hindalga jail Archives | News 24 Tass Marathi

कारागृहातील पतीचे आधारकार्ड मिळवण्यासाठी महिलेची धावपळ
मुलीच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

बेळगाव : जातीधर्माच्या बंधनांना झुगारून प्रेमविवाह केलेल्या एका महिलेच्या आयुष्यातील संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. पहिल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी पती सध्या हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत असताना, दुसऱ्या मुलीच्या शाळा प्रवेशासाठी आणि एसआयआर नोंदणीसाठी आवश्यक असलेले पतीचे आधार कार्ड मिळविण्यासाठी ही आई गदग ते बेळगाव अशी वारंवार धावपळ करत आहे.

संपूर्ण समाजाचा विरोध पत्करून गदग येथील एका मुस्लिम महिलेने हिंदू तरुणाशी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या संसारात दोन मुलींचा जन्म झाला. मात्र, मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पहिल्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात तो सध्या बेळगावच्या हिंडलगा कारागृहात आहे.

दरम्यान, दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये वडिलांच्या आधार कार्डची गरज भासत आहे. त्यासाठी संबंधित महिला हिंडलगा कारागृहात वारंवार फेऱ्या मारत असली, तरी तिला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. गुन्हेगार पतीची साथ नव्हे, तर केवळ मुलीचे भविष्य घडविण्यासाठी त्याच्या आधार कार्डाची आवश्यकता असल्याचे तिने सांगितले.

या प्रकरणात कारागृह प्रशासनासह संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुलीच्या शिक्षणातील अडथळा दूर करावा, अशी मागणी होत आहे.

The post कारागृहातील पतीचे आधारकार्ड मिळवण्यासाठी महिलेची धावपळ appeared first on News 24 Tass Marathi.

‘शिवम असोसिएट्स’ प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावरला जामीन मंजूर
बेळगाव : राज्यभरात चर्चेत असलेल्या ‘शिवम असोसिएट्स’ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला असून, त्याची हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या विविध अटींचे पालन करण्याच्या अधीन राहून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी १५ मे रोजी शिवानंद नीलण्णावर याला आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. या प्रकरणाची सुनावणी बेंगळुरू येथील सिटी सिव्हिल आणि सत्र न्यायालयात झाली.

न्यायालयाने १२ जून रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करत काही कठोर अटी घातल्या आहेत. त्यानुसार, नीलण्णावर याने तीन लाख रुपयांचे हमीपत्र सादर करणे, देशाबाहेर न जाणे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच २७ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

जामीन मंजूर झाल्यानंतर शिवानंद नीलण्णावरची काल रात्री हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहाबाहेर उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी कोणतीही सविस्तर माहिती न देता केवळ “ओम नमः शिवाय” असा उल्लेख करून तेथून प्रस्थान केले.

दरम्यान, या प्रकरणातील तपास सुरू असून आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांचे दावे आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

The post ‘शिवम असोसिएट्स’ प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावरला जामीन मंजूर appeared first on News 24 Tass Marathi.

हिंडलगा कारागृहातील ‘मोबाईल’ प्रकरणांचा तपास तीव्र
पोलिसांचे विशेष पथक कार्यरत

बेळगाव : हिंडलगा कारागृहात मोबाईल फोनच्या अवैध वापराच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस सतर्क झाले असून या प्रकरणांचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

गेल्या दीड वर्षात तुरुंगात मोबाईल वापराशी संबंधित १२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणांचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस तांत्रिक पुरावे गोळा करत असून कारागृहातील बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे.

तपासादरम्यान कुख्यात आरोपी जयेश पुजारी याचे नाव समोर आले असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत त्याने तब्बल २८ मोबाईल फोन वापरल्याचे उघड झाले आहे. तसेच त्याचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, तुरुंगातूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे या तपासाला आणखी एक वळण लागले आहे. एनआयएकडून मिळालेल्या माहितीनुसार तुरुंग प्रशासनाने तक्रार दाखल केली असून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

कारागृहातील बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असून पुढील तपास सुरू आहे.

