fuel price hike Archives | News 24 Tass Marathi

पुन्हा एलपीजी गॅस दरवाढ
केंद्राच्या महागाई धोरणांवर लक्ष्मी हेब्बाळकर यांची टीका

बेळगाव : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा २९ रुपयांची वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि गृहिणींच्या अडचणीत भर पडत असल्याची टीका त्यांनी केली.

निवेदनाद्वारे प्रतिक्रिया देताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, यापूर्वी मार्च महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता आणखी २९ रुपयांची वाढ झाल्याने तीन महिन्यांत एकूण ८९ रुपयांची वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असताना गॅस दरवाढ करून केंद्र सरकारने सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्या पुढे म्हणाल्या की, स्वयंपाकघर हे प्रत्येक कुटुंबाचे केंद्रबिंदू असते. गॅस सिलेंडरच्या दरातील वाढीचा थेट परिणाम घरगुती अर्थसंकल्पावर होत असतो. सध्या अनेक कुटुंबे वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत गॅसच्या किमती वाढविण्याचा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधातील आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ, चहा, कॉफी आणि जेवणाच्या किमती वाढल्या आहेत. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सामान्य कुटुंबांचे जगणे आणखी कठीण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये स्वस्त गॅस आणि महागाई नियंत्रणाची आश्वासने देत सत्तेत आलेल्या सरकारकडून आज सर्वसामान्य नागरिकांवर सातत्याने आर्थिक बोजा टाकला जात आहे. महागाई रोखण्याऐवजी दरवाढीचे निर्णय घेतले जात असल्याने जनतेमध्ये असंतोष वाढत आहे, असेही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि महागाईने होरपळणाऱ्या कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे. तसेच जनतेच्या हिताला प्राधान्य देणारी धोरणे राबवून सर्वसामान्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

The post पुन्हा एलपीजी गॅस दरवाढ appeared first on News 24 Tass Marathi.

गॅस – इंधन दरवाढीविरोधात बेळगावात महिला काँग्रेसचे आंदोलन
रस्त्यावर चूल पेटवून स्वयंपाक ; दरकपातीसाठी केंद्राला इशारा

बेळगाव : एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ शहर महिला काँग्रेसच्या वतीने बेळगावात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी भररस्त्यात चूल मांडून स्वयंपाक करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवला. यावेळी दरवाढ मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला सात दिवसांची मुदत देण्यात आली.

राणी चन्नम्मा चौकात आयोजित आंदोलनात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवून चहा आणि जेवण तयार केले. तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ नागरिकांना वाटप करत त्यांनी महागाईच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान आयेशा सनदी यांनी केंद्र सरकारवर टीका करत इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. गॅस दरवाढीच्या विरोधात पूर्वी आंदोलन करणारे भाजपचे नेते आता शांत का आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पुढील सात दिवसांत एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी न झाल्यास दिल्लीत जाऊन अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा लता शिवाजीराव माने यांनी महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य आणि कष्टकरी कुटुंबांना बसत असल्याचे सांगितले. वाढत्या दरांमुळे घरगुती अर्थसंकल्पावर ताण निर्माण झाला असून महिलांसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात गॅरंटी योजनांचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

The post गॅस – इंधन दरवाढीविरोधात बेळगावात महिला काँग्रेसचे आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi.

इंधन दरवाढीचा फटका ; बेळगावात पेट्रोल ११०.७४ तर डिझेल ९८.६९ रुपयांवर
बेळगाव : इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून बेळगावात पेट्रोलचा दर ११० रुपये ७४ पैसे, तर डिझेलचा दर ९८ रुपये ६९ पैशांवर पोहोचला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २.७० रुपयांची वाढ करण्यात आली असून, मागील दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे.

दरवाढ तात्काळ लागू करण्यात आल्याने वाहनचालक, परिवहन क्षेत्र तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. चार वर्षांनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, होर्मूज सामुद्रधुनी परिसरातील तणाव आणि जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी इंधन दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

The post इंधन दरवाढीचा फटका ; बेळगावात पेट्रोल ११०.७४ तर डिझेल ९८.६९ रुपयांवर appeared first on News 24 Tass Marathi.

पेट्रोल – डिझेलच्या दरात ५ दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ
नवी दिल्ली : ऐन उन्हाळ्यात महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.

आज, मंगळवारी (१९ मे) देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात चालू आठवड्यात झालेली ही दुसरी दरवाढ असून यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वी गेल्या शुक्रवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच पुन्हा ९० पैशांची वाढ झाल्याने बाजारात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

The post पेट्रोल – डिझेलच्या दरात ५ दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ appeared first on News 24 Tass Marathi.