rain Archives | News 24 Tass Marathi

महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा परिणाम ; कृष्णा नदीच्या विसर्गात मोठी वाढ
चिक्कोडी-निपाणी तालुक्यात पुराची भीती

सात पूल पाण्याखाली , अनेक गावांचा संपर्क तुटला

चिक्कोडी : महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता सीमाभागातही जाणवू लागला आहे. वाढलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओघ वाढल्याने कल्लोळ गावाजवळ कृष्णा नदीत सध्या सुमारे ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अवघ्या एका दिवसात नदीची पाणीपातळी सुमारे दोन फुटांनी वाढली असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कृष्णा नदीसह तिच्या उपनद्यांमधील पाणीपातळी वाढल्यामुळे चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील सात कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये येडूर–कल्लोळ, बावन सौंदत्ती–मांजरी, बारवाड–कुन्नूर, कारदगा–भोज, भोज–शिवापूरवाडी, अक्कोळ–सिद्नाळ आणि हुन्नरगी–ममदापूर या पुलांचा समावेश आहे.

हे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा थेट संपर्क तुटला असून, नागरिक आणि वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

The post महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा परिणाम ; कृष्णा नदीच्या विसर्गात मोठी वाढ appeared first on News 24 Tass Marathi.

पांगुळ गल्लीत पावसाच्या पाण्याने मुख्य बाजारपेठ जलमय
दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

बेळगाव : शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या पांगुळ गल्ली आणि गणपत गल्ली परिसरात मुसळधार पावसानंतर पाण्याचा निचरा न झाल्याने संपूर्ण बाजारपेठ जलमय झाली. विविध विकासकामांसाठी करण्यात आलेल्या खोदाईनंतर योग्य निचरा व्यवस्था न केल्याने पावसाचे पाणी थेट रस्ते, दुकाने आणि व्यापारी आस्थापनांमध्ये शिरले असून, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात व्यापारी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पांगुळ गल्ली ही शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या बाजारपेठांपैकी एक मानली जाते. मात्र, पावसाच्या प्रत्येक सरीत येथे पाणी साचण्याची समस्या गंभीर बनत आहे. यावेळीही निचऱ्याचे मार्ग बंद झाल्याने पावसाचे पाणी दुकानांमध्ये घुसले. त्यामुळे व्यापाऱ्यांचा माल भिजून नुकसान झाले, तर रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाल्यांची मोठी गैरसोय झाली.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला असून, पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. पावसाच्या पाण्यासोबत तुंबलेल्या गटारातील पाणीही रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुख्य बाजारपेठ असूनही या कायमस्वरूपी समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. विकासकामांच्या नावाखाली करण्यात आलेल्या खोदाईचे योग्य नियोजन आणि जलनिस्सारणाची व्यवस्था न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आरपीडी सर्कल परिसरातही प्रत्येक पावसाळ्यात गटाराचे पाणी रस्त्यावर येण्याची समस्या कायम असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. लोकप्रतिनिधींकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

The post पांगुळ गल्लीत पावसाच्या पाण्याने मुख्य बाजारपेठ जलमय appeared first on News 24 Tass Marathi.

राकसकोप जलाशय पूर्ण भरण्यास अजून १०.०८ फूट पाण्याची गरज
पावसाच्या सरींमुळे दिलासा ; मात्र गेल्या दहा दिवसांतील पावसाच्या खंडामुळे वाढीचा वेग मंदावला

बेळगाव : शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत असली तरी जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप १०.०८ फूट पाण्याची आवश्यकता आहे. जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रासह बेळगाव शहर आणि तालुक्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत असून, शेतकऱ्यांच्या पिकांनाही त्याचा काहीसा दिलासा मिळत आहे.

सध्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी २४६४.७० फूट इतकी नोंदविण्यात आली असून, जलाशय पूर्ण भरावयास आणखी १०.०८ फूट पाण्याची गरज आहे. यंदा जून महिनाभर समाधानकारक पाऊस न झाल्याने जलाशयातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला होता. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

मात्र, जुलै महिन्याच्या प्रारंभी सलग आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आणि जलाशयाची पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे शहरवासीयांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला.

तथापि, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने पाणीपातळीतील वाढीचा वेग मंदावला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढू लागली असून, जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आगामी काही दिवसांत चांगल्या पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.

हवामानातील बदलत्या परिस्थितीकडे प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास राकसकोप जलाशय लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

The post राकसकोप जलाशय पूर्ण भरण्यास अजून १०.०८ फूट पाण्याची गरज appeared first on News 24 Tass Marathi.

मुसळधार पावसामुळे खानापुरातील मडवाळ-हलशी रस्ता खचला
दहा गावांचा संपर्क तुटण्याची भीती

वाहतुकीला धोका ; तातडीच्या दुरुस्तीची मागणी

खानापूर : तालुक्यातील मडवाळ – हलशी मार्गावरील नाल्यालगतचा रस्ता मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास या मार्गावरील सुमारे दहा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे मडवाळ–हलशी रस्त्यालगतच्या नाल्याच्या बाजूचा भाग कोसळू लागला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षीही या रस्त्याची एक बाजू खचली होती. यंदा दुसऱ्या बाजूनेही धूप सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

या मार्गावरून मडवाळ, हलशी, देवराई, घोटगाळी, रेडेकुंडी, तारवाड, रंजनकोडी, शिवठाण यांसह सुमारे दहा गावांची वाहतूक होते. रस्ता आणखी खचल्यास या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली असून, कोणत्याही क्षणी वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असल्याने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब देसाई, महादेव फटाण आणि स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून नाल्यालगत कायमस्वरूपी मजबूत रस्ता उभारावा, असा आग्रहही नागरिकांनी धरला आहे.

The post मुसळधार पावसामुळे खानापुरातील मडवाळ-हलशी रस्ता खचला appeared first on News 24 Tass Marathi.

राकसकोप जलाशयात आठ दिवसांत १३ फूट पाणीसाठा
जलाशय पूर्ण भरण्यासाठी अद्यापही १६ फूट पाण्याची गरज

बेळगाव : जुलैच्या पहिल्या तारखेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राकसकोप जलाशयातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत पाणीपातळी १३ फुटांनी वाढली आहे. गुरुवारी (दि.९) जलाशयात पातळी २,४५८.८० फूट पाणी होते. गतवर्षी याच दिवशी पाणीपातळी २,४७४ फूट होती. जलाशय तुडुंब होण्यासाठी आणखी १६ फूट पाण्याची गरज आहे.

जलाशय परिसरात आतापर्यंत एकूण ९३८.५ मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारी पहाटे संपलेल्या चोवीस तासांत ९२.५ मिमी पावसाची नोंद झाली. सतत दहा दिवस झालेल्या पावसामुळे जलाशय परिसरातील नाले प्रवाहीत झाल्याने मृत साठ्यांपेक्षा कमी पातळी गाठलेल्या राकसकोप जलाशयात १३ फूट पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे, पाणीपातळी २,४५९ फुटांपर्यंत पोचली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत जलाशयात ११ फूट कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी या महिन्यात जलाशय तीनवेळा तुडुंब झाले होते. यंदा हे जलाशय भरण्यासाठी १६ फूट पाण्याची आवश्यक्ता आहे. त्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यक्ता आहे. मात्र, गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलाशय भरण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

The post राकसकोप जलाशयात आठ दिवसांत १३ फूट पाणीसाठा appeared first on News 24 Tass Marathi.

मुसळधार पावसाचा फटका; सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षