Ashadi Ekadashi Archives | News 24 Tass Marathi

जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी
बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित मंडोळी रोड येथील जोशी सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई च्या प्रार्थनेसह दिंडी काढली. आणि आसपासच्या भागातून निघालेल्या या बालचमुच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बालकांनी पारंपारिक वेशभूषेत या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. शाळेचे प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला. विद्यार्थी वर्गाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विठ्ठल भक्तीचे दर्शन घडविले. शाळेतील शिक्षक वर्गाने पुढाकार घेतला होता.

The post जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी appeared first on News 24 Tass Marathi.

आषाढी एकादशीनिमित्त वीर सौध योगा केंद्रात किर्तनाचा जागर
बेळगाव : टिळकवाडी येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने ह. भ. प सौ.अश्विनी सरनोबत यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते संत कान्होपात्रा यांच्या अभंगातून भक्तीचा जागर त्यांनी रसाळ, ओघवत्या शैलीतून मांडणी करून संतांचे विचार मानसिक समाधान देतात.आध्यात्मिक हाच खरा मानवी धर्म आहे जीवन कृतार्थ होण्यासाठी नामाचा जयघोष करा.संत तुकाराम, एकनाथ महाराज, नामदेवांनी भक्तीचा मार्ग अठरा पगड जातीला दाखवून जगण्याचा अधिकार दिला लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल,जय जय राम कृष्ण हरी हा जयघोष करीत पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन वारकरी संप्रदायाची‌ पताका खांद्यावर घेतात.हा एकतेचा संदेश संतांनी दिला.असे विविध दृष्टांत देऊन संतमहती कथन केली.

प्रारंभी विठ्ठल प्रतिमेचे पूजन योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले. उषा दळवी व विजयालक्ष्मी मायकलवार यांनी सौ. अश्विनी रवि सरनोबत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

प्रास्ताविक व परिचय वाय. पी. नाईक यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय कुरविनकोप यांनी केले. आभार प्रा. भूदेवी पुरोहित यांनी मानले. यावेळी उमेश सुपाले रवींद्र सुतार गीता देशपांडे, शोभा दुर्वे, पल्लवी मदली,वर्षा शानबाग, बीना मुन्नोळकर, स्मिता निंबाळकर, सुलक्षणा जाधव, नारायण नवखणकर, शामल पाटील  आदि सदस्य उपस्थित होते.

The post आषाढी एकादशीनिमित्त वीर सौध योगा केंद्रात किर्तनाचा जागर appeared first on News 24 Tass Marathi.

राज्यात भरपूर पाऊस पडू दे ; शेतकरी समृद्ध होऊ दे
आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे साकडे

सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा

वारकऱ्यांच्या भक्तीने फुलली पंढरी ; लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याहस्ते शनिवारी पहाटे विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा भक्तिभावाने संपन्न झाली. यावेळी राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी सुखी-समृद्ध व्हावेत, महाराष्ट्रावर विठुरायाची कृपादृष्टी कायम राहावी आणि जनतेच्या जीवनात आनंद व समाधान नांदावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठ्ठलाच्या चरणी केली.

यंदाच्या शासकीय महापूजेसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी बाळासाहेब माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती माने यांची ‘मनाचे दाम्पत्य’ म्हणून निवड करण्यात आली. त्यांना मुख्यमंत्री दाम्पत्यासमवेत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारीच पंढरपुरात दाखल झाले होते. शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडल्यानंतर रुक्मिणी मातेचीही महापूजा करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान सहाव्यांदा मिळाला.

महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विठ्ठलाच्या मंदिरात आल्यानंतर नवी ऊर्जा मिळते. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडावा, अशीच विठुरायाकडे प्रार्थना केली आहे. तसेच देशातील तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विठुरायाचा आशीर्वाद लाभावा, अशीही प्रार्थना केली.”

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासूनच विठ्ठलनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. लाखो वारकरी आणि भाविकांनी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपुरात हजेरी लावली आहे. दर्शनासाठी २० ते २५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून चंद्रभागा नदीच्या तीरावरही वारकऱ्यांचा जनसागर उसळला आहे.

The post राज्यात भरपूर पाऊस पडू दे ; शेतकरी समृद्ध होऊ दे appeared first on News 24 Tass Marathi.

आषाढी एकादशीनिमित्त धारवाड – बेळगाव – पंढरपूर विशेष रेल्वेला आजपासून सुरुवात
२३ ते २८ जुलैदरम्यान सहा फेऱ्या

बेळगावसह उत्तर कर्नाटकातील भाविकांना मोठा दिलासा

बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण पश्चिम रेल्वेकडून धारवाड-बेळगाव-पंढरपूर विशेष रेल्वे आजपासून सुरू करण्यात आली आहे. बेळगाव, धारवाड, हुबळी आणि परिसरातील हजारो भाविकांची दरवर्षी होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, २३ ते २८ जुलैदरम्यान ही रेल्वे एकूण सहा फेऱ्या करणार आहे.

या विशेष रेल्वेत एकूण १० डबे असून त्यापैकी ८ जनरल आणि २ स्लीपर कोचचा समावेश आहे. बेळगावहून पंढरपूरसाठी थेट रेल्वेची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. या विशेष सेवेच्या माध्यमातून भाविकांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सकाळी ६ वाजता धारवाड येथून सुटणारी विशेष एक्स्प्रेस सकाळी ७.४९ वाजता खानापूर, ८.३० वाजता बेळगाव, ९.३० वाजता घटप्रभा, दुपारी १२.२० वाजता मिरज येथे पोहोचून सायंकाळी ४.५० वाजता पंढरपूर येथे दाखल होईल.

परतीच्या प्रवासात ही रेल्वे सायंकाळी ६.४० वाजता पंढरपूरहून सुटेल. त्यानंतर मध्यरात्री १.२० वाजता बेळगावला, तर पहाटे ४.३० वाजता धारवाडला पोहोचणार आहे.

ही विशेष रेल्वे धारवाड, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, कुडची, उगार, शेडबाळ, विजापूर, मिरज, अरग, सांगोला आणि पंढरपूर या स्थानकांवर थांबणार असल्याने उत्तर कर्नाटकातील तसेच सीमाभागातील भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

The post आषाढी एकादशीनिमित्त धारवाड – बेळगाव – पंढरपूर विशेष रेल्वेला आजपासून सुरुवात appeared first on News 24 Tass Marathi.

विठ्ठल दर्शनाची प्रतीक्षा आता चार तासांवर
व्हीआयपी दर्शन बंदचा सकारात्मक परिणाम

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

भाविकांना जलद दर्शनासाठी सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या सूचना

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आल्याने दर्शनरांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तास प्रतीक्षा करावी लागत असताना आता ही प्रतीक्षा सुमारे चार तासांवर आली असून भाविकांना अधिक सुलभ आणि जलद दर्शनाचा लाभ मिळत आहे.

२५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी शुद्ध एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनरांगेतील भाविकांना कोणताही अडथळा न येता दर्शन मिळावे, यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वेरी महाविद्यालयापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिर समितीने दर्शनरांग आणि पत्राशेड परिसरात भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधत त्यांनी दर्शन व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध सुविधांबाबत प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. दर्शनरांगेत घुसखोरी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून व्यवस्था अधिक काटेकोर करण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर समितीला दिल्या.

व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे सामान्य भाविकांना जलद दर्शन मिळत असल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले असून, आषाढी यात्रेदरम्यानही ही व्यवस्था प्रभावीपणे कायम ठेवण्याची अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.

The post विठ्ठल दर्शनाची प्रतीक्षा आता चार तासांवर appeared first on News 24 Tass Marathi.

