प्रतिभेची प्रेरणा ठरायला हवी. मराठी भाषा गौरव दिवस हा प्रतिभा जागवायचा दिवस आहे. कुसुमाग्रजानी ज्या अंतप्रेरणेने प्रगल्भ असे साहित्य लिहून मराठी भाषेची सेवा केली; तशी आजच्या पिढीने, विद्यार्थ्याने लिहिले पाहिजे. सगळे पुन्हा मिळू शकेल पण वेळ गेलेली कधीच पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही चांगले वाचा, चांगले लिहा. हे काम इथल्या मराठी विभागात होतं आहे याचे मला प्रचंड समाधान वाटते आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी केले.

येथील शिवानंद महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विनोद गायकवाड बोलत होते.

बोलताना पुढे डॉ. गायकवाड म्हणाले, तारुण्याचा काळ हा फार महत्वाचा आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणायचे सगळ्यात विषेश काळ आयुष्यातला कोणता तर तो तारुण्याचा काळ असतो. तो काळ तरुणांकडे असतो पण दुर्दैवाने ते त्यांनाच माहीत नसते. शिरवाडकर यांनी अशा तारुण्यात कितीतरी कविता लिहिल्या. विनायक सावरकरांनी याच वयेत मराठीला असंख्य नवीन शब्द देऊन मराठी भाषेची समृध्दी वाढविली. असे काहीतरी आपल्याला करता आले पाहिजे. बहिणाबाई चौधरी तर निरक्षर असतानाही किती प्रतिभावान काव्य लेखन त्यांनी केलं. चांगलं वाचलं की चांगलं लिहिता येते. रोजची वर्तमानपत्रे मासिके वाचा. तूम्ही समृध्द व्हाल. असे ते म्हणाले.

कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाच्या सभामांचावर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर गोंधळी, महाविद्यालयातील गुणवत्ता मानांकन केंद्राचे समन्वय अधिकारी प्रा. बी. डी. दामन्नवर, मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. मनोज कोरे आदी उपस्थित होते.

डॉ. एस. पी. तळवार यांनी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कोणतीही भाषा माणूस जोडण्याचे काम करते. भाषेच्या विकासात साहित्यिक योगदान देत असतात. शिरवाडकर यांनी मराठी भाषेला फार मोठे योगदान दिले आहे. डॉ. गायकवाड यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी आपला सृजनात्मक आविष्कार साहित्य लेखनातून करावा.

उपस्थितांचे स्वागत प्रा. मनोज कोरे यांनी केले तर प्रास्ताविक आणि परिचय प्रा. अशोक आलगोंडी यांनी करून दिला. यावेळी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कविता लेखन, निबंध लेखन व पोस्टर बनवणे स्पर्धा घेतल्या होत्या. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु शुभम बोरगावे, व्दितीय क्रमांक श्वेता बाबर, तृतीय क्रमांक अनन्या कुलकर्णी आणि उत्तेजनार्थ प्रतीक्षा पाटील, अश्विनी माळी, प्रीती मुळीक यांना मिळाला. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम स्नेहा करव, व्दितीय वैष्णवी माळी, तृतीय महेक अपराज आणि उत्तेजनार्थ पूजा भगत, निर्जरा पाटील, अक्काताई पाटील यांना मिळाले. पोस्टर बनवणे स्पर्धेत प्रथम सानिया गायकवाड, व्दितीय माधुरी माने, तृतीय शुभम बोरगावे आणि उत्तेजनार्थ वैष्णवी माळी, साक्षी पाटील, स्नेहल पाटील यांनी मिळवले.

यावेळी डॉ. अमोल पाटील, प्रा. साजिद इनामदार, प्रा. शिवानंद आवटी, प्रा. अशोक पाटील, प्रा. सोनाली फडतरे, मराठी पत्रकार संघाचे पत्रकार लक्ष्मण सुर्यवंशी, सचिन माने, अरुण जोशी आदींसह मोठ्या संख्येने प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु शुभम बोरगावे व सानिया बिलगी यांनी केले तर आभार गणित विषयाच्या प्रा. जास्मिन राजापूरे यांनी केले.

The post वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास – डॉ. विनोद गायकवाड appeared first on News 24 Tass Marathi.

बंदुकीच्या धाकाने लूट ; अवघ्या चार तासात आरोपी गजाआड
कागवाड पोलिसांची कारवाई

कागवाड / वार्ताहर

शिरगुप्पी परिसरात दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांची लूट करणाऱ्या आरोपीला कागवाड पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक करत कर्तृत्वाची झलक दाखवली आहे. पोलिसांच्या या झटपट कारवाईमुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

उगार (बी.के.) गावातील शांतू तवक्कर हे दुचाकीवरून शिरगुप्पी गावाच्या बाहेरील भागातून जात असताना आरोपी सागर सनदी याने त्यांना अडवले. बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील सुमारे २ लाख ८१ हजार २८० रुपये रोख रक्कम लुटून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच कागवाड पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. अखेर अवघ्या चार तासांत आरोपी सागर सनदी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या जलद कारवाईमुळे कागवाड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत असून स्थानिक नागरिकांनीही पोलिसांचे अभिनंदन केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

The post बंदुकीच्या धाकाने लूट ; अवघ्या चार तासात आरोपी गजाआड appeared first on News 24 Tass Marathi.