ashadhi wari Archives | News 24 Tass Marathi

विठ्ठल दर्शनाची प्रतीक्षा आता चार तासांवर
व्हीआयपी दर्शन बंदचा सकारात्मक परिणाम

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

भाविकांना जलद दर्शनासाठी सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या सूचना

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आल्याने दर्शनरांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तास प्रतीक्षा करावी लागत असताना आता ही प्रतीक्षा सुमारे चार तासांवर आली असून भाविकांना अधिक सुलभ आणि जलद दर्शनाचा लाभ मिळत आहे.

२५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी शुद्ध एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनरांगेतील भाविकांना कोणताही अडथळा न येता दर्शन मिळावे, यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वेरी महाविद्यालयापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिर समितीने दर्शनरांग आणि पत्राशेड परिसरात भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधत त्यांनी दर्शन व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध सुविधांबाबत प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. दर्शनरांगेत घुसखोरी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून व्यवस्था अधिक काटेकोर करण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर समितीला दिल्या.

व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे सामान्य भाविकांना जलद दर्शन मिळत असल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले असून, आषाढी यात्रेदरम्यानही ही व्यवस्था प्रभावीपणे कायम ठेवण्याची अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.

The post विठ्ठल दर्शनाची प्रतीक्षा आता चार तासांवर appeared first on News 24 Tass Marathi.

सुळगा (हिं.) येथे उस्ते – सत्तरी गोवा येथील वारकरी दिंडीचे उत्साहात स्वागत
पाचव्या वर्षीही वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था

स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या सेवाभावाची परंपरा कायम

दिंडीकडून आयोजकांचा सन्मान

सुळगा (हिं.) : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी निघालेल्या गोव्यातील उस्ते-सत्तरी, वाळपई येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या दिंडीचे बुधवारी सुळगा (हिं.) येथे ग्रामस्थांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करून, दिवंगत सामाजिक कार्यकर्ते शट्टूप्पा (बाळू) पाटील यांनी सुरू केलेली सेवाभावाची परंपरा त्यांच्या कुटुंबीयांनी यंदाही कायम ठेवली.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात आयोजित स्वागत कार्यक्रमासाठी स्व. शट्टूप्पा पाटील यांचे सुपुत्र रोहन पाटील, समाजसेविका माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. दिंडीचे स्वागत करून सर्व वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. पावसाने उघडीप दिल्यामुळे वारकऱ्यांनी मोकळ्या वातावरणात अल्पोपहाराचा आनंद घेतला.

यावेळी वारकरी विदेश माडकर यांनी श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या पायी वारीची माहिती देत सांगितले की, यंदाची ही मंडळाची पाचवी पायी वारी असून उस्ते येथून खांद्यावर पालखी घेऊन पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करणे हे या दिंडीचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या वारीत १५३ वारकरी सहभागी झाले असून दररोज नामस्मरणावर विशेष भर दिला जातो. वारीचे प्रमुख बारकेलो राणे (बुवा), उपप्रमुख सर्वेश राणे, संचालक रामकृष्ण इब्रामपूरकर आणि सचिव मोहन वांतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सुळगा ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताबद्दल तसेच रोहन पाटील, माधुरी जाधव आणि सहकाऱ्यांनी केलेल्या सेवाभावी उपक्रमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रास्ताविकात शेखर मनोहर पाटील यांनी स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा या भावनेतून त्यांनी चार वर्षांपूर्वी या दिंडीच्या अल्पोपहाराची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या निधनानंतरही त्यांचा सुपुत्र रोहन पाटील, भगिनी माधुरी जाधव आणि सहकाऱ्यांनी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवत त्यांच्या कार्याचा वारसा जपला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दिंडीच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या.

माधुरी जाधव यांनी मनोगतात स्व. शट्टूप्पा पाटील यांनी रुजविलेल्या सेवाभावाच्या संस्कारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून ही परंपरा भविष्यातही अविरत सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सुळगा ग्रामस्थांसह भरत पाटील, वीर पाटील, राजश्री कदम, मनीषा देसाई आणि अन्य सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिंडीचा उर्वरित प्रवास निर्विघ्न आणि मंगलमय व्हावा, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

श्रीराम सेना हिंदुस्थानचे ग्रामीण अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील यांनीही दिंडीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत वारकरी परंपरेतील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.

दरवर्षीप्रमाणे केलेल्या स्वागत व अल्पोपहार व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिंडीच्या वतीने रोहन पाटील, माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम, वासंती पाटील, श्वेता खांडेकर, स्मिता पाटील, नेहा मोरे, वीर पाटील, भरत पाटील, साईनाथ पाटील, माजी सैनिक ऑन. कॅप्टन धनाजी मोरे, परशराम सांगावकर, मोन्नापा पाटील, शिवा पुजारी, दिलीप कोंडुसकोप, रमेश कुडचीकर, योगेश कुडचीकर, ओमकार पाटील, भरत कुडचीकर, गोपाळ कलखांबकर, बाबुराव कोकीतकर, प्रथमेश कोचेरी, नागेश निलजकर, शंकर अष्टेकर, पार्थ खांडेकर, रोहित चौगुले, सूरज चौगुले, रमेश कलखांबकर, खेमानी कलखांबकर, धनंजय मोहिते आदी उपस्थित होते.

