hescom Archives | News 24 Tass Marathi

हेस्कॉम ग्राहक तक्रार निवारण बैठकीत बिल आणि मीटर समस्यांवर जागेवर तोडगा
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरी उपविभाग ३ मध्ये सोमवारी वीज ग्राहकांसाठी तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली. सहायक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत जनतेला भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर सविस्तर तोडगा काढण्यात आला.

बैठकीचे आयोजन शहरी उपविभाग ३ च्या कार्यालयात सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले. या बैठकीला शहर सेवक दिनेश नशीपुडी, निवृत्त न्यायाधीश ओडियर, माजी नगरसेवक रसुल मुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्राहकांनी प्रामुख्याने वीज मीटरमधील त्रुटी, बिलाच्या समस्या आणि सायबर फसवणुकीशी संबंधित तक्रारी मांडल्या. तसेच ॲड. पाटील यांनी सह्याद्री नगर टॉवर संदर्भातील मुद्द्यावर चर्चा केली.

बैठकीत उपस्थित महसूल अधिकाऱ्यांनी आणि कनिष्ठ अभियंत्यांनी ग्राहकांच्या प्रश्नांची तांत्रिक उत्तरे दिली. अनेक समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या, तसेच अश्विन शिंदे यांनी अधिकाऱ्यांना प्रलंबित काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सायबर फसवणूकबाबत आलेल्या तक्रारींचीही बैठकीत गांभीर्याने दखल घेतली गेली.

व्यावसायिक भंडारी, ॲड. चव्हाण आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर इस्माईल बाबू यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.

The post हेस्कॉम ग्राहक तक्रार निवारण बैठकीत बिल आणि मीटर समस्यांवर जागेवर तोडगा appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी दर्पणतर्फे हेस्कॉम कर्मचाऱ्यांसाठी मोफत हृदय तपासणी शिबिर
शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार लाभ

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हेस्कॉम कर्मचाऱ्यांसाठी १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सेंट्राकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडत आहे.

हृदयतज्ज्ञ डॉ. एस. आर. पटेल (MBBS, MD, DM – Cardiologist) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात हृदय सल्लामसलत, ईसीजी तसेच रँडम ब्लड शुगर (RBS) तपासणी करण्यात आली. प्रतिबंधात्मक हृदय आरोग्य आणि आजारांचे लवकर निदान यावर विशेष भर देण्यात आला.

शिबिराच्या पहिल्याच दिवशी ३५ हेस्कॉम कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. पाच दिवसांत १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, कार्यस्थळावरील आरोग्य संवर्धनासाठी रोटरीची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

हा उपक्रम क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन अॅड. विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि सचिव रोटेरियन कावेरी करूर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयन रोटेरियन डॉ. श्रीदेवी रेवण्णवर यांनी केले, तर समुदाय सेवा संचालक रोटेरियन सविता वेस्ने यांनी सक्रिय सहकार्य दिले. सहाय्यक राज्यपाल रोटेरियन उदय जोशी यांच्या प्रेरणा व पाठिंब्याबद्दल क्लबने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले.

हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या सहभागासाठी सहकार्य केल्याबद्दल कार्यकारी अभियंता श्री. विनोद करूर आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. जगदीश मोहिटे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. शिबिराच्या यशासाठी परिश्रम घेतलेल्या डॉ. नीता देशपांडे, डॉ. हिमगौरी देशपांडे, सीओओ श्री. विनायक ताम्हणकर, पीआरओ तसेच रुग्णालयातील वैद्यकीय व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचेही मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी बोलताना क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन अॅड. विजयलक्ष्मी मन्निकेरी यांनी सांगितले की, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा ही काळाची गरज असून, या हृदय तपासणी उपक्रमाद्वारे जागरूकता निर्माण करणे, लवकर निदानास प्रोत्साहन देणे आणि हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण आरोग्यास हातभार लावणे हा क्लबचा मुख्य उद्देश आहे. रोटरी संस्था समाजहिताच्या कार्यात सदैव कटिबद्ध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

The post रोटरी दर्पणतर्फे हेस्कॉम कर्मचाऱ्यांसाठी मोफत हृदय तपासणी शिबिर appeared first on News 24 Tass Marathi.

बिजगर्णी प्राथमिक शाळेला निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे यांच्याकडून कपाट भेट
बिजगर्णी : येथील निवृत्त शिक्षक गुरुवर्य एस. आर. मोरे यांनी आपल्या मूळ गावातील प्राथमिक शाळेला सुमारे २२ हजार रुपये किमतीचे कपाट भेट देत शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. साठ वर्षांपूर्वी याच शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते.

शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी कपाटाची गरज असल्याचे मुख्याध्यापक पी. के. पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर या उपक्रमाची पूर्तता झाली. शाळा हे ज्ञानाचे केंद्र असून आपल्याला घडवणाऱ्या संस्थेचे ऋण विसरू नये, या भावनेतून मोरे यांनी हा आदर्श उपक्रम राबवला.

या निमित्ताने शाळेत सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीसी कमिटीचे अध्यक्ष भाऊराव जाधव होते. विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी शाळेतील संस्कार हे आयुष्यभर उपयोगी पडतात, असे मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर ग्रामपंचायत उपाध्यक्ष महेश पाटील, संतोष कांबळे, पुंडलिक जाधव मनोहर बेळगावकर,निंगापा जाधव, बबलू नावगेकर, दयानंद यळूरकर, संतोष दरेकर, सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. के. पाटील, आभार ॲड. नामदेव मोरे यांनी मानले. सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post बिजगर्णी प्राथमिक शाळेला निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे यांच्याकडून कपाट भेट appeared first on News 24 Tass Marathi.

हेस्कॉमच्या नूतन कार्यालयामुळे नागरिकांना जलद सेवा मिळणार
पालकमंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव / प्रतिनिधी

नेहरुनगर, बेळगाव येथे हेस्कॉमच्या नूतन अर्बन डिव्हिजन कार्यालयाचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते झाले. या नवीन कार्यालयामुळे शहरातील वीज विभाग अधिक सक्षम होणार असून नागरिकांना कामे जलद गतीने व सुलभतेने करता येणार आहेत.

यावेळी बोलताना पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले की, “नवीन कार्यालय अत्याधुनिक सुविधा असलेले असून कोणतेही काम रखडणार नाही, याची काळजी अधिकार्‍यांनी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी. नागरिकांना दर्जेदार व जलद सेवा देण्यावर भर द्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ होते. व्यासपीठावर वायव्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, एच. एम. रेवण्णा, विनय नावलगट्टी, विभागीय मुख्य अभियंता प्रवीणकुमार चिकार्डे, शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांनी मार्गदर्शन करताना नवीन कार्यालयामुळे हेस्कॉमच्या कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post हेस्कॉमच्या नूतन कार्यालयामुळे नागरिकांना जलद सेवा मिळणार appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव दक्षिण भागासह तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव / प्रतिनिधी

वीज विभागाच्या नियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे बेळगाव दक्षिण विभागासह बेळगाव तालुक्यात उद्या (रविवार, दि. १६) सकाळी १० ते सायं. ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

हेस्कॉमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्य लाईनचे बळकटीकरण, दुरुस्त्या, ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स, झाडांच्या फांद्या कापणे, उपकरणांची तपासणी या कारणास्तव वीजपुरवठा ठप्प करण्यात येणार आहे.

वीजपुरवठा खालील परिसरात बंद राहणार :

