Sankeshwar Archives | News 24 Tass Marathi

अवैध सावकारीतून दुप्पट वसुलीचा प्रयत्न
संकेश्वर पोलिसांकडून फरार सावकाराला अटक

अडीच पट रक्कम परत करूनही अतिरिक्त पैशांचा तगादा

जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

संकेश्वर : अवैध सावकारी करून कर्जदाराकडून मुद्दल आणि व्याजासह मोठी रक्कम वसूल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या एका सावकाराला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. करजगा येथील महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सदानंद भीमराव हलगे (वय ४७) असे आहे. तक्रारदार महिलेने घेतलेल्या कर्जाची मुद्दल आणि व्याज मिळून ३६.७७ लाख रुपये परतफेड केली होती. मात्र, एवढी रक्कम मिळूनही आरोपीने आणखी ४.६४ लाख रुपये देण्याची मागणी करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध सुरू असतानाच २२ जुलै रोजी कणगला गावाजवळून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संकेश्वर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संकेश्वर पोलीस करत आहेत.

The post अवैध सावकारीतून दुप्पट वसुलीचा प्रयत्न appeared first on News 24 Tass Marathi.

संकेश्वरमधील हत्या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा
सहा आरोपींना अटक

बेळगाव : जिल्ह्यातील संकेश्वर शहरात घडलेल्या बाबू भुसगोळ हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. या प्रकरणी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, संकेश्वरमधील गोरक्षणमाळ परिसरात पूर्वीपासून असलेले वैमनस्य आणि नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादातून बाबू भुसगोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. तीक्ष्ण हत्यारे आणि दगडांचा वापर करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृताच्या पत्नीने संकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत शुभम बिसूरे, अक्षय मरडी, पवन मरडी, अनिल मरडी, संदीप मरडी आणि अभिषेक अलदाळे या सहा जणांना अटक केली.

पोलीस अधीक्षक के. रामराजन, अप्पर पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि गोकाक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपती कोंगणोळ्ळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्या प्रकरणाचा अल्पावधीत छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी तपास पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

The post संकेश्वरमधील हत्या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा appeared first on News 24 Tass Marathi.

दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा ; सहाजण ताब्यात
संकेश्वर पोलिसांची कारवाई

६ लाखांहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त

संकेश्वर : संकेश्वर आणि जिल्ह्यातील विविध भागांतून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीविरोधात कारवाई करत संकेश्वर पोलिसांनी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख १० हजार रुपये किमतीच्या १४ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पहिल्या प्रकरणात गिरिष तुकाराम सत्यनाईक (रा. भीमनगर, संकेश्वर) यांची दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार संकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर बाबुगोडा चंद्रगौडा पाटील (रा. हुक्केरी रोड, संकेश्वर) यांच्या घरासमोरूनही दुचाकी चोरी झाली होती.

या घटनांचा तपास करताना पोलिसांनी संशयितांचा मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला. तपासादरम्यान संकेश्वर, चिकोडी, यमकनमर्डी, बेळगाव शहर आणि गडहिंग्लज परिसरातून तब्बल १० दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. या प्रकरणात अंदाजे ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

या गुन्ह्यात अमित बसवराज कोळी (वय २१) आणि आनंद यल्लाप्पा घस्ती (वय ३८, दोघे रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) यांना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात सुमित गंगाराम कम्मार (वय २१, रा. निडसोशी), शिवराज निगौंडा पाटील (वय २१, रा. कमतनूर), ओंकार मोहन कडलगी (वय २०, रा. कडलगे, ता. गडहिंग्लज) आणि किरण हेमंत कम्मार (वय १८, रा. निडसोशी) या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर निडसोशी, अंकले आणि गोकाक परिसरातून चोरी करण्यात आलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. या वाहनांची किंमत सुमारे १ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या सर्व आरोपींविरोधात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी, उपनिरीक्षक विठ्ठल नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश शेट्टण्णावर, सी. जी. सारापुरे आणि पोलिस पथकाने केली.

The post दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा ; सहाजण ताब्यात appeared first on News 24 Tass Marathi.

संकेश्वरजवळ वऱ्हाडी टेम्पो ट्रॅव्हलरला कारची धडक
अनेकजण गंभीर जखमी

संकेश्वर : पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर क्रॉसजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला असून टेम्पो ट्रॅव्हलर आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरमधून सुमारे १४ प्रवासी महाराष्ट्रातील इचलकरंजी येथून गडहिंग्लजजवळील शिंदेवाडी येथे लग्नासाठी निघाले होते. हुक्केरी तालुक्यातील सोलापूर क्रॉस परिसरात पोहोचताच टेम्पो आणि कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.

अपघात इतका भीषण होता की, टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्यावर तीन वेळा कोलांट्या घेतल्या. त्यामुळे वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

The post संकेश्वरजवळ वऱ्हाडी टेम्पो ट्रॅव्हलरला कारची धडक appeared first on News 24 Tass Marathi.

संकेश्वर पोलिसांकडून दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक
२७ दुचाकींसह १८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

संकेश्वर : संकेश्वरसह बेळगाव शहर आणि चंदगड परिसरात घडलेल्या दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करण्यात संकेश्वर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

लक्ष्मण वीरूपाक्षी कणबर्गी (वय ३१, मूळ रा. अंकलगी, ता. गोकाक, सध्या रा. समर्थनगर, बेळगाव) व फकीरप्पा सिद्धाप्पा करीगार (वय २५, मूळ रा. हिरेहट्टी, ता. गोकाक, सध्या रा. जोळकुरळी, ता. यरगट्टी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणाची सुरुवात जुगूळ (ता. कागवाड) येथील अजित अरबोळे यांच्या तक्रारीपासून झाली. त्यांची दुचाकी ३१ मार्च रोजी संकेश्वरमधून चोरीला गेल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांना ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलीस प्रमुख आर. बी. बसर्गी आणि उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एम. आवजी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. सखोल चौकशीत आरोपींनी संकेश्वर, बैलहोंगल तसेच बेळगाव शहरातील विविध भाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

यानुसार पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या २७ दुचाकी जप्त केल्या आहेत. यापूर्वीही या दोघांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक यु. एस. शेट्टेण्णावर, विठ्ठल नाईक, एएसआय एल. एस. खोत व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

The post संकेश्वर पोलिसांकडून दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक appeared first on News 24 Tass Marathi.

‘धूम’ स्टाईलने चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला अटक
यमकनमर्डी पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

बॉलिवूडमधील ‘धूम’ चित्रपटाच्या स्टाईलने चोरी करणाऱ्या एका कुख्यात चोरट्याला अखेर यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ९७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आज बेळगाव येथे पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, आरोपी सुरेश मारुती नायक सनदी याने सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वाहनांसह अनेक ठिकाणी चोरी केल्या होत्या. १२८० ग्रॅम सोने, सुमारे साडेआठ किलो चांदी, ₹१.२५ लाख रोख रक्कम, एक थार वाहन आणि दोन दुचाकी असा एकूण माल त्याच्याकडून जप्त करण्यात आला.

ही कारवाई बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी, पोलिस उपअधीक्षक रवी नाईक आणि यमकनमर्डी पोलिस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या विशेष पथकाने आरोपीला पकडले.

तपासादरम्यान उघड झाले की, आरोपीने याआधीही यमकनमर्डी, मणगुत्ती आणि संकेश्वर परिसरात चोऱ्या केल्या होत्या. वैज्ञानिक तपास पद्धतींच्या साहाय्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात यश मिळवले.

सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या कारवाईत सहभागी अधिकाऱ्यांचे कौतुक करून बक्षीस जाहीर केले आहे.

The post ‘धूम’ स्टाईलने चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला अटक appeared first on News 24 Tass Marathi.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला बोटीतून पूर परिस्थितीचा आढावा
चिक्कोडी / वार्ताहर

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील नद्यांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी चिक्कोडी तालुक्यातील यडूर गावातील कृष्णा नदीतील पूर परिस्थितीचा बोटीतून आढावा घेतला.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. शेजारच्या महाराष्ट्रात वाढलेल्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात नद्यांचा प्रवाह वाढला आहे. चिक्कोडी तालुक्यातील मांजरी आणि येडूर गावातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. नंतर, त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी अभिनव जैन, डीवायएसपी गोपालकृष्ण गौडा, उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी, तहसीलदार राजेश बुर्ली, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

The post जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला बोटीतून पूर परिस्थितीचा आढावा appeared first on News 24 Tass Marathi.

नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे
जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने दि. १९ आणि २० ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. सततच्या पावसामुळे घटप्रभा, कृष्णा, दूधगंगा, हिरण्यकेशी, मार्कंडेय आणि मलप्रभा नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे जिल्हापालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे की, हिडकल जलाशय पूर्णपणे भरल्यामुळे, दररोज हजारो क्युसेक पाणी वाहत आहे आणि २५,००० हून अधिक क्युसेक पाण्याचा आधीच विसर्ग करण्यात आला आहे. हिडकल डॅम, हिरण्यकेशी, मार्कंडेय आणि बळ्ळारी नाला आणि घटप्रभा नदीतून एकत्रितपणे ४०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराचा धोका आणखी गंभीर झाला आहे.

या संदर्भात, नदीपात्रात राहणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना मी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करत आहे. कृष्णा आणि हिरण्यकेशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असलयाने, स्थलांतरित होण्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करावी. अनेक पूल आधीच पाण्याखाली गेले असल्याने, वाहतुक करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गरज पडल्यास, परिस्थिती लक्षात घेऊन उद्या देखील सुट्टी दिली जाईल. पालकांनी मुले, वृद्ध आणि महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे. आवश्यक वस्तूंची आगाऊ व्यवस्था करावी आणि नदीपात्र, पूल आणि पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी जाणे काटेकोरपणे टाळावे अशी सूचना त्यांनी केली.

मी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन दलांच्या सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांची सुरक्षा ही आमचे प्राधान्य आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्वांना या कठीण परिस्थितीत सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे जेणेकरून स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

The post नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे appeared first on News 24 Tass Marathi.

कृष्णा नदीत १ लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणीसाठा
नदीकाठच्या भागाला पुराचा धोका

चिक्कोडी / वार्ताहर

महाराष्ट्रातील पश्चिम घाट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्लोळ बंधाऱ्यातून कृष्णा नदीत एकूण १,०८,५०१ क्युसेक पाणी वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील राजापूर बॅरेजपासून कर्नाटकातील कृष्णा नदीपर्यंत ८४,९१७ क्युसेक पाणी वाहत आहे. कृष्णा नदीसह दूधगंगा आणि वेदगंगा या उपनद्यांच्या पाण्याची पातळी सरासरी २ फूट वाढली आहे. पाण्याची पातळी प्रत्येक क्षणी वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुर येण्याची भीती आहे.

चिक्कोडी -निप्पाणी तालुक्यातील सर्व ८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.आज वेदगंगा नदीवरील जत्राट -भिवशी आणि अक्कोळ – सिद्धनाळ बॅरेज तुडुंब भरले आहेत. वेदगंगा नदीवरील बारवाड -कुन्नूर, भोज-शिवापूरवाडी, दूधगंगा नदीवरील करदगा-भोज, मलिकवाड – दत्तवाड , कृष्णा नदीवरील कल्लोळ – येडूर आणि मांजरी – सवदत्ती या बॅरेजना पूर आला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

The post कृष्णा नदीत १ लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणीसाठा appeared first on News 24 Tass Marathi.

संकेश्वरात अट्टल मोबाईल चोरट्याला अटक
१०१ मोबाईलसह कार जप्त

१४ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत : आरोपी तेलंगणाचा

संकेश्वर / वार्ताहर

संकेश्वर पोलिसांनी आंतरराज्य पातळीवरील मोबाईल चोराला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीकडून लाखो रुपयांचे मोबाईल आणि कार जप्त करण्यात आली आहे. संकेश्वर पोलिसांनी कारवाई करत तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील बानसवाडा येथील नवीन संपत या चोराला अटक केली आहे. संशयित आरोपीच्या कारमधून विविध कंपन्यांचे एकूण १०१ मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण १४.७१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

संकेश्वर पोलिसांनी हिरण्यकेशी कारखान्याजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना, एका संशयित वाहनात विविध मोबाईल आढळून आले. चौकशीदरम्यान ही मोबाईल चोरीची प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून ११.७१ लाख रुपये किमतीचे मोबाईल आणि ३ लाख रुपये किमतीची हुंडाई कंपनीची कार पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. ही कारवाई गोकाकचे डीएसपी रवी नायक आणि संकेश्वरचे सीपीआय शिवशरण अवजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पीएसआय आर. एस. खोत, पीएसआय ए.के. सोनद, तसेच कर्मचारी एस. एल. गलातगी, एस.ए. कांबळे, व्ही.बी. मुरकीभावी, एस. एम. यक्संबी, बी.टी. पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

The post संकेश्वरात अट्टल मोबाईल चोरट्याला अटक appeared first on News 24 Tass Marathi.