The post सुळगा (हिं.) येथे उस्ते – सत्तरी गोवा येथील वारकरी दिंडीचे उत्साहात स्वागत appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
१६ व्या वर्षी पायी वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शेकडो वारकरी सहभागी

येळ्ळूर : आषाढी वारीनिमित्त येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या वतीने पंढरपूरकडे निघालेली पारंपरिक पायी दिंडी दुसऱ्या दिवशीही अभंग, टाळ-मृदुंगाच्या गजरात मार्गक्रमण करत पुढे सरकली. गेली १५ वर्षे अखंड सुरू असलेली ही दिंडी यंदा १६ व्या वर्षात प्रवेश करत असून, शेकडो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.

मौनानंद तुकाराम महाराज मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धामणे येथील हभप मारुती महाराज सांबरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे. वैष्णव सदन आश्रमात विधीवत पादुका पूजनानंतर भव्य मिरवणुकीने यात्रेला प्रारंभ झाला. ९० वर्षांवरील ज्येष्ठ वारकऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत विविध वयोगटातील भाविकांनी पायी वारीत सहभाग नोंदविला.

यावेळी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी दिंडीची भेट घेऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच उत्तम पिकपाण्यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करण्याची विनंती त्यांनी वारकऱ्यांना केली. दरवर्षी दिंडीत सहभागी होणे आणि वारकऱ्यांची सेवा करणे ही आपल्या कुटुंबाची परंपरा असल्याचे सांगत, पुढील वर्षी स्वतःही पायी वारीत सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

गतवर्षी दिंडीच्या वाहनांना महामार्गावरील टोल नाक्यांवर वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि मृणाल हेब्बाळकर यांच्या सहकार्याने दिंडीच्या वाहनांसाठी टोल नाक्यांवर सुलभ आणि टोलमुक्त प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. या सहकार्याबद्दल दिंडी समितीने हेब्बाळकर कुटुंबाचे आभार व्यक्त केले.

The post येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान appeared first on News 24 Tass Marathi.

अंकली येथून माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान
अंकली : येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा ३०० किमी प्रवासास सुरवात करण्यात आली.

अंकली येथील शितोळे घराण्याकडे १९४ वर्षापासून माऊलीच्या अश्‍वाची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे दोन्ही अश्‍व अंकली कडे प्रस्थान करतात. हैबतबाबा आरफळकर यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळ्यास विशेष महत्त्व मिळवून दिले. यावेळी माऊलीच्या अश्वांचा व माऊलीच्या तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला. पिढ्या-दर-पिढ्या चालत आलेली परंपरा सध्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार व त्यांचे पुत्र महादजीराजे शितोळे सरकार हे निष्ठेने चालवत आहेत.

अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात सकाळी १० वा. अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली. जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार, विहानराजे शितोळे सरकार यांच्या उपस्थितीत चिकोडी सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडी व दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी केली व दर्शन घेतले. गावातील पारंपारीक मार्गावरून ही मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना निरोप देण्यात आला.

याप्रसंगी कापशीकर राणोजीराजे घोरपडे, राजाभाऊ थोरात पुणे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख विक्रम महाराज मोरे, संत सेवक विलास तात्या बालवडकर,पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष निवृत्ती आबा कोळेकर, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे सचिव सौरभ शिंदे, संत ज्ञानेश्वर पादुका मंदिराचे विश्वस्त संदीप काळे, योगेश गोंधळे, योगेश आरू, बेळगावच्या मराठा संवर्धन संघटनेचे अनिल चौधरी, नितीन कपलेश्वरी, श्री बेरगी, शिवराज पाटील, बेळगावच्या राजश्री हलगेकर ज्ञानेश्वरी कार्लेकर यांच्यासह अश्वत शितोळे, रणजित शिरशेट, तुकाराम पाटील, पांडूरंग वड्डर तसेच अंकली, जुगूळ,चंदूर, मांजरीवाडी, काडापूर, परीसरातील वारकरी उपस्थित होते.अश्व चालक म्हणून तुकाराम कोळी, अक्षय परीट सेवा बजावणार आहेत.

The post अंकली येथून माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान appeared first on News 24 Tass Marathi.

माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान
अंकली : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या मानाच्या अश्वांचे अंकली येथून आळंदीकडे प्रस्थान २७ जून रोजी होणार असल्याची माहिती उर्जितसिंगराजे शितोळे सरकार यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावात हा पारंपरिक सोहळा पार पडणार आहे.

आळंदी ते पंढरपूर वारीतील मानाच्या अश्वांची परंपरा शितोळे घराण्याकडे असून, अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. यंदाचे वारीचे १९४ वे वर्ष असून त्यानिमित्त आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. शनिवार, २७ जून रोजी सकाळी दहा वाजता अंकली येथील शितोळे सरकार राजवाड्यातून मानाच्या अश्वांचे प्रस्थान होणार आहे. या वेळी वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अंकली ते आळंदी हा प्रवास सुमारे अकरा दिवसांचा असणार असून अश्वांसोबत २० ते २५ जणांचा लवाजमा सहभागी होणार आहे. ७ जुलै रोजी हे अश्व आळंदी येथे पोहोचतील.

The post माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान appeared first on News 24 Tass Marathi.