workshop Archives | News 24 Tass Marathi

प्राण्यांप्रति करुणा आणि सार्वजनिक सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी ; महापौर प्रीती कामकर
बेळगाव महापालिकेत खाद्य क्षेत्रांसाठी प्रमाणित कार्यपद्धतीवर कार्यशाळा

प्राणीप्रेमी आणि नागरिकांच्या सहभागावर भर

बेळगाव : प्राण्यांप्रति करुणा दाखवणे हे माणुसकीचे लक्षण आहे; मात्र सार्वजनिक सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन महापौर प्रीती कामकर यांनी केले. बेळगाव महानगरपालिका, जिल्हा पशु कल्याण संघटना आणि पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी महापालिकेत आयोजित भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य क्षेत्र निश्चित करण्यासंबंधी प्रमाणित कार्यपद्धतीच्या (एसओपी) कार्यशाळेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.

शहरात भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य क्षेत्र निश्चित करताना नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब करण्यास ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उपमहापौर हनुमंत कोंगळी यांनी भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य क्षेत्र आणि त्यांच्या संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. प्राण्यांच्या कल्याणाची काळजी घेतानाच कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठीही प्रभावी व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राणीप्रेमी आणि नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य व संरक्षण क्षेत्रे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. या प्रक्रियेबाबत स्पष्टता निर्माण करणे आणि संबंधितांना आवश्यक मार्गदर्शन करणे, हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत ‘ह्युमन वर्ल्ड फॉर ॲनिमल्स’च्या प्रतिनिधी भजंत्री आणि सीमांतिनी यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी प्रात्यक्षिकांसह भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य क्षेत्र निश्चित करण्याची पद्धत आणि त्यासंबंधीच्या विविध बाबींची माहिती दिली. पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागाचे डॉ. श्रीकांत गवी यांनी प्रास्ताविक केले, तर महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अधिकारी आणि अभियंता हनुमंत कलादगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष राजू भातकांडे, विकास स्थायी समितीचे अध्यक्ष श्रेयस नाकाडी, नगरसेवक रवी धोत्रे, गिरीश धोंगडी, संदीप जिराग्याळ आणि शंकर पाटील उपस्थित होते. तसेच महापालिकेच्या पर्यावरण विभागातील अभियंते अशोक कुमार सज्जन, प्रवीण कुमार आणि आदिल खान, पेटा (PETA) व अन्य संस्थांचे प्रतिनिधी, प्राणीप्रेमी, नागरिक आणि विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

The post प्राण्यांप्रति करुणा आणि सार्वजनिक सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी ; महापौर प्रीती कामकर appeared first on News 24 Tass Marathi.

पॅरिसमध्ये बेळगावचे चित्रकार विकास पाटणेकर यांच्या कलाकृतींवर चर्चासत्र
‘क्रॉस्ड ग्लानसिस’ पुस्तकातील चित्रांवर समीक्षक व चित्रकारांकडून चर्चा

पॅरिसमध्ये चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्याची घोषणा

बेळगाव : बेळगावचे चित्रकार विकास पाटणेकर यांच्या कलाकृतींवर पॅरिस येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. रोक डी अंथेनर सभागृहात झालेल्या या चर्चासत्रात ‘क्रॉसड ग्लानसिस’ या पुस्तकात प्रकाशित झालेल्या विकास पाटणेकर यांच्या चित्रावर विशेष चर्चा करण्यात आली.

या पुस्तकातील त्यांच्या कलाकृतींचे जगभरातील अनेक समीक्षकांनी कौतुक केले आहे. चर्चासत्रात सहभागी समीक्षक आणि चित्रकारांनी विकास पाटणेकर यांच्या चित्रांविषयी आपली मते व्यक्त करत त्यांच्या कलाकृतींची वैशिष्ट्ये विशद केली.

