sucide Archives | News 24 Tass Marathi

पतीसोबतच्या वादानंतर पत्नीची दुधगंगा नदीत उडी ; शोधमोहीम सुरू
सदलगा : पती-पत्नीतील किरकोळ वादानंतर एका विवाहित महिलेने दुधगंगा नदीत उडी घेतल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील सदलगा येथे घडली. नदीत उडी घेतल्यानंतर महिला बेपत्ता झाली असून, तिचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरू आहे.

सदलगा येथील रहिवासी मंजुळा वांजिरे (वय २५) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. स्थानिक माहितीनुसार, जत्रेला जाण्याच्या कारणावरून मंजुळा आणि तिचा पती अनिल यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर मंजुळा घरातून बाहेर पडून सदलगा गावाबाहेरील दुधगंगा नदीत उडी घेतल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर नदीकाठी तिच्या चपला आणि कपडे आढळून आले. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने कुटुंबीयांना आणि पोलिसांना कळवले.

माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा वेग आणि खोली लक्षात घेऊन नदीत व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत तिचा शोध लागलेला नव्हता. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

The post पतीसोबतच्या वादानंतर पत्नीची दुधगंगा नदीत उडी ; शोधमोहीम सुरू appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात विवाहितेची मुलासह आत्महत्या
सासरकडून छळ झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

बेळगाव : बेळगाव शहरात २८ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालय (बिम्स) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सासरच्या छळाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमा तळवार (२८) आणि तिच्या मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी बिम्स रुग्णालयात धाव घेतली. यावेळी संतप्त नातेवाईकांनी तिच्या सासूला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

मृत महिलेची आई फकीरव्वा पावडी यांनी आरोप केला की, सासरच्या मंडळींनी प्रेमाच्या नावावर विविध बँका आणि वित्तीय संस्थांतून अनेक कर्जे घेतली होती. त्यानंतर आणखी १० लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. तिचे दागिने काढून घेणे, उपाशी ठेवणे अशा प्रकारेही तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मृत महिलेचा भाऊ नागेश याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी घरात कोणी नसताना ही घटना घडली. जुन्या कर्जाच्या ओझ्याबरोबरच तम्मण्णी नावाचा एक व्यक्ती पैशांसाठी वारंवार घरी येऊन धमकावत असल्याने प्रेमा मानसिक तणावाखाली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा आरोप त्याने केला.

या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांसह सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

The post बेळगावात विवाहितेची मुलासह आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

हिंडाल्को कंपनीतील कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
मृत्यू प्रकरणी संतप्त ग्रामस्थांची चौकशीची मागणी

बेळगाव : बेळगावजवळील औद्योगिक परिसरातील हिंडाल्को कंपनीत कार्यरत असलेल्या एका तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात निषेध व्यक्त केला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मुत्त्यानट्टी येथील रहिवासी शंकर तळवार (वय २४) यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक संदेश प्रसारित केल्याचे सांगितले जात असून, त्यामध्ये नोकरीसंदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि नातेवाईक कंपनी परिसरात जमले. मृत्यूबाबत सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी दगडफेकीची घटना घडल्याचेही वृत्त आहे, ज्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. पोलीस आयुक्त भूषण बोरसे तसेच स्थानिक आमदार आसिफ सेठ यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

स्थानिक नागरिकांनी कंपनी स्थापनेच्या वेळी रोजगारासंदर्भात देण्यात आलेल्या आश्वासनांचा उल्लेख करत काही मुद्दे उपस्थित केले. तसेच मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि योग्य पुनर्वसन देण्याची मागणीही करण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, माळमारुती पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून आत्महत्येची कारणे आणि संबंधित आरोपांच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

The post हिंडाल्को कंपनीतील कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव एपीएमसी मार्केट परिसरात अज्ञात व्यक्तीची आत्महत्या
बेळगाव : शहरातील एपीएमसी भाजी मार्केट परिसरात रविवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून परिसरातच वावरत होती. ती रिकाम्या बाटल्या गोळा करून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच रात्रीच्या वेळी ती मार्केट परिसरातच मुक्काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

रविवारी सकाळी बाजारातील एका बंद दुकानासमोर संबंधित व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

The post बेळगाव एपीएमसी मार्केट परिसरात अज्ञात व्यक्तीची आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

‘डेथ नोट’ लिहून तरुणाची आत्महत्या
पोलिसांसह कर्जदारांवर गंभीर आरोप

गोकाक : बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील बेंडिगेरी गावात एका तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्जदारांची नावे नमूद करत गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्जदारांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून पोलिसांकडूनही न्याय मिळाला नसल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

मृताचे नाव रवींद्र दानव्वागोळ असे असून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात लक्ष्मण चंदरगी आणि भरमप्पा पूजारी यांच्याकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम परत मागितल्यानंतर संबंधितांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच पीएसआय आनंद आणि तत्कालीन डीवायएसपी मुल्ला यांच्याकडूनही अन्याय झाल्याचा आरोप रवींद्र यांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच मूडलगी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून आत्महत्येच्या पत्रातील आरोप, त्याची सत्यता आणि संबंधित परिस्थितीचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

The post ‘डेथ नोट’ लिहून तरुणाची आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

कर्करोगाने त्रस्त डॉक्टराची गोळी झाडून घेऊन आत्महत्या
बेळगाव : कर्करोगाने त्रस्त डॉक्टरने शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या.आत्महत्या करणारे डॉक्टर दिनेश लक्ष्मण भटकळ (७९) हे मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्याचे रहिवासी होते आणि बेळगावमध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावली होती. समाजात त्यांच्या साध्या आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाणारे, ते वैद्यकीय क्षेत्रातही आदरणीय होते. डॉ. भटकळ यांनी त्यांच्या घरातील बाल्कनीमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे रहिवासी घटनास्थळी धावून आले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.

