kapileshwar mandir Archives | News 24 Tass Marathi

कपिलेश्वर तलावात गोकुळ मूर्तींच्या विसर्जनासाठी पाणीच नाही
अवघ्या ७-८ इंच पाण्यात विसर्जन

महापालिकेच्या नियोजनावर भाविकांचा संताप

बेळगाव : गोकुळाष्टमीच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही जपली जाते. रात्री बारा वाजता पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नदी, तलाव किंवा कुंडात मूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र, बेळगावातील कपिलेश्वर तलावात यंदा विसर्जनासाठी पुरेसे पाणीच उपलब्ध नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली.

बेळगाव शहरात नदी नसल्याने दरवर्षी गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन कपिलेश्वर तलावात केले जाते. याठिकाणी विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा तलावातील पाण्याची पातळी एक फुटापेक्षाही कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांना नाईलाजाने अवघ्या ७–८ इंच पाण्यात गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन करावे लागले.

महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना निर्माण झालेली अडचण पाहून उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. धार्मिक परंपरेनुसार होणाऱ्या विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था आधीच का करण्यात आली नाही, असा सवाल भाविकांकडून उपस्थित करण्यात आला.

महापालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील नगरसेवकांना या समस्येची पूर्वकल्पना असूनही वेळीच उपाययोजना का करण्यात आली नाही, अशी चर्चा भाविकांमध्ये सुरू होती.

परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर, रामराज दरवंदकर आणि माजी नगरसेवक राजू बिरजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

गोकुळाष्टमीसारख्या पारंपरिक धार्मिक उत्सवासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असताना, मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था न होणे ही महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले.

भविष्यात अशा धार्मिक उत्सवांच्या वेळी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने आवश्यक सुविधा आणि योग्य नियोजन वेळेत करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

The post कपिलेश्वर तलावात गोकुळ मूर्तींच्या विसर्जनासाठी पाणीच नाही appeared first on News 24 Tass Marathi.

एक लाखांहून अधिक बेलपत्रांनी सजणार कपिलेश्वर ; उद्या भव्य माळ अर्पण
बेळगाव : श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारनिमित्त दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात उद्या विशेष धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भगवान कपिलेश्वरांना एक लाखांहून अधिक बेलपत्रांची भव्य माळ अर्पण करण्यात येणार आहे.

बेळगावचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक केंद्र असलेल्या कपिलेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी विशेष पूजा आणि धार्मिक विधींसाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. भगवान कपिलेश्वरांना अर्पण करण्यासाठी एक लाखांहून अधिक बेलपत्रांचा भव्य हार तयार करण्यात आला आहे.

विविध भगिनी तसेच मंदिर विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने हा आकर्षक आणि भक्तिपूर्ण हार तयार करण्यात आला आहे. उद्या विशेष पूजाविधीदरम्यान हा हार भगवान कपिलेश्वरांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे.

या अनोख्या धार्मिक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी शेकडो शिवभक्त कपिलेश्वर मंदिरात उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. श्रावण महिन्यातील या विशेष सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांसाठी हा दिवस विशेष ठरणार आहे.

The post एक लाखांहून अधिक बेलपत्रांनी सजणार कपिलेश्वर ; उद्या भव्य माळ अर्पण appeared first on News 24 Tass Marathi.

पहिला श्रावण सोमवार, नागपंचमीनिमित्त कपिलेश्वर मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रम
बेळगाव : पवित्र श्रावण महिना आणि नागपंचमीच्या निमित्ताने श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून अभिषेक, रुद्राभिषेक, त्रिकाल पूजा आणि पालखी प्रदक्षिणेसह विविध धार्मिक विधी पार पडणार असून, भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

श्रावण महोत्सवाची सुरुवात रात्री १२.३० वाजता पहिल्या अभिषेकाने होणार आहे. समस्त बेळगावकर नागरिकांच्या जनकल्याणासाठी दरवर्षी हा अभिषेक करण्यात येतो. पहाटे ४ वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक सुरू राहणार असून, त्यानंतर विशेष रुद्राभिषेक आणि त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ७.३० वाजता मंदिर परिसरातून भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. त्यानंतर विशेष महाआरतीने दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने आकर्षक धार्मिक देखावा साकारण्यात आला आहे. यंदाच्या देखाव्यात राजमहालाच्या माध्यमातून हिंदू वैदिक धर्मातील पवित्र सप्तर्षींची माहिती भाविकांना करून देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना सप्तर्षींच्या धार्मिक व वैदिक परंपरेची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे.

श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. विनायक पालकर व त्यांच्या टीमसह राजू लोहार आणि बसवराज हुंदेकर यांच्या सहकार्याने ही सजावट करण्यात आली असून, गेल्या पाच वर्षांपासून ही टीम मंदिरातील देखावे आणि सजावटीची परंपरा जपत आहे.