या कार्यक्रमाचे आयोजन बेनेडिक्त जोबे डुवाल यांनी केले होते. पुढील काळात विकास पाटणेकर यांच्या चित्रांचे पॅरिसमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले.

The post पॅरिसमध्ये बेळगावचे चित्रकार विकास पाटणेकर यांच्या कलाकृतींवर चर्चासत्र appeared first on News 24 Tass Marathi.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची विविध गणेश मूर्तीशाळांना भेट
विसर्जन मिरवणुकीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केले मार्गदर्शन

बेळगाव : गणेशोत्सवा दरम्यान विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी वेळेत दूर व्हाव्यात आणि मिरवणुकीचा कालावधी कमी व्हावा, या उद्देशाने बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे अत्यंत सक्रिय झाले आहेत. काल, मंगळवार दि.२८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:०० ते रात्री १०:०० या वेळेत पोलीस आयुक्तांनी शहरातील विविध गणेश मूर्तीशाळांना थेट भेटी देऊन पाहणी केली आणि मूर्तिकारांशी संवाद साधला. उत्सव दीड महिना म्हणजेच ४५ दिवस बाकी असतानाच आयुक्तांनी ही महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे. या दौऱ्यात मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर हे देखील आयुक्तांसोबत उपस्थित होते.

विविध भागात प्रत्यक्ष पाहणी व स्वागत :

पोलीस आयुक्त श्री. बोरसे यांनी येडियुराप्पा रोड येथील मनोहर पाटील, अनगोळ येथील जे. जे. पाटील, विक्रम व विनायक, मुतगा गावातील एम. जी. पाटील आणि गुडशेड रोड येथील कुंभार ब्रदर्स यांच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यांसह अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. या पाहणी दौऱ्यात जवळपास 200 हून अधिक मूर्तींची पाहणी करण्यात आली. मूर्तिकार संघटनेचे सचिव विनायक मनोहर पाटील यांनी पोलीस आयुक्तांचे झाडाचे रोप देऊन उत्साहात स्वागत केले.

अडचणींवर मात करण्यासाठी थेट संवाद :

मागील वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पोलीस आयुक्त स्वतः मागील वर्षी पहिल्या मूर्तीपासून ते शेवटच्या मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत कपलेश्वर तलावापाशी जातीने हजर होते. त्यामुळे त्यांना तिथल्या लहान-मोठ्या सर्व तांत्रिक अडचणींची पूर्ण कल्पना आहे. यंदा त्या चुका आणि अडचणी पुन्हा घडू नयेत, यासाठी आयुक्तांनी सर्व मूर्तिकारांना विसर्जन सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन केले व सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच मूर्तिकारांना काही अडचणी असल्यास त्यांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस अधिकारी आणि मूर्तिकारांची साथ :

या विशेष मोहिमेदरम्यान मार्केट, खडे बाजार, शहापूर, मारीहाळ आणि उद्यमबाग अशा विविध पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या या सकारात्मक पुढाकाराचे सर्व मूर्तिकारांनी स्वागत केले असून, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या मोहिमेमुळे यंदाची बेळगावची गणेश विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तबद्ध आणि कमी वेळेत पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

The post पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची विविध गणेश मूर्तीशाळांना भेट appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात सार्वजनिक वक्तृत्व कलेवरील प्रेरणादायी ओपन हाऊस कार्यक्रम
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि बेळगाव टोस्टमास्टर्स सेंटेनरी क्लबचा संयुक्त उपक्रम

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि बेळगाव टोस्टमास्टर्स सेंटेनरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलै २०२६ रोजी बेळगावात सार्वजनिक वक्तृत्व कला, प्रभावी संवादकौशल्य आणि नेतृत्व विकासावर आधारित प्रेरणादायी ओपन हाऊस कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सायंकाळी ४ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सहभागी आणि उपस्थित पाहुण्यांना सार्वजनिक वक्तृत्वाची प्रभावी शैली, आत्मविश्वासपूर्ण संवाद आणि नेतृत्वगुण विकसित करण्याविषयी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. विविध सत्रांमधून उपस्थितांना स्वतःच्या अभिव्यक्तीची ताकद ओळखण्याची आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधण्याची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन कार्यक्रम अध्यक्षा रोटेरियन दिव्या एम. यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी रोटेरियन राजनंदा गर्गी, रोटेरियन अनुपमा कळ्ळोळ, रोटेरियन रेणुका मोत्रे आणि रोटेरियन सविता वेसणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले.

आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येईल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

The post बेळगावात सार्वजनिक वक्तृत्व कलेवरील प्रेरणादायी ओपन हाऊस कार्यक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

कवितेतून मूल्यांची जोपासना आवश्यक
ज्येष्ठ कवी विजय चोरमारे यांचे प्रतिपादन

बेळगाव : कविता म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा नसतो. कविता लिहिणे सोपे नसून ती एक जोखीम असते. आपण जे पाहतो, अनुभवतो, ते कवितेत यायला हवे. कवितेतून मूल्यांची जोपासना करत चांगला आशय मांडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी विजय चोरमारे यांनी केले.

येथील शब्दगंध कविमंडळाच्या वतीने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २८) मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कविमंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी होते.

प्रारंभी मराठी विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष सुभाष ओउळकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. अशोक अलगोंडी यांनी केले. बसवंत शहापूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर सुभाष ओउळकर यांचे उद्घाटनपर भाषण झाले.

पुढे बोलताना विजय चोरमारे म्हणाले, जन्मापासूनच कविता आपल्या सोबत असते. त्यामुळे कविता आणि जगणे यांचा अतूट संबंध आहे. चांगली कविता लिहिण्यासाठी चांगले वाचक निर्माण होणे गरजेचे आहे. कविता लिहिण्यासाठी सर्वप्रथम वाचन वाढविण्याची आवश्यकता आहे. चांगली कविता लयीत नसून आशयात असते. आपल्या कवितेचे समीक्षक आपणच व्हायला हवे. कवितेचा केवळ रतीब घालण्यात अर्थ नसून ती कविता नेमका कोणता विचार देते, हे अधिक महत्त्वाचे आहे. कवींनी स्वतःचा स्वतःशी संवाद साधला पाहिजे. यातून चांगली कविता निर्माण होण्यास पोषक वातावरण तयार होते. टाळ्यांच्या मोहात अडकलेला कवी संपून जातो. कविता ही एक कलाकृती आहे, याचे भान ठेवून कवीने लेखन करावे.

यावेळी कवी अजय कांडर यांची मुलाखत सुधाकर गावडे आणि उर्मिला शहा यांनी घेतली. यावेळी कवी कांडर म्हणाले, “जेव्हा कविता मरते, तेव्हा भाषा मरते आणि भाषा मरताच संस्कृती नष्ट होते. भाषा वाचविण्याचे काम संस्कृती करते. कवितेतून वैश्विक विचार मांडण्याची गरज आहे. कवीने माणूस म्हणून लिखाण करावे. विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे. आतून हुंकार द्यावासा वाटणे, हीच कविता असते. विचारांची बांधिलकी असेल तर तुम्ही कविता लिहू शकता. सातत्याने लिहिल्याने स्वतःची चिकित्सा करता येते. कवितेची समज कशी वाढवावी, यासाठी काव्यलेखन कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरते.”

कार्यशाळेस प्रा. सुभाष सुंठणकर, प्राचार्य आनंद मेणसे, किशोर काकडे, विलास बेळगावकर, लेखक विलास माळी, कणकवलीचे कवी सत्यवान साटम, निशिगंधा गावकर, रेखा गद्रे, जितेंद्र रेडेकर, स्मिता किल्लेकर, स्मिता पाटील आदींसह मोठ्या संख्येने कवी, अभ्यासक आणि श्रोते उपस्थित होते. कार्यशाळेला कवींचा उदंड प्रतिसाद लाभला. गुरुनाथ किरमटे यांनी सूत्रसंचालन केले, तर अस्मिता आळतेकर यांनी आभार मानले.

