employee Archives | News 24 Tass Marathi

मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात बस कर्मचाऱ्यांचा संताप
मध्यवर्ती बस स्थानकावर आंदोलन

विश्रामगृह आणि स्वच्छतागृहांची मागणी रखडली

बसमध्येच रात्र काढण्याची वेळ, परिवहन प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी

बेळगाव : बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकावर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या बस चालक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात आंदोलन छेडत परिवहन विभागाच्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. विश्रामगृह, स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने बसमध्येच रात्र काढण्याची वेळ आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

यादगीर, म्हैसूर, कलबुर्गी, बळ्ळारी, बसवकल्याणसह २० हून अधिक जिल्ह्यांतून कर्तव्यासाठी बेळगावात येणाऱ्या चालक आणि कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी योग्य खोल्या, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रोजच गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुमारे दीड वर्षांपासून परिवहन विभागाकडे सातत्याने मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत, बेळगावमध्ये बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबित असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सुविधांच्या अभावामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बसमध्येच विश्रांती घ्यावी लागत असून, डासांचा त्रास, उकाडा, पाऊस आणि अपुऱ्या सुविधांमुळे रात्रभर झोप न लागता दुसऱ्या दिवशी पुन्हा सेवेत रुजू व्हावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.

“रात्रभर धावल्यानंतर बसला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर अपघाताची शक्यता वाढते. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण?” असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे बेळगाव जिल्ह्याचे असूनही येथील कर्मचाऱ्यांना किमान सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे की चालक आणि कमर्चाऱ्यांना विश्रामगृहे आणि शौचालये यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि एक सुरक्षित व मानवी कामाचे वातावरण निर्माण करण्यात यावे.

The post मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात बस कर्मचाऱ्यांचा संताप appeared first on News 24 Tass Marathi.

दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावात बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
७ ऑगस्टला संसदेला घेरावाचा इशारा

बेळगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावमध्ये बीएसएनएल (BSNL) कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी धरणे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. रखडलेली वेतनवाढ, पेन्शन दुरुस्ती आणि बीएसएनएलची ४जी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलकांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षांपासून वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित असून, पेन्शनधारकांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच बीएसएनएलला खाजगी दूरसंचार कंपन्यांप्रमाणे आधुनिक उपकरणे खरेदी करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देता येईल, अशी मागणीही करण्यात आली.

मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास येत्या ७ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील संसद भवनाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनेचे नेते अरविंद चौगुले आणि रामू तटपटी यांनी दिला.

या आंदोलनात बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

The post दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावात बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi.