Chandgad Archives | News 24 Tass Marathi

तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकसकोपकडे वळवण्याची मागणी
बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

बेळगाव : शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील तिलारी जलाशयातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याच्या प्रस्तावाला नव्याने गती मिळाली आहे. या मागणीसंदर्भात बेळगावच्या माजी नगरसेवकांच्या संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या प्रस्तावाबाबत खासदार शेट्टर यांनी सकारात्मक भूमिका घेत पुढील पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. दरवर्षी मे ते जुलै या कालावधीत राकसकोप आणि हिडकल जलाशयांतील पाणीसाठा कमी झाल्याने बेळगाव शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून चंदगड तालुक्यातील तिलारी जलाशय आणि राकसकोप जलाशय यांची ‘राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पा’अंतर्गत जोडणी करण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली.

माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव सुंठकर यांनी सांगितले की, तिलारी जलाशयात वीज निर्मितीनंतर मे ते जुलै या काळात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पाणी उपलब्ध असते. हे पाणी राकसकोप जलाशयात वळविल्यास बेळगाव शहरासह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. याशिवाय मार्कंडेय नदीच्या पात्रातून शेतीसाठीही या पाण्याचा लाभ होईल.

माजी नगरसेवक लतीफ खान पठाण यांनी सांगितले की, या योजनेसाठी यापूर्वीही विविध स्तरांवर प्रयत्न झाले आहेत. तिलारीचे पाणी बेळगावला उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित केला जाणार आहे. हा प्रश्न भाषा किंवा सीमावादाशी न जोडता केवळ जनहिताच्या दृष्टीने मार्गी लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खासदार जगदीश शेट्टर यांनी या प्रस्तावाचे स्वागत करत संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासमवेत तिलारी जलाशय परिसराची संयुक्त पाहणी करून प्रकल्प पुढे नेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीला नेताजी जाधव, दीपक वाघेला, वंदना बेळगुंदकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, संजीव प्रभू, मोहम्मद पिरजादे यांच्यासह माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकसकोपकडे वळवण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपमध्ये वळविण्याची मागणी
बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन

चंदगड : बेळगाव शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. यासंदर्भात बेळगाव महापालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळविण्याची योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजाही प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतील, असा दावा शिष्टमंडळाने केला आहे.

बेळगावच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील पाणीपुरवठा लक्षात घेऊन या योजनेचा गांभीर्याने विचार करून आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

The post तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपमध्ये वळविण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा
पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांवर ; नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

१० बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून, सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीची पातळी सध्या २२ फुटांवर पोहोचली असून, अवघ्या २४ तासांत नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.

नद्यांमधील वाढलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील १० बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये राजाराम बंधाऱ्याचाही समावेश आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून, या भागातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे तसेच पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून किंवा धोकादायक मार्गांवरून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

The post कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा appeared first on News 24 Tass Marathi.

लिव्ह-इनमधील प्रेयसीची शिक्षकाकडून हत्या
दहा वर्षांच्या नात्याचा दुर्दैवी अंत

दुसऱ्या विवाहाला विरोध केल्याने कट रचून खून

मृतदेह तिलारी घाटातील जंगलात फेकला

बेळगाव : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला सोडून दुसऱ्या तरुणीशी विवाह करण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराने तिची निर्घृण हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेळगाव तालुक्यातील वंटमुरी येथील गंगव्वा हंचिनमणी (वय २५) हिचा तिचा लिव्ह-इन पार्टनर आणि खाजगी शिक्षक बसवराज करनावर (वय ३३, रा. राजनकट्टी, ता. हुक्केरी) याने त्याचे वडील आणि मामाच्या मदतीने खून केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांपासून गंगव्वा आणि बसवराज हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, बसवराजने दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरवले होते. याला गंगव्वाने विरोध करत जाब विचारल्याने आरोपीने तिचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.