The post कवितेतून मूल्यांची जोपासना आवश्यक appeared first on News 24 Tass Marathi.

रविवारी काव्य लेखन कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणप्रेमी सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते होणार असून, प्रसिद्ध कवी अजय कांडर आणि कवी, पत्रकार विजय चोरमारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेमध्ये कविता म्हणजे काय?, कवितेचे स्वरूप, कवितेचे विविध प्रकार, मराठी कवितेचा प्रवास, आधुनिक मराठी कविता, कवितेची निर्मिती प्रक्रिया, चांगल्या कवितेची वैशिष्ट्ये, प्रभावी कविता कशी लिहावी, प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तरे, शंका निरसन आणि खुली चर्चा या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अजय कांडर परिचय :

समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी म्हणून अजय कांडर यांची ओळख आहे. आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच आणि अजूनही जिवंत आहे गांधी हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कवितांचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले असून अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध साहित्य संमेलनांत त्यांनी मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.

विजय चोरमारे परिचय :

प्रसिद्ध पत्रकार, कवी आणि लेखक विजय चोरमारे यांनी १९८७ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. दैनिक सकाळ, लोकमत, प्रहार आणि महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात, आतबाहेर सर्वत्र आणि स्तंभसूक्त हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले आहेत. पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

कविता लेखनाची आवड असलेल्या नवोदित कवी, साहित्य अभ्यासक, विद्यार्थी तसेच रसिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

The post रविवारी काव्य लेखन कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती appeared first on News 24 Tass Marathi.

काव्य लेखन कार्यशाळेत सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन
बेळगाव : नवोदित कवी, विद्यार्थी, कवितेचे अभ्यासक तसेच कविता लिहिण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवारी दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती कॉलेज कॅम्पस, बेळगाव येथे “काव्य लेखन कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या विकासासाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत ज्येष्ठ कवी व महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार (अमेरिका) प्राप्त सुप्रसिद्ध कवी अजय कांडर आणि सुप्रसिद्ध कवी, पत्रकार व समीक्षक विजय चोरमारे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मराठी विद्यानिकेतन, बेळगावचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

कार्यशाळेमध्ये कविता म्हणजे काय?, कवितेचे स्वरूप, कवितेचे विविध प्रकार, मराठी कवितेचा प्रवास, आधुनिक मराठी कविता, कवितेची निर्मिती प्रक्रिया, चांगल्या कवितेची वैशिष्ट्ये, प्रभावी कविता लेखन, प्रश्नोत्तरे व मुक्त चर्चा आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यशाळेतील सर्व सहभागींसाठी टिपण वही, पेन तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून, सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. कार्यशाळा सर्वांसाठी मोफत आहे. त्यामुळे साहित्यप्रेमी, नवोदित कवी आणि कविता लेखनाची आवड असणाऱ्या सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी प्रा. अशोक आलगोंडी (९०३५३ ८५९२३), श्री. बसवंत शहापूरकर (९९००२ ९५२००) आणि श्री. सुधाकर गावडे (९०१९९ ९२९५१) यांच्याशी संपर्क साधावा.

The post काव्य लेखन कार्यशाळेत सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन appeared first on News 24 Tass Marathi.

मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेसाठी बेळगाव महापालिकेत जनजागृती कार्यशाळा
नगरसेवकांच्या सहकार्याचे आयुक्त कार्तिक एम. यांचे आवाहन

बेळगाव : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मतदार यादीची एसआयआर मोहीम सुरू होत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आवाहन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी केले आहे. महापालिका सभागृहात आयोजित माहिती कार्यशाळेत ते बोलत होते.

