ganesh visarjan Archives | News 24 Tass Marathi

यंदाच्या अनुभवातून पुढील वर्षाच्या गणेशोत्सवाचे नियोजन
मंडळांची वाढलेली संख्या, उंच मूर्ती आणि रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे विसर्जनाला विलंब

पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची माहिती

बेळगाव : श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनासह महानगरपालिका आणि हेस्कॉमने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान आलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे पुढील वर्षाच्या गणेशोत्सवाचे नियोजन केले जाईल, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली.

रविवारी दुपारी श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना निकम म्हणाले की, यंदा गणेश मंडळांची संख्या वाढण्यासोबतच गणेशमूर्तींची उंचीही वाढली. तसेच रस्त्यांवरील विविध अडथळ्यांमुळे मिरवणुकीला विलंब झाला. यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल ४१ तास चालली. मिरवणूक शांततेत पार पाडणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते.

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी बाहेरील जिल्ह्यांतूनही पोलीस कुमक मागविण्यात आली होती. विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सलग ४८ तास रात्रंदिवस कर्तव्य बजावले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करावे लागेल, असे निकम यांनी सांगितले.

यंदाच्या मिरवणुकीतील सकारात्मक बाबींवरही त्यांनी भाष्य केले. मिरवणुकीत लेझर आणि प्लाझ्मा लाईटचा वापर झाला नाही. तसेच डीजे साऊंडचे प्रमाणही सुमारे ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाले. डीजे आणि प्लाझ्मा लाईटच्या वापराबाबत गणेश मंडळांना विविध बैठकांमधून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम यंदाच्या उत्सवात दिसून आला.

यंदाच्या उत्सवातील अनुभव आणि अडचणींचा अभ्यास करून पुढील वर्षी अधिक चांगले नियोजन केले जाईल. तसेच मिरवणूक अधिक सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले.

The post यंदाच्या अनुभवातून पुढील वर्षाच्या गणेशोत्सवाचे नियोजन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन सोहळ्याची ४२ तासांनी सांगता
बेळगाव : बेळगाव शहरातील यंदाचा गणेश विसर्जन सोहळा तब्बल ४२ तास अखंडपणे सुरू राहिला. कपिलेश्वर तलाव आणि जक्कीन होंड परिसरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्याने बेळगावच्या गणेशोत्सवाची भव्यता पुन्हा एकदा अधोरेखित केली. रात्रंदिवस सुरू असलेल्या मिरवणुकीत भक्ती, उत्साह आणि पारंपरिक जल्लोषाचा अनुभव भाविकांनी घेतला.

चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बेळगावचा राजा’ गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भक्तिगीते, ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी विशेष आरती व पूजा करून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

माळी गल्ली मंडळाच्या गणेश मूर्तीचे पहिले विसर्जन करून मिरवणुकीला अधिकृत सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात गणेश मूर्तीची महाआरती करण्यात आली.

भव्य गणेशमूर्ती, मोठ्या संख्येने सहभागी झालेली मंडळे आणि अंतिम मिरवणुकीचा प्रचंड आकार यामुळे विसर्जन प्रक्रियेला वेळ लागला. आगामी काळात मूर्तींची उंची आणि विसर्जनाची वेळ याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून यापूर्वीच देण्यात आले आहेत.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारो भाविकांच्या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रात्रंदिवस कर्तव्य बजावले. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव पार पडल्याबद्दल पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

महापालिकेच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाने ऐतिहासिक मिरवणुकीची सांगता

गेल्या ४२ तासांपासून सुरू असलेल्या गणेश विसर्जन सोहळ्याची सांगता बेळगाव महापालिकेने स्थापन केलेल्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली. विसर्जनापूर्वी महापालिकेच्या गणेशमूर्तीची महाआरती करण्यात आली. यावेळी उपमहापौर हनुमंत कोंगळी, महापालिका आयुक्त कार्तिक एम., अभियंता लक्ष्मी निपाणीकर, पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

महाआरतीनंतर डोल-ताशांच्या गजरात परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपमहापौर हनुमंत कोंगळी, आयुक्त कार्तिक एम. आणि अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही डोल-ताशांच्या तालावर सहभागी होत उत्सवाचा आनंद व्यक्त केला.

कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत महापालिकेच्या गणेशमूर्तीचे कपिलेश्वर तलावात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भाविकांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. ४२ तासांच्या या विसर्जन सोहळ्याची सांगता होत असताना भक्तांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची आतुरता दिसून आली.

The post बेळगावच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन सोहळ्याची ४२ तासांनी सांगता appeared first on News 24 Tass Marathi.

मच्छे येथे गणेश विसर्जनावेळी युवकाचा बुडून मृत्यू
विसर्जनासाठी पाण्यात उतरला असता दुर्घटना

बेळगाव : शहरालगतच्या मच्छे गावात गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. विश्वनाथ नाईक असे मृत युवकाचे नाव आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेला विश्वनाथ नाईक विसर्जनावेळी पाण्यात उतरला होता. यावेळी तो पाण्यात बुडाला. उपस्थितांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. मात्र, या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे मच्छे गावासह परिसरात शोककळा पसरली असून, गणेश विसर्जनाच्या उत्साहावर या दुर्दैवी घटनेने विरजण पडले.

The post मच्छे येथे गणेश विसर्जनावेळी युवकाचा बुडून मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

मराठा लाईट इन्फंट्रीच्या गणेशाचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन
बेळगाव : द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या गणेशमूर्तीचा अर्गन तलाव येथे पारंपरिक पद्धतीने विसर्जन सोहळा धार्मिक, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

मिलिटरी महादेव मंदिरापासून अर्गन तलावापर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पारंपरिक लेझीम आणि झांज-पथक सहभागी झाले होते. उत्साहपूर्ण मराठी लोकनृत्यांमुळे मिरवणुकीतील वातावरण भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण झाले. तालबद्ध वाद्यांच्या गजरात जवान आणि नागरिकांनी मराठी संस्कृती व परंपरेचा आविष्कार घडविला.

द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली विसर्जन सोहळा पार पडला. मिरवणुकीत अधिकारी, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ), जवान, अग्निवीर, नागरी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The post मराठा लाईट इन्फंट्रीच्या गणेशाचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावातील सार्वजनिक श्रीमूर्ती विसर्जनाला प्रारंभ
माळी गल्लीतील ‘बेळगावचा लंबोदर’ गणेशमूर्तीचे सर्वप्रथम विसर्जन

बेळगाव : माळी गल्ली येथील एसएसजीयू मंडळाच्या ‘बेळगावचा लंबोदर’ सार्वजनिक गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक गुरुवारी दुपारी ३ वाजता उत्साहात काढण्यात आली. पारंपरिक व भक्तिमय वातावरणात मिरवणूक मार्गक्रमण करत दुपारी ३.३० वाजता नवीन कपिलतीर्थ तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

विसर्जनापूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री गंगा पूजन केले. त्यानंतर गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. माळी गल्ली येथील एसएसजीयू मंडळाची ‘बेळगावचा लंबोदर’ ही सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जित होणारी पहिली मूर्ती ठरली.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.

The post बेळगावातील सार्वजनिक श्रीमूर्ती विसर्जनाला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

गणेश विसर्जनासाठी बेळगाव शहरातील वाहतूक मार्गांत मोठे बदल
२५ सप्टेंबरला दुपारी २ पासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक बदल लागू

अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी

नागरिकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

बेळगाव : अनंत चतुर्दशीनिमित्त शहरात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बेळगाव वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गांत मोठे बदल केले आहेत. २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.

विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग चन्नम्मा सर्कल, कॉलेज रस्ता, पिंपळ कट्टा, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, एन. डी. सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल आणि कपिलेश्वर रोडमार्गे कपिलेश्वर तलाव असा निश्चित करण्यात आला आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध मार्गांवरील वाहने पर्यायी रस्त्यांवर वळविण्यात आली आहेत. खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी संगोळी रायन्ना चौक, एसपी ऑफिस रोड, कृष्णदेवराय चौक, सदाशिवनगर, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्या नगर, बाजी प्रभू मार्ग, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शर्कत पार्क, सिंझो बंगला, सेंट पॉल्स हायस्कूल आणि मिलिटरी महादेव मंदिर क्रॉसमार्गे खानापूर रस्त्याला जोडणारा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

