waterfall Archives | News 24 Tass Marathi

दूधसागर येथे बेकायदेशीर ट्रेकिंग ; ३२ पर्यटकांवर कारवाई
रेल्वे रुळांवर प्रवेश केल्याप्रकरणी १६ हजारांचा दंड

पावसाळ्यात निर्बंधांचे पालन करण्याचे रेल्वेचे आवाहन

हुबळी : सार्वजनिक सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करून दूधसागर धबधब्याकडे रेल्वे रुळांलगत बेकायदेशीर ट्रेकिंग करणाऱ्या ३२ पर्यटकांवर रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) कारवाई करत एकूण १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रविवारी विशेष वीकेंड मोहिमेदरम्यान कॅसल रॉक आरपीएफच्या विशेष पथकाने दूधसागर आणि सोनालियम रेल्वे स्थानकांदरम्यान अचानक तपासणी केली. यावेळी जंगलातून रेल्वे रुळांवर अतिक्रमण करून धबधब्याकडे जाणारे ३२ पर्यटक आढळून आले. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या (जन विश्वास कायदा) कलम १४७ अंतर्गत कारवाई करून प्रत्येकाकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दक्षिण पश्चिम रेल्वेने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेमार्गे दूधसागर धबधब्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक प्रवेशावर बंदी घातली आहे. मात्र, पावसाळ्यात काही पर्यटक बेकायदेशीरपणे जंगलातून रेल्वे रुळांवर प्रवेश करत असल्याने त्यांच्या जीविताला तसेच रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आलोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावी आणि वास्को येथील आरपीएफकडून दूधसागर परिसरात विशेष निगराणी वाढविण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यटकांना रेल्वे रुळांवर किंवा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश न करण्याचे तसेच सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

The post दूधसागर येथे बेकायदेशीर ट्रेकिंग ; ३२ पर्यटकांवर कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख धबधबे पर्यटकांसाठी तात्पुरते बंद
पर्यटकांना प्रवेशबंदी ; नदीकाठी व धबधब्यांमध्ये जाण्यास सक्त मनाई

रील्स आणि धोकादायक स्टंट टाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बेळगाव : जिल्ह्यात खानापूरसह विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धबधब्यांकडे जाणारे जंगलमार्ग तात्पुरते बंद करण्यात आले असून पर्यटकांना तेथे जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नद्यांमधील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने नदीकाठी जाणे, धबधब्यांमध्ये रील्स चित्रीकरण करणे अथवा धोकादायक प्रकार टाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

गेल्या २४ ते ४८ तासांत अथणी, चिक्कोडी, हुक्केरी, रायबाग, सौंदत्ती, कित्तूर, निपाणी आणि कागवाड तालुक्यांत २०० ते ४०० मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सिम्बॉल, पारवाड, वज्रपोह आणि डेल्टा धबधब्याकडे जाणारे जंगलमार्ग बंद करण्यात आले असून पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील पावसामुळे कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढला असून जिल्ह्यातील सात पुलांवर पाणी आले आहे. या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्षही कार्यरत आहे.

दरम्यान, बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होत असून सध्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पाच मातीची घरे कोसळून नुकसान झाले असून संबंधितांना नुकसानभरपाई देण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख धबधब्यांवर सुरक्षित आणि नियंत्रित पर्यटन सुरू करण्यासाठी वन विभागाशी समन्वय साधून पुढील १० ते २० दिवसांत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक धोका टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.

The post मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख धबधबे पर्यटकांसाठी तात्पुरते बंद appeared first on News 24 Tass Marathi.

खळाळत कोसळणारा गोकाक धबधबा पर्यटकांना खुणावतोय
नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

गोकाक : राज्यात मान्सूनने जोर धरताच बेळगावचा ‘नायगारा’ म्हणून ओळखला जाणारा गोकाक धबधबा पुन्हा एकदा खळाळत कोसळू लागला आहे. सततच्या पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला असून, निसर्गाचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून धबधब्याच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून, धबधबा पूर्ण जोमात वाहत आहे. खळाळत कोसळणाऱ्या पाण्याचा गडगडाट आणि परिसरातील हिरवळ यामुळे पर्यटकांना निसर्गसौंदर्याची अनोखी मेजवानी मिळत आहे. राज्याच्या विविध भागांतून पर्यटक गोकाक धबधब्याकडे आकर्षित होत आहेत.

दरम्यान, पाण्याची पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सेल्फीच्या मोहापायी जीव धोक्यात घालू नये तसेच मुलांसह येणाऱ्या पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस व पर्यटन विभागाने घालून दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचेही प्रशासनाने आवाहन केले आहे.

The post खळाळत कोसळणारा गोकाक धबधबा पर्यटकांना खुणावतोय appeared first on News 24 Tass Marathi.