Rakshbandhan Archives | News 24 Tass Marathi

रोटरी दर्पणतर्फे मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांसोबत रक्षाबंधन
बेळगाव : कृतज्ञता व देशभक्तीची भावना जपण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेलगाव दर्पण (RCBD) यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर मधील शूर जवानांसोबत राखी पौर्णिमा (रक्षाबंधन) साजरी केली. कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या स्नेहपूर्ण उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम सर्वांसाठी अभिमानास्पद व संस्मरणीय ठरला.

रोटरी दर्पणच्या अध्यक्ष रोटे. ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी व क्लब सचिव रोटे. कवरी करूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्यात राखी बांधण्याची परंपरा ही केवळ सणापुरती मर्यादित न राहता देशरक्षणासाठी असलेल्या जवानांच्या अथक सेवेचा सन्मान आहे.

“ही आमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी क्षणयात्रा होती, आपल्या मातृभूमीच्या रक्षकांबद्दल प्रत्यक्ष कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली,” असे सदस्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी इव्हेंट चेअर रोटे. सविता वेसणे यांचे विशेष योगदान होते. तसेच सेवानिवृत्त सुबेदार मेजर सुधाकर चाळके यांचेही विशेष आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी सदस्य रोटे. सुरेखा मुम्मिगट्टी, डॉ. स्पूर्ती मस्तीहोळी, शीला पाटील, कोमल कोळ्लीमठ, सविता हेब्बार, यशस्वी व रोटरॅक्ट सदस्य प्रीती मन्निकेरी उपस्थित होते.

The post रोटरी दर्पणतर्फे मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांसोबत रक्षाबंधन appeared first on News 24 Tass Marathi.

रक्षाबंधन चांगल्या आचार – विचारांच्या रक्षणाचा सण ; ब्रह्माकुमारी राधिका
बेळगाव : श्रावण मासातील विविध सण आणि उत्सवातून आंतरिक शक्ती प्राप्त होते.रक्षाबंधन हा सण केवळ भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण नसून, चांगल्या आचार विचार रक्षणाचा सण असल्याचे प्रतिपादन, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शहापूर शाखेच्या ब्रह्मकुमारी राधिका बहेन यांनी बोलताना व्यक्त केले.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने आज शनिवारी सकाळी शहापूर बॅरिस्टर नागपूर चौक येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात शहापूर टपाल कार्यालयातील कर्मचारी तसेच उपस्थित पत्रकारांना ब्रह्माकुमारी यांच्या हस्ते राखी बांधण्यात आल्या. या कार्यक्रमाला शहापूर टपाल कार्यालयाचे पोस्टमास्तर एस. पी. कांबळे तसेच ब्रह्माकुमार काशिनाथ भाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ब्रह्मकुमारी राधिका बहेन म्हणाल्या, आधुनिक युगात विज्ञानाने मोठी झेप घेतली आहे. मात्र, तरीही सर्वांनाच सुख शांती मिळताना दिसत नाही.अध्यात्मिक मार्गातूनच प्रत्येकाला जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त होते. माणसाच्या जीवनात शालिनता हवी. जीवनात चारित्र्याचे महत्त्व मोठे आहे. याचे सर्वांनी भान राखावे. ईश्वरीय संदेश देण्याचे काम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने केले जात आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. ब्रह्माकुमार काशिनाथ भाई यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कार्याचे माहिती विशद केली.

कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत श्रीकांत काकतीकर यांनी केले. उपेंद्र बाचीकर यांनी प्रास्ताविक केले.आभार प्रदर्शन हिरालाल चव्हाण यांनी केले. ब्रह्माकुमारी सुमन, ब्रह्माकुमारी प्रमिळा,ब्रह्माकुमारी शकुंतला, ब्रह्माकुमारी मंजुळा यांच्याबरोबरच सविता जौलर, संजय चौगुले, हरीश दिवटे, उमेश राऊळ अन्य सदस्य यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

The post रक्षाबंधन चांगल्या आचार – विचारांच्या रक्षणाचा सण ; ब्रह्माकुमारी राधिका appeared first on News 24 Tass Marathi.

मराठा लाईट इन्फंट्री येथे जवानांचे सामूहिक रक्षाबंधन
बेळगाव / प्रतिनिधी

भावा बहिणींच्या नात्याचा गोडवा जपणाऱ्या राखी पौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या महिला व विद्यार्थिनीतर्फे मराठा सेंटर बेळगाव येथे जवानांचा सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला. राखी पौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या महिला व विद्यार्थिनींनी आज शुक्रवारी सकाळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला खास भेट दिली. तसेच देशाचे संरक्षण करणाऱ्या तेथील जवान आणि अग्निविरांच्या मनगटावर भाऊ व बहिणी मधील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेली राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.

या कार्यक्रमात बेळगाव शहरासह आसपासच्या परिसर तसेच कोल्हापूर व गोवा येथील भगिनींचा सहभाग होता. याप्रसंगी बोलताना एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी सर्वप्रथम मराठा सेंटरच्यावतीने उपस्थित सर्व भगिनींचे हार्दिक स्वागत केले. रक्षाबंधनाचा पवित्र सण आपण सर्वजण आमच्या सोबत साजरा करत आहात ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आज तुम्ही आम्हाला जो सन्मान दिला आहे त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव आभारी राहू. आम्ही आज देशाचे तुमचे संरक्षण करण्याचे जे काम करत आहोत ते आमचे कर्तव्यच आहे. कर्तव्य, मान, साहस या तीन गोष्टी ध्यानात ठेवून आम्ही काम करत असतो. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर ही संरक्षण दलाची सर्वात जुनी रेजिमेंट असून जी स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे १९२२ पासून बेळगावमध्ये अस्तित्वात आहे. या पद्धतीने आमच्या रेजिमेंटला या ठिकाणी १०० वर्षे पूर्ण झाली असून अजून हजारो वर्षे आम्ही येथे राहू. बंधू मानून तुम्ही आम्हाला राखी बांधली बहिण-भावाचे हे नाते असेच यापुढेही कायम राहून वृद्धिंगत होत राहील, असे सांगून देव ना करो तुमच्यावर कोणते संकट अथवा आपत्ती येवो, मात्र जर का तसेच झाले तर केंव्हाही मदतीसाठी आम्हाला हाक मारा.आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तयार असू असे ब्रिगेडियर मुखर्जी यांनी शेवटी स्पष्ट केले.

The post मराठा लाईट इन्फंट्री येथे जवानांचे सामूहिक रक्षाबंधन appeared first on News 24 Tass Marathi.

जोशीज पब्लिक स्कूलमध्ये राखी प्रशिक्षण कार्यशाळा
बेळगाव / प्रतिनिधी

मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल मध्ये रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व मुलांनी उत्साहाने भाग घेतला आणि आकर्षक राख्या बनवल्या. त्यांना तज्ञ कला प्रशिक्षक बिना तलाठी, मनाली कुलकर्णी आणि मनीषा हरिदास यांनी मौलिक मार्गदर्शन केले. शाळेतल्या सर्व शिक्षकांनी मुलांना मदत केली. शाळेच्या प्राचार्य आर. आर. जोशी, अरुण जाधव उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रशिक्षकांना गौरविण्यात आले.

The post जोशीज पब्लिक स्कूलमध्ये राखी प्रशिक्षण कार्यशाळा appeared first on News 24 Tass Marathi.