Mumbai Archives | News 24 Tass Marathi

मुंबई – बंगळुरू मार्गावर धावणार देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’
अंतिम चाचणी टप्प्यात

बेळगाव, पुणे, हुबळी – धारवाडच्या प्रवाशांनाही लाभ

ताशी १८० किमी वेगाची क्षमता

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’ रेल्वे अंतिम चाचणी टप्प्यात पोहोचली आहे. सर्व सुरक्षा चाचण्या आणि आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर ही अत्याधुनिक रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, मुंबई–बंगळुरू प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल)ने चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ)च्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही स्लीपर रेल्वे विकसित केली आहे. ग्रे आणि ऑरेंज रंगसंगतीतील ही रेल्वे विशेषतः रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली असून, ताशी १८० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे.

या स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असून ८२३ प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये ११ एसी ३-टियर डबे (६११ बर्थ), ४ एसी २-टियर डबे (१८८ बर्थ) आणि एक फर्स्ट एसी डबा समाविष्ट आहे.

प्रवाशांच्या सुरक्षितता आणि आरामासाठी या रेल्वेमध्ये कमी कंपन व आवाज, आधुनिक शौचालये, डिजिटल प्रवासी माहिती प्रणाली, सीसीटीव्ही, पूर्ण वातानुकूलित व्यवस्था, ‘कवच’ सुरक्षा प्रणाली तसेच आपत्कालीन ‘टॉक-बॅक’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मार्गावर बेळगाव, हुबळी-धारवाड आणि पुणे येथील प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि बंगळुरूदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर रेल्वे जानेवारी २०२६ मध्ये हावडा–कामाख्या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई–बंगळुरू मार्गावरील ही दुसरी स्लीपर रेल्वे सेवेत दाखल होण्याच्या अंतिम टप्प्यात असून, चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर भारतीय रेल्वेकडून तिच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

The post मुंबई – बंगळुरू मार्गावर धावणार देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’ appeared first on News 24 Tass Marathi.

सीमाप्रश्नी महाराष्ट्राची आक्रमक भूमिका
सर्वोच्च न्यायालयातील लढा अधिक आक्रमकपणे लढण्याचा निर्णय

मुंबईतील विधानभवनात उच्चाधिकार समितीची बैठक

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई अधिक प्रभावीपणे लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईतील विधानभवनात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडण्यासाठी देशातील नामांकित आणि ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्यात येणार असून, सीमावासीयांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार ठामपणे पाठीशी राहील, अशी ग्वाहीही बैठकीत देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयातील आगामी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत न्यायप्रविष्ट प्रकरण अधिक आक्रमकपणे लढण्याबाबत एकमत झाले. त्याचबरोबर सीमाप्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत लवकरच विशेष बैठक आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. कर्नाटक सरकारच्या प्रत्येक भूमिकेला महाराष्ट्राने जशास तसे आणि ठोस प्रत्युत्तर द्यावे, या भूमिकेला समितीने मंजुरी देत त्यासंदर्भातील ठरावही संमत करण्यात आला.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या सातत्यपूर्ण आणि आग्रही पाठपुराव्यामुळे या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार तब्बल ३४ वर्षांनंतर सीमाप्रश्नासंदर्भातील बैठकीसाठी विशेषत्वाने विधानभवनात उपस्थित राहिले.

या उच्चाधिकार समितीच्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मुख्यमंत्री शरद पवार, नारायण राणे, मंत्री हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार भास्कर जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार शिवाजी पाटील, आमदार रोहित पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, वकील महेश बिर्जे, माजी आमदार मनोहर किणेकर तसेच मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्यासह अनेक प्रमुख नेते, कायदेतज्ज्ञ आणि पदाधिकारी उपस्थित होते.

The post सीमाप्रश्नी महाराष्ट्राची आक्रमक भूमिका appeared first on News 24 Tass Marathi.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात बुधवारी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. समितीची पुनर्रचना झाल्यानंतर प्रथमच होत असलेल्या या बैठकीकडे सीमाभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतिनिधीही बैठकीत सहभागी होऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन सादर करणार आहेत.

बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या सुनावणीला गती देण्यासाठी आवश्यक कायदेशीर रणनीती, राज्य सरकारची भूमिका आणि पुढील कृती आराखड्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सीमा प्रश्नाशी संबंधित पुरावे, कागदपत्रे आणि स्थानिक माहिती अधिक प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडण्याबाबतही विचारविनिमय होणार आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांवरील कथित अन्याय, मराठी भाषा व शिक्षणाशी संबंधित अडचणी, प्रशासकीय स्तरावरील प्रश्न तसेच सीमाभागातील नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली जाणार आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रकरणाची तातडीने सुनावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अशीही समितीची भूमिका आहे.

उच्चाधिकार समितीच्या या बैठकीतील निर्णय सीमा प्रश्नाच्या कायदेशीर आणि राजकीय लढ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

The post महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली
ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासूनचा कामाचा ताण आणि सततची धावपळ याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात आयोजित करण्यात आलेला शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला.

सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कारण नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले आहे.

The post महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली appeared first on News 24 Tass Marathi.

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक लांबणीवर
प्रशासकीय कारणास्तव उद्याची बैठक रद्द

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. ३० जून रोजी मुंबईतील विधान भवन येथे होणारी उच्चाधिकार समितीची बैठक अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. या बैठकीची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

ही बैठक मंगळवारी दुपारी १ वाजता विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत पत्रकाद्वारे बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट केले. बैठकीची पुढील तारीख स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सीमाप्रश्नासंदर्भातील ही महत्त्वाची बैठक अचानक लांबणीवर पडल्याने प्रदीर्घ काळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सीमाभागातील नागरिकांमध्ये तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा सदस्य शरद पवार, लोकसभा सदस्य नारायण राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यासह राज्य सरकारचे महाधिवक्ता मिलिंद साठे तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार होते.

दरम्यान, सीमाप्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी ही बैठक आता नेमकी कधी होणार, याकडे सीमावासीयांचे लक्ष लागले आहे.

The post सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक लांबणीवर appeared first on News 24 Tass Marathi.

भावगीतांची सम्राज्ञी हरपली ; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन
संगीत क्षेत्रावर शोककळा

मुंबई : भारतीय संगीतविश्वातील मधुर आणि सुरेल आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

१९५४ मध्ये पार्श्वगायिका म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी ६० आणि ७० च्या दशकात आपल्या अवीट गोड आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार आणि मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गीते गायली. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ आणि ‘ना तुम हमें जानो’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी भावसंगीतातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘शब्द शब्द जपून ठेव’, ‘केतकीच्या वनी येथे’, ‘पाखरा जा रे दूर देशी’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ यांसारख्या भावगीतांनी मराठी रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य असूनही सुमन कल्याणपूर यांनी आपल्या स्वतंत्र शैलीत आणि वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून भारतीय संगीतविश्वात वेगळे स्थान निर्माण केले. मराठी, हिंदीसह विविध भारतीय भाषांमध्ये त्यांनी शेकडो गाणी गायली.

भारतीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार आणि गदिमा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुश्राव्य, अजरामर आणि भावस्पर्शी अध्याय कायमचा हरपला आहे.

The post भावगीतांची सम्राज्ञी हरपली ; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन appeared first on News 24 Tass Marathi.

बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ
रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

बेळगाव : बेंगळुरू ते मुंबईदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वेसेवेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हर्च्युअल माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून केले. बेळगावमार्गे धावणारी ही रेल्वेसेवा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार असून, दोन्ही राज्यांतील संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील रेल्वेसंबंधित अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच बेंगळुरू-मुंबई मार्गावर लवकरच वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

