traffic rule Archives | News 24 Tass Marathi

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई
नियमभंग करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

बेळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांसोबतच नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील परिसरात नो पार्किंगमध्ये उभी करण्यात आलेली अनेक वाहने टोईंग करून जप्त करण्यात आली.

वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू असतानाच चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील रस्त्यावर नो पार्किंगचा फलक असतानाही अनेक वाहनचालकांनी वाहने उभी केल्याचे आढळून आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅनच्या सहाय्याने ही वाहने हटवून पोलीस ठाण्यात जमा केली.

शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. मात्र, काही वाहनचालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष करून नो पार्किंगच्या जागेत वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

याशिवाय काही मालवाहू वाहनेही रस्त्याच्या कडेला अथवा नो पार्किंग क्षेत्रात उभी केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा वाहनांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत ती जप्त केली आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

The post जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

“नो हेल्मेट ; नो पेट्रोल” ; बेळगाव पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश
१९ जूनपासून हेल्मेटशिवाय दुचाकीस्वारांना पेट्रोल मिळणार नाही

१५ ते २१ जूनदरम्यान विशेष जनजागृती अभियान

बेळगाव : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बेळगाव शहर पोलिसांनी “नो हेल्मेट; नो पेट्रोल” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत १९ जूनपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन देण्यात येणार नाही.

शहरातील प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करावा आणि सुरक्षित प्रवासाची सवय अंगीकारावी, या उद्देशाने १५ ते २१ जून या कालावधीत विशेष हेल्मेट जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून “नो हेल्मेट; नो पेट्रोल” या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील सर्व पेट्रोल पंप चालक आणि मालकांना पत्र पाठवून या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. १९ जूनपासून शहरातील पेट्रोल पंपांवर “हेल्मेट धारण केल्याशिवाय इंधन मिळणार नाही” असे फलक लावण्यात येणार असून, हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हा उपक्रम केवळ दंडात्मक कारवाईसाठी नसून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी आणि रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी राबविण्यात येत असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

The post “नो हेल्मेट ; नो पेट्रोल” ; बेळगाव पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात अल्पवयीन मुलाकडून कार चालवणे पडले महागात
वाहन मालकाला २५ हजारांचा दंड

बेळगाव : शहरात अल्पवयीन मुलाकडून कार चालविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहन मालकाविरुद्ध कारवाई करत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

चन्नम्मा सर्कल परिसरातील गणेश मंदिराजवळ वाहतूक तपासणीदरम्यान पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा कार चालविताना आढळला. यानंतर पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतले तसेच मुलाला पोलीस ठाण्यात आणून त्याच्या पालकांना बोलावून घेतले.

या वेळी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती पालकांना देण्यात आली. या प्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली असून वाहन मालकाला न्यायालयामार्फत २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

वाहतूक पोलिसांनी पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनांची चावी देऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगून नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

The post बेळगावात अल्पवयीन मुलाकडून कार चालवणे पडले महागात appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावकरांना दिलासा ; गोव्यातील अवाजवी वाहतूक दंड कमी होणार
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन

प्रथमच नियमभंग करणाऱ्यांना दंडाऐवजी ताकीद देण्याची तयारी

बेळगाव : गोव्यात प्रवेश करणाऱ्या बेळगावसह अन्य राज्यांतील वाहनचालकांना आकारण्यात येणाऱ्या अवाजवी वाहतूक दंडाबाबत अखेर दिलासादायक हालचाल सुरू झाली आहे. बेळगावचे माजी आमदार अनिल बेनके यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रथमच किरकोळ नियमभंग करणाऱ्यांसाठी दंड कमी करण्यासह ताकीद देणारी नवी व्यवस्था लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.

अलीकडच्या काळात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) आणि इतर किरकोळ कारणांवरून गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनात सदोष ई-चलन प्रणाली, वाहतूक चिन्हांचा अभाव, पर्यटक वाहनांवरील वाढता दंड आणि सर्वसामान्यांवर होणारा आर्थिक बोजा याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेत, जीवघेण्या स्वरूपाचे नसलेल्या आणि प्रथमच झालेल्या नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये मोठा दंड आकारण्याऐवजी इशारा देण्याची आणि दंडाची रक्कम कमी करण्याची नवी नियामक प्रणाली लवकरच लागू केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे बेळगावसह गोव्यात नियमित ये-जा करणारे प्रवासी, पर्यटक आणि कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

The post बेळगावकरांना दिलासा ; गोव्यातील अवाजवी वाहतूक दंड कमी होणार appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव शहरात वाहतूक शिस्तीसाठी नवे बदल
वन वे नियमांची कठोर अंमलबजावणी होणार

रिक्षांमध्ये आता क्यूआर कोडची सुरक्षा

बेळगाव : बेळगाव शहरात वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी वन वे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.

माळमारुती पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल राबवले जात असल्याची माहिती दिली. रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनी वन वे व्यवस्थेला सहमती दर्शवली असून, मध्यवर्ती बसस्थानक, चन्नम्मा चौक आणि न्यायालय परिसरात पार्किंग शिस्तीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील रिक्षा सेवेला सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक रिक्षात चालक व मालकाचा तपशील असलेला क्यूआर कोड बसवला जाणार आहे. हा कोड स्कॅन केल्यावर रिक्षाचा प्रवास मार्ग ट्रॅक करता येणार आहे. सुमारे १० हजार अधिकृत रिक्षांना ही व्यवस्था लागू केली जाणार आहे.

तसेच, नोंदणी नसलेल्या सुमारे २ हजार रिक्षांना अधिकृत प्रवाहात आणण्यासाठी ओळखपत्रे देण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही संपूर्ण प्रणाली प्रायोजकांच्या मदतीने विनामूल्य राबवली जाणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

The post बेळगाव शहरात वाहतूक शिस्तीसाठी नवे बदल appeared first on News 24 Tass Marathi.

जोतिबा डोंगरावर आजपासून अवजड वाहनांना प्रवेशबंदी
कोल्हापूर / प्रतिनिधी

श्री क्षेत्र जोतिबा येथे ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार, ३० मार्च) पासून डोंगरावर अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मालवाहू ट्रक, मोठी वाहने, तीनचाकी प्रवासी व मालवाहतूक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना केर्ली, कुशिरे, वाघबीळ आणि गिरोली या नाकाबंदी ठिकाणांपुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ही वाहतूक व्यवस्था पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार लागू करण्यात आली असून, एकेरी वाहतूक आणि प्रवेशबंदीचे नियम १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

१ एप्रिल रोजी मुख्य यात्रेनिमित्त सकाळी ५ वाजल्यापासून दुचाकी वाहनांनाही डोंगरावर प्रवेश दिला जाणार नाही. दानेवाडी क्रॉसिंग, जुने आंब्याचे झाड आणि गिरोली फाटा येथून दुचाकींना प्रवेश बंद असेल. भाविकांनी पार्किंग ठिकाणांहून मोफत एसटी किंवा केएमटी बससेवेचा वापर करावा. दरम्यान, डोंगर ते जुने आंब्याचे झाड या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहील.

दर्शन करून परतणाऱ्या भाविकांनी गिरोली मार्ग, तसेच जुने आंब्याचे झाड–गायमुख–केर्ली किंवा दानेवाडी–वाघबीळ मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी दुपारी ४ नंतर केर्ली फाटा, गिरोली टी-पॉइंट आणि इतर सर्व मार्गांवरून डोंगराकडे सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णतः बंदी राहणार आहे.

पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी दुपारी ४ वाजण्यापूर्वी डोंगरावर पोहोचावे. केली ते जुने आंब्याचे झाड, दानेवाडी क्रॉसिंग, रेस्ट हाऊस, सेंट्रल प्लाझा, यमाई टोल नाका, गिरोली फाटा ते निलगिरी बाग या मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहन उभे करण्यास किंवा पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहन पार्किंगसाठी प्रशासनाने विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे. सेंट्रल प्लाझा येथे ट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रॅक्टर आणि इतर मोठ्या वाहनांसाठी जागा राखीव आहे. गिरोली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी यमाई वळण, बुने कॉर्नर, श्रावणी हॉटेल परिसर, केएमटी थांबा, निलगिरी बाग, दोनवाडी फाटा आणि बुने येथे सुविधा उपलब्ध आहे.

तसेच केर्ली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी जुने एसटी स्टँडसमोर, पिराचा कडा, तोरणाई कडा, नवीन एसटी स्टँडमागील जागा, जुने आंब्याचे झाड आणि गायमुख इनाम पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

The post जोतिबा डोंगरावर आजपासून अवजड वाहनांना प्रवेशबंदी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव शहरात विना नंबर प्लेट वाहनांवर पोलिसांचा बडगा
विशेष मोहिमेत शेकडो वाहनांवर दंडात्मक कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी कडक मोहीम उघडली असून, नंबर प्लेट नसलेल्या अथवा नियमबाह्य नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, शहरभर राबवलेल्या विशेष तपासणीत १२६ दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईदरम्यान एकाच दिवशी तब्बल ६३ हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला.

पोलिसांनी केवळ दंड आकारण्यावर न थांबता, नियमभंग करणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेट तात्काळ दुरुस्त करून घेत संबंधितांना कडक इशारा दिला. वाहनधारकांनी विहित नमुन्याच्या नंबर प्लेट लावून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आगामी काळातही अशा प्रकारची विशेष मोहीम सातत्याने राबवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

The post बेळगाव शहरात विना नंबर प्लेट वाहनांवर पोलिसांचा बडगा appeared first on News 24 Tass Marathi.