shree mangai devi Archives | News 24 Tass Marathi

वडगावच्या श्री मंगाई देवी यात्रेसाठी जय्यत तयारी
भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बेळगाव : वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि देवस्थान समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी होणाऱ्या यात्रेसाठी व्यापारी मोठ्या संख्येने वडगावमध्ये दाखल झाले असून, परिसरात यात्रेची लगबग वाढली आहे.

बेळगाव शहर आणि उपनगरातील मोठ्या यात्रांपैकी एक म्हणून श्री मंगाई देवी यात्रेची ओळख आहे. सोमवारी रात्रीपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गर्दी नियंत्रणाचे नियोजन केले आहे. मंदिर परिसरासह प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.

यात्रेदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी नियमित बंदोबस्तासोबत अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, देवस्थान समितीनेही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी तयारीला वेग दिला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, स्वच्छता तसेच अन्य आवश्यक कामे पूर्ण करण्यात येत आहेत. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

यात्रेनिमित्त तीन ते चार दिवस वडगाव परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे विविध साहित्य व वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने दाखल झाले असून, परिसरात यात्रेचे वातावरण निर्माण झाले आहे.

The post वडगावच्या श्री मंगाई देवी यात्रेसाठी जय्यत तयारी appeared first on News 24 Tass Marathi.

श्री मंगाई देवी जत्रोत्सवाच्या धार्मिक विधींना प्रारंभ
११ ऑगस्टला होणार भव्य जत्रा ; वडगावात भक्तिमय वातावरण

बेळगाव : वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या प्राथमिक धार्मिक विधींना शुक्रवारी सायंकाळी पारंपरिक ‘वरा’ अर्पण करण्याच्या विधीने प्रारंभ झाला. या धार्मिक सोहळ्यामुळे वडगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून जत्रोत्सवाची औपचारिक सुरुवात झाली आहे.

बेळगावसह सीमाभाग, महाराष्ट्र आणि गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवीच्या जत्रोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. ‘वरा’ सोडण्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर पुढील एक महिन्याचा पवित्र कालावधी सुरू होतो. या काळात देवीला नारळ न फोडणे आणि ओटी न भरणे, ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा भाविकांकडून श्रद्धेने पाळली जाते.

जत्रोत्सवापूर्वी येणाऱ्या एकूण नऊ मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी श्री मंगाई देवी मंदिरात विशेष पूजा, आरती आणि विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. या काळात मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणार आहेत.

यंदाचा श्री मंगाई देवीचा भव्य वार्षिक जत्रोत्सव ११ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे. त्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२ या शुभ मुहूर्तावर ‘गाऱ्हाणे आलिशिव’ हा प्रमुख धार्मिक विधी भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होईल. या विधीनंतर जत्रोत्सवाला अधिकृत प्रारंभ होणार आहे.

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती, वडगाव ग्रामस्थ आणि स्वयंसेवक भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन मिळावे यासाठी विविध नियोजन आणि आवश्यक तयारी करण्यात व्यस्त आहेत.

The post श्री मंगाई देवी जत्रोत्सवाच्या धार्मिक विधींना प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.