श्रावणाच्या पहिल्या सोमवारनिमित्त आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, तसेच मंदिरातील सप्तर्षींचा धार्मिक देखावा आवर्जून पाहावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

The post पहिला श्रावण सोमवार, नागपंचमीनिमित्त कपिलेश्वर मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

पर्जन्यवृष्टीसाठी सकल मराठा समाजाचे श्री कपिलेश्वर चरणी साकडे
महारुद्राभिषेक, भजन व महाआरतीद्वारे बळीराजाच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना

बेळगाव : जिल्ह्यातील पावसाची टंचाई दूर होऊन बळीराजाच्या शेतात समृद्धीचे पाणी वाहावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या ऐतिहासिक श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले. लोककल्याण, उत्तम पर्जन्यवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी शिवचरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

पहाटे मंदिरात भगवान शिवाच्या पिंडीवर विधिवत महारुद्राभिषेक करण्यात आला. वेदमंत्रांच्या घोषात पार पडलेल्या या धार्मिक विधीनंतर दिवसभर मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती. संध्याकाळी भजन, शिवनामस्मरण आणि पारंपरिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

बेळगाव जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून, यंदा पावसाअभावी अनेक भागांतील शेतकरी चिंतेत आहेत. पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा, बळीराजाचे संकट दूर व्हावे आणि सर्वसामान्य जनतेचे कल्याण व्हावे, अशी सामूहिक प्रार्थना सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी श्री कपिलेश्वर चरणी केली.

यावेळी सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पावसाची कमतरता आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन या विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. वरुणराजाने लवकरच कृपा करून जिल्ह्यावर समाधानकारक पाऊस पाडावा, अशी सर्वांची मनोमन प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.

या धार्मिक सोहळ्याला सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post पर्जन्यवृष्टीसाठी सकल मराठा समाजाचे श्री कपिलेश्वर चरणी साकडे appeared first on News 24 Tass Marathi.

वरुणराजाच्या कृपेसाठी श्री कपिलेश्वरांना साकडे
सकल मराठा समाज बेळगाव वतीने सोमवारी’महाआरती’ आयोजन

सकल मराठा समाज बेळगावचे जाहीर आवाहन

१८ पगड आणि १२ बलुतेदार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव : बेळगावचा बहुसंख्य असलेला मराठा समाज हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून शेतीवरच या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यंदाच्या हंगामात वरुणराजाने आणि निसर्गाने बळीराजाला उत्तम साथ द्यावी, पिकांची चांगली भरभराट व्हावी, आणि पर्यायाने शेतकरी व बहुजन समाजाचे कल्याण व्हावे, या उदात्त हेतूने सोमवार, दिनांक २९ जून रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिण काशी म्हणून अत्यंत पवित्र मानले जाणारे बेळगावचे श्री क्षेत्र कपिलेश्वर तीर्थ मंदिर येथे सायंकाळी ठीक ७:०० वाजता समस्त मराठा समाजाच्या वतीने देवा चरणी ‘गाराणे’ घालून ‘महाआरती’ करण्यात येणार आहे.

प्रमुख आयोजक आणि नेतृत्व  सकल मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या वतीने या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने  किरण जाधव (नेते, सकल मराठा समाज) , रमाकांत कोंडुसकर (नेते, सकल मराठा समाज) , रणजित चव्हाण पाटील (ज्येष्ठ नेते, मराठा समाज) , सागर पाटील (समन्वयक, मराठा समाज), कपिल भोसले (समन्वयक, मराठा समाज), प्रकाश बेळगोजी (समन्वयक, मराठा समाज) यांच्यासह मराठा समाजातील इतर अनेक प्रमुख नेत्यांचा पुढाकार आहे. सर्व समाजबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन “आपल्या बळीराजाला समाधानकारक पाऊस मिळावा, हवामान अनुकूल राहावे, शेती पिकांची उत्तम भरभराट होऊन सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी यावी, हीच या गाराण्यामागची मुख्य भावना आहे. यासाठी केवळ मराठा समाजच नव्हे, तर १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार सर्वच जाती-जमातींच्या प्रमुखांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”

वार आणि दिनांक: सोमवार, २९ जून

वेळ: सायंकाळी ठीक ७:०० वाजता

ठिकाण: श्री कपिलेश्वर तीर्थ मंदिर (दक्षिण काशी), बेळगाव.

निमंत्रक: सकल मराठा समाज, बेळगाव.

The post वरुणराजाच्या कृपेसाठी श्री कपिलेश्वरांना साकडे appeared first on News 24 Tass Marathi.

कपिलेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू
बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिराचे पावित्र्य आणि धार्मिक वातावरण कायम राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

नवीन नियमांनुसार पाश्चात्त्य किंवा अती तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. पुरुषांना हाफ पॅंट घालून प्रवेश करता येणार नसून महिलांनी गाऊन किंवा अती फॅन्सी आणि तोकडे कपडे घालून येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. साडी व्यतिरिक्त इतर पारंपरिक पोशाख परिधान करणाऱ्या महिलांसाठी दुपट्टा वापरणे आवश्यक करण्यात आले आहे.

या संदर्भातील सूचना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फलकाद्वारे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः सोमवारी तसेच महाशिवरात्रीसारख्या धार्मिक उत्सवांच्या काळात भाविकांची संख्या लक्षणीय वाढत असते.

मंदिर प्रशासनाच्या मते, काही भाविक पर्यटनस्थळांवरून परतताना किंवा इतर कारणांनी पाश्चात्त्य वेशभूषेत मंदिरात येत असल्याचे आढळून आले होते. तसेच काही जण मंदिर परिसरात धार्मिक स्थळांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांसाठी चित्रिकरण करत असल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर मंदिरातील शिस्त आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंदिराचे मुख्य पुजारी नागराज कट्टी यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था सुरू करण्यात आली असून, भाविकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाने धार्मिक स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन योग्य वेशभूषेत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

The post कपिलेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू appeared first on News 24 Tass Marathi.