encroachments Archives | News 24 Tass Marathi

टिळकवाडी आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डाची अतिक्रमण हटाव मोहीम
रस्ते आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी कारवाई

शहर सौंदर्यीकरण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष अभियान

बेळगाव : शहरातील सार्वजनिक रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करून वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने कॅन्टोन्मेंट बोर्डाने सोमवारी विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. बोर्डाच्या अलीकडील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ही कारवाई करण्यात आली असून, नागरिक आणि वाहनचालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी विविध भागांतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला.

मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेट परिसरातील रस्त्यांच्या कडेला उभारण्यात आलेली अनधिकृत दुकाने, तात्पुरती बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यात आली. पादचाऱ्यांच्या वावरात अडथळा ठरणारी शेड आणि इतर संरचनाही यावेळी हटवण्यात आल्या.

यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पथकाने बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही अतिक्रमणविरोधी कारवाई केली. मुख्य रस्ते आणि फूटपाथ व्यापून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना सार्वजनिक जागांवर अतिक्रमण न करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या.

यापुढे सार्वजनिक रस्ते, फूटपाथ किंवा इतर जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे.

The post टिळकवाडी आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डाची अतिक्रमण हटाव मोहीम appeared first on News 24 Tass Marathi.

अनगोळमध्ये महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई
पदपथावरील १० हून अधिक अनधिकृत शेड हटवले

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने सोमवारी अनगोळ मुख्य रस्त्यावरील पदपथ आणि नाल्यांवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड व दुकानांवर कारवाई करत १० हून अधिक अतिक्रमणे हटवली. या कारवाईमुळे नागरिक, शाळकरी मुले आणि पादचाऱ्यांसाठी सार्वजनिक मार्ग पुन्हा मोकळा करण्यात आला.

अनगोळ मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी पदपथ आणि नाल्यांवर पत्र्याची शेड व दुकाने उभारल्याने पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. याशिवाय वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती. नागरिकांकडून वारंवार तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत अनधिकृत बांधकामे हटवली.

याबाबत माहिती देताना महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागांमध्ये आठवड्यागणिक कृती आराखडा तयार करून अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. अनगोळनंतर पुढील आठवड्यात खानापूर रोड परिसरातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

पदपथ आणि रस्ते हे नागरिकांच्या सुरक्षित वापरासाठी निर्माण करण्यात आले असून त्यांचा वापर मूळ उद्देशासाठीच व्हावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. व्यापारी व नागरिकांनी स्वखुशीने अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा महापालिका कोणतीही पूर्वसूचना न देता कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या कारवाईवेळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

The post अनगोळमध्ये महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कॅम्प परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम
झाडे व खांबावरील बॅनर-होर्डिंग्ज हटवले

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी कॅम्प परिसरासह हिंडलगा रोड आणि गणेशपूर रोडपर्यंत विविध ठिकाणी रस्त्यांवर, झाडांवर तसेच विजेच्या खांबांवर लावलेले बेकायदेशीर बॅनर व होर्डिंग्ज हटविण्याची व्यापक मोहीम राबवली.

या कारवाईत सकाळी मिलिटरी महादेव मंदिर परिसर, सेंट पॉल्स हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल रोड, फिश मार्केट, गवळी गल्ली, ई. डब्ल्यू. फर्नांडिस रोड, मार्केट स्ट्रेट तसेच पिकेट रोड ते गणेशपूर रोड या मार्गावरील विविध ठिकाणांवरील अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले.

दुपारच्या सत्रात वनिता विद्यालय परिसर, सेंट झेवियर हायस्कूल ते महात्मा गांधी सर्कल (हिंडलगा रोड) आणि बिस्किट महादेव मंदिर ते शौर्य सर्कल दरम्यानच्या भागातही कारवाई सुरू ठेवण्यात आली. या मोहिमेत रस्त्यांच्या कडेला लावलेले मोठ्या प्रमाणातील बॅनर व होर्डिंग्ज हटवण्यात आले.

दिवसभर चाललेल्या या मोहिमेत सुमारे ५० बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्ज काढून जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या या फलकांवर कारवाई झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

The post कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कॅम्प परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम appeared first on News 24 Tass Marathi.

गणपत गल्लीत पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम
महापालिकेची धडक कारवाई ; रस्ते मोकळे – वाहतूक सुरळीत

बेळगाव : शहरातील वर्दळीच्या गणपत गल्ली परिसरात बेळगाव महापालिकेने शनिवारी सकाळी अतिक्रमणाविरोधात पुन्हा धडक मोहीम राबवत रस्ते मोकळे केले. रहदारी पोलिसांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.

बेळगावमधील प्रमुख व्यापारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपत गल्लीत दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनांची वर्दळ असते. मात्र काही फेरीवाले आणि दुकानदारांनी रस्त्यावर स्टॉल, हातगाड्या तसेच विविध साहित्य ठेवून अतिक्रमण केल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या.

शनिवारी सकाळी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक अचानक परिसरात दाखल झाले. सुरुवातीला विक्रेत्यांना समज देत स्वखुशीने अतिक्रमण हटवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतरही रस्त्यावर ठेवलेले टेबल, फळ-भाजीपाला गाड्या, प्लास्टिक साहित्य आणि इतर अडथळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. काही ठिकाणी कारवाईला विरोध झाल्याने संबंधितांचे साहित्य जप्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना नियमानुसार परवाना घेऊनच व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. भविष्यात पुन्हा अतिक्रमण आढळल्यास दंडात्मक कारवाईसह कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही देण्यात आला.

महापालिकेच्या या मोहिमेनंतर गणपत गल्लीतील वाहतूक सुरळीत झाली असून स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

The post गणपत गल्लीत पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव महापालिकेची हिंडलगा रस्त्यावरील अनधिकृत खोक्यांवर कारवाई
अतिक्रमणधारकांना दणका

बेळगाव : शहराच्या सौंदर्यीकरणासाठी बेळगाव महापालिकेने अनधिकृत अतिक्रमणांविरोधात मोहीम तीव्र केली असून फूटपाथ आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्यानंतर आज हिंडलगा रस्त्यावर उभारलेली खोकी हटवून प्रशासनाने मोठी कारवाई केली.

फूटपाथ आणि बेकायदा होर्डिंग्ज हटवल्यानंतर आता महापालिकेने अनधिकृत खोक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत हिंडलगा गणेश मंदिराजवळील रस्त्यावर उभारलेली सुमारे १० ते १५ खोकी जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आली.

या कारवाईदरम्यान रस्त्याच्या जागेत आलेले बारचे फलक आणि मोठे जाहिरात फलक देखील हटवण्यात आले. उपजीविकेचे साधन असलेल्या दुकानांवर कारवाई होत असल्याने काही व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला, यावेळी व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला.

मात्र, विरोधाची पर्वा न करता महापालिकेच्या पथकाने सर्व अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. शहरात यापुढेही अशाच प्रकारे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू ठेवली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

The post बेळगाव महापालिकेची हिंडलगा रस्त्यावरील अनधिकृत खोक्यांवर कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.