Tamilnadu Archives | News 24 Tass Marathi

जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
तामिळनाडू : राज्याच्या राजकारणात आज ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. टीव्हीके पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर जोसेफ विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत मोठे यश मिळवत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभाला लाखो समर्थक आणि चाहत्यांची उपस्थिती लाभली.

चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल ए. आर. व्ही. अर्लेकर यांनी विजय यांच्यासह नऊ सदस्यीय मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात अनुभवी आणि युवा नेतृत्वाचा समतोल साधण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मागील सरकारच्या परंपरेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत मुख्यमंत्री विजय आणि मंत्र्यांनी देवाच्या नावाने शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर विजय यांनी जनतेला संबोधित करताना, “मी कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेलो नाही, मात्र जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करणार नाही,” असे सांगितले.

यावेळी त्यांनी मागील डीएमके सरकारवर टीका करत राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची घोषणा केली. तसेच अमली पदार्थांविरोधात कठोर मोहीम राबवणे, पारदर्शक प्रशासन देणे आणि सामाजिक न्यायावर आधारित शासन व्यवस्था उभी करणे हे आपल्या सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

The post जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान appeared first on News 24 Tass Marathi.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले
एप्रिलमध्ये मतदान ; ४ मे रोजी निकाल

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच राजकीय वातावरण तापले आहे. आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ या राज्यांतील निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल ४ मे रोजी घोषित करण्यात येणार आहे.

घोषित कार्यक्रमानुसार, पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यांत २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या राज्यात सुमारे ६.४४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर तामिळनाडूतील २३४ मतदारसंघांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून सुमारे ४.६७ कोटी मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

आसाममधील १२६, केरळमधील १४० आणि पुद्दुचेरीतील ३० विधानसभा मतदारसंघांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या तीन राज्यांमध्ये अनुक्रमे सुमारे २.५ कोटी, २.७ कोटी आणि ४.४४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाचही राज्यांतील एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे १७.४ कोटी मतदार मतदान करणार आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पाच राज्यांमध्ये सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास २५ लाख निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहणार असून सुमारे ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी १,४४४ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

The post पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले appeared first on News 24 Tass Marathi.

कोयंबतूर स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला विजयपुरमध्ये अटक
विजयपूर / दिपक शिंत्रे

कोयंबतूरमध्ये 1998 साली झालेल्या स्फोटासह विविध दहशतवादी घटनांमध्ये सामील असलेला मुख्य आरोपीस तमिळनाडू पोलिसांनी, दहशतवादविरोधी पथक (ATS) व गुप्तचर विभागाच्या सहकार्याने विजयपूर शहरात अटक केली आहे.

सादिक राजा उर्फ टेलर राजा उर्फ शहजाहान अब्दुल मजीद मकानदार उर्फ शहजाहान शेख (वय 50) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो मूळचा चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट येथील रहिवासी असून, कोयंबतूर स्फोट प्रकरणानंतर कर्नाटकमधील हुबळी व विजयपूर शहरांमध्ये मागील 29 वर्षांपासून लपून राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हुबळीतील एका महिलेशी विवाह केलेल्या आरोपीने मागील 12 वर्षांपासून विजयपूर शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता, असे समजते. प्रकरणाच्या तपासासाठी तमिळनाडू पोलिसांनी त्याला कोयंबतूरला नेले असून, न्यायालयात हजर केले आहे. 1998 साली भाजपचे वरिष्ठ नेते एल. के. अडवाणी यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या स्फोटामध्ये 58 लोकांचा मृत्यू झाला आणि 250 लोक जखमी झाले होते.

1996 मध्ये कोयंबतूर जेलमध्ये त्याने केलेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात एक जेल वॉर्डन ठार झाला होता. “दहशतवादाशी संबंधित प्रकरणांव्यतिरिक्त, 1996 मध्ये नागूरमध्ये झालेल्या सयिता खून प्रकरण आणि 1997 मध्ये मदुरैमधील जेलर जयप्रकाश यांच्या खून प्रकरणातही टेलर राजाला आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

The post कोयंबतूर स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला विजयपुरमध्ये अटक appeared first on News 24 Tass Marathi.

रामनवमीला होणार देशातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सागरी पुलाचे उद्घाटन
तामिळनाडू : रामनवमीदिनी दिनांक ६ एप्रिल रोजी देशातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट समुद्र पुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. तामिळनाडूच्या पंबन येथे हा व्हर्टिकल लिफ्ट समुद्र पूल उभारण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन केले जाणार आहे. व्हर्टिकल लिफ्ट समुद्र पूल पंबन आणि रामेश्वरम यांना जोडणारा पूल आहे. उद्या रविवारी दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुलावरून रेल्वे आणि जहाज वाहतुकीला हिरवा कंदील दाखवतील. यानंतर दुपारी १२.४५ वाजता पंतप्रधान रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना करतील.

दुपारी दीड वाजता ते ८५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन करतील यानंतर ते जनतेला संबोधित करतील. तांबरम (चेन्नई) ते रामेश्वरम दरम्यान नव्या रेल्वे सेवेचा मोदी शुभारंभ करतील. रामेश्वरमजवळील धनुष्कोडी येथून सुरू झाले होते. त्यामुळे या पुलाचे सांस्कृतिक महत्त्वही विशेष आहे.

रामेश्वरम मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल भारतीय अभियांत्रिकीचा जगभरात लौकिक वाढवणारा ठरणार आहे. या पुलाची लांबी २.०८ किमी असून, यावर ९९ स्पॅन आणि ७२.५ मीटरचा व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन आहे, जो १७ मीटर उंचीपर्यंत वर जाऊ शकतो. यामुळे जहाजांना सहज मार्ग मिळेल आणि रेल्वे वाहतूकही अडथळाविना चालू राहील.

The post रामनवमीला होणार देशातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सागरी पुलाचे उद्घाटन appeared first on News 24 Tass Marathi.