महापालिका क्षेत्रात ३० जून ते २९ जुलै दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. दक्षिण विभागासाठी स्वतः आयुक्त आणि उत्तर विभागासाठी उपायुक्त उदयकुमार तळवार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

एकूण ५१४ मतदान केंद्र अधिकारी घरोघरी भेट देऊन माहिती गोळा करणार असून, कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोकशाही बळकटीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यात नगरसेवकांनी आपल्या प्रभागात जनजागृती करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.

कार्यशाळेत दक्षिण विभागाचे साहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सभागृह नेते संतोष पेडणेकर, विरोधी पक्षनेते मोहम्मद सोहेल संगोळी यांच्यासह विविध विभागांचे उपायुक्त आणि नगरसेवक उपस्थित होते.

The post मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेसाठी बेळगाव महापालिकेत जनजागृती कार्यशाळा appeared first on News 24 Tass Marathi.

प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांच्या चित्रकला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : बेननस्मिथ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सतर्फे बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांची चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी प्राचार्या वृंदा चेन तसेच आर्ट अफेअर्स मासिकाचे अक्षय बापट उपस्थित होते.

अक्षय बापट यांनी विद्यार्थ्यांना कला प्रदर्शने, संग्रहालये आणि कलाक्षेत्रातील विविध संधींबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी चंद्रशेखर रांगणेकर यांच्या कलाप्रवास आणि कलाकृतींविषयीही मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमुळे कला विद्यार्थ्यांना एका अनुभवी कलाकाराच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या अनुभवांबद्दल आणि विविध माध्यमांमध्ये केलेल्या कामांविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी रांगणेकर यांचे प्रात्यक्षिक उत्सुकतेने पाहिले आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रांगणेकर यांनी लाईव्ह डेमोद्वारे चित्रनिर्मितीची प्रक्रिया समजावून सांगितली. कलाकृती तयार करताना आवश्यक असलेली एकाग्रता, सातत्य आणि निरीक्षणशक्ती यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यशाळेनंतर प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

The post प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांच्या चित्रकला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव : निवडणूक आयोगाने जारी केलेले नियम व मार्गदर्शक तत्त्वानुसार मतदारयाद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (एसआयआर) प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडावी. कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये.मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत लोकशाही हक्क आहे. हा हक्क प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. निवडणूक नोंदणी अधिकारी व साहायक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

सुवर्णसौध येथील सेंट्रल हॉलमध्ये एसआयआरबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेला बेळगाव विभागातील अप्पर जिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, साहायक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार, तांत्रिक साहाय्यक उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या अचूक, पारदर्शक व त्रुटीरहित ठेवण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, बेळगाव उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदणी असलेल्या मतदारांच्या नोंदणीचे कार्य यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे.

मात्र अनेक नागरिक अद्याप या प्रक्रियेत सहभागी झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उर्वरित नोंदणीचे काम तातडीने पूर्ण करून योग्य क्षेत्रीय सर्वेक्षणाद्वारे पात्र नागरिकांचा मतदारयादीत समावेश करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले. सह मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. राघवेंद्र यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देताना, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांची पुनर्तपासणी पूर्णपणे पारदर्शक व त्रुटीरहित पद्धतीने व्हावी, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. निवडणूक नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे काही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची उदाहरणे आहेत.

यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने निवडणूक कामकाज पार पाडावे. तसेच पात्र मतदारांचा समावेश व अपात्र मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात यावे. अनुपस्थित व स्थलांतरित मतदारांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेदरम्यान नवीन मतदार नोंदणी, नाव दुऊस्ती, पत्ता बदल, मृत व दुबार मतदारांची नावे वगळणे तसेच ऑनलाईन सेवांचा वापर यासह मतदारयादी सुधारणेच्या विविध बाबींवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या शंका आणि अडचणी मांडून त्यांचे निरसन करून घेतले. या कार्यशाळेला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह बेळगाव विभागातील अधिकारी उपस्थित होते.

The post नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये appeared first on News 24 Tass Marathi.