groundwater level Archives | News 24 Tass Marathi

राकसकोप धरण भरण्याच्या उंबरठ्यावर
सततच्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ

शहराच्या पाणीपुरवठ्याला मिळणार आधार

बेळगाव : गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बेळगाव शहरासाठी आता दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण पूर्ण क्षमतेच्या जवळ पोहोचले आहे.

यंदा पावसाला झालेल्या विलंबामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस राकसकोप धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मे महिन्यात धरणातील पाणीपातळी चिंताजनक स्थितीवर पोहोचल्याने बेळगाव शहरावर पाणी संकट ओढवले होते. त्यावेळी उपलब्ध पाणीसाठा केवळ १० ते १५ दिवस पुरेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

बेळगाव शहराला दररोज सुमारे १३० ते १३५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलस्रोतांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते.

सध्या झालेल्या पावसामुळे मार्कंडेय नदी आणि जांबूळा कालव्यातून राकसकोप धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. २७ जुलै रोजी धरणाची पाणीपातळी २४७०.३ फूट नोंदवण्यात आली असून धरणाची पूर्ण क्षमतेची पातळी २४७७ फूट आहे. त्यामुळे धरण पूर्ण भरण्यासाठी अजून काही फूट पाण्याची आवश्यकता आहे.

राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे. उपलब्ध साठ्यामुळे पावसाळ्यानंतरच्या काळात शहराला काही महिन्यांसाठी पुरेसा पाणीपुरवठा करता येण्याची शक्यता आहे. मात्र, उन्हाळ्यातील बाष्पीभवन, पाण्याचा वापर आणि हिडकल धरणातून होणारा पुरवठा यावर पाणीसाठ्याचा कालावधी अवलंबून राहणार आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास राकसकोप धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, धरणाचे दरवाजे उघडण्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

काही आठवड्यांपूर्वी पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बेळगाव शहरवासीयांसाठी आता राकसकोप धरणातील वाढता पाणीसाठा मोठा दिलासा ठरत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा शहरवासीयांना लागली आहे.

The post राकसकोप धरण भरण्याच्या उंबरठ्यावर appeared first on News 24 Tass Marathi.

राकसकोप जलाशय पूर्ण भरण्यास अजून १०.०८ फूट पाण्याची गरज
पावसाच्या सरींमुळे दिलासा ; मात्र गेल्या दहा दिवसांतील पावसाच्या खंडामुळे वाढीचा वेग मंदावला

बेळगाव : शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत असली तरी जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप १०.०८ फूट पाण्याची आवश्यकता आहे. जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रासह बेळगाव शहर आणि तालुक्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत असून, शेतकऱ्यांच्या पिकांनाही त्याचा काहीसा दिलासा मिळत आहे.

सध्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी २४६४.७० फूट इतकी नोंदविण्यात आली असून, जलाशय पूर्ण भरावयास आणखी १०.०८ फूट पाण्याची गरज आहे. यंदा जून महिनाभर समाधानकारक पाऊस न झाल्याने जलाशयातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला होता. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

मात्र, जुलै महिन्याच्या प्रारंभी सलग आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आणि जलाशयाची पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे शहरवासीयांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला.

तथापि, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने पाणीपातळीतील वाढीचा वेग मंदावला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढू लागली असून, जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आगामी काही दिवसांत चांगल्या पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.

हवामानातील बदलत्या परिस्थितीकडे प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास राकसकोप जलाशय लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

The post राकसकोप जलाशय पूर्ण भरण्यास अजून १०.०८ फूट पाण्याची गरज appeared first on News 24 Tass Marathi.

राकसकोप जलाशयात आठ दिवसांत १३ फूट पाणीसाठा
जलाशय पूर्ण भरण्यासाठी अद्यापही १६ फूट पाण्याची गरज

बेळगाव : जुलैच्या पहिल्या तारखेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राकसकोप जलाशयातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत पाणीपातळी १३ फुटांनी वाढली आहे. गुरुवारी (दि.९) जलाशयात पातळी २,४५८.८० फूट पाणी होते. गतवर्षी याच दिवशी पाणीपातळी २,४७४ फूट होती. जलाशय तुडुंब होण्यासाठी आणखी १६ फूट पाण्याची गरज आहे.

