tree collapsed Archives | News 24 Tass Marathi

बेनकनहळ्ळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे रोपे पुनर्लावणी उपक्रम
गेल्या वर्षी लावलेली ५६० रोपांची जोमदार वाढ

पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न

बेळगाव : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या ‘पाही वाईब्स फाउंडेशन’ तर्फे रविवारी बेनकनहळ्ळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात रोपे पुनर्लावणी मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षीच्या वृक्षारोपण मोहिमेनंतर जी रोपे जगू शकली नाहीत किंवा नष्ट झाली होती, त्या ठिकाणी नवीन रोपे लावून हरित उपक्रमाला नवी उभारी देण्यात आली.

या मोहिमेसाठी ‘युनिव्हर्सल नॉलेज ट्रस्ट’ ने रोपे उपलब्ध करून दिली. फाउंडेशनच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रोपे पुनर्लावणीचे काम पूर्ण केले.

गेल्या वर्षी शाळेच्या परिसरात लावण्यात आलेली ५६० रोपे आजही जोमाने वाढत असल्याने या उपक्रमाच्या यशाची प्रचिती येत आहे. रोपांच्या संगोपनासाठी शाळा प्रशासनाने घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या संस्थापक-संचालिका रक्षा यू. यांनी, “निसर्गासाठी काम करताना त्या कार्याचा आनंद घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजची मोहीम हे सिद्ध करते की, छोटे पण सातत्यपूर्ण प्रयत्न पर्यावरणावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम घडवू शकतात. ‘युनिव्हर्सल नॉलेज ट्रस्ट’ आणि मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांचे सहकार्य या उपक्रमाच्या यशामागील महत्त्वाचा आधार आहे,” असे सांगितले.

रोपे पुनर्लावणी मोहिमेत विजय कनेरी, शिवानंद हिरेमठ, एच. ओ. कुमारस्वामी, किरण नरगुंदकर आणि महांतेश हिरेमठ यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत नेतृत्व केले.

शाळेच्या परिसरातील रोपांची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करून ती जोपासल्याबद्दल सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांचा फाउंडेशनतर्फे विशेष गौरव करण्यात आला. ५६० रोपांच्या निरोगी वाढीत त्यांच्या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती फाउंडेशनने दिली.

The post बेनकनहळ्ळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे रोपे पुनर्लावणी उपक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव परिसरात मुसळधार पाऊस
नद्या-जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ

बेळगाव : बेळगावसह खानापूर, निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यांत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा आदी नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठाही दोन फुटांनी वाढला आहे.

सततच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही भागांमध्ये सखल परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बुधवारी सकाळपासूनही पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयांतील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने मात्र नदीकाठच्या आणि पूरप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

The post बेळगाव परिसरात मुसळधार पाऊस appeared first on News 24 Tass Marathi.

चलवेनहट्टी – अगसगे मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प
ग्रामपंचायतीच्या तत्परतेने हटविले झाड

काही तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला

बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चलवेनहट्टी–अगसगे मुख्य रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे बेळगाव शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र, अगसगे ग्रामपंचायतीच्या तत्परतेमुळे झाड हटवून काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

मध्यरात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड कोसळले. पहाटे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना अचानक अडथळा निर्माण झाल्याने मोठी तारांबळ उडाली. झाडामुळे अपघाताचीही शक्यता निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अगसगे ग्रामपंचायत उपाध्यक्ष तथा सदस्य गुंडू कुरेण्णवर यांनी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी उमेश कांबळे आणि लक्ष्मण कंग्राळकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या प्रयत्नांतून रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पहाटेच्या वेळी संबंधित यंत्रणांशी संपर्क होऊ न शकल्याने काही काळ वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, तातडीच्या प्रवासासाठी काही वाहनचालकांना हंदिगनूर- मण्णीकेरे मार्गे वळसा घालावा लागला. रस्ता तातडीने मोकळा केल्याबद्दल प्रवाशांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

The post चलवेनहट्टी – अगसगे मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
सहा दिवसांत ७८.६ मिमी पावसाची नोंद

१ जूनपासून १८२.६ मिमी पाऊस; सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक

वादळी वाऱ्याने झाडे कोसळून नुकसान

बेळगाव : रविवारी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी पावसाने बेळगाव शहरासह जिल्हाभर जोरदार पुनरागमन केले. सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने अनेक भागांत पाणी साचले असून, वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांत जिल्ह्यात ७८.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत १३४ टक्के आहे. गेल्या दोन दिवसांतील संततधार पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.

कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राच्या आकडेवारीनुसार, १ जून ते ६ जुलैदरम्यान बेळगाव जिल्ह्यात १८२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद १७९.५ मिमी या सरासरीच्या तुलनेत दोन टक्के अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोर लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

The post बेळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला appeared first on News 24 Tass Marathi.

हनुमान नगरात कारवर झाड कोसळून मोठे नुकसान
सुदैवाने जीवितहानी टळली ; वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी

बेळगाव : शहरातील हनुमाननगर येथील कुवेम्पू नगर प्रेस कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी उभी असलेल्या कारवर मोठे झाड कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने, झाड कोसळताना गाडीत किंवा परिसरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

सोमवारी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी, १ जानेवारी रोजी खरेदी करण्यात आलेल्या ह्युंदाई क्रेटा या नवीन कारवर अचानक झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी वाहन पार्क करताना तसेच रस्त्यावरून प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

The post हनुमान नगरात कारवर झाड कोसळून मोठे नुकसान appeared first on News 24 Tass Marathi.

खानापूरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
जामगाव येथे झाड कोसळून वीज खांब व वाहिन्यांचे नुकसान

दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

खानापूर : तालुक्यातील जामगाव येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतचे एक मोठे झाड विजेच्या खांबांवर आणि वीजवाहिन्यांवर कोसळल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून गाव अंधारात असून, हेस्कॉमच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सततच्या पावसामुळे झाड उन्मळून पडल्याने विजेचे खांब तुटले आणि काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. मात्र, दोन दिवस उलटूनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात अंधारामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

तुटलेले वीज खांब आणि वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करावा, तसेच अशा घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी जामगावच्या नागरिकांनी केली आहे.

The post खानापूरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत appeared first on News 24 Tass Marathi.

खानापूर – हल्याळ महामार्गावर झाड कोसळून वृद्ध गंभीर जखमी
दोन दुचाकी, विजेच्या खांबांचे नुकसान

वनविभागाने तातडीने रस्ता केला मोकळा

खानापूर : खानापूर-हल्याळ राज्य महामार्गावरील नंदगडजवळ बिडी रस्त्यावर अचानक मोठे झाड कोसळल्याने एका वृद्धाला गंभीर दुखापत झाली, तर दोन दुचाकी आणि दोन विजेचे खांबांचे मोठे नुकसान झाले. वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

नंदगड-बिडी रस्त्यावरील संगोळ्ळी रायण्णा चौकात ही घटना घडली. रस्त्यालगत असलेला जुनाट वृक्ष अचानक मुख्य रस्त्यावर कोसळल्याने नरसेवाडी येथील पुंडलिक देवप्पा पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नंदगड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेमुळे महामार्गावरील दोन विजेचे खांब तसेच दोन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शिवकुमार तुरमुरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणात आणली.

त्यानंतर नंदगड उप-परिक्षेत्र वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने जेसीबी आणि कटरच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी सुकलेली व धोकादायक झाडे हटविण्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

The post खानापूर – हल्याळ महामार्गावर झाड कोसळून वृद्ध गंभीर जखमी appeared first on News 24 Tass Marathi.