electricity Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव ग्रामीणमधील वीज समस्येबाबत अधिकाऱ्यांची भेट
हेस्कॉमकडे समस्या सोडविण्याची मागणी

बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवेळी होणाऱ्या वीजखंडित पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता विशाल मिर्जे यांची भेट घेऊन वीज समस्येवर सविस्तर चर्चा केली. ग्रामीण भागात वारंवार आणि अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही अडथळे निर्माण होत असल्याचे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

वीजपुरवठ्यातील अनियमितता दूर करून नागरिकांना सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या भेटीदरम्यान एपीएमसीचे माजी सभापती आप्पाजी जाधव, संजय पाटील, महांतेश कोळूचे, किसन सुंठकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

The post बेळगाव ग्रामीणमधील वीज समस्येबाबत अधिकाऱ्यांची भेट appeared first on News 24 Tass Marathi.

शहरातील विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने काही उपनगरांत रविवार दि. ६ रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम शहर विभागाने कळविले आहे.

राणी चन्नम्मानगर पहिला व दुसरा क्रॉस, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर पहिला ते दुसरा क्रॉस, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेरगिन गल्ली, व्हडर छावणी, डोर गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर बस्ती गल्ली, माधव रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, हिंदवाडी कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी रोड, भाग्यनगर १० क्रॉस, रानडे कॉलनी पहिला ते दुसरा क्रॉस, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन व परिसर, आनंदवाडी, अनगोळ, वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रस्ता, सत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथपेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर केएलबी, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर पहिला ते पाचवा क्रॉस, पटवर्धन लेआऊट, मेघदूत हाऊसिंग सोसायटी, घुमटमाळ, नाय पै सर्कल, जेल शाळा, गोमटेश या भागाचा वीजपुरवठा रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खंडित होणार आहे.

श्रीनगर परिसरातील चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर परिसर, महांतेशनगर सेक्टर नं. ८ ते १२, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, केएमएफ डेअरी परिसर, शिवबसवनगरचा काही भाग, एसबीआय ते धर्मनाथ भवन, अशोकनगर, कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटल, वीरमद्रनगर, शिवाजीनगर, पोलीस हेडक्वार्टर्स, केएसआरटीसी क्वॉर्टर्स, त्रिवेणी हॉटेल परिसर, मेटगूड हॉस्पिटल, राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, काकतीवेस, क्लब रोड, डीसी ऑफिस, कोर्ट कंपाऊड, अलारवाड परिसरातील केएचबी कॉलनी, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी लेआऊट व या गावातील शेती पंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.

वृद्धाश्रम परिसर, अलारवाड, सुवर्णसौध लाईन १ व २, बसवेश्वर चौक, शहापूर परिसरातील जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, बिच्छू गल्ली परिसर, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, साई कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड या भागात सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार आहे.

उचगाव, हिंडलगा परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

बेळगाव दुरुस्तीच्या कारणास्तव ११० केव्ही उचगाव उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या काही गावांचा वीजपुरवठा रविवार दि. ६ रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत खंडित होणार आहे.

बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकॉप, कुंद्रेमनी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत, उचगाव, बसूर्ते, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनवाडी, वाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी महाविद्यालय, गणेशपूर.

हिंडलगा उपकेंद्रावरून वितरण होणाऱ्या हिंडलगा पप हाऊस, गणेशपूर, हिंडलगा, मण्णूर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, डिफेन्स कॉलनी, क्रांतीनगर, मारुतीनगर, शिवमनगर, गोजगा, आंबेवाडी व तेथील शेती पंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळविले आहे.

The post शहरातील विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित appeared first on News 24 Tass Marathi.