गोगटे सर्कल रेल्वे ओव्हरब्रिजमार्गे शहरात येणाऱ्या वाहनांनी गोगटे सर्कलवरून डावीकडे वळून काँग्रेस रोड, मिलिटरी महादेव मंदिर, सेंट पॉल्स हायस्कूल, सिंझो बंगला, शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शौर्य चौक, हिंडलगा गणेश मंदिर आणि हनुमाननगर डबल रोडमार्गे बॉक्साईट रोडचा वापर करावा.

गोगटे सर्कलवरून रेल्वे स्टेशन, हेड पोस्ट ऑफिस आणि जुन्या पीबी रोडकडे जाणारी वाहने गोवावेस, नाथाजीनगर सर्कल, खासबाग बसवेश्वर सर्कल आणि संभाजी गल्लीमार्गे वळविण्यात आली आहेत. नाथ पै सर्कलहून बँक ऑफ इंडिया आणि एसपीएम रोडकडे जाणाऱ्या वाहनांनी खासबाग बसवेश्वर सर्कल व संभाजी गल्लीमार्गे जावे.

जीजामाता सर्कलहून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक आणि पाटील गल्लीकडे जाणाऱ्या वाहनांनी मध्यवर्ती बसस्थानक किंवा व्हॉटसन शोरूममार्गे जुन्या पीबी रोडचा वापर करावा. जुन्या पीबी रोडवरून व्हीआरएल लॉजिस्टिक्स व भातकांडे स्कूलकडे जाणारी वाहने संभाजी गल्ली, बसवेश्वर चौक, खासबाग आणि नाथाजीनगरमार्गे वळविण्यात आली आहेत.

जुन्या पीबी रोडवरून यश रुग्णालय व कपिलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनी यश रुग्णालयाजवळ डावीकडे वळून व्हीआरएल लॉजिस्टिक्समार्गे जुन्या पीबी रोडला जोडावे. गुड्स शेड रोडवरून कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहनांनी एसपीएम रोड, मराठा मंदिर आणि गोवावेस सर्कलमार्गे प्रवास करावा. विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

नो-पार्किंग व्यवस्था

२५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून काकतीवेस रोड, गणपती गल्ली, चन्नम्मा सर्कल ते मिरवणूक मार्ग, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल तसेच कपिलेश्वर मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर वाहन पार्किंगला बंदी राहणार आहे.

नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था

देशपांडे वाडा ते गांधी सर्कलदरम्यानचा वेंगुर्ला रस्ता, डेअरी फार्मची जागा (सेंट झेव्हियर्स स्कूलजवळ), महिला पोलीस ठाण्यामागील मोकळी जागा, सरदार मैदान, न्यायालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, भरतेश शिक्षण संस्थेसमोरील कॅन्टोन्मेंट पार्किंगची जागा, संभाजी उद्यान तसेच जुन्या भाजी मार्केटजवळील मुजावर कोर्ट परिसरात नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिक आणि वाहनधारकांनी वाहतूक व्यवस्थेतील या बदलांची नोंद घेऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post गणेश विसर्जनासाठी बेळगाव शहरातील वाहतूक मार्गांत मोठे बदल appeared first on News 24 Tass Marathi.

गणेश विसर्जन काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा
एडीजीपी आर. हितेंद्र यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना

सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश

बेळगाव : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) आर. हितेंद्र, आयपीएस यांनी गुरुवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विसर्जन कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर योग्य सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बाबींचा आढावा घेत विसर्जनाचा कार्यक्रम सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम, उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकित गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरील सुरक्षा आराखड्याचा आढावा घेण्यात आला.

The post गणेश विसर्जन काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा appeared first on News 24 Tass Marathi.

गणेश विसर्जन तयारीची महापौर – उपमहापौर, आयुक्तांकडून पाहणी
बेळगाव : गणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन तलाव आणि मिरवणूक मार्गावर महानगरपालिका आणि विविध विभागांकडून सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील तयारीची पाहणी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाळी आणि पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह भेट देऊन केली.