सुळगा (हिं.) येथे उस्ते – सत्तरी गोवा येथील वारकरी दिंडीचे उत्साहात स्वागत
पाचव्या वर्षीही वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था

स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या सेवाभावाची परंपरा कायम

दिंडीकडून आयोजकांचा सन्मान

सुळगा (हिं.) : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी निघालेल्या गोव्यातील उस्ते-सत्तरी, वाळपई येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या दिंडीचे बुधवारी सुळगा (हिं.) येथे ग्रामस्थांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करून, दिवंगत सामाजिक कार्यकर्ते शट्टूप्पा (बाळू) पाटील यांनी सुरू केलेली सेवाभावाची परंपरा त्यांच्या कुटुंबीयांनी यंदाही कायम ठेवली.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात आयोजित स्वागत कार्यक्रमासाठी स्व. शट्टूप्पा पाटील यांचे सुपुत्र रोहन पाटील, समाजसेविका माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. दिंडीचे स्वागत करून सर्व वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. पावसाने उघडीप दिल्यामुळे वारकऱ्यांनी मोकळ्या वातावरणात अल्पोपहाराचा आनंद घेतला.

यावेळी वारकरी विदेश माडकर यांनी श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या पायी वारीची माहिती देत सांगितले की, यंदाची ही मंडळाची पाचवी पायी वारी असून उस्ते येथून खांद्यावर पालखी घेऊन पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करणे हे या दिंडीचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या वारीत १५३ वारकरी सहभागी झाले असून दररोज नामस्मरणावर विशेष भर दिला जातो. वारीचे प्रमुख बारकेलो राणे (बुवा), उपप्रमुख सर्वेश राणे, संचालक रामकृष्ण इब्रामपूरकर आणि सचिव मोहन वांतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सुळगा ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताबद्दल तसेच रोहन पाटील, माधुरी जाधव आणि सहकाऱ्यांनी केलेल्या सेवाभावी उपक्रमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रास्ताविकात शेखर मनोहर पाटील यांनी स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा या भावनेतून त्यांनी चार वर्षांपूर्वी या दिंडीच्या अल्पोपहाराची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या निधनानंतरही त्यांचा सुपुत्र रोहन पाटील, भगिनी माधुरी जाधव आणि सहकाऱ्यांनी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवत त्यांच्या कार्याचा वारसा जपला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दिंडीच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या.

माधुरी जाधव यांनी मनोगतात स्व. शट्टूप्पा पाटील यांनी रुजविलेल्या सेवाभावाच्या संस्कारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून ही परंपरा भविष्यातही अविरत सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सुळगा ग्रामस्थांसह भरत पाटील, वीर पाटील, राजश्री कदम, मनीषा देसाई आणि अन्य सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिंडीचा उर्वरित प्रवास निर्विघ्न आणि मंगलमय व्हावा, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

श्रीराम सेना हिंदुस्थानचे ग्रामीण अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील यांनीही दिंडीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत वारकरी परंपरेतील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.

दरवर्षीप्रमाणे केलेल्या स्वागत व अल्पोपहार व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिंडीच्या वतीने रोहन पाटील, माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम, वासंती पाटील, श्वेता खांडेकर, स्मिता पाटील, नेहा मोरे, वीर पाटील, भरत पाटील, साईनाथ पाटील, माजी सैनिक ऑन. कॅप्टन धनाजी मोरे, परशराम सांगावकर, मोन्नापा पाटील, शिवा पुजारी, दिलीप कोंडुसकोप, रमेश कुडचीकर, योगेश कुडचीकर, ओमकार पाटील, भरत कुडचीकर, गोपाळ कलखांबकर, बाबुराव कोकीतकर, प्रथमेश कोचेरी, नागेश निलजकर, शंकर अष्टेकर, पार्थ खांडेकर, रोहित चौगुले, सूरज चौगुले, रमेश कलखांबकर, खेमानी कलखांबकर, धनंजय मोहिते आदी उपस्थित होते.