टेंगिनकेरी गल्लीत विजेच्या खांबावरील इलेक्ट्रिक बॉक्सला अचानक आग
शॉर्टसर्किटमुळे आगीचे गोळे व ठिणग्या

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

बेळगाव : टेंगिनकेरी गल्लीत रस्त्यावरील विजेच्या खांबावर बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बॉक्सला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. खांबातून आगीचे गोळे आणि ठिणग्या पडू लागल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये घबराट पसरली. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.

आगीची तीव्रता लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. धाडसी नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्राथमिक प्रयत्न केला. दरम्यान, संबंधित वीज कंपनीला घटनेची माहिती देण्यात आली.

वीज कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वीजपुरवठा खंडित केला आणि बॉक्सची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच मोठे नुकसान टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

The post टेंगिनकेरी गल्लीत विजेच्या खांबावरील इलेक्ट्रिक बॉक्सला अचानक आग appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव शहरातील विविध भागांत उद्या वीजपुरवठा खंडित
हेस्कॉमच्या दुरुस्तीच्या कामामुळे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वीज बंद

बेळगाव : हेस्कॉमकडून देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) बेळगाव शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत खंडित राहणार आहे.

हेस्कॉमने दिलेल्या माहितीनुसार, आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, संकम हॉटेल परिसर, बागलकोट रस्ता, जुना पी.बी. रोड, फुलबाग गल्ली, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवण कुडची, देवराज अर्स कॉलनी, टी.व्ही. सेंटर, मुख्य बसस्थानक, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, कीर्ती हॉटेल परिसर, वनखाते कार्यालय परिसर, कोतवाल गल्ली, खडेबाजार, काकतीवेस गल्ली, शनिवार खुट, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी गल्ली, उज्वलनगर, गांधीनगर, अमननगर, एसी मोटर्स परिसर, मारुतीनगर, आझाद गल्ली, टेंगिनकेरी गल्ली, पांगुळ गल्ली आणि भोवी गल्ली या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण झाल्यास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. संबंधित भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.

The post बेळगाव शहरातील विविध भागांत उद्या वीजपुरवठा खंडित appeared first on News 24 Tass Marathi.

विजेचा धक्का लागून टायर दुकान मालकाचा मृत्यू
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील जोडकुर्ली गावात दुकान बंद करत असताना विजेचा धक्का लागून टायर दुकानाच्या मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवन माने (वय २८) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन माने हे जोडकुर्ली गावात टायरचे दुकान चालवत होते. नेहमीप्रमाणे रात्रीचे काम आटोपून ते दुकान बंद करत असताना दुकानातील शॉर्ट सर्किट किंवा जुन्या वायरिंगमुळे वीज प्रवाहित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जुन्या वीज वाहिन्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि हेस्कॉमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनेची पाहणी केली असून, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

The post विजेचा धक्का लागून टायर दुकान मालकाचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव शहर, तालुका आणि औद्योगिक वसाहतीत उद्या दिवसभर वीजपुरवठा खंडित
बेळगाव : हेस्कॉम देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने रविवारी (दि. २४) शहर, औद्योगिक वसाहतींसह बेळगाव तालुक्यातील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खंडीत करण्यात येणार आहे.