The post हिंडलगा कारागृहातील ‘मोबाईल’ प्रकरणांचा तपास तीव्र appeared first on News 24 Tass Marathi.

एडीजीपी आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली हिंडलगा कारागृहावर अचानक धाड
गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी तपासणी

श्वान पथकांचा सहभाग ; कर्मचाऱ्यांना इशारा

बेळगाव : हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

हिंडलगा कारागृहात वाढत चाललेल्या अवैध प्रकारांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने ही मोठी कारवाई हाती घेतली. आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५२ पोलीस कर्मचाऱ्यांसह बेळगाव शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी या धाडीत सहभागी झाले होते.

या कारवाईदरम्यान कारागृहात सखोल तपासणी करण्यात आली. सुमारे दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या सर्च ऑपरेशनमध्ये कैद्यांच्या सेलची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन श्वान पथकांचीही मदत घेण्यात आली. तपासणीदरम्यान एक सिगारेट पाकीट तसेच जिमसाठी वापरले जाणारे डंबेल्स आढळून आले.

धाडीदरम्यान आढळलेल्या काही त्रुटींवरून आलोक कुमार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा न घातल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर किरकोळ शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या काही वर्षांपासून हिंडलगा कारागृहात धमकीचे फोन, गुटखा व अमली पदार्थांचा वापर, तसेच मोबाईलचा गैरवापर यांसारख्या गंभीर तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर ही धाड टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कारागृहातील शिस्त प्रस्थापित करून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

The post एडीजीपी आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली हिंडलगा कारागृहावर अचानक धाड appeared first on News 24 Tass Marathi.

हिंडलगा कारागृहात पुन्हा सापडले दोन मोबाईल आणि सीमकार्ड
बेळगाव / प्रतिनिधी

हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृह परिसरात पुन्हा मोबाईल फोन आणि सीमकार्ड आढळून आल्याने कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली आहे. कारागृहातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी दरम्यान दोन मोबाईल फोन आणि एक सीमकार्ड सापडले असून याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

अलीकडेच कारागृह प्रशासनाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी कारागृहाला भेट देत गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. १० रोजी सकाळी कारागृह प्रशासनाने सर्कल क्रमांक दोनमधील बराक क्रमांक चार येथे तपासणी मोहीम राबवली.

यावेळी शौचालयाच्या खिडकीत एक सीमकार्ड आणि कीपॅड मोबाईल आढळून आला. तसेच भिंतीत लपवून ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत आणखी एक मोबाईल फोन सापडला. संबंधित मोबाईल आणि सीमकार्ड अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत.

या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या वतीने जेलर रमेश कांबळे यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

The post हिंडलगा कारागृहात पुन्हा सापडले दोन मोबाईल आणि सीमकार्ड appeared first on News 24 Tass Marathi.

अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची हिंडलगा कारागृहाला अचानक भेट
सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील ऐतिहासिक हिंडलगा मध्यवर्ती कारागृह येथे कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे राज्य पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी मंगळवारी अचानक भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आढावा घेतला. या अनपेक्षित पाहणीमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली.

कारागृहाच्या अंतर्गत तसेच बाह्य सुरक्षेची त्यांनी बारकाईने तपासणी केली. कैद्यांवरील देखरेख, कर्मचारी वर्गाची कामकाज पद्धती आणि शिस्त याबाबत त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

तपासणीदरम्यान तांत्रिक सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला. कारागृहात ५जी जॅमर यंत्रणा बसवूनही काही भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत असल्याच्या तक्रारींची त्यांनी गंभीर दखल घेतली. तसेच कारागृहाच्या भिंतीबाहेरून मोबाईल फोन व अंमली पदार्थ आत फेकले जात असल्याच्या आरोपांवरही चर्चा झाली. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचे बजावत निगराणी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे आदेश त्यांनी दिले. या बैठकीस उत्तर विभागाचे आयजीपी टी. पी. शेषा, आयजीपी चेतन सिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, एसपी के. रामराजन तसेच कारागृह अधीक्षक कृष्णमूर्ती आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची हिंडलगा कारागृहाला अचानक भेट appeared first on News 24 Tass Marathi.

हिंडलगा तुरुंगात मोबाईल फेकल्याचा व्हिडिओ जुना
महिनाभरापूर्वीच गुन्हा दाखल : डीआयजी टी.पी. शेष यांचे स्पष्टीकरण

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये सध्या चर्चेत असलेल्या हिंडलगा कारागृहातील सीसीटीव्ही व्हिडिओबाबत उत्तर कारागृह विभागाचे डीआयजी टी.पी. शेष यांनी खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फुटेज सुमारे महिनाभर जुने असून, त्या घटनेप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना डीआयजी शेष म्हणाले की, या घटनेचा तपास सध्या बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाकडून सुरू आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनाच प्राप्त झाले असून, तपास पूर्ण करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले आहेत.

या प्रकरणात काही सीआयएसएफ कर्मचाऱ्यांचे वर्तन प्राथमिकदृष्ट्या निष्काळजीपणाचे असल्याचेही निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. महासंचालकांच्या सूचनेनुसार, पुढील दिवशी कारागृहात तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान १२ मोबाईल फोन, एक चार्जर तसेच चार सीमकार्ड जप्त करण्यात आले. उत्तर विभागातील विविध कारागृहांमध्ये आतापर्यंत एकूण ३४ मोबाईल फोन आढळून आल्याची माहिती डीआयजी शेष यांनी दिली.

The post हिंडलगा तुरुंगात मोबाईल फेकल्याचा व्हिडिओ जुना appeared first on News 24 Tass Marathi.

हिंडलगा कारागृह परिसरात मोबाईल – अंमली पदार्थ फेकल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
पोलिस आयुक्त भूषण बोरसे

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील हिंडलगा कारागृहाबाहेरून मोबाईल फोन आणि अंमली पदार्थ फेकल्याचा आरोप प्रसारमाध्यमांतून झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

गुरुवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओतील तारीख व वेळेची खातरजमा सुरू आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या कॅमेऱ्यातून आणि कोणत्या दिवशी चित्रीत करण्यात आला, याची स्पष्टता आल्यानंतर सविस्तर तपास केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या केआयएसएफचे कर्मचारी कारागृहाच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत. व्हिडिओचे बारकाईने परीक्षण झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

याशिवाय कारागृह परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येणार असून, ग्रामीण पोलिस तसेच केआयएसएफ कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली जाईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आयुक्त बोरसे यांनी स्पष्ट केले.

The post हिंडलगा कारागृह परिसरात मोबाईल – अंमली पदार्थ फेकल्याप्रकरणी चौकशीचे आदेश appeared first on News 24 Tass Marathi.

हिंडलगा कारागृहाच्या परिसरात अज्ञातांकडून ड्रग्ज व मोबाईल फेकण्याचा प्रकार उघड
बेळगाव / प्रतिनिधी

नववर्षाच्या उत्सवाच्या काळात हिंडलगा कारागृहाच्या परिसरात अज्ञात व्यक्तींनी ड्रग्ज तसेच मोबाईल फोन फेकल्याची घटना समोर आली असून, हा प्रकार कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद झाला आहे. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेल्या काही जणांनी कारागृहाच्या आवारात संशयास्पद वस्तू फेकून पळ काढल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे कारागृहातील कैद्यांपर्यंत ड्रग्ज व मोबाईल फोन पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकरणाची दखल घेत पोलिस आयुक्त भूषण भोरसे यांनी हिंडलगा कारागृहाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कारागृह प्रशासन व कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

पहाटेच्या सुमारास कारागृह परिसरात आलेल्या एका अज्ञात गुन्हेगाराने ड्रग्ज व मोबाईल फोन फेकून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये नोंद झाल्याने तपासाला गती मिळाली आहे. कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

The post हिंडलगा कारागृहाच्या परिसरात अज्ञातांकडून ड्रग्ज व मोबाईल फेकण्याचा प्रकार उघड appeared first on News 24 Tass Marathi.