जलाशय परिसरात आतापर्यंत एकूण ९३८.५ मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारी पहाटे संपलेल्या चोवीस तासांत ९२.५ मिमी पावसाची नोंद झाली. सतत दहा दिवस झालेल्या पावसामुळे जलाशय परिसरातील नाले प्रवाहीत झाल्याने मृत साठ्यांपेक्षा कमी पातळी गाठलेल्या राकसकोप जलाशयात १३ फूट पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे, पाणीपातळी २,४५९ फुटांपर्यंत पोचली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत जलाशयात ११ फूट कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यात जलाशय तीनवेळा तुडुंब झाले होते. यंदा हे जलाशय भरण्यासाठी १६ फूट पाण्याची आवश्यक्ता आहे. त्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यक्ता आहे. मात्र, गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलाशय भरण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

The post राकसकोप जलाशयात आठ दिवसांत १३ फूट पाणीसाठा appeared first on News 24 Tass Marathi.

पाणीपातळीत सातत्याने घट ; राकसकोप जलाशयाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन

शहरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा कपातीची शक्यता

बेळगाव : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, कर्नाटक नागरी पाणीपुरवठा व मलनिस्सारण मंडळ (KUWSDB) आणि एलॲण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी राकसकोप जलाशयाची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. जलाशयातील पाणीपातळी सातत्याने घटत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

यंदा मान्सूनला झालेल्या विलंबामुळे राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलाशयांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या राकसकोप जलाशयातून मृतसाठ्यातील पाणी उपसून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. वेळेत पाऊस न झाल्यास शहरासमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त कार्तिक एम., अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर आणि एलॲण्डटीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी जलाशयाची प्रत्यक्ष पाहणी केली. गुरुवारी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी २,४४६ फूट इतकी नोंदविण्यात आली असून मृतसाठ्यातील पाणी आणखी दोन फूटांनी कमी झाले आहे. सध्या मोटारींच्या साहाय्याने दररोज २० ते २५ एमएलडी पाणी उपसले जात असून, आवश्यकतेनुसार आणखी दोन मोटारी कार्यान्वित करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी जलवाहिन्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, हिडकल जलाशयातील पाणीपातळी पाच टीएमसीपर्यंत खाली आली असून शेती आणि औद्योगिक वापरासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या जलाशयातून शहरासाठी दररोज ५५ एमएलडी पाणीपुरवठा सुरू आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पुरवठा कायम ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आणि पावसाचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास, शहरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

The post पाणीपातळीत सातत्याने घट ; राकसकोप जलाशयाची अधिकाऱ्यांकडून पाहणी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्ह्यात भूजल पातळीत लक्षणीय वाढ
खासदार ईराण्णा कडाडी यांची माहिती

बेळगाव / प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध जलसंधारण उपक्रमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील भूजल पातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या १,६७६ चेक डॅम्ससह सुमारे १.१ लाख जलसंधारणाच्या कामांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार ईराण्णा कडाडी यांनी दिली. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यासंदर्भात लेखी उत्तर दिले आहे.

गेल्या दहा वर्षांतील सरासरी आकडेवारीचा आढावा घेतल्यास जिल्ह्यातील सुमारे ८१ टक्के विहिरींच्या पाणी पातळीत सकारात्मक बदल झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सुमारे ९७ टक्के विहिरींमध्ये ० ते १० मीटर खोलीवरच पाणी उपलब्ध होत असून ही अत्यंत दिलासादायक बाब असल्याचे खासदार कडाडी यांनी सांगितले. जलसंधारणाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे भूजल व्यवस्थापनातही लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील ‘सुरक्षित’ तालुक्यांचे प्रमाण २०१७ मधील ४० टक्क्यांवरून २०२५ मध्ये ५३.३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर अतिवापराच्या श्रेणीत असलेल्या तालुक्यांचे प्रमाण ३० टक्क्यांवरून १३.३ टक्क्यांपर्यंत घटले असून सध्या केवळ बैलहोंगल आणि सौंदत्ती हे दोनच तालुके या श्रेणीत आहेत. अटल भूजल योजनेअंतर्गत अथणी आणि रामदुर्ग तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये १,५३६ बोअरवेल पुनर्भरण युनिट्स उभारण्यात आले असून त्यापैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले आहे.

तसेच ‘पर ड्रॉप मोर क्रॉप’ योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. राज्य सरकारच्या शाश्वत पीक व्यवस्थापन योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील सुमारे १,००० हेक्टर ऊस क्षेत्रात नवीन सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे खासदार कडाडी यांनी सांगितले.

The post बेळगाव जिल्ह्यात भूजल पातळीत लक्षणीय वाढ appeared first on News 24 Tass Marathi.