शहरात शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कार रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली, हंस टॉकीज रोड, कॅण्टोन्मेंट, जेएल विंग, विजयनगर, ओमकारनगर, इंडाल, केव्हेंपूनगर, विनायकनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, करिअप्पा कॉलनी, आश्रय कॉलनी, शिवाजी कॉलनी, मुनियार ले आऊट, द्वारकानगर, अयोध्यानगर, गोगटे कॉलनी, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्रीनगर पहिला क्रॉस, गांधी उद्यान, शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, जैन इंजिनीअरिंग, चेंबर ऑफ कॉमर्स, जनेश्र्वर इंडस्ट्रीज, राणी चन्नमानगर पहिला व दुसरा क्रॉस, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, उद्यमबाग पोलिस स्थानक परिसर, अनगोळ परिसर, यरमाळ रोड, माणिकबाग, देशपांडे हॉल, पृथ्वी मेटल, कामाक्षी इंजीनीअरिंग, मारुती मेटल, निर्मन नेतलकर, अशोक आयर्न, हिंदुस्थान इंजिनीअरिंग, दामोदर कंपाउंड, दोड्डण्णावर कंपाउंड, अरुण इंजिनीअर्स, एन. आर. पटेल कंपाउंड, शिवाजी हॉटेल, राघवेंद्र हॉटेल, गृहलक्ष्मी परिसर, जीआयटी कॉलेज, राजारामनगर, महावीरनगर, खानापूर रस्ता, मच्छे रस्ता, पाटील माळ, राघवेंद्र हॉटेल परिसर, सुखशांती हॉटेल, गुरुप्रसादनगर, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, भवानीनगर, राजीव गांधीनगर, नित्यानंद कॉलनी, गोडसेवाडी, बी. के. फौंड्री, विश्वकर्मा कॉलनी, जैतनमाळ परिसर, ऑटोनगर, कणबर्गी, रामतीर्थनगर, मारुतीनगर, काकती, मुत्यानट्टी, बसवन कुडची, नेहरुरस्ता पहिला क्रॉस, आगरकर रोड दुसरा क्रॉस, पावर हाउस, राणा प्रताप रोड, रेल्वेगेट खानापूर रोड, सराफ गल्ली, आरपीडी, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, महावीरनगर, वड्डर गल्ली, इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हॉस्टेल, गुड्‌स शेड रोड, मराठा कॉलनी, एस. जी. कॉलनी पहिले गेट, टिळक चौक, शिवभवन या भागात रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा ठप्प होणार आहे.

बेळगाव तालुक्यात मुचंडी, अष्टे, मारीहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होन्याळ, मावीनकट्टी, तारीहाळ, चंदनहोसूर, सांबरा, मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, खणगाव, चंदूर, चंदगड, गुंजेनट्टी, केदनूर, मण्णीकेरी, हंदिगनूर, चलवेनट्टी, म्हाळेनट्टी, अतवाड, बोडक्यानट्टी, कुरीहाळ, कट्टणभावी, निंग्यानट्टी, गुडगेनट्टी, गौंडवाड, कडोली, अगसगा, जाफरवाडी, हिंडलगा, कंग्राळी के. एच. अलतगा, आंबेवाडी या गावात रविवारी दिवसभर वीजपुरवठा खंडीत होणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post बेळगाव शहर, तालुका आणि औद्योगिक वसाहतीत उद्या दिवसभर वीजपुरवठा खंडित appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव शहरातील विविध भागात उद्या वीज पुरवठा खंडित
बेळगाव : शहरातील ११० के. व्ही. वडगाव वीज वितरण केंद्रातून येणारे सर्व फिडर तसेच भागात रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

बाजार गल्ली, राणी चन्नम्मा नगर पहिला क्रॉस दुसरा क्रॉस,बुडा लेआउट, सुभाष चंद्र नगर, उत्सव हॉटेल, तिसरी रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, वडगाव विष्णू गल्ली, धामणे रोड,कलमेश्वर रोड,देवांग नगर पहिला आणि दुसरा क्रॉस,वझे गल्ली, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याण नगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, ढोर गल्ली, जुने बेळगाव गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुका नगर, देवांग नगर, बस्ती गल्ली होसुर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थ नगर, ओम नगर, पाटील गल्ली, हिंदवाडी सुभाष मार्केट, आर के मार्ग, हिंदवाडी कार्पोरेशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी रोड, भाग्यनगर दहावा क्रॉस, रानडे कॉलनी पहिला व दुसरा क्रॉस, सर्वोदय रोड, महावीर गार्डन आणि आसपास परिसर, आनंदवाडी, विद्यानगर,अनगोळ वडगाव मेन रोड, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, अनगोळचा काही भाग केशवनगर, येळ्ळूर रोड या परिसरात वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉम ने कळविले आहे.

