rani channamma university Archives | News 24 Tass Marathi

केआरसीयू आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत एसआरएफजीसी बेळगावला तिसरे स्थान
महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची विद्यापीठ संघासाठी निवड

प्राचार्यांसह शिक्षकांकडून अभिनंदन

बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (केआरसीयू) आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत सांगोल्ली रायण्णा फर्स्ट ग्रेड कॉन्स्टिट्युएंट कॉलेज (एसआरएफजीसी), बेळगावच्या पुरुष संघाने तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ संघासाठी निवड झाली असून, महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी भर पडली आहे.

केआरसीयूच्या मार्गदर्शनाखाली एसआरएफजीसी महाविद्यालयातर्फे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगावातील सुभाषचंद्र बोस मैदानावर, म्हणजेच लेले मैदानावर, पुरुष आणि महिला गटातील आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धा तसेच निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. चुरशीच्या सामन्यांमध्ये एसआरएफजीसीच्या पुरुष संघाने तिसरे स्थान पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.

महाविद्यालयातील सृष्टी शेट्टी, संजोता चौगुले, प्रज्वला बेळवी, रोशन पाटील, आकाश आणि निधी पाटील या सहा खेळाडूंची विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ संघासाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. सी. पाटील, उपप्राचार्य प्रा. अर्जुन जंबगी, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. करुणा अमरुस्कर, डॉ. गिरीजाशंकर माने आणि सर्व कर्मचारीवर्गाने खेळाडूंचे अभिनंदन केले. प्राचार्यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करत खेळाडूंना भविष्यातही उत्तम यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

The post केआरसीयू आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत एसआरएफजीसी बेळगावला तिसरे स्थान appeared first on News 24 Tass Marathi.

कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेला सुरुवात
बेळगाव – विजापूर जिल्ह्यातील १४ संघांचा सहभाग

बेळगाव : संगोळ्ळी रायण्णा फर्स्ट ग्रेड युनिट कॉलेजच्या नेतृत्वाखाली कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील आंतरमहाविद्यालयीन एकल विभागीय हॉकी स्पर्धा गुरुवारी (दि. ८) टिळकवाडी येथील लेले (सुभाषचंद्र) मैदानावर झाली. बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या १४ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

खेळामुळे शारीरिक – मानसिक आरोग्य सुधारते

बेळगाव हॉकीचे सरचिटणीस सुभेदार सुधाकर चाळके यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. खेळाडूंसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. खेळामुळे विद्यार्थ्यांची क्रियाशीलता आणि आरोग्य सुधारते. प्रत्येक विद्यार्थ्याने खेळात सहभागी होऊन आपली क्षमता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.

तरुणांनी खिलाडूवृत्ती जोपासावी

अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. सी. पाटील यांनी तरुणांनी खेळाचे महत्त्व समजून घेऊन खिलाडूवृत्ती विकसित करावी, असे आवाहन केले.

यावेळी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. करुणा आम्रिस्कर उपस्थित होत्या. हर्षिता यांनी स्वागत केले. रुपाली अनिल गोडा आणि नेत्रा जवेजर यांनी परिचय करून दिला, तर डॉ. महांतेश डी. यांनी सूत्रसंचालन केले.

The post कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेला सुरुवात appeared first on News 24 Tass Marathi.