The post सुळगा (हिं.) येथे उस्ते – सत्तरी गोवा येथील वारकरी दिंडीचे उत्साहात स्वागत appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
१६ व्या वर्षी पायी वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शेकडो वारकरी सहभागी

येळ्ळूर : आषाढी वारीनिमित्त येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या वतीने पंढरपूरकडे निघालेली पारंपरिक पायी दिंडी दुसऱ्या दिवशीही अभंग, टाळ-मृदुंगाच्या गजरात मार्गक्रमण करत पुढे सरकली. गेली १५ वर्षे अखंड सुरू असलेली ही दिंडी यंदा १६ व्या वर्षात प्रवेश करत असून, शेकडो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.

मौनानंद तुकाराम महाराज मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धामणे येथील हभप मारुती महाराज सांबरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे. वैष्णव सदन आश्रमात विधीवत पादुका पूजनानंतर भव्य मिरवणुकीने यात्रेला प्रारंभ झाला. ९० वर्षांवरील ज्येष्ठ वारकऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत विविध वयोगटातील भाविकांनी पायी वारीत सहभाग नोंदविला.

यावेळी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी दिंडीची भेट घेऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच उत्तम पिकपाण्यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करण्याची विनंती त्यांनी वारकऱ्यांना केली. दरवर्षी दिंडीत सहभागी होणे आणि वारकऱ्यांची सेवा करणे ही आपल्या कुटुंबाची परंपरा असल्याचे सांगत, पुढील वर्षी स्वतःही पायी वारीत सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

गतवर्षी दिंडीच्या वाहनांना महामार्गावरील टोल नाक्यांवर वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि मृणाल हेब्बाळकर यांच्या सहकार्याने दिंडीच्या वाहनांसाठी टोल नाक्यांवर सुलभ आणि टोलमुक्त प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. या सहकार्याबद्दल दिंडी समितीने हेब्बाळकर कुटुंबाचे आभार व्यक्त केले.

The post येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान appeared first on News 24 Tass Marathi.

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर
८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे २०२६ सालासाठीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पडली असून, यावेळी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती सादर करण्यात आली.

पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, २४ जुलै रोजी ती पंढरपूर येथे पोहोचेल. प्रस्थानाची वेळ दुपारी ३ वाजता ठेवण्यात आली आहे. या कालावधीत १७ दिवसांचे मुक्काम, ४ गोल रिंगण आणि ३ उभे रिंगण पार पडणार आहेत. तसेच आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे हजारो वारकरी ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. जसे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहतो, त्याचप्रमाणे वारकऱ्यांनाही आषाढी यात्रेची ओढ लागलेली असते. चैत्र दशमीपासूनच वारीच्या नियोजनासाठी आळंदी देवस्थानमध्ये बैठका घेतल्या जातात. या बैठकीला संस्थेचे विश्वस्त आणि दिंडी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी सोहळ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

८ जुलै (ज्येष्ठ वद्य अष्टमी) : आळंदी येथून प्रस्थान

९ व १० जुलै : पुणे मुक्काम

११ व १२ जुलै : सासवड मुक्काम

१३ जुलै : जेजुरी

१४ जुलै : वाल्हे मुक्काम

१५ जुलै : नीरा येथे स्नान, नंतर लोणंद मुक्काम

१६ जुलै : चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण, तरडगाव मुक्काम

१७ जुलै : फलटण मुक्काम

१८ जुलै : बरड मुक्काम

१९ जुलै : नातेपुते मुक्काम

२० जुलै : पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण, माळशिरस मुक्काम

२१ जुलै : खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, वेळापूर मुक्काम

२२ जुलै : ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण, टप्पा येथे बंधू भेट, भंडीशेगाव मुक्काम

२३ जुलै : बाजीराव विहीर येथे गोल व उभे रिंगण, वाखरी मुक्काम

२४ जुलै : आषाढ दशमी, पंढरपूर येथे आगमन व मुक्काम

२५ जुलै : आषाढी एकादशी सोहळा

बैठकी दरम्यान वारीदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी शासनस्तरावर मांडून त्यांचे निराकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भाविकांमध्ये पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

The post आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर appeared first on News 24 Tass Marathi.

आषाढी एकादशीनिमित्त नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
सुळगे (ये.) : येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त भव्य वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ शाळेचे मुख्याध्यापक श्री.टी.वाय भोगण आणि सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. दिंदीत विठ्ठल रखुमाई तसेच तुकाराम महाराज, सोपानदेव, ज्ञानदेव ,चोखामेळा मुक्ताई, जनाई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.

प्रारंभी शाळेच्या पटांगणातून सुळगे (ये.) गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर, भावकेश्वरी मंदिर आणि मारुती मंदिर पर्यंत पायी दिंडी काढून सर्वांचे लक्ष या दिंडीकडे वेधण्यात आले.

या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकांच्या हस्ते विठ्ठल – रखुमाई यांची यथोचित पूजा करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढीवारी निमित्त काढल्या जाणाऱ्या पायी दिंडीचे महत्त्व सांगितले. यानंतर पायी दिंडी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

The post आषाढी एकादशीनिमित्त नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी appeared first on News 24 Tass Marathi.

बा विठ्ठला… राज्याची भरभराट होऊ दे…शेतकरी सुखी राहू दे !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठल चरणी साकडे

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा

पंढरपूर : राज्याची भरभराट व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल चरणी साकडे घातले.

आषाढी एकादशीनिमित्त लाखो भक्तांच्या उपस्थितीत आज रविवार (दि. ६ जुलै) रोजी पहाटे पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याहस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास ही पारंपरिक पूजा पार पडली. यावेळी थेट प्रक्षेपणाद्वारे भक्तांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतला. या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करून, विठ्ठलाची आरती करण्यात आली.

या वर्षीच्या शासकीय पूजेचा मान मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे असलेले कैलास उगले आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांना मिळाला. गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठल भक्तीत लीन असलेल्या उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांम्पत्यासोबत विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री आपले कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. तिथे रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली.

पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा शाल घालून सन्मान करण्यात आला. मंदिर समितीच्या गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला. यावेळी गहिनीनाथ महाराजांनी आषाढीसाठी वारकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “या मंदिराच्या माध्यमातून पुढील दोनशे वर्षे या मंदिराचं आयुष्य वाढवलं तसं संतपीठ क्षेत्र पंढरपूरी येथे स्थापन करून एक अलौकिक कार्य करावे अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो.” त्यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख या नात्याने सर्व वारकरी संप्रदायाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. वारकरी संप्रदायाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांना सार्थ अभिमान असल्याचे नमूद केले. भविष्यातही असेच खंबीरपणे उभे राहावे अशी विनंती करण्यात आली. पंढरपूर येथे संतपीठ स्थापन करण्याची मागणी हा या भेटीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला. वारकऱ्यांसाठीच्या सुविधा आणि संतपीठाची मागणी हे प्रमुख विषय होते.

तर मानाचे वारकरी दाम्पत्य कैलास उगले आणि कल्पना उगले यांचा मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्याहस्ते शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकऱ्यांचा उत्साह आणि श्रद्धा यांचे कौतुक केले. “आषाढी एकादशीच्या मंगलप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होण्याचे तसेच शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले आणि विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले असे त्यांनी सांगितले. “आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या पवित्र दिवशी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन मी सर्वांसाठी प्रार्थना केली आहे. राज्यात भरपूर पाऊस पडो, शेतकरी सुखी आणि समृद्ध होवो आणि महाराष्ट्राचा विकास अखंड सुरू राहो, असे साकडे मी विठुमाऊलीला घातले आहे.” असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान आज पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा आनंदोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने महिनाभर वारी करत चालत असणारे लाखो वारकरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली आहे. यानिमित्ताने संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.

The post बा विठ्ठला… राज्याची भरभराट होऊ दे…शेतकरी सुखी राहू दे ! appeared first on News 24 Tass Marathi.