road repairing work Archives | News 24 Tass Marathi

बेळगावात न्यू गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणारा आणि डेक्कन हॉस्पिटलसमोरील अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘न्यू गुड्स शेड रोड’ गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य गटारींचे बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी आज बेळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांना जाहीर निवेदन देण्यात आले.

यावेळी रमाकांत कोंडुस्कर, विकास कलघटगी, गणेश दड्डीकर, प्राचार्य आनंद आपटेकर, विशाल देशपांडे, प्रसाद मरगाळे, राजू बेर्जे, संजय शिंदे, विनायक गुंजटकर, सुनील बोकडे, संकेत पेडणेकर, डेक्कन हॉस्पिटलचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाच्या दिरंगाईवर नागरिकांचा तीव्र संताप

नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, यापूर्वी १० जून २०२६ रोजी आणि त्यानंतर ३ जुलै २०२६ रोजी स्मरणपत्र देऊनही महापालिका प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. इतकेच नव्हे तर, १४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी आणि १८ ऑगस्ट २०२६ रोजी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनाही याबाबत साकडे घालण्यात आले होते. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश देऊनही महापालिका प्रशासन ढिम्म राहिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जेसीबीने केवळ मलमपट्टी ; रस्ता बनला मृत्यूचा सापळा

महापालिकेने काही दिवसांपूर्वी केवळ जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खरवडून आणि सपाटीकरण करून तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र, यामुळे हा रस्ता पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनला असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. पावसाळा संपून हवामान अनुकूल झाले असतानाही प्रशासन कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शाळकरी मुले आणि रुग्णांचे हाल

हा रस्ता परिसरातील शाळा, महाविद्यालये, डेक्कन हॉस्पिटल तसेच रेल्वे स्थानकासाठी एकमेव मुख्य संपर्क मार्ग आहे. खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांची मोठी कोंडी होत आहे. ‘आता प्रशासनाला आणखी किती अपघातांची प्रतीक्षा आहे?’ असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

“बेळगावच्या जनतेला पोकळ आश्वासने नको, तर सुरक्षित रस्ते हवेत,” अशा शब्दांत नागरिकांनी प्रशासनाला सुनावले असून, यावेळेस त्वरित डांबरीकरण आणि पाणी उपशाची योग्य व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित नागरिकांनी दिला.

The post बेळगावात न्यू गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन appeared first on News 24 Tass Marathi.

पावसामुळे बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
दुरुस्तीसाठी तालुका म. ए. समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या संपर्क रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यांची गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरुवार, दि. २० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे.

तालुक्यातील अनेक गावांमधील रस्त्यांवर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत आहेत. गणेशोत्सवाला अवघा महिनाभराचा कालावधी असल्याने त्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी समितीकडून करण्यात येणार आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि गणेशोत्सवाच्या काळात गावागावांतून होणारी वाहतूक सुरळीत राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.

या निवेदन देण्याच्या कार्यक्रमाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण समितीचे सदस्य, युवा आघाडी व महिला आघाडीचे कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच मराठी भाषिकांनी गुरुवार, दि. २० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील आणि मोनाप्पा पाटील यांनी केले आहे.

The post पावसामुळे बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था appeared first on News 24 Tass Marathi.

गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्टेशनच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासोबतच दोन्ही बाजूंना गटार व्यवस्था उभारावी, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशन, डेक्कन हॉस्पिटल आणि बसवेश्वर रेल्वे ओव्हरपासच्या हद्दीत असलेला हा रस्ता एल अँटीच्या कामामुळे तसेच पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडेही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरवर्षी या रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यामुळे काही दिवसांतच रस्त्याची पुन्हा दुरवस्था होते. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिकांना होत आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतुकीची समस्याही निर्माण होत आहे.

आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खासदारांनी संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करावे तसेच दोन्ही बाजूंना नाल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

The post गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन appeared first on News 24 Tass Marathi.

अखेर गुड्सशेड रोडच्या तात्पुरत्या दुरुस्तीला प्रारंभ
रहिवाशांच्या पाठपुराव्याला यश

बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या गुड्सशेड रोडच्या तात्पुरत्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खोदून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी रस्त्याचे कायमस्वरूपी काम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

गुड्सशेड रोडची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट होत होती.

या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शास्त्रीनगर, गुड्सशेड रोड, संत सेना रोड, आठल्ये गल्ली, कपिलेश्वर कॉलनी आणि परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अनेकदा मागणी करूनही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नव्हते.

अखेर रहिवाशांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन गुड्सशेड रोडची दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांची समस्या जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापूर्वीच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे.

