investigation Archives | News 24 Tass Marathi

बैलहोंगल पोलिसांकडून अवघ्या २४ तासांत चोरीचा छडा
मुख्य आरोपीला अटक ; ५.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बैलहोंगल : बैलहोंगल तालुक्यातील चिवतगुंडी गावात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ५ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महांतेश बसप्पा बोगूर आणि त्यांचे कुटुंबीय शेतात कामासाठी गेले असताना त्याच गावातील प्रकाश रायप्पा मुल्ला (वय ४०) याने त्यांच्या घरात घुसून चोरी केली. आरोपीने घरातील सुमारे ५८ ग्रॅम वजनाचे अंदाजे ५.४९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ४८ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.

याप्रकरणी महांतेश बोगूर यांनी बैलहोंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद सी. यलिगार आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीचा माग काढत त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी बैलहोंगल पोलीस पथकाचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

The post बैलहोंगल पोलिसांकडून अवघ्या २४ तासांत चोरीचा छडा appeared first on News 24 Tass Marathi.

सराफी दुकानातील चोरीचा बनाव उघड
तक्रारदारच निघाला मुख्य आरोपी ; ६५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्वतःच दुकानातील दागिने व रोकड लपवून पोलिसांत खोटी तक्रार

बेळगाव : शहरातील रामदेव गल्ली येथील व्ही. पी. वेर्णेकर अँड सन्स या सराफी दुकानात झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या दुकान मालकानेच संपूर्ण कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, त्याच्याकडून तब्बल ६५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित सराफा व्यावसायिकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

टिळकवाडी येथील सावरकर रोडवरील रहिवासी आणि सराफा व्यावसायिक कृष्णानंद विश्वनाथ वेर्णेकर यांनी १७ जुलै रोजी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १६ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला होता.

तक्रारीनंतर खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय तक्रारदारावरच गेला.

त्यानंतर कृष्णानंद वेर्णेकर यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी स्वतःच दुकानातील सोने, चांदीचे दागिने आणि रोकड काढून ती आपल्या ॲक्टिव्हा स्कूटरच्या डिक्कीतून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

या कारवाईत पोलिसांनी ६२ लाख ६० हजार ९९० रुपये किमतीचे ५१९.८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ हजार रुपये किमतीचे ३१ ग्रॅम चांदीचे दागिने, २ लाख ८३ हजार ११० रुपयांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ४५ हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा स्कूटर असा एकूण ६५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासात तक्रारदारच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. तसेच, गुन्ह्याचा वेगाने छडा लावणाऱ्या खडेबाजार पोलीस पथकाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

The post सराफी दुकानातील चोरीचा बनाव उघड appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावच्या युनियन जिमखाना गोळीबार प्रकरणी पुणे येथून एकाला अटक
रमी क्लबमधील गोळीबाराचा तपास वेगात ; उर्वरित संशयितांचा शोध सुरू

बेळगाव : शहरातील युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असून, पुणे येथून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. रोहन असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध सुरू असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारचीही माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

मंगळवारी (१४ जुलै) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तालयापासून काही अंतरावर असलेल्या युनियन जिमखाना परिसरातील रमी क्लबमध्ये कारमधून आलेल्या काही बंदूकधारी तरुणांनी प्रवेश केला. त्यांनी क्लबमधील काही जणांना धमकावल्यानंतर हवेत गोळीबार केला. या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत एक जिवंत काडतूसही घटनास्थळी पडले होते. अचानक झालेल्या गोळीबारामुळे क्लबमधील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण बरमनी, कॅम्प पोलीस निरीक्षक आनंद वणकुद्रे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसेतज्ज्ञांच्या मदतीने पुरावे संकलित केले.

तपासादरम्यान गोळीबार करणारे संशयित मराठी भाषेत संवाद साधत असल्याची माहिती समोर आल्याने त्यांचा महाराष्ट्राशी संबंध असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यानुसार पुणे येथे कारवाई करून एका संशयिताला अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

The post बेळगावच्या युनियन जिमखाना गोळीबार प्रकरणी पुणे येथून एकाला अटक appeared first on News 24 Tass Marathi.