national highway Archives | News 24 Tass Marathi

हलगा पुलावर ट्रक पलटी ; दीड तास वाहतूक कोंडी
चारा वाहून नेणारे वाहन उलटले

पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक पूर्ववत

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हलगा पुलावर गुरुवारी रात्री चारा वाहून नेणारे वाहन पलटी झाल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली. सुदैवाने या अपघातात चालक आणि क्लिनर सुखरूप बचावले.

दावणगेरेहून नसलापूरकडे चारा घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड बडा दोस्त वाहनाचे हलगा पुलावर नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर उलटले. अपघातामुळे वाहनातील चाऱ्याची पोती महामार्गावर विखुरली गेली. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली.

घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी विधानसौधच्या बाजूने बेळगावकडे जाणारी वाहने काही काळ सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली.

दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. तसेच महामार्गावर विखुरलेल्या चाऱ्याची पोती हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

The post हलगा पुलावर ट्रक पलटी ; दीड तास वाहतूक कोंडी appeared first on News 24 Tass Marathi.

निपाणी महामार्गावरील संरक्षक भिंत कोसळली
काम पूर्ण होण्यापूर्वीच भिंत जमीनदोस्त

बांधकामाच्या दर्जावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

निपाणी : राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामादरम्यान उभारण्यात आलेली संरक्षक भिंत अचानक कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काम पूर्ण होण्यापूर्वीच भिंत कोसळल्याने स्थानिक नागरिकांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना ही घटना घडल्याने वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप प्रकल्प पूर्ण झालेला नसतानाच संरक्षक भिंत कोसळल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकामाच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी करण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

The post निपाणी महामार्गावरील संरक्षक भिंत कोसळली appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्ह्यातील महामार्ग विकासासाठी प्रभाकर कोरे यांचे मंत्री नितीन गडकरींना आवाहन
नवी दिल्ली : केएलईचे मानद अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलईचे संचालक श्री. विजय मेटगुड यांच्यासमवेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत कर्नाटकातील दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेत सौंदत्ती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्ग ७४८ए वर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. तसेच बेळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८बी च्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली.

एनएच-७४८ए संदर्भात नवीन महामार्गाच्या संरेखनामुळे पारंपरिक बैलगाडी मार्गांना आणि कृषी वाहतुकीला होणारा अडथळा टाळण्यासाठी सौंदत्ती तालुक्यातील मुरकुंबी आणि हिरेकोप्प गावांजवळ नवीन वाहन भुयारी मार्ग (व्हीयूपी) उभारण्याची विनंती डॉ. कोरे यांनी केली.

तसेच अथणी तालुक्यातील मुरगुंडी ते हुक्केरी तालुक्यातील गोतुर दरम्यान असलेल्या एनएच-५४८बी रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी मंत्र्यांना केले.

हा रस्ता प्रादेशिक आर्थिक विकासासाठी तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या मुद्द्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

The post बेळगाव जिल्ह्यातील महामार्ग विकासासाठी प्रभाकर कोरे यांचे मंत्री नितीन गडकरींना आवाहन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग दर्जा द्या
मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला या राज्य महामार्गावर वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका निलिमा पावशे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

नागपूर येथे मंत्री गडकरी यांची भेट घेऊन पावशे यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. बेळगावसह महाराष्ट्रातील सीमाभागातील नागरिक गोव्यातील नव्याने सुरू झालेल्या मोपा विमानतळ, सिंधुदुर्गातील चिपरी विमानतळ तसेच रेडी बंदर येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, दोडा मार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि गोवा येथील वाहतूकही याच रस्त्यावरून होत असल्याने सतत वर्दळ असते.

कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि बेळगाव या जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित झाल्यास कृषीमाल, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अधिक सुलभ होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच गोव्यातील सिमेंट व स्टील, सिंधुदुर्ग–गोवा येथील मासळी तसेच कोकणातील हापूस आंब्याची जलद आणि सुरक्षित वाहतूक करण्यास मदत होईल, असेही पावशे यांनी स्पष्ट केले.

निवेदन सादर करताना वसुंधराराजे भोसले, शैलजा खानविलकर, उज्वला कदम पाटील आणि आमदार आशिष देशमुख उपस्थित होते.

The post बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग दर्जा द्या appeared first on News 24 Tass Marathi.