rural area Archives | News 24 Tass Marathi

मोबाईलच्या वादातून मित्राची हत्या
मुरगोड पोलिसांकडून आरोपीला अटक

चिकबुदनूर गावातील घटना

दगडाने ठेचून खून केल्याचा आरोप

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील चिकबुदनूर गावात मोबाईल फोनवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान एका मित्राच्या निर्घृण हत्येत झाले. या प्रकरणी मुरगोड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

मृताची ओळख फकीरप्पा मल्लप्पा हिडकन्णावर (वय ४०) अशी झाली असून ते मजुरीचे काम करत होते. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मल्लिकार्जुन सिध्दप्पा पुजारी (वय २५) असे आहे. दोघेही मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चिकबुदनूर गावातील लक्ष्मीदेवी मंदिराच्या आवारात सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फकीरप्पा यांनी मल्लिकार्जुन यांचा मोबाईल फोन घेतला होता. तो परत देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

फकीरप्पा मंदिराच्या ओसरीवर झोपले असताना मल्लिकार्जुन तेथे आला आणि मोबाईल परत देण्याची मागणी केली. मात्र, फकीरप्पा यांनी मोबाईल रात्री देईन, असे सांगत तत्काळ परत देण्यास नकार दिल्याने दोघांतील वाद चिघळला.

वादाच्या भरात संतापलेल्या मल्लिकार्जुनने मंदिराच्या आवारात पडलेला मोठा दगड उचलून फकीरप्पा यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत झाल्याने फकीरप्पा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताच्या पत्नी भारती हिडकन्णावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

The post मोबाईलच्या वादातून मित्राची हत्या appeared first on News 24 Tass Marathi.

बाळेकुंद्री खुर्द विकासापासून वंचित
मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थ संतप्त

सांडपाणी रस्त्यावर, चिखल-दुर्गंधीने नागरिक हैराण

प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

बाळेकुंद्री : बेळगाव शहरापासून अवघ्या १० किलोमीटरवर आणि सांबरा विमानतळालगत असलेल्या बाळेकुंद्री खुर्द गावात गेल्या दहा वर्षांपासून विकासकामे रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, सांडपाण्याची समस्या आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे जनजीवन त्रस्त झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

फुलबाग गल्ली, कसाई गल्ली, टिपू सुलतान गल्ली, मुल्ला गल्लीसह गावातील अनेक भागांमध्ये सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नसल्याने घरातील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल साचून दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाला आहे.

विशेषतः मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दूषित पाणी वाहत असल्याने नमाजासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दूषित पाणी अंगावर उडत असल्याने धार्मिक कार्यातही अडथळे निर्माण होत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

गेल्या दशकभरात या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने रस्ते आणि सांडपाणी निचऱ्याची समस्या सोडवावी, अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

The post बाळेकुंद्री खुर्द विकासापासून वंचित appeared first on News 24 Tass Marathi.