सध्या रस्ता खोदून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले तरी, काही दिवसांनी पुन्हा रस्त्याची अवस्था पूर्ववत होऊ नये यासाठी मजबूत आणि कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

The post अखेर गुड्सशेड रोडच्या तात्पुरत्या दुरुस्तीला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

गुड्सशेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : गुड्सशेड रोड, शास्त्रीनगर, आठले गुरुजी रोड, एसपीएम रोड, गोडसे कॉलनी, गोकुळनगर तसेच परिसरातील रहिवाशांनी गुड्सशेड रोडची कायमस्वरूपी दुरुस्ती व विकास करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

गेल्या जवळपास ७ वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, यामुळे परिसरातील रहिवासी, पादचारी, विद्यार्थी तसेच दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास आणि सुरक्षिततेच्या समस्या निर्माण होत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, उद्या दुपारी १२ ते ३ या वेळेत स्वतः गुड्सशेड रोडची पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे मनःपूर्वक आभार.

आता त्यांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुड्सशेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व विकासाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आम्हाला आशा आहे.

The post गुड्सशेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on News 24 Tass Marathi.

बडेकोळ्ळमठ अपघातप्रवण मार्गाच्या कायमस्वरूपी दुरुस्तीला लवकरच सुरुवात
बेळगाव : पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बेळगाव शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) अंतिम मंजुरी दिली असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पाऊस कमी होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

बडेकोळ्ळमठ परिसरातील पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने बेळगाव शहर पोलीस विभागाने याबाबत एनएचएआयकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर प्राधिकरणाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कायमस्वरूपी दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली आहे.

दरम्यान, कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघातप्रवण ठिकाणी पाण्याचे ड्रम, वाहतूक कोन, परावर्तित मानवी आकृत्या आणि दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत.

या सुरक्षाव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यरत आहेत. कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी व्यक्त केला.

The post बडेकोळ्ळमठ अपघातप्रवण मार्गाच्या कायमस्वरूपी दुरुस्तीला लवकरच सुरुवात appeared first on News 24 Tass Marathi.

मंगाई यात्रेपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; अन्यथा आंदोलनाचा इशारा
खड्डे आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर नागरिक आक्रमक

महापालिकेला निवेदन

बेळगाव : मंगाई नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, सर्वत्र पडलेले खड्डे आणि मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात मंगाई नगर रहिवासी संघ, महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेत धडक देत उपायुक्त उदयकुमार तलवार यांना निवेदन सादर केले. मंगाई यात्रेपूर्वी सर्व समस्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी एल अँड टी कंपनीने विविध भागांत खोदकाम करूनही आजपर्यंत खड्डे न बुजवल्याचा आरोप केला. मंगाई नगर, वझे गल्ली, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, यल्लम्मा रोड आणि धामणे रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहनचालक, पादचारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रिक्षाचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय पावसाचे पाणी रस्त्यावर साचणे, गटारींचा निचरा न होणे, नळ दुरुस्तीचा प्रश्न आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक मूलभूत समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली.

“मंगाई यात्रेपूर्वी आमच्या सर्व समस्या सोडवाव्यात. आठ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर मंगाई यात्रा संपल्यानंतर महानगरपालिका आणि एल अँड टी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा बंडू केरवाडकर यांनी दिला.

निवेदन स्वीकारल्यानंतर उपायुक्त उदयकुमार तलवार यांनी संबंधित विभागामार्फत सर्व समस्यांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती नागरिकांनी दिली.

मंगाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन या प्रश्नांवर किती तत्परतेने उपाययोजना करते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

The post मंगाई यात्रेपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; अन्यथा आंदोलनाचा इशारा appeared first on News 24 Tass Marathi.

भातकांडे शाळेसमोरील रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
बेळगाव : शहरातील भातकांडे शाळेसमोरील खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू करण्यात आले. अनेक महिन्यांपासून खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अखेर या मार्गाच्या दुरुस्तीला प्रारंभ झाल्याने व्यापारी, वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. व्यावसायिक कारणांसाठी चारचाकी वाहनांची वर्दळ असतानाच अवजड वाहनांचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परिसरात शाळा असल्याने विद्यार्थी आणि पालकांचीही सतत गर्दी असते. त्यामुळे रस्त्याची खराब अवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होती.

विशेषतः रस्त्यावरील खड्डे आणि उडणाऱ्या धुळीमुळे व्यापारी तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली. नगरसेवक राजू भातकांडे आणि स्थानिक आमदार यांच्या प्रयत्नांमुळे हे काम सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दुरुस्तीच्या कामामुळे काही प्रमाणात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी कपिलेश्वर कॉलनीमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अवजड वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती निर्बंध घालण्यात आले असून त्यांना गोवा वेस मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

वाहतूक विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या असून आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. सध्या दुरुस्तीचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सुविधाजनक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महत्त्वाच्या या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर तोडगा निघाल्याची भावना व्यक्त होत आहे.

The post भातकांडे शाळेसमोरील रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात appeared first on News 24 Tass Marathi.