cabinet expansion Archives | News 24 Tass Marathi

कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार ; १९ नव्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न
लोकभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत सोहळा

लवकरच खातेवाटपाची घोषणा

बेंगळुरू : कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार आज पार पडला. राजधानीतील लोकभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण १९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सर्व नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या सोहळ्याला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य, लोकप्रतिनिधी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये डॉ. अजय धर्मसिंग, एच. सी. बालकृष्ण, के. एस. बसवंतप्पा, बसवराज रायरेड्डी, एन. चेलुवरायास्वामी, लक्ष्मण सवदी, मधू बंगारप्पा, एस. एस. मल्लिकार्जुन, डी. नागेंद्र, पी. एम. नरेंद्रस्वामी, पुट्टुरंग शेट्टी, टी. रघुमूर्ती, रिझवान अर्शद, रुद्रप्पा लमाणी, संतोष लाड, के. एम. शिवलिंगेगौडा, शिवराज संगडगी, विजयानंद काशप्पनावर आणि बी. झेड. जमीर अहमद खान यांचा समावेश आहे.

शपथविधी सोहळ्यात अनेक मंत्र्यांनी ईश्वर, महापुरुष, आई आणि ज्येष्ठांच्या नावाने शपथ घेतल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

दरम्यान, नव्या मंत्र्यांना लवकरच खात्यांचे वाटप करण्यात येणार असून, एक मंत्रिपद अद्याप रिक्त ठेवण्यात आले आहे. या जागेवर महिला आमदाराला संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या प्रशासनाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

The post कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार ; १९ नव्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम मंजुरी
१८ नव्या मंत्र्यांचा आज शपथविधी ; काँग्रेस हायकमांडचा निर्णय

शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात

बेंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, रिक्त असलेल्या २० पदांपैकी १८ पदे भरण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असून, त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

तीन दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद उपस्थित होते. बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या अंतिम स्वरूपावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दिल्लीतील बैठकीनंतर राज्यातील काँग्रेस नेते बेंगळुरूला परतले असून, सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे अंतिम मंत्र्यांची यादी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंह सुरजेवाला सुपूर्द करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. हे दोन्ही नेते रविवारी रात्री अथवा सोमवारी सकाळी बेंगळुरूला पोहोचण्याची शक्यता आहे.

यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांकडे मंत्र्यांची अंतिम यादी पाठवतील आणि त्यानुसार नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यापूर्वीच सोमवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

सध्या राज्य मंत्रिमंडळात २० पदे रिक्त असून त्यापैकी दोन पदे सध्या रिक्त ठेवून १८ पदे भरण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.

The post कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम मंजुरी appeared first on News 24 Tass Marathi.