shok sabha Archives | News 24 Tass Marathi

दीपक दळवी यांच्या निधनाने सीमा आंदोलनात मोठी पोकळी
कोल्हापूर येथे सर्वपक्षीय शोकसभेत दीपक दळवींना श्रद्धांजली

कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ लढा देणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्या निधनामुळे सीमा आंदोलनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी आंदोलन अधिक जोमाने पुढे नेणे आवश्यक असून, कोल्हापुरातून ही चळवळ नव्याने बळकट करण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा असल्याचे मत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केले.

बेळगाव येथील निधनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना देवणे म्हणाले, “ज्येष्ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सीमा लढ्यात दळवी सुरुवातीपासून सक्रिय होते. आंदोलने-मोर्चांमध्ये सहभागी होणे गंभीर गुन्ह्यांचा धोका असतानाही दळवी यांनी सातत्याने अन्यायाविरोधात आवाज उठवला.”

मराठा महासंघाचे नेते वसंत मुळीक यांनी सांगितले, “सीमा प्रश्नासाठी दळवी यांनी संपूर्ण आयुष्य खर्चले. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ ही त्यांची भूमिका होती. सलग ७० वर्षे सुरू असलेला हा लढा जगात अनोखा असून, सीमा भागातील अनेक गावे या चळवळीत सहभागी झाली आहेत.”

दिलीप पोवार यांनी राज्य सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठी भाषिकांना न्याय मिळवून देणे हीच दळवी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. व्यंक्काप्पा भोसले यांनी दळवी हे सर्व मराठी भाषिकांचे ठाम आवाज होते, तर महेश मछले यांनी सीमा लढ्याच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल असे नमूद केले.

यावेळी शाहीर दिलीप सावंत, रिपब्लिकन पक्षाचे भाऊसाहेब काळे, विठ्ठल कोतेकर, प्रा. मधुकर पाटील, प्रभाकर शिंदे यांनी मनोगते व्यक्त केले. तसेच वाय. ए. पाटील, पी. एन. हिरगुडे, तय्यब मोमीन, संपत्ती पाटील, रोहिणी मुळीक, पद्मजा पाटील, महेश जाधव, बबनराव शिंदे, आकाश शेलार, गोपाळ पाटील व अवधूत पाटील उपस्थित होते.

The post दीपक दळवी यांच्या निधनाने सीमा आंदोलनात मोठी पोकळी appeared first on News 24 Tass Marathi.

शोकसभेत दीपक दळवींच्या सीमालढ्यातील संघर्षाचा गौरव
बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी आयुष्यभर झुंजारपणे संघर्ष करणारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना आज बेळगावमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आयोजित शोकसभेत दळवींच्या पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या सीमालढ्यातील संघर्षाचा गौरव करण्यात आला.

शोकसभेत बोलताना मान्यवरांनी दळवींच्या प्रखर नेतृत्वाचा उल्लेख केला. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणसांच्या अस्मितेसाठी त्यांनी दिलेला लढा, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला न जुमानता सीमाप्रश्न जिवंत ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा, हे सांगितले गेले. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतरही ते खचले नाहीत, उलट त्यांनी आपला लढा अधिक तीव्र केला, अशी आठवण उपस्थितांनी काढली.

ॲड. अमर येळ्ळूरकर म्हणाले की, “दळवी हे चळवळीतील एक तळमळीचे नेते होते. त्यांनी कायदेशीर बाजू अत्यंत ताकदीने उचलून धरली. मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा सदैव स्मरणात राहील.” तर युवा समितीचे सागर पाटील यांनी दळवींच्या शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.

माजी आमदार दिगंबर पाटील यांनी दळवींच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकत सांगितले, “कार्यकर्त्यांशी एकरूप होऊन राहणारा हा मनमिळावू नेता होता. त्यांनी संघटना एकजूट ठेवण्यासाठी जो संदेश दिला, तोच आता त्यांच्या पश्चात आपण सर्वांनी पाळणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” शिवसैनिक संजय मोरे यांनीही दळवींच्या स्मृतींना उजाळा दिला.

या शोकसभेला माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर नागेश सातेरी, खानापूर म.ए. समितीचे गोपाळ देसाई, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी नगरसेवक टी.के. पाटील, धनंजय जाधव, मदन बामणे आणि गजानन पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post शोकसभेत दीपक दळवींच्या सीमालढ्यातील संघर्षाचा गौरव appeared first on News 24 Tass Marathi.

