excise department Archives | News 24 Tass Marathi

अबकारी आयुक्तांच्या निवासस्थानावरील ईडीच्या छाप्यात १३.३ कोटींची मालमत्ता जप्त
बेळगाव : बेळगाव विभागाचे अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, दागदागिने आणि महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर ईडीने तपासासंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

ईडीच्या शोधमोहिमेदरम्यान एकूण १३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये ५.५ कोटी रुपयांची रोख रक्कम, ७.८ कोटी रुपये मूल्याचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच ३.३ लाख रुपयांचे परदेशी चलन समाविष्ट आहे. याशिवाय कॅश बुक, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद असलेले अनेक दस्तऐवजही जप्त करण्यात आले आहेत.

ईडीने बेळगाव, म्हैसूर आणि बेंगळुरू येथील एकूण १४ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ, वरिष्ठ अधिकारी जगदीश नायक आणि के. एम. तम्मण्णा यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता.

तपासादरम्यान अधिकाऱ्यांच्या हाती एक महत्त्वाची डायरी लागली असून, त्यामध्ये अबकारी परवाने मंजूर करणे, नूतनीकरण करणे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांच्या नोंदी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विविध दारू विक्री परवानाधारकांकडून नियमित स्वरूपात रक्कम गोळा केल्याच्या नोंदीही आढळल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीच्या प्राथमिक तपासात या कथित व्यवहारांमधून मिळालेल्या निधीचा वापर बेनामी मालमत्ता खरेदी, नातेवाईकांच्या नावावर गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त कागदपत्रांच्या आधारे ईडीकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे.

The post अबकारी आयुक्तांच्या निवासस्थानावरील ईडीच्या छाप्यात १३.३ कोटींची मालमत्ता जप्त appeared first on News 24 Tass Marathi.

ईडीच्या कारवाईनंतर वाय. मंजुनाथ बेळगावात दाखल
निवासस्थानी चार्टर्ड अकाउंटंटसोबत दीर्घ चर्चा

बेळगाव : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीनंतर उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ बेळगावात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. छापेमारीनंतरच्या घडामोडींमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावातील टीव्ही सेंटर परिसरातील निवासस्थानी पोहोचल्यानंतर वाय. मंजुनाथ यांनी आर्थिक आणि कायदेशीर बाबींवरील मार्गदर्शनासाठी शहरातील ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट सीए पी. जी. गाली यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे तीन तास चालल्याचे सांगितले जाते.

या चर्चेदरम्यान ईडीकडून तपासण्यात आलेले आर्थिक व्यवहार, जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, संभाव्य नोटिसा तसेच पुढील चौकशीच्या प्रक्रियेला सामोरे जाण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर विचारविनिमय झाल्याची चर्चा आहे. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कायदेशीर बाबींविषयीही मार्गदर्शन घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दीर्घ चर्चेनंतर सीए पी. जी. गाली यांनी निवासस्थानातून प्रस्थान केले. ईडीच्या धाडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे वाय. मंजुनाथ यांच्या पुढील भूमिकेकडे आणि तपासातील आगामी घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post ईडीच्या कारवाईनंतर वाय. मंजुनाथ बेळगावात दाखल appeared first on News 24 Tass Marathi.

चिक्कोडी उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा विस्तार ; कागदपत्रांची तपासणी सुरू

चिक्कोडी : उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणखी एक पाऊल पुढे टाकत चिक्कोडी उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात असलेल्या काही व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने बेळगाव शहरातील बसव कॉलनी परिसरातील विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदींची छाननी सुरू केली आहे.

राज्यात सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ईडी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत असून, यापूर्वी अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ तसेच इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणीही कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सध्याची छापेमारी तपासाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या कारवाईबाबत ईडीकडून अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नसून, तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

The post चिक्कोडी उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

जांबोटी – कणकुंबी मार्गावर बेकायदा स्पिरीट वाहतूक उघड
१४ हजार लिटर स्पिरीटसह ट्रक जप्त ; ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अबकारी विभागाची कारवाई

खानापूर : तालुक्यातील जांबोटी – कणकुंबी मार्गावर अबकारी विभागाने मोठी कारवाई करत बेकायदा स्पिरीट वाहतूक करणारा ट्रक जप्त केला. या कारवाईत १४ हजार लिटर स्पिरीटसह सुमारे ३५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मंगळवार दि. १९ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

अशोक लेलँड कंपनीच्या बँकर प्रकारातील सहा चाकी वाहनातून (क्र. KA-22 B-3793) अवैधरित्या स्पिरीटची वाहतूक विक्रीच्या उद्देशाने केली जात असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून संबंधित वाहन अडवले असता त्यामध्ये १४ हजार लिटर स्पिरीट आढळून आले.

या प्रकरणी वाहन चालक सिद्धराजू पुट्टस्वामी शेट्टी (वय ४७, रा. हेग्गिनवाळू, ता. नंजनगुड, जि. म्हैसूर) याच्याविरुद्ध बीएनएसएस कायदा २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये पुढील तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच वाहन मालकाचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अबकारी विभागाने सांगितले.

जप्त करण्यात आलेल्या स्पिरीटची किंमत अंदाजे १४ लाख रुपये असून वाहनाची किंमत सुमारे २१ लाख रुपये आहे. अशाप्रकारे एकूण ३५ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई डॉ. वाय. मंजुनाथ, अबकारी आयुक्त (केंद्रीय कार्यालय, बेळगाव), एफ. एच. चलवादी, अबकारी संयुक्त आयुक्त (प्रशासन), बेळगाव विभाग, तसेच जगदीश एन. के., अबकारी उपआयुक्त, बेळगाव (दक्षिण) जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विजयकुमार जे. हिरेमठ, अबकारी अधीक्षक यांच्या सूचनेनुसार रवी एम. मुरगोड, उपअधीक्षक (बेळगाव उपविभाग) यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली.

या कारवाईत मंजुनाथ मेळ्ळिगेरी (अबकारी निरीक्षक), नुरुल्ला खान (उपनिरीक्षक, खानापूर विभाग), सुनील एस. पाटील (उपनिरीक्षक, डीसीई कार्यालय), तसेच अबकारी कर्मचारी वाय. बी. पाटील, विवेकी आणि वाहनचालक प्रकाश यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

The post जांबोटी – कणकुंबी मार्गावर बेकायदा स्पिरीट वाहतूक उघड appeared first on News 24 Tass Marathi.

कणकुंबी तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची दारू जप्त
३.७३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; आरोपी अटकेत

खानापूर : कणकुंबी सीमाभागात उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी कार पकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कणकुंबी चेकपोस्टवर वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी संशयावरून थांबविण्यात आलेल्या मारुती सुझुकी रिट्झ कारची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली.कारमधून सुमारे ५१.८४ लिटर व्हिस्की व रम तसेच ३६ लिटर बिअर जप्त करण्यात आली. ही दारू केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी बेळगाव तालुक्यातील हलगा गावचा रहिवासी प्रसाद शंकर पुनाजी याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहनासह दारू असा एकूण ३ लाख ७३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कर्नाटक अबकारी कायद्यांतर्गत उत्पादन गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वाहन मालकाचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

The post कणकुंबी तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची दारू जप्त appeared first on News 24 Tass Marathi.

गावठी दारू आणि अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव : शहर व जिल्ह्यातून गावठी दारू व अंमली पदार्थांची विक्री काटेकोरपणे थोपविण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. बुधवारी विविध खात्यांच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना दिली आहे.

बेळगाव दक्षिण व उत्तर अबकारी जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा घेण्यात आला. विशेषतः गावठी दारू व अंमली पदार्थांची विक्री थोपविण्यासाठी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्थायी समिती स्थापन केली आहे. केवळ पोलीस व अबकारीच नव्हे तर शिक्षण, वन खात्यासह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनाही याकामी जुंपण्यात आले आहे. गावठी दारू थोपविण्यासाठी पोलीस,अबकारी व वनखात्याने संयुक्त मोहीम राबवून कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. अबकारी विभागातून गेल्या वर्षभरात झालेले व्यवहार व सरकारच्या खजिन्यात जमा झालेला कर याचाही आढावा घेण्यात आला.

या बैठकीला पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, अबकारी विभागाचे जगदीश कुलकर्णी, स्वप्ना, एन. सी. पाटील, विजय हिरेमठ, रवी मुरगोड, शंकरगौडा आदींसह पोलीस, अबकारी, परिवहन, शिक्षण व वनविभागातील अधिकारी उपस्थित होते.

The post गावठी दारू आणि अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा appeared first on News 24 Tass Marathi.

हलगानजीक राष्ट्रीय महामार्गालगत गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सुमारे ३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील हलगा गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीची दारू जप्त केली. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेला सुमारे ३ लाख ७७ हजार रुपयांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

हिरेबागेवाडी ते मुत्नाळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या सर्व्हिस रोडवरील संशयित शेडवर निरीक्षक ढुंडप्पा हक्की यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. या धाडीत ५५३.९६ लिटर गोवा बनावटीची दारू तसेच २३.४०० लिटर बिअर असा मोठा साठा आढळून आला. अवैध विक्रीच्या उद्देशाने हा माल ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी मुत्नाळ येथील २१ वर्षीय अरुण राजू वाघमोरे याला बीएनएसएस कायद्यान्वये चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित शेडच्या मालकाचा शोध सुरू असून कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा १९६५ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उपअधीक्षक रवी एम. मुरगोड व अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संपूर्ण मोहीमेचे चित्रीकरण करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

The post हलगानजीक राष्ट्रीय महामार्गालगत गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त appeared first on News 24 Tass Marathi.

अवैध दारू विक्री विरोधात अबकारी विभागाची धडक मोहीम
९ महिन्यांत १२९४ गुन्हे दाखल : २.२८ कोटींचा मुद्देमाल जप्त

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव व चिक्कोडी विभागात अवैध दारू विक्री आणि बेकायदा पार्ट्यांविरोधात अबकारी विभागाने गेल्या नऊ महिन्यांत व्यापक मोहीम राबवली असून या कारवाईत १२९४ गुन्हे दाखल करून सुमारे २ कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अबकारी सहआयुक्त फकीरप्पा चलवादी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत ग्रामीण भागातील ७८३ अवैध दारू विक्री प्रकरणांचा समावेश आहे. हातभट्टी दारू तसेच ढाब्यांवरील बेकायदा पार्ट्या रोखण्यासाठी बीट पातळीवर विशेष पथके तैनात करण्यात आली असून, नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

रायबाग येथील एका बारमध्ये पाच वर्षांच्या मुलाला दारू पाजल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, संबंधित बारवर गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू असल्याचे चलवादी यांनी सांगितले. अबकारी विभागात सुमारे ३० टक्के मनुष्यबळाची कमतरता असली, तरी उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या मदतीने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मद्य विक्रेत्यांना कोणतेही विक्री लक्ष्य देण्यात आलेले नसून, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच नवीन वर्षाच्या नावाखाली होणारे अवैध प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला अबकारी जिल्हाधिकारी जगदीश एन. के., निंगनगौडा पाटील, विजय हिरेमठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post अवैध दारू विक्री विरोधात अबकारी विभागाची धडक मोहीम appeared first on News 24 Tass Marathi.