कर्नाटकमधील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचे सांगताना त्यांनी ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत राज्यातील ६१ रेल्वे स्थानकांचा सुमारे २,१६० कोटी रुपयांच्या खर्चातून पुनर्विकास सुरू असल्याची माहिती दिली. त्यापैकी नऊ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, बेंगळुरू कॅन्टोन्मेंट स्थानकाचा ४८५ कोटी रुपये आणि यशवंतपूर स्थानकाचा ३६७ कोटी रुपयांत विकास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०१४ नंतर कर्नाटकमध्ये सुमारे १,७५० किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हासन-मंगळुरू विभागातील विद्युतीकरण पूर्णत्वाच्या टप्प्यात असून त्याची चाचणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बेंगळुरू उपनगरी रेल्वे प्रकल्पातील चारही कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैयप्पनहळ्ळी-चिक्कबनवारा आणि हिलालिगे-राजानुकुंटे मार्गांसाठी जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, केएसआर बेंगळुरू-देवनहळ्ळी आणि केंगेरी-व्हाईटफिल्ड मार्गांनाही मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे विमानतळ, इलेक्ट्रॉनिक सिटी, मराठहळ्ळी आणि हेब्बळ यांसारख्या प्रमुख भागांना रेल्वे जोडणी मिळणार आहे.

कर्नाटकमध्ये सध्या १२ जोड्या वंदे भारत गाड्या कार्यरत असून, बेंगळुरू-मंगळुरू मार्गावरील चाचण्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच बेंगळुरू-हैदराबाद आणि बेंगळुरू-चेन्नई बुलेट ट्रेन कॉरिडॉरलाही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांनीही उपस्थितांना संबोधित केले. एसएमव्हीटी बेंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (गाडी क्रमांक १६५५३/५४) सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. देशातील व्यस्त रेल्वेमार्गांपैकी एका मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा दिलासादायक ठरेल, असे ते म्हणाले.

थानिसंद्रा येथे सुमारे २७० कोटी रुपयांचा वंदे भारत स्लीपर देखभाल डेपो उभारण्यात येणार असून, एसएमव्हीटी बेंगळुरू येथे ५२.७३ कोटी रुपयांचा चेअर कार देखभाल प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला खासदार पी. सी. मोहन, लहर सिंग सिरोया आणि तेजस्वी सूर्या हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. तसेच बेंगळुरू विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष कुमार सिंह आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

श्रीमती. सुधा वसंत सप्रे यांचे निधन
डोंबिवली : मूळच्या शहापूर बसवाण गल्ली, बेळगाव आणि सध्या डोंबिवली, मुंबई येथे स्थायिक असलेल्या श्रीमती. सुधा वसंत सप्रे (वय ८६) यांचे शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी डोंबिवलीतील राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना, नातवंडे आणि पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सध्याच्या राहत्या ठिकाणी, डोंबिवली येथे होणार आहे.

The post श्रीमती. सुधा वसंत सप्रे यांचे निधन appeared first on News 24 Tass Marathi.

संगीत विश्वातील ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील ‘सूरसम्राज्ञी’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत लोअर परळ या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही आनंद भोसले यांनी सांगितले.

आशाताईंची कारकीर्द :

आशा भोसले, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी एक. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली असून हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाज दिला आहे. १९५० च्या दशकात त्यांनी कारकीर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचे खास स्थान निर्माण केले. ओ. पी. नाय्यर, आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली.

त्यांनी क्लासिकलपासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमँटिक गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक प्रकारात आपली छाप पाडली. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मविभूषण सारखे सन्मान मिळवले आहेत. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.

सांगली या ठिकाणी आशा भोसले यांचा जन्म झाला होता. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. गिनिज बुकात सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद झाली आहे. आपल्या वेगळ्या आवाजाची भुरळ सगळ्या जगाला पडली होती. त्या जरी आपल्याला सोडून गेल्या असल्या तरीही त्यांचे गाणे कायमच आपल्या सोबत राहणार आहे. तो आवाज कायमच आपल्याला साथ देईल यात शंका नाही.

The post संगीत विश्वातील ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत appeared first on News 24 Tass Marathi.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले रुग्णालयात दाखल
मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (वय ९२) यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा होती, मात्र नंतर कुटुंबीयांकडून याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. आशा भोसले यांच्यावर सध्या रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, त्यांच्या नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर पोस्ट करत आजीला अशक्तपणा आणि छातीचा संसर्ग (चेस्ट इन्फेक्शन) झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच चाहत्यांनी आणि माध्यमांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही तिने केले आहे.

आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत बातमी समोर आल्यानंतर विविध तर्कवितर्क सुरू झाले होते. मात्र कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

The post ज्येष्ठ गायिका आशा भोसले रुग्णालयात दाखल appeared first on News 24 Tass Marathi.