sslc result Archives | News 24 Tass Marathi

घुमटमाळ मारुती मंदिर आणि बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे विद्यार्थिनींचा सत्कार
बेळगाव : “मुलींनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर डोळसपणे प्रेम करा, आपल्या आई-वडिलांची मान खाली झुकणार नाही असेच वागा, जीवनात आत्मविश्वास, शिस्त, चांगला एटीट्यूड आणि एकाग्रता महत्त्वाची आहे, त्याचबरोबर गुरुनिष्ठा, चांगली संगतही महत्त्वाची आहे” असे विचार सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्ष प्रा स्वरूपा इनामदार यांनी बोलताना व्यक्त केले.

येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट आणि कै. बी. के. बांडगी शैक्षणिक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमिक शाळामधून दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रा. स्वरूपा इनामदार प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या आणि पाहुणे म्हणून प्रकाश कडोलकर हे उपस्थित होते अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष कुलदीप भेकणे हे होते तर व्यासपीठावर बांडगी ट्रस्टचे रघुनाथ बांडगी, मंदिराचे उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी व सचिव अनंत लाड हे उपस्थित होते.

बेळगाव तालुक्यातील विविध शाळांमधून प्रथम आलेल्या २५ हून अधिक विद्यार्थिनींना प्रत्येकी पंधराशे रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, वह्या आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात व उपस्थितांचे स्वागत सौ मनस्वी केदार बांडगी यांनी केले, पाहुणे व ट्रस्टीज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर हनुमान फोटोचे पूजन रघुनाथ बांडगी यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रकाश कडोलकर यांनी स्वर्गीय बी. के. बांडगी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पाहुण्यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी काकडे फाउंडेशनचे किशोर काकडे यांनी विद्यार्थिनींना मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावशाली भाषनाने सर्वांना मंत्रमुग्ध केलेल्या स्वरूपा इनामदार पुढे म्हणाल्या की, “ज्या मारुती मंदिरात तुमचा सन्मान होतोय तो मारुती हा पराक्रमी योद्धा होता तो संस्कृतचा गाडा अभ्यासक होता त्याच्यापासून प्रेरणा घेऊन जीवन उज्वल करा. त्यासाठी मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचा, जीवनात जी जी माणसे यशस्वी झाली आहेत त्या पाठीमागे त्यांचा प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम कारणीभूत आहेत.आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत त्यामुळे जीवनात नम्रता, उत्तम चरित्र, प्रामाणिकपणा, विश्वास आणि सतर्कपणा या गोष्टी आत्मसात करा म्हणजे आपले जीवन उज्वल होईल” असे त्या म्हणाल्या.

प्रारंभी सचिव अनंत लाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन नेताजी जाधव यांनी केले .कार्यक्रमास बाबुराव पाटील, चंद्रकांत बांडगी, संभाजी चव्हाण, सुनील सरनोबत या ट्रस्टीजसह रमेश कुकडोळकर, प्रभाकर पाटील, मनोहर कुकडोळकर व अनेक मान्यवर उपस्थित होते.

The post घुमटमाळ मारुती मंदिर आणि बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे विद्यार्थिनींचा सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक ; गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव
बेळगाव : गणेशपूर-हिंडलगा येथील इम्पोरिया टॉवरमध्ये धनंजय जाधव मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेली हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक तसेच मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात श्री मळेकरणी देवस्थान परिसरात आयोजित करण्यात आलेल्या २९ व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याला मोठ्या संख्येने हिंदू बांधव-भगिनी उपस्थित होते. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेण्यासाठी रविवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते तथा बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव होते. यावेळी नगरसेवक राजू भातकांडे, शंकर पाटील, माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगांवकर, प्रदीप पाटील, तिम्माजी मोरे, भुजंग सादगुडे, सिद्धाप्पा हुक्केरी, भरमा गोमानाचे, अनिल पाटील, पंकज घाडी, शडाक्षरी हिरेमठ, सूर्याजी बीर्जे, उमेश पुरी, बाळू भडगावी, अनिल केसरकर यांच्यासह बेळगाव ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत मल्लाप्पा बेळगांवकर, मारुती पाटील आणि पंकज घाडी यांनी आपले विचार मांडले. तसेच नारायण पाटील यांनी मेळाव्याच्या आयोजनाचा सविस्तर आढावा सादर केला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. बेळगाव ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक मिळविणारी प्राजक्ता उत्तम चौगुले, ग्रामीण कन्नड माध्यमात प्रथम आलेली राधिका चंद्रशेखर बंगारी, शहरातील मराठी माध्यमात प्रथम आलेली स्नेहा यल्लाप्पा हीरोजी, इंग्रजी माध्यमात प्रथम आलेली साईशा पवन देसाई, उच्च शिक्षण शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेली तृप्ती देसाई तसेच राज्यात प्रथम क्रमांक मिळविणारी दिव्या प्रदीप देसाई यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सर्व विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, फळांची टोपली आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या यशामागील अनुभव कथन करत आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