राणी चन्नमानगर पहिला व दुसरा क्रॉस, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे फाटक, उद्यमबाग औद्योगिक वसाहत, अनगोळ परिसर, यरमाळ क्रॉस, गुरुप्रसादनगर, कावेरी कॉलनी, आरसीनगर दुसरा स्टॉप, पार्वती नगर, भवानीनगर, राजीव गांधीनगर, नित्यानंद कॉलनी, जैतनमाळ, संपूर्ण अनगोळ, चिदंबरनगर, मृत्युंजय नगर, खानापूर रोड, दुसरे रेल्वे फाटक, संपूर्ण टिळकवाडी, संत रोहिदासनगर, मजगाव, कल्लेश्वरनगर, ब्रम्हनगर, संत ज्ञानेश्वर नगर, विष्णू गल्ली, धामणे रोड, कल्लेश्वर रोड, देवांगनगर पहिला व दुसरा क्रॉस, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याण नगर, वड्डर छावणी, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, हिंदवाडी कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, भाग्यनगर, आनंदवाडी परिसर, वडगाव मेन रोड, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, संभाजीनगर, केशव नगर, येळ्ळूर केएलई, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर, घुमटमाळ, नाथपैसर्कल,जेल शाळा, गोमटेश शाळा परिसरात रविवारी दिवसभर वीजपुरवठा ठप्प होणार आहे.

बेळगाव तालुक्यात बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकोप्प, कुद्रेमानी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत, उचगाव, बसुर्ते, बेक्किनकेरी. सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी कॉलेज, गणेशपुर, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी लेआऊट, हिंडलगा पंप हाऊस, गणेशपूर, हिंडलगा, मण्णूर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, डिफेन्स कॉलनी, क्रांतीनगर, शिवमनगर, गोजगा आणि आंबेवाडी, अवचारट्टी, यरमाळ रोड, येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदीहळ्ळी, कोंडूसकोप्प या गावातही रविवारी दिवसभर वीज नसेल. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

The post बेळगाव दक्षिण भागासह तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित appeared first on News 24 Tass Marathi.

सीमोल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमला महामंडळाच्यावतीने निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी

गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी “सीमोल्लंघन’ कार्यक्रमासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमचे बेळगाव शहर कार्यकारी अभियंता श्री. मनोहर सुतार यांची नेहरूनगर कार्यालयात भेट घेतली व येणाऱ्या दसरा उत्सवासंदर्भात चर्चा करण्यात आली.

सर्वप्रथम नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान हेस्कॉम अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या पध्दतीने नियोजन करून कुठेही अडथळा न करता सुरळीत उत्सव पार पडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ विजयादशमी दिवशी सायंकाळी ४ वाजता शेकडो वर्षाचा इतिहास असलेला बेळगावचा ऐतिहासिक दसरा सीमोल्लंघन मैदानात (मराठी विद्यानिकेतन मैदान) पार पडतो. बेळगावातील विविध देवस्थानाच्या शासनकाठी व पालख्या या दिवशी विजयादशमीचा दिवस संपन्न करण्यासाठी एकत्र मैदानात जमतात. मागील काही वर्षापासून श्री. रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा उत्सव शिस्तबद्ध नियोजन करण्यात आला. काही वर्षांपासून दसरा उत्सवात सुद्धा हेस्कॉम विभाग सतर्क राहून सर्व रीतीने तयारी करून सहकार्य करतात. मागील काही तीन-चार वर्षापासून कुठेही अनुचित घटना घडल्या नाहीत. यंदाच्या वर्षी सुद्धा असेच सहकार्य करण्यासाठी आणि अजून काही अडथळे असतील ते मोकळे करण्यासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी दसरा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, मल्लेश चौगुले, विविध देवस्थानाचे पदाधिकारी लक्ष्मण किल्लेकर, मुर्गेश अंगडी, परिश्रम किल्लेकर, श्रीनाथ पवार, बळवंत, ज्योतिबा धामणेकर, मनोज काकतकर उपस्थित होते.

The post सीमोल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमला महामंडळाच्यावतीने निवेदन appeared first on News 24 Tass Marathi.

गणेशोत्सव काळात सुरळीत वीजपुरवठा करा
अधिकारी – पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महामंडळाची हेस्कॉमकडे मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशमूर्तीची ने-आण करताना तसेच मंडप घालताना वीजवाहिन्यांमुळे अडथळे येतात. त्यामुळे हेस्कॉमने शहरातील मंडळांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्या त्या ठिकाणी वीजवाहिन्यांची उंची वाढवावी. तसेच वाहतुकीस अडथळे ठरत असलेले वीजखांब हटवावेत, अशी मागणी बुधवारी झालेल्या हेस्कॉम अधिकारी व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली.

बुधवारी रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये समस्या मांडल्या. मुख्य मार्गांवर लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे गणेशमूर्ती ने – आण करताना मंडळांना अडचणी येत आहेत. बऱ्याच वेळा विजेचा धक्का लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विसर्जन मार्गावरील वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे म्हणाले, गणेशमूर्तींना अडथळे ठरत असलेल्या वीजवाहिन्यांची उंची वाढविण्यात आली आहे. मंडळांच्या सोयीसाठी एक खिडकी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे मंडळांनी लवकर वीजपुरवठा घ्यावा. जेणेकरून शेवटच्या वेळी अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी धोकादायक वीजवाहिन्या अथवा खांब आहेत, त्यांनी तात्काळ हेस्कॉम कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेबाबतची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. बैठकीला हेस्कॉमच्या साहाय्यक कार्यकारी अभियंता जयश्री बजंत्री यांच्यासमवेत मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे महादेव पाटील, विकास कलघटगी , आनंद आपटेकर, सतीश गौरगोंडा, सागर पाटील, विराज मुरकुंबी, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, राजकुमार खटावकर, गिरीश धोंगडी , हेमंत हावळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

The post गणेशोत्सव काळात सुरळीत वीजपुरवठा करा appeared first on News 24 Tass Marathi.

गणेशोत्सव मार्गावरील विद्युत खांब बदला
लोकमान्य टिळक महामंडळाचे हेस्कॉमला निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

श्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ११ जुलै रोजी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सव आगमन सोहळा व विसर्जन मिरवणुक मार्गावरील कमी उंचीचे विद्युत खांब बदलून त्या जागी जास्त उंची असलेले विद्युत खांब उभारण्याची मागणी करण्यात आली.

गणेश मूर्तींची उंची जास्त असल्याने गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये विद्युत तारांचा अडथळा निर्माण होत होता. त्यासाठी मागील वर्षी श्री गणेशोत्सव महामंडळाने मागणी केल्याप्रमाणे, जास्त उंची असलेले विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. परंतु उर्वरित भागांमध्ये व इतर ठिकाणी अजून विद्युत खांब बदलण्यात आले नाहीत. त्यामुळे, गणेशोत्सव मिरवणुकीला विद्युत तारांचा अडथळा निर्माण होत आहे. त्यासाठी, गणेश उत्सवापूर्वी सदर विद्युत खांब बदलण्यात यावेत व त्या जागी जास्त उंची असलेले खांब बसविण्यात यावेत, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

निवेदनाचा स्वीकारून मनोहर सुतार यांनी बेळगाव शहर व उपनगरातील मिरवणुक मार्गाबद्दल उपस्थित असलेल्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व गणेशोत्सवापूर्वी मिरवणुक मार्गावरील विद्युत खांब बदलण्याची ग्वाही दिली.

महामंडळाचे नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या कमी उंचीच्या विद्युत खांबांमुळे, मोठ्या मूर्ती किंवा देखावे ने-आण करताना अडचणी येतात. त्यामुळे, उंच खांब बसवण्याची मागणी केली मिरवणुकीच्या मार्गावर तात्पुरत्या वीज जोडणीची मागणी, किंवा इतर आवश्यक सोयींसाठी महामंडळ कटिबद्ध आहे असे अधिकाऱ्यांना सांगितले.

विजय जाधव यांनी गणेशोत्सव काळात आवश्यक असलेल्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी परवानगी मिळवण्यासाठी, कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याची महामंडळाच्या निवेदनाची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी असे सांगितले. यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक मनपा माजी गटनेते गिरीश धोंगडी, हेमंत हावळ, सुनिल जाधव, प्रवीण पाटील, गजानन हांगिरगेकर, सौरभ सावंत,आदित्य पाटील, अरुण पाटील, आदी उपस्थित होते.

The post गणेशोत्सव मार्गावरील विद्युत खांब बदला appeared first on News 24 Tass Marathi.