exam Archives | News 24 Tass Marathi

बेळगावात नागरी पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेसाठी जय्यत तयारी
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या देखरेखीखाली प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांकडे रवाना

६१ केंद्रांवर २५,१६४ उमेदवार देणार परीक्षा

बेळगाव : राज्यभरात आज होत असलेल्या नागरी पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या लेखी परीक्षेसाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने कडेकोट सुरक्षा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या थेट देखरेखीखाली जिल्हा कोषागारातून प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांकडे रवाना करण्यात आल्या.

विश्वेश्वरैया नगर येथील जिल्हा कोषागार कार्यालयात ठेवण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्या. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात १५ हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून त्या विविध परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आल्या. जिल्ह्यातील परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

बेळगाव शहरातील ४६ आणि चिक्कोडी शैक्षणिक क्षेत्रातील १५ अशा एकूण ६१ परीक्षा केंद्रांवर २५ हजार १६४ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, चेहरा ओळखणारी (फेस रिकग्निशन) यंत्रणा आणि अत्याधुनिक तपासणी उपकरणे बसवण्यात आली आहेत. ब्लूटूथसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी ६४ ईएनटी पॅरामेडिकल पथके तैनात करण्यात आली असून, उमेदवारांची सखोल तपासणी केली जाणार आहे. तसेच अनिवार्य गणवेश संहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातून परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (KEA) आयोजित या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्वंकष तयारी केली असून, उमेदवारांनी कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

The post बेळगावात नागरी पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेसाठी जय्यत तयारी appeared first on News 24 Tass Marathi.

तृप्ती देसाईचे पुन्हा जागतिक यश
ऑक्सफर्डसह तीन जागतिक विद्यापीठांत मोफत शिक्षणाची संधी

बेळगाव : जिद्द, कष्ट आणि समाजाप्रती असलेली निस्वार्थ भावना यांची सांगड घातल्यास यश पुन्हा दार ठोठावते, याचे प्रेरणादायी उदाहरण तृप्ती मल्लाप्पा देसाई हिने घालून दिले आहे. टोरंटो विद्यापीठातील प्रवेशाची संधी विविध शैक्षणिक अडचणींमुळे गमावावी लागल्यानंतरही तिने हार मानली नाही. आता जागतिक स्तरावरील गुणवत्तायादीत चौथा क्रमांक मिळवत तिने ऑक्सफर्ड विद्यापीठ, इम्पीरियल कॉलेज लंडन आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक या जगप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवला आहे.

यापूर्वी तृप्तीची कॅनडातील टोरंटो विद्यापीठात निवड झाली होती. मात्र, भारतातील काही शैक्षणिक प्रक्रियेतील अडचणींमुळे तिला यावर्षी तेथे प्रवेश घेता आला नाही. त्या वेळी मिळालेली तब्बल ९ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती तिने स्वतःसाठी न वापरता गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले होते.

यानंतर मंगळवारी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय समुपदेशन प्रक्रियेत जागतिक गुणवत्तायादीत तृप्तीने चौथा क्रमांक पटकावला. या यशामुळे तिला एकाच वेळी तीन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षणाची संधी मिळाली आहे.

तिची जर्मनीतील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक (TUM) येथे एम.एस. अभ्यासक्रमासाठी, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे पीएच.डी.साठी तसेच इम्पीरियल कॉलेज लंडन येथे एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी तिला संपूर्ण शिष्यवृत्ती मिळाल्याने उच्च शिक्षणाचा सर्व खर्च संस्थांकडून उचलला जाणार आहे.

स्वतःच्या यशाबरोबरच समाजालाही काहीतरी परत देण्याची तृप्तीची भूमिका आणि त्यासाठी केलेला त्याग अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

The post तृप्ती देसाईचे पुन्हा जागतिक यश appeared first on News 24 Tass Marathi.

नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजपचे तीव्र आंदोलन
काँग्रेस भवनला घेरावाचा प्रयत्न ; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

बेळगाव : नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधासाठी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा तसेच भाजप आमदारांवर अंडी फेकल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने बेळगावात तीव्र आंदोलन केले. राणी चन्नम्मा चौकातून काँग्रेस भवनकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

राणी चन्नम्मा चौकातून निघालेल्या मोर्चात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. काँग्रेस भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा देणे आणि देशविरोधी वक्तव्ये करणे अस्वीकार्य असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याला भाजपचा विरोध नसून, आंदोलनाच्या नावाखाली देशद्रोही कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.

बंगळुरूमध्ये आंदोलनादरम्यान भाजप आमदारांवर अंडी फेकल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माजी विधान परिषद सदस्य महंतेश कवटगीमठ आणि भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आंदोलनादरम्यान देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींची व्हिडिओ फुटेजच्या आधारे ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

मोर्चादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखले. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The post नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजपचे तीव्र आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi.

नीट गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बेळगावात युथ काँग्रेस व विद्यार्थ्यांची तीव्र निदर्शने
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बेळगाव : देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा प्रश्नपत्रिका गळती आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी युथ काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी बेळगावात तीव्र आंदोलन छेडले. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा तसेच योग्य आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलकांनी आरोप केला की, गेल्या दहा वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका १५० हून अधिक वेळा फुटल्या असून, अलीकडील काळातही ७० पेक्षा अधिक गैरप्रकार समोर आले आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

मुसळधार पावसातही विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे त्याग करत असताना परीक्षांतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. तसेच शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाचाही त्यांनी निषेध नोंदवला.

युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये केवळ २२ कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असून उर्वरित कर्मचारी कंत्राटी आहेत. त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

The post नीट गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बेळगावात युथ काँग्रेस व विद्यार्थ्यांची तीव्र निदर्शने appeared first on News 24 Tass Marathi.

सोनम वांगचूक यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बेळगांवात उद्या निदर्शने
बेळगाव : नीट व इतर परिक्षांतील गोंधळ आणि त्याला जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे गेल्या अठरा दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवार दि. १५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड येथे निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. प्रगतिशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगांव व संलग्न संस्थांच्या वतीने हे आंदोलन होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. आनंद मेणसे व निला आपटे यांनी केले आहे.

The post सोनम वांगचूक यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बेळगांवात उद्या निदर्शने appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावरील स्पेल बी परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथील इयत्ता पाचवी ‘ब’ मधील विद्यार्थिनी अन्शाराह शोएब मुल्ला हिने आपल्या उत्कृष्ट शब्दलेखन कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व व मेहनतीच्या जोरावर WIZ International Spell Bee या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पेल बी परीक्षेत अन्शाराहने उत्तम कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन व योग्य दिशा मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमार्फत विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अन्शाराहच्या या यशाबद्दल शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, शिक्षकवृंद व पालकांनी तिचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

The post ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावरील स्पेल बी परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात ‘री-नीट’ परीक्षेसाठी २८ केंद्रांभोवती जमावबंदी
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा आदेश

२१ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ पर्यंत २०० मीटर परिसरात निर्बंध

सायबर कॅफे, झेरॉक्स दुकानेही राहणार बंद

बेळगाव : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) आयोजित करण्यात येणारी ‘री-नीट यूजी’ परीक्षा शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी बेळगाव शहरातील २८ परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. २१ जून २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या कालावधीत संबंधित परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू राहणार आहे.

बेळगाव शहराचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश जारी केले आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

या आदेशानुसार परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात ध्वनिक्षेपक वापरण्यास बंदी घालण्यात आली असून, सायबर कॅफे, झेरॉक्स दुकाने तसेच इंटरनेट सुविधा केंद्रे परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर नागरिक तसेच पालकांना या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच परीक्षा केंद्रांच्या आवारात शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, स्फोटके किंवा कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संगोळ्ळी रायण्णा कॉलेज, केएलई संस्थेची विविध महाविद्यालये, शासकीय तंत्रनिकेतन, मच्छे येथील व्हीटीयूचे चार स्वतंत्र ब्लॉक, आरपीडी कॉलेज, ज्योती कॉलेज तसेच केंद्रीय विद्यालय क्रमांक १, २ आणि ३ यांच्यासह शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस उपायुक्त आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

The post बेळगावात ‘री-नीट’ परीक्षेसाठी २८ केंद्रांभोवती जमावबंदी appeared first on News 24 Tass Marathi.

नीट यूजीची फेरपरीक्षा २१ जूनला
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून घेण्यात आलेली नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द झाल्यानंतर आता फेरपरीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, ही परीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेनंतर पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे देशभरात मोठी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा परिणाम २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर झाला आहे.

विद्यार्थी या परीक्षेची वर्षभर तयारी करत असतात. परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांत सोशल मीडियावर कथित ‘गेस पेपर’चे फोटो व्हायरल झाले होते. त्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा दावा करण्यात आल्याने संशय निर्माण झाला होता.

यानंतर एनटीएने संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान काही अनियमितता आणि गैरप्रकार समोर आल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

The post नीट यूजीची फेरपरीक्षा २१ जूनला appeared first on News 24 Tass Marathi.

सीईटी परीक्षेवेळी जानवे काढायला लावल्याने संताप
बेळगावात ब्राह्मण महासभेचे आंदोलन

बेळगाव : सीईटी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना जानवे काढण्यास भाग पाडल्याच्या प्रकारावरून बेळगावमध्ये वाद निर्माण झाला असून अखिल भारतीय ब्राह्मण महासभेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले.

परीक्षेदरम्यान जानवे, मंगळसूत्र आणि बांगड्या काढण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करत या नियमामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे जिल्हाध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती यांनी सांगितले की, “सीईटी परीक्षेच्या नावाखाली अशा प्रकारचे निर्बंध लादणे हे संविधानाने दिलेल्या धार्मिक अधिकारांचे उल्लंघन आहे. जानवे केवळ ब्राह्मण समाजापुरते मर्यादित नसून इतर समाजातील नागरिकही ते परिधान करतात. त्यामुळे अशा प्रकारे वागणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात ब्राह्मण समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The post सीईटी परीक्षेवेळी जानवे काढायला लावल्याने संताप appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावमध्ये डीएलएड परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी लागू
बेळगाव : शहरात होणारी डीएलएड पूरक परीक्षा शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. परीक्षा केंद्राभोवती २०० मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

२७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत डीएलएड प्रथम व द्वितीय वर्षाची पूरक परीक्षा आयोजित करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मन्नूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) परीक्षा केंद्राभोवती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारे गर्दी जमविणे, एकत्र येणे किंवा हालचाल करणे यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच परीक्षा कालावधीत परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने, सायबर कॅफे आणि इंटरनेट केंद्रे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फक्त अधिकृत कर्मचारी व परीक्षार्थींनाच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र परिसरात ध्वनिवर्धकाचा वापर, घोषणा अथवा कोणत्याही प्रकारचे गोंगाटपूर्ण वातावरण निर्माण करणे यालाही बंदी घालण्यात आली आहे.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.

The post बेळगावमध्ये डीएलएड परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी लागू appeared first on News 24 Tass Marathi.