त्यांनी आजारपण आणि मानसिक नैराश्यामुळे हे कृत्य केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. मात्र, तपासानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.पोलिस आणि टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली.

The post कर्करोगाने त्रस्त डॉक्टराची गोळी झाडून घेऊन आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

वाढदिवसाच्या दिवशीच विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव : वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच एका विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

कावेरी उमेश नायक (वय २१) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती हुक्केरी तालुक्यातील कटबळी गावची रहिवासी होती. कावेरी बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती आणि बेळगावातील आझम नगर परिसरातील एका वसतिगृहात राहत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस असल्यामुळे सकाळपासूनच कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि परिचितांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात होत्या. दिवसभर ती वसतिगृहातच होती आणि काही जणांशी संवादही साधत होती. मात्र दुपारनंतर तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला.

रात्री जेवणासाठी बोलविण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने दरवाजा उघडून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस, संबंधित अधिकारी आणि तिचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीआयएमएस रुग्णालयात पाठविला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच कावेरीचा एका पोलीस कॉन्स्टेबलसोबत साखरपुडा झाला होता. तिच्या अचानक निधनामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.

The post वाढदिवसाच्या दिवशीच विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

व्यवसायातील तोट्यामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
सेल्फी व्हिडिओतून मांडली व्यथा

चिक्कोडी : व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिक्कोडी शहरात घडली.

विनायक महादेव भंडारे असे त्या तरुणाचे नाव असून, त्याने आत्महत्येपूर्वी एक सेल्फी व्हिडिओ तयार करून आपली व्यथा व्यक्त केली. “मी जगणार नाही, आज माझा शेवटचा दिवस आहे,” असे म्हणत त्याने व्हिडिओमध्ये आपली मानसिकता व्यक्त केली. व्यवसायातील नुकसान आणि गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्याने केला आहे.

या व्हिडिओमध्ये त्याने काही व्यक्तींची नावे घेत त्यांच्याकडून त्रास होत असल्याचा दावा केला आहे. तसेच “पैसे घेतल्यामुळे माझी बदनामी झाली,” असा आरोप करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेपूर्वी त्याने एक पत्रही लिहिल्याचे समजते.

घटनेनंतर संबंधित तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

The post व्यवसायातील तोट्यामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न appeared first on News 24 Tass Marathi.

कौटुंबिक वादाला कंटाळून तरुणाची किल्ला तलावात आत्महत्या
बेळगाव / प्रतिनिधी

कौटुंबिक वादाला कंटाळून एका तरुणाने किल्ला तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला हा तरुण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुभाष हलगेकर (वय ३२, रा. घाडी कॉलनी, शहापूर) असे मृत तरुणाचे नाव असून तो बेळगाव महापालिकेत पौरकार्मिक म्हणून कार्यरत होता. अलीकडेच तो नोकरीत कायम झाला होता. मात्र वैवाहिक आयुष्यातील सततच्या वादामुळे तो मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे.

घरातील वारंवार भांडणांमुळे त्याची पत्नी माहेरी गेली होती. त्यानंतर सुभाष दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शहापूर पोलीस स्थानकात तक्रारही नोंदविण्यात आली होती.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी किल्ला तलावात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेवाडीकर, मायकल पिंटो, राजू टक्केकर आणि अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

The post कौटुंबिक वादाला कंटाळून तरुणाची किल्ला तलावात आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

मायक्रोफायनान्सच्या छळामुळे डेथनोट लिहून महिलेची आत्महत्या
बैलहोंगल तालुक्यातील घटना

बैलहोंगल / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ गावात मायक्रोफायनान्स कर्जाच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.आत्महत्ये पूर्वी तिने घराच्या भिंतीवर डेथनोट लिहल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भिंतीवर लिहिलेल्या या डेथनोटमुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. डेथनोटमध्ये तिने काही व्यक्तींना आपल्या मृत्यूस जबाबदार धरल्याचे समजते.

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव गौरव्वा निलप्पा केंगानूर (वय ३६) असे आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विविध मायक्रोफायनान्स संस्थांकडून सुमारे ७ ते १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जफेडीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडून सातत्याने दबाव व त्रास होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हा मानसिक ताण सहन न झाल्याने गौरवने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

मृत्युपत्रात तिने सुमव्वा, मंजप्पा आणि कस्तुरी यांची नावे घेत आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्या मुलांच्या शिक्षण व भवितव्याबाबत शेवटची इच्छा व्यक्त केली आहे.

या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. घटनेनंतर मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

The post मायक्रोफायनान्सच्या छळामुळे डेथनोट लिहून महिलेची आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.