मध्यवर्ती म. ए. समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी यांच्या स्मरणार्थ उद्या शोकसभा
बेळगाव / प्रतिनिधी

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री दीपक दळवी यांचे निधन झाले असून, त्यांच्या स्मरणार्थ शोकसभा शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूलजवळ), टिळकवाडी, बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

शोकसभेत नागरिक, कार्यकर्ते आणि संघटनेशी संबंधित पदाधिकारी सहभागी होतील. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे श्री दळवी यांच्या योगदानाचा आदर सन्मानपूर्वक केला जाईल.

श्री दीपक दळवी यांनी महाराष्ट्र एकीकरणासाठी केलेले कार्य आणि समाजसेवेत केलेला वाटा अनेकांनी आदर्श मानला आहे. या शोकसभेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येईल.

The post मध्यवर्ती म. ए. समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी यांच्या स्मरणार्थ उद्या शोकसभा appeared first on News 24 Tass Marathi.

सीमाप्रश्नाची जाण असलेले नेतृत्व हरपले
येळ्ळूरवासियांकडून अजितदादांना श्रद्धांजली

येळ्ळूर / वार्ताहर

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला आहे. सहकार, कृषी आणि जलसिंचन क्षेत्रात दूरदृष्टीने राबवलेल्या योजनांमुळे विकासाभिमुख ओळख निर्माण करणारे, तसेच सीमाप्रश्नाची सखोल जाण असलेले अष्टपैलू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना येळ्ळूर येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त करण्यात आली. मराठी भाषिकांनी एकजूट राखून मराठी भाषेचे संवर्धन करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे एपीएमसी सदस्य वामनराव पाटील होते. प्रारंभी वामनराव पाटील व लक्ष्मी मासेकर यांच्या हस्ते अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रास्ताविकात प्रकाश अष्टेकर यांनी सीमाभागातील मराठी संस्थांना आर्थिक बळ मिळावे यासाठी अजितदादांनी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्याचा उल्लेख केला. सीमाप्रश्नाकडे त्यांचे सातत्याने लक्ष होते, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते दत्ता उघाडे यांनी अजितदादांच्या नेतृत्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. काँग्रेसतर्फे आण्णा हणमंत पाटील यांनी सीमाप्रश्नासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज अधोरेखित केली. भाजपचे अरविंद पाटील यांनी अजितदादा हे अत्यंत शिस्तप्रिय नेते असून सकाळी सहा वाजल्यापासून कार्यात मग्न राहत असत, अशी आठवण सांगितली.

समाज सारथी सेवा संघाचे अध्यक्ष सी. एम. गोरल यांनी अजितदादा दिलखुलास, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या जाण्याने आपण पोरके झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. दुद्दापा बागेवाडी, राजू पावले आदींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात वामनराव पाटील यांनी पवार कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण येळ्ळूर गाव सहभागी असल्याचे सांगितले.

या सर्वपक्षीय शोकसभेला माजी तालुका पंचायत सदस्य चांगदेव परीट, नवहिंद सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव सायनेकर, ब्रह्मलिंग सोसायटीचे नेताजी गोरल, स्वामी विवेकानंद सोसायटीचे प्रकाश पाटील, डॉ. तानाजी पावले, ग्रामपंचायत सदस्य दयानंद उघाडे, राकेश परीट, पिंटू चौगुले, विलास बेडरे, सतीश देसूरकर, शशिकांत धुळजी, कल्लापा मेलगे, अनुसया परीट, श्रीमती रेणुका मेलगे, नारायण काकतकर, लक्ष्मण बेकवाडकर, सूरज गोरल, यलाप्पा आ. पाटील, संजय गोरल, हणमंत पाटील, बळीराम देसूरकर, सुभाष मजुकर, रमेश धामणेकर, कृष्णा बिजगरकर, कृष्णा शहापूरकर, नंदकुमार पाटील, शिवाजी कदम, मधुसूदन पाटील, प्रकाश मालुचे, आण्णा संभाजी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post सीमाप्रश्नाची जाण असलेले नेतृत्व हरपले appeared first on News 24 Tass Marathi.