‘विशालगडला फिरायला जाऊ’ असे सांगून बसवराजने गंगव्वाला कारमधून नेले. त्यानंतर वडील आणि मामाच्या मदतीने लोखंडी रॉडने तिच्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह महाराष्ट्रातील तिलारी घाटातील जंगलात फेकून दिला.

२९ मे रोजी तिलारी घाट परिसरात कुजलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी चंदगड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत घटनास्थळ परिसरातील रस्ते आणि टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून संशयास्पद कारचा माग काढण्यात आला आणि शिक्षक बसवराज करनावरसह तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

दरम्यान, मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “मुलगी जेव्हा जेव्हा भेटायला यायची, तेव्हा सर्व काही ठीक असल्याचे सांगायची. पण तिची अशी हत्या होईल, असे कधीच वाटले नव्हते,” असे म्हणत गंगव्वाच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

मृत तरुणीचा भाऊ रमेश यानेही संताप व्यक्त करत, “महाराष्ट्र पोलीस घरी आल्यानंतरच बहिणीचा खून झाल्याचे समजले. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी केली आहे.

The post लिव्ह-इनमधील प्रेयसीची शिक्षकाकडून हत्या appeared first on News 24 Tass Marathi.

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा छडा
कर्नाटकातील तिघांना अटक

चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही धागेदोऱ्यांच्या आधारे उलगडा करत कर्नाटकातील तिघा आरोपींना अटक केली आहे. महिलेची ओळख नसताना आणि अत्यल्प पुरावे उपलब्ध असतानाही पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामुळे या खळबळजनक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.

दि. 29 मे 2026 रोजी सकाळी तिलारी घाटातील प्रेशर पॉईंटजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर मारहाण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चंदगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपासाची जबाबदारी सोपवली. तपास पथकाने घटनास्थळी मिळालेल्या वस्तू, कपडे, दागिने आणि अन्य पुराव्यांच्या आधारे महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले. याचबरोबर कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटकातील बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली. तिलारीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचेही बारकाईने विश्लेषण करण्यात आले.

तपासादरम्यान मृत महिलेची ओळख गंगवा सत्याप्पा हंचीमनी (वय 25, रा. वंटमोरी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी दि. 25 मे रोजी तिलारी घाटातून गेलेल्या एका इको कारचा माग काढला. तब्बल 110 किलोमीटर परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

या तपासातून बसवराज चेल्लप्पा करणावर (वय 33, रा. राजकोटे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चेल्लप्पा चेल्लप्पा करणावर (वय 57, रा. राजकोटे) आणि लक्ष्मण लक्ष्मण अंकली (वय 37, रा. केनवट्टी, ता. हुक्केरी) यांच्या मदतीने गंगवा हंचीमनी हिचा खून करून मृतदेह तिलारी घाट परिसरात टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, चंदगड पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक कोळेकर, विजय इंगळे, समीर कांबळे, सागर चौगुले आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

The post तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा छडा appeared first on News 24 Tass Marathi.

सावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा
कोल्हापूर : देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी मागणी ‘कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ’ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.​

प्रवासी संघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना म्हटले आहे की, सध्या मुंबई-पुणे-कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांदरम्यान रोज हजारो खाजगी वाहनांमुळे लाखो लीटर पेट्रोल व डिझेल वाया जात असून अब्जावधी रुपयांचे परकीय चलन देशाबाहेर जात आहे. ‘शक्तीपीठ महामार्ग’ सारख्या प्रकल्पांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात असले, तरी त्यामुळे भविष्यात परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी होणार नाही. याला उत्तम पर्याय म्हणून १) कोल्हापूर – आजरा – गडहिंग्लज – चंदगड – बेळगाव, २) सावंतवाडी – चंदगड – बेळगाव आणि ३) कोल्हापूर – वैभववाडी या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे नियोजन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवर जलद गतीने करून पुढील पाच वर्षांत ते प्रत्यक्ष पूर्ण करावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

The post सावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा appeared first on News 24 Tass Marathi.