The post बेळगाव शहरातील विविध भागात उद्या वीज पुरवठा खंडित appeared first on News 24 Tass Marathi.

सांबऱ्यात विजेचा धक्का बसून शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
सांबरा / वार्ताहर

सांबरा गावात शुक्रवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत विजेच्या धक्क्याने एका शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. परिनीती चंद्रू पालकर (वय १३, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती.

माहितीनुसार, सकाळी घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना तिला अचानक तीव्र विजेचा धक्का बसला. धक्का बसताच ती खाली कोसळली. तातडीने परिसरातील युवकांनी तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

परिनीतीच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ व आजी असा परिवार आहे. ती शाळेत हुशार, शिस्तप्रिय विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. अभ्यासासोबतच शालेय उपक्रमांत तिचा नेहमीच उत्साहपूर्ण सहभाग असायचा. या दुर्दैवी घटनेमुळे सांबरा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

The post सांबऱ्यात विजेचा धक्का बसून शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

गोव्यातील अडचणीत सापडलेले वीज क्षेत्र : वास्तवाची तपासणी
लेखक / जॉन्सन डि’सिल्वा

विद्युत विभागाने अलिकडेच दिलेल्या सार्वजनिक सूचनेमुळे ग्राहकांना पूर्वपरवानगीशिवाय खाजगी जनरेटर किंवा सौर इन्व्हर्टर त्यांच्या घरातील पुरवठ्याशी समांतर जोडण्याविरुद्ध इशारा दिला आहे यामुळे गोव्यातील लोकांमध्ये व्यापक चर्चा सुरू झाली आहे. लाईनमन आणि तंत्रज्ञांना होणारा बॅक-फीड धोका टाळण्यासाठी सुरक्षा नियम आवश्यक असले तरी, खोलवरचा मुद्दा दुर्लक्षित करता येत नाही – गोव्यातील वीज सेवांची निराशाजनक स्थिती.

खराब वीज सेवा : गोव्यातील लोकांसाठी दैनंदिन संघर्ष

गोव्यासारख्या राज्यासाठी, जे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रक्षेपित केले जाते आणि स्मार्ट सिटीचा दर्जा मिळविण्याची आकांक्षा बाळगते, त्याच्या वीज पुरवठ्याची स्थिती लज्जास्पद आहे. वारंवार वीज खंडित होणे, व्होल्टेज चढउतार, ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि पुरवठा पुनर्संचयित होण्यास विलंब होणे हे शहरी आणि ग्रामीण भागात एक नित्याचे प्रकरण बनले आहे. अशी उदाहरणे घडली आहेत जिथे संपूर्ण गावे तासन्तास, कधीकधी दिवस, विशेषतः पावसाळ्यात किंवा उपकरणांमध्ये बिघाड झाल्यामुळे अंधारात राहिली आहेत.

विकसित मानले जाणारे मडगाव, वास्को, म्हापसा आणि पणजी येथेही वीजपुरवठा अत्यंत अविश्वसनीय आहे. व्होल्टेज अनेकदा इतका कमी होतो की रेफ्रिजरेटर, एसी आणि वॉटर पंप काम करणे बंद करतात. दक्षिण गोव्यातील वेलीम, अंबेलिम, चिंचिनिम, लौटोलीम, चांदोर, कामुरलीम आणि बेनौलीम सारख्या गावांमध्ये, लांब आणि अघोषित वीज कपातीमुळे नागरिकांना निराश आणि असहाय्य केले आहे.

जनरेटर आणि सौर युनिट्स का?

जेव्हा विभाग अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवण्यात अपयशी ठरतो, तेव्हा लोकांना डिझेल जनरेटर, सौर इन्व्हर्टर आणि यूपीएस युनिट्स सारख्या बॅकअप सिस्टम बसवण्याशिवाय पर्याय उरत नाही. वैद्यकीय मशीनवर रुग्ण, ऑनलाइन वर्गात जाणारी मुले आणि विजेवर अवलंबून असलेले छोटे व्यवसाय असलेल्या घरांमध्ये हे चैनीच्या वस्तू नसून आवश्यक जगण्याची साधने आहेत.