समारोपाच्या भाषणात धनंजय जाधव यांनी सामाजिक कार्य, संघटनात्मक एकता आणि समाजातील बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या अनेक वर्षांपासून साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांप्रती त्यांनी आभार व्यक्त करत, समाजकार्याची ही परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि देणगीदारांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

The post हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक ; गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव appeared first on News 24 Tass Marathi.

विद्यार्थी हा नेहमी नम्र असावा – वाय. पी. नाईक
बिजगर्णी : विद्यार्थी नेहमी नम्र असला पाहिजे.अभ्यासाबरोबर त्याला कुटुंबाची, समाजांतील घडत असलेल्या घटनांची जाणीव असावी लागते.पुस्तके वाचनातून मन समृद्ध होते.अवांतर वाचन हवे.विविध छंद जोपासा. सुप्त गुणांना वाव मिळाल्याने व्यक्तीमत्व विकास होतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन हवे निसर्गाच्या जवळ जाऊन आरोग्य जपा. सुंदर विचार मनाला प्रसन्न करतात. चांगल्या संस्कारातून इतरांना आनंद द्या.मन समाधानी असणं हीच खरी गुणवत्ता आहे असे मौलिक विचार अध्यक्षपदावरून बोलताना महात्मा गांधी संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी बिजगर्णी हायस्कूल मध्ये व्यक्त केले.

बिजगर्णी हायस्कूल मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय. पी. नाईक उपस्थित होते.

प्रारंभी प्रशालेतील मुलींनी स्वागत गीत सादर केले. मान्यंवराच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी करून वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला त्याबद्दल संस्था पदाधिकारी यांच्या कडून मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाचं भेट वस्तू देऊन कौतुक केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्था उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्या एंकेऐशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षकवर्गाकडून शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.प्रशालेतील दहावी उत्तीर्ण झालेले पहिले तीन क्रमांक, कु. प्रियांका तारीहाळकर, वैभव भास्कर, स्नेहा मोरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, रोख रक्कम पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

वाय. पी. नाईक, मनोहर बेळगावकर, संतोष कांबळे, बबलू नावगेकर, रामचंद्र हलकर्णीकर, एस. एम. जाधव यांच्याकडून रोख रक्कम बक्षिसे देण्यात आली. तसेच पुढील वर्षी दहावी मध्ये विशेष गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ए. एल. निलजकर यांनी नव्वद टक्के गुण घेणा-यास पाच हजार रुपये, त्याचप्रमाणे पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अशोक कांबळे, रामचंद्र हलकर्णीकर, वाय. पी. नाईक, यांच्याकडून रोख रक्कमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली.

यावेळी अशोक कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष सातेरी जाधव, माजी मुख्याध्यापक वाय. एच. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर वाय. पी. नाईक, यल्लापा बेळगावकर, एस. एम. जाधव, अर्जून निलजकर, अशोक कांबळे, पुंडलिक जाधव, के. आर. भास्कर, एम. पी. मोरे, मनोहर बेळगावकर, संतोष कांबळे, निंगापा पाटील, मनोहर पाटील, परशराम भास्कर, बबलू नावगेकर, वाय. एच. पाटील कल्लापा अष्टेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी सूत्रसंचालन सुलभा भास्कर, आभार क्रीडा शिक्षक अरुण दरेकर यांनी केले.

The post विद्यार्थी हा नेहमी नम्र असावा – वाय. पी. नाईक appeared first on News 24 Tass Marathi.

कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात
कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दहावी आणि बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. संस्थेचा हा उपक्रम सलग सहाव्या वर्षी आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. एस. मोरे होते. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली असून अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केल्याने त्यांना भविष्यासाठी नवी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख वक्ते आणि सह्याद्री सोसायटीचे संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यश संपादन करता येते. त्याचबरोबर संस्कार, नम्रता आणि मोठ्यांप्रती आदर ही जीवनातील महत्त्वाची मूल्ये असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी विनायक पाटील आणि रविना बसरीमरद यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले. गौरवाबद्दल प्रतिक्षा तरवाल हिने विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक स्तरावरील कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित स्पर्धेत डेन्मार्क येथे भारताचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रविना बसरीमरद (नागपूर) हिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

याशिवाय सह्याद्री सोसायटीचे नूतन संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांचाही यल्लापा बेळगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास पांडुरंग मोरे, यल्लापा बेळगावकर, विनायक पाटील, सुरेश किणयेकर, मोणापा सुतार, अशोक कडोलकर, शिवाजी जाधव, एम. पी. मोरे, यशवंतराव मोरे, के. डी. यळ्ळूरकर, जोतिबा मोरे, रामचंद्र मोरे, यल्लापा बुरुड, वसंत हेब्बाळकर, शशिकांत गावडे, आशा बाचीकर, रेणुका मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नयन जाधव हिने यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बाबुराव जाधव आणि किशोर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कळ यांनी केले. या गौरव सोहळ्याला पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन
बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तरी बेळगाव शहर व बेळगाव तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता व व्हाटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळ कार्यालय, मेलगे गल्ली, शहापूर(वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत) मधू कणबर्गी, शंकर बेकरीच्या बाजूला, किर्लोस्कर रोड तसेच धनश्री सोसायटी, अनगोळ रोड, अनगोळ येथे दि. ३१ मे पर्यंत आणून द्यावी. अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील  (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

The post मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन appeared first on News 24 Tass Marathi.

बिजगर्णी हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेने आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवली आहे.

या परीक्षेत कु. प्रियांका शिवाजी तारिहाळकर हिने ८१.९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. वैभव शंकर भास्कर याने ७९.५२ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. नेहा संजय मोरे हिने ७८.८८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एस.आर. मोरे, उपाध्यक्ष एस.एम. जाधव, सचिव ए.एल. निलजकर, तसेच पी.पी. बेळगावकर, मनोहर पाटील, अशोक कांबळे, के.आर. भास्कर, पुंडलिक जाधव, यल्लापा बेळगावकर आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक रमेश कांबळे यांचे अभिनंदन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकवर्गाचेही सर्वत्र कौतुक होत असून पालकांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

The post बिजगर्णी हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के appeared first on News 24 Tass Marathi.

कर्नाटक राज्याचा एसएसएलसी परीक्षेचा निकाल 94.10 टक्के
बेंगळुरू : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा निकाल 94.10 इतका लागला असून यंदा कर्नाटक राज्याच्या निकालात उड्डपी जिल्हा आघाडीवर असून कलबुर्गी जिल्ह्याचा निकाल मात्र घसरला आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल देखील उत्तम लागला असून बेळगाव कर्नाटक राज्यात १८ व्या क्रमांकावर आहे. 30,860 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 29 हजार 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 94.75 इतका लागला आहे.

दहावी परीक्षा ही प्रामुख्याने शालेय जीवनातील महत्त्वाची परीक्षा असते त्यानंतरच विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळतो. यामुळे दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली होती. मात्र यंदाचा दहावीचा निकाल चांगला लागला असून गतवर्षीच्या तुलनेत बेळगाव जिल्हा यावर्षी टक्केवारीत आघाडीवर आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा व बेळगाव यांच्या निकालामध्ये दरवर्षी चुरस असते. यंदा मात्र निकालात बेळगाव जिल्ह्याने बाजी मारली असून चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याची टक्केवारी 94.09 इतकी आहे त्यानुसार चिकोडी जिल्हा 23 व्या क्रमांकावर आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 41560 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 39049 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या तुलनेत चिकोडी शैक्षणिक जिल्हा पाच क्रमांकाने पाठीमागे पडला आहे. कर्नाटक राज्यातून सात 770209 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सात 724794 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हिंदी भाषा विषयात ग्रेड देण्यात यावी यावरून निकाल लांबणीवर पडला होता. मात्र सालाबाद प्रमाणे गुण देऊन निकाल देण्यात यावा या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. 23 रोजी निकाल जाहीर होणार हे समजताच विद्यार्थ्यांना धाकधूक लागली होती मात्र यंदाचा दहावीचा निकाल पाहता चांगली असून यंदा संपूर्ण राज्याचा निकाल 94.10 इतका लागला आहे.

The post कर्नाटक राज्याचा एसएसएलसी परीक्षेचा निकाल 94.10 टक्के appeared first on News 24 Tass Marathi.

बालिका आदर्श विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 95 टक्के
वेदिका नावगेकर प्रथम

बेळगाव : टी.एफ.ई. सोसायटीच्या बालिका आदर्श विद्यालय, मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील एस.एस.एल.सी. परीक्षा 2026 चा निकाल 95% लागला असून विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या परीक्षेत कु. वेदिका लक्ष्मण नावगेकर हिने 95.68% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर सायली विनोद पाटील (95.52%) हिने द्वितीय आणि वैभवी निलेश यळगुळकर (93.92%) हिने तृतीय क्रमांक मिळवला.

याशिवाय आचल अनिल धाडवे (93.76%), ऋतुजा दशरथ सुतार (93.28%), अनुश्री श्रीधर पाटील (92.80%), स्नेहल बसाप्पा गवळी (91.04%), सौम्या ज्योतिबा बेळगावकर (90.56%), इच्छा अमृत जाधव (90.08%), वैष्णवी मारुती कणबरकर (90%) आणि श्रद्धा यल्लाप्पा पाटील (90%) यांनीही उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा मान उंचावला. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

The post बालिका आदर्श विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 95 टक्के appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी विद्यानिकेतनचा दहावी परीक्षेचा निकाल ९४.७९ टक्के
स्नेहा हिरोजी ९८.४ टक्के गुणांसह शाळेत प्रथम

बेळगाव : बेळगावमधील कॅम्प भागातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळेने एसएसएलसी परीक्षेत ९४.७९ टक्के निकालासह सुवर्णयशाची परंपरा यंदाही यशस्वीपणे जपली आहे.

शाळेची विद्यार्थिनी स्नेहा यल्लाप्पा हिरोजी हिने ६२५ पैकी ६१५ गुण मिळवून ९८.४ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून, तिने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिवराज सिद्धेश्वर गवळी आणि उर्वी आनंद पाटील या दोघांनीही ६०७ गुण (९७.१२%) मिळवून शाळेत संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळवला, तर वैजनाथ शरद पाटील ६०६ गुणांसह (९६.९६%) तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

गुणवत्ता यादीत सोहम हळदणकर (९६.८%), अनिकेत जाधव (९६.६४%), अनुष्का पाटील व श्रेया भातकांडे (९५.६८%), उदय कुमार हाजगोळकर (९५.३६%), ऐश्वर्या कंग्राळकर (९५.२%) आणि स्वरा पाटील (९४.४%) यांनी ९४ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर अदिती चोपडे आणि रघुवीर देसाई यांनी ९३.९२ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

The post मराठी विद्यानिकेतनचा दहावी परीक्षेचा निकाल ९४.७९ टक्के appeared first on News 24 Tass Marathi.

खानापूर सर्वोदय इंग्लिश मीडियम हायस्कूलचा एसएसएलसीचा ९९ टक्के निकाल
खानापूर : खानापूर शहरातील सर्वोदय इंग्लिश मीडियम हायस्कूलने २०२५-२६ च्या एसएसएलसी परीक्षेत ९९ टक्के यश मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या परीक्षेत श्रेयसी नार्वेकर हिने ९६.८८ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. श्रुती सनदी हिने ९४.८८ टक्के तर सई जाधव हिने ९४.७२ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे शाळेचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे.

खानापूर तालुक्यातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वोदय इंग्लिश मीडियम हायस्कूलने यंदाही उच्च निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचे प्राचार्य फादर नेल्सन तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

The post खानापूर सर्वोदय इंग्लिश मीडियम हायस्कूलचा एसएसएलसीचा ९९ टक्के निकाल appeared first on News 24 Tass Marathi.