तिलारी धरणात बुडालेल्या तरुण दंतवैद्याचा मृतदेह सापडला
चंदगड : तिलारी धरण परिसरात पाण्यात बुडालेल्या युवा दंतवैद्याचा मृतदेह रविवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान सापडला. विविध यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

आझमनगर परिसरातील काही तरुण शनिवारी तिलारी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये व्यवसायाने दंतवैद्य असलेले डॉ. मोहम्मद शेहजान (वय २६) हे पोहण्यासाठी अडक्याचा वझर परिसरात पाण्यात उतरले. मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने ते बुडाल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी संध्याकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र अंधारामुळे ती थांबवावी लागली.

रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी एसडीआरएफ पथक, बेळगाव ग्रामीण पोलीस, वन विभाग तसेच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, मुदस्सर तरनीकर, राजू टक्केकर यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले. अखेर समन्वित कारवाईतून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

The post तिलारी धरणात बुडालेल्या तरुण दंतवैद्याचा मृतदेह सापडला appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावचा तरुण ‘तिलारी’ धरणात बुडाला
चंदगड : बेळगाव शहरातील शाहूनगरच्या एका तरुणाचा तिलारी धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. महम्मद अमीरशा (वय २६) असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महम्मद अमीरशा हा दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण करून मित्रांसमवेत तिलारी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी तो धरणात पोहण्यासाठी उतरला असता अचानक बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधार पडल्याने शोधमोहीम राबवण्यात अडचणी आल्या. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.

The post बेळगावचा तरुण ‘तिलारी’ धरणात बुडाला appeared first on News 24 Tass Marathi.

तुडये येथे आंबेडकर जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांचा सत्कार
तुडये : भीमस्वराज्य युवक मंडळ तुडये यांच्यावतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संस्कृतीक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी आमंत्रित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबानी केलं, शिवराय ते भीमराव, स्वराज्य ते संविधान, मनगटात शिवराय आणि डोक्यात भिवराव जर असतील तर उभ्या आयुष्यात कुणासमोर झुकण्याची वेळ येणार नाही असे मनोगत शुभम शेळके यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्हा, चंदगड तालुका आणि तुडये गाव सदैव सीमावासियांच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही ग्रामस्थांकडून देण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर श्री. विलास नाईक सभापती चंदगड ,विलास सुतार सरपंच ग्रामपंचायत तुडिये, जगन्नाथ हुलजी माजी सभापती, भरमाना गावडा, पंचायत समिती सदस्य सौ प्रेमा जगन्नाथ हुलाजी, मारुती पाटील, हनमंत पाटील तसेच युवा समिती सीमाभाग चे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, अशोक घगवे, मोतेश बारदेसकर यांच्यासह इतर मान्यवर आणि तुडये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुडये गावचे सरपंच तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास सुतार यांना आम्ही ज्या ब्रीदवाक्य घेऊन काम करतोय “लढा नाहीतर गुलामीची सवय होईल” ते ब्रीद स्मृतिचिन्ह स्वरूपात देऊन भविष्यात होणाऱ्या मराठी सन्मान यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

The post तुडये येथे आंबेडकर जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांचा सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी ३३ ठिकाणी पार्किंगची सोय
कोल्हापूर / प्रतिनिधी

श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या यात्रेसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ३३ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी सुमारे ४०० पोलीस आणि ४०० होमगार्ड तैनात करण्यात आले असून शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन व जुने एस.टी. स्टँड परिसर, तोरणाई कडा, पिराचा कडा, एमटीडीसी परिसर, सेंट्रल प्लाझा, ग्रामपंचायत परिसर, यमाई मंदिर परिसर, निलगिरी बाग, दानेवाडी फाटा आदी ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

यात्रेदरम्यान वाहतुकीवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. ३० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहने, मालवाहतूक ट्रक, रिक्षा आणि ट्रॅक्टर यांना जोतिबा डोंगरावर जाण्यास बंदी असेल. तसेच मुख्य यात्रेच्या दिवशी १ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजल्यापासून दुचाकी वाहनांनाही काही मार्गांवर प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

भाविकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

The post जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी ३३ ठिकाणी पार्किंगची सोय appeared first on News 24 Tass Marathi.