विद्युत विभागाची नोटीस मूळ कारण , खराब पुरवठा विश्वासार्हता – याकडे लक्ष न देता जनरेटरसाठी “परवानगी” मागण्यासारखे आहे.  हे पीडिताला दोष देण्यासारखे आहे. जीर्ण झालेल्या पायाभूत सुविधा दुरुस्त करण्याऐवजी, विभाग सामान्य माणसाला शिक्षा करण्यास प्राधान्य देतो जो समस्येचा सामना करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो.

जबाबदारी आणि पारदर्शकतेचा अभाव :

सौभाग्य, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि स्मार्ट मीटर प्रकल्पांसारख्या केंद्र आणि राज्य योजनांअंतर्गत कोट्यवधी रुपये मंजूर करूनही, फारशी सुधारणा झालेली नाही. प्रकल्पांना अनेकदा विलंब होतो, कंत्राटदार बेजबाबदार असतात आणि तक्रारी बहिरे कानावर पडतात. हेल्पलाइन एकतर पोहोचू शकत नाहीत किंवा तक्रारी नोंदवतात ज्या दिवसेंदिवस सोडवल्या जात नाहीत.

या गोंधळात भर म्हणजे देखभालीचा अभाव आणि विभागात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता. कनिष्ठ कर्मचारी अनेकदा कठोर परिश्रम करतात, परंतु पद्धतशीर समस्या आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव सेवा पुरवण्यात अडथळा आणतो.

विभागाच्या एकतर्फी सूचना :

“तात्काळ डिस्कनेक्शन” च्या मोठ्या धमक्या देण्याऐवजी, विभागाने प्रथम जुन्या पायाभूत सुविधांचे अपग्रेड करावे – जुने ट्रान्सफॉर्मर, सॅगिंग लाईन्स आणि जीर्ण झालेले पोल. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्याच्या काळात २४x७ वीज उपलब्ध करून द्या.तक्रार निवारण बळकट करा – जलद प्रतिसाद पथके आणि प्रत्यक्षात काम करणाऱ्या हेल्पलाईन. नागरिकांसोबत काम करा, त्यांच्याविरुद्ध नाही – सोप्या प्रक्रियांद्वारे कायदेशीर सौर आणि जनरेटर स्थापनेला प्रोत्साहन द्या.

पुढे जाण्याचा मार्ग :

गोव्यातील लोक चांगले पात्र आहेत. वीज विभागाने ग्राहकांना आदराने वागवले पाहिजे, कायदा मोडणारे म्हणून नाही. जर वीज पुरवठा स्थिर असेल तर कोणीही महागड्या जनरेटर किंवा सौर बॅकअपमध्ये गुंतवणूक करणार नाही. तोपर्यंत, नागरिकांना स्वतःची वीज सुरक्षित करण्याचा अधिकार आहे, विशेषतः जेव्हा विभाग त्यांच्या मूलभूत कर्तव्यात अपयशी ठरतो.

गोवा सरकार आणि संबंधित मंत्री (सीएम सावंत ज्यांच्याकडे वीज खाते आहे) यांनी या वास्तविकतेला जागृत होण्याची वेळ आली आहे. जर त्यांना अनुपालन लागू करायचे असेल तर त्यांनी प्रथम स्वतःचे घर व्यवस्थित करावे. तोपर्यंत, विभागाच्या अकार्यक्षमतेसाठी सामान्य माणसाला दंड आकारला जाऊ नये.

The post गोव्यातील अडचणीत सापडलेले वीज क्षेत्र : वास्तवाची तपासणी appeared first on News 24 Tass Marathi.