कपिलेश्वर मंदिर परिसरातील जुना आणि नवा तलाव, जक्केरीहोंड, किल्ला तलावासह पालिका हद्दीतील विविध ठिकाणी असलेल्या विसर्जन तलावांना भेट देऊन स्वच्छता, सोयी-सुविधा आणि सुरक्षा उपायांची पाहणी केली.तसेच मिरवणूक जाणाऱ्या मार्गांनाही भेट देऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली.

पाहणीनंतर महापौर प्रीती कामकर यांनी, गेल्या काही दिवसांपासून कामे सुरू असून अंतिम टप्प्यातील तयारी लवकर पूर्ण करून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने विसर्जनाचे काम होण्यासाठी अनुकूलता निर्माण करावी, अशा सूचना तेथे उपस्थित पालिका आणि एल अँड टी सह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

उपमहापौर हणमंत कोंगाळी यांनी, यापूर्वीच अनेक वेळा बैठका घेऊन विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही कामे शिल्लक असतील तर लक्ष देऊन वेळेत तयारी करावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली.

पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी, तलाव परिसरात क्रेन, मंडप, ध्वनिक्षेपक, पिण्याचे पाणी यासह विविध तयारी करून, पोलीस, जीव रक्षक पथकासह विविध विभागांशी समन्वय साधावा, अशी सूचना केली.

गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि शुक्रवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी पोलीस आणि इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना शांतता, संयम आणि शिस्तीने सहकार्य करून मिरवणूक यशस्वी करावी, असे आवाहन महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी केले आहे. स्थायी समिती अध्यक्ष राजू भातकांडे, नितीन जाधव आणि इतर नगरसेवक, महानगरपालिकेचे अभियंता आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

The post गणेश विसर्जन तयारीची महापौर – उपमहापौर, आयुक्तांकडून पाहणी appeared first on News 24 Tass Marathi.

गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
मिरवणूक वेळेत पूर्ण करण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन

बेळगाव : गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी बेळगाव पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला तब्बल ३६ तास लागल्याने यंदा मंडळांनी रात्री ८ वाजेपर्यंत मिरवणूक सुरू करून ती वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी केले आहे.

विसर्जनाच्या नियोजनात गणेश मंडळांनी एकमेकांशी स्पर्धा करू नये, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बाहेरील जिल्ह्यांतून मागविण्यात आलेल्या सुमारे ५ हजार पोलिसांसह स्थानिक पोलिसांचा मिळून ६ ते ७ हजारांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने ५०० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, शहरातील एकूण १,१०० हून अधिक कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्था आणि महावितरणशी समन्वय साधण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता गणेशोत्सव शांततेत साजरा करावा. तसेच कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त प्रकाश निकम यांनी केले आहे.

The post गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त appeared first on News 24 Tass Marathi.

गणेश विसर्जन तलाव व्यवस्थेची मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी केली पाहणी
कपिलेश्वरसह शहरातील विसर्जन तलावांवर दोन दिवसांत सर्व सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश

बेळगाव : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कपिलेश्वरसह शहरातील विविध विसर्जन तलाव आवारात सुरू असलेल्या तयारीची महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी केली.

विसर्जनाच्या दिवशी तलाव परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन तसेच गणेशमूर्ती विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

तलाव परिसरात क्रेन, पाणी, विद्युत रोषणाई, मंडप आणि ध्वनिवर्धक यंत्रणेची व्यवस्था करण्यासोबतच पोलीस, अग्निशमन दल आणि जीव रक्षक पथकांची नियुक्ती करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विविध विभागांशी समन्वय साधून दोन दिवसांत सर्व आवश्यक सुविधांसह तयारी पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.

तयारी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तलाव परिसराची पाहणी करून अंतिम टप्प्यातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्त कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले.

यावेळी महापालिका अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर सुळगेकर, नगरसेवक राजू भातकांडे, गिरीश धोंगडी, मंगेश पवार यांच्यासह महापालिका अधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते.

The post गणेश विसर्जन तलाव व्यवस्थेची मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी केली पाहणी appeared first on News 24 Tass Marathi.