traffic diversion Archives | News 24 Tass Marathi

पहिले रेल्वे गेट कोसळल्याने टिळकवाडीत वाहतूक विस्कळीत
बेळगाव : टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटचे एका बाजूचे लोखंडी गेट अचानक तुटून पडल्याने सोमवारी सकाळी काही काळ वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने त्यावेळी परिसरात तुरळक रहदारी असल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठ बाजूचे रेल्वे गेट अचानक कोसळले. गेट तुटून पडताच दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत आपली वाहने जागेवरच थांबवली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पहिले रेल्वे गेट तात्पुरते बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळवली. त्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी रेल्वे गेट अशा प्रकारे तुटून पडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भविष्यात अशा धोकादायक घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गेटची नियमित तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

The post पहिले रेल्वे गेट कोसळल्याने टिळकवाडीत वाहतूक विस्कळीत appeared first on News 24 Tass Marathi.

श्री बसव जयंती मिरवणुकीनिमित्त उद्या बेळगावातील वाहतूक मार्गात बदल
बेळगाव : विश्वगुरू श्री बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त उद्या रविवार दि. २६ एप्रिल २६ रोजी शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीप्रसंगी सार्वजनिकांना अनुकूल व्हावे यासाठी नेहमीच्या वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन शहर पोलीस आयुक्तांनी केले आहे.

श्री बसवेश्वर जयंती उत्सव निमित्त उद्या रविवारी बेळगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून सुरू होणाऱ्या या मिरवणुकीची काकती वेस रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड मार्गे लिंगराज कॉलेज मैदानावर सांगता होणार आहे.

त्यामुळे वाहतूक सुरळीत राहून सार्वजनिकांना अनुकूल व्हावे यासाठी उद्या रविवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील वाहतूक मार्गांमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

१) किल्ला तलाव अशोक सर्कल, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड मार्गे खानापूरच्या दिशेने जाणारी वाहने संगोळी रायण्णा चौकातून एस.पी. ऑफिस रोड मार्गे कृष्ण देवराज (कोल्हापूर कत्री) सर्कल वाय -जंक्शन, सदाशिवनगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्यानगर, गांधी सर्कल, शौर्य चौक (मिलिटरी हॉस्पिटल सर्कल), केंद्रीय विद्यालय नं. 2, शर्कत पार्क, ग्लोब थिएटर सर्कल मार्गे खानापूर रोड वरून पुढे मार्गस्थ.

२) खानापूरकडून काँग्रेस रोड मार्गे बेळगाव शहरात प्रवेश करणारी आणि रेल्वे ओव्हर ब्रिज वरून शहराकडे जाणारी वाहने गोगटे सर्कल, ग्लाब थिएटर सर्कल येथून गवळी गल्ली क्रॉस कॅम्प, शरकत पार्क, केंद्रीय विद्यालय नं. 2, शौर्य चौक, गांधी सर्कल (अरगन तलाव), श्री गणेश मंदिर, हिंडलगा रोड, हनुमाननगर डबल रोड मार्गे बॉक्साइट रोड वरून राष्ट्रीय महामार्गाकडे प्रस्थान.

३) सार्वजनिकांच्या सोयीसाठी मिरवणूक मार्गावरील ज्या रस्त्यांवर दुहेरी वाहतूक असेल त्या रस्त्यावर एकेरी आणि ज्या रस्त्यावर एकेरी वाहतूक असेल तो खुला ठेवला जाईल.

४) उद्या रविवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व दिशांकडून अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असेल.

५) राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते काकती वेस रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, लिंगराज कॉलेज रोड या मिरवणूक मार्गावर उद्या रविवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4 नंतर मिरवणूक संपेपर्यंत कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करण्यास अथवा थांबवण्यास बंदी असेल.

The post श्री बसव जयंती मिरवणुकीनिमित्त उद्या बेळगावातील वाहतूक मार्गात बदल appeared first on News 24 Tass Marathi.

शिवजयंती मिरवणुकीनिमित्त आज बेळगावातील वाहतूक मार्गात बदल
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. २१ एप्रिलपासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केले असून त्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहेत.

मिरवणूक राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, कॉलेज रोड, पिंपळकट्टा आदी मार्गांवरून पुढे जात नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, सम्राट अशोक चौक, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनिमंदिरमार्गे कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळ कपिलेश्वर मंदिर येथे संपन्न होणार आहे.

दरम्यान, किल्ला तलाव, अशोक स्तंभ सर्कल, आरटीओ सर्कलहून राणी चन्नम्मा सर्कलकडे जाणारी वाहतूक संगोळ्ळी रायण्णा सर्कलपासून एसपी ऑफिसमार्गे कोल्हापूर सर्कल, सदाशिवनगर, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्यानगर, गांधी सर्कल (अरगन तलाव), शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. २, शरकत पार्क, ग्लोब थिएटर सर्कलमार्गे खानापूर रोडकडे वळविण्यात आली आहे.

खानापूरहून काँग्रेस रोडमार्गे शहरात येणारी तसेच रेल्वे उड्डाणपुलावरून येणारी वाहने ग्लोब थिएटर सर्कलमार्गे गवळी गल्ली क्रॉस, शरकत पार्क, गांधी सर्कल, हिंडलगा गणेश मंदिर, हनुमाननगर डबल रोडवरून बॉक्साईट रोडकडे वळविण्यात येणार आहेत. गोगटे सर्कलहून स्टेशन रोड, हेडपोस्ट ऑफिस, शनिमंदिरकडे जाणारी वाहतूक गोवावेस सर्कल, नाथ पै सर्कल, खासबाग बसवेश्वर सर्कल, संभाजी गल्लीमार्गे वळविण्यात येणार आहे.

नाथ पै सर्कलहून कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक खासबाग बसवेश्वर सर्कल व संभाजी गल्लीमार्गे वळविली जाणार आहे. तसेच जिजामाता सर्कलहून देशपांडे पेट्रोलपंप, नरगुंदकर भावे चौकमार्गे जाणारी वाहतूक थेट मध्यवर्ती बसस्थानक किंवा जुन्या पी. बी. रोडकडे वळविण्यात येणार आहे.

जुना पी. बी. रोड, यश हॉस्पिटल, महाद्वार रोडमार्गे कपिलेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक डाव्या बाजूने वळवून व्हीआरएल लॉजिस्टिकमार्गे पुन्हा जुन्या पी. बी. रोडवर नेण्यात येणार आहे. गुड्सशेड रोडमार्गे येणारी वाहतूक मराठा मंदिर व गोवावेस सर्कलकडे वळविण्यात येणार आहे.

मिरवणूक मार्गावर जिथे डबल रोड आहे, तेथे एक बाजू पूर्णपणे मिरवणुकीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हे बदल मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून बुधवारी मिरवणूक संपेपर्यंत लागू राहणार आहेत.

वाहने उभी करण्यास प्रतिबंध :

वाहन पार्किंगवरही निर्बंध घालण्यात आले असून राणी चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेस, गणपत गल्ली, कपिलेश्वर मंदिर परिसर, हॅवलॉक रोड, कॅटल रोड, यंदे खूट सिग्नल ते कॉलेज रोडपर्यंत मिरवणूक संपेपर्यंत वाहन उभे करण्यास बंदी असेल. पार्किंगसाठी महिला पोलीस ठाण्याच्या पाठीमागील जागा तसेच संभाजी उद्यान परिसर येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

The post शिवजयंती मिरवणुकीनिमित्त आज बेळगावातील वाहतूक मार्गात बदल appeared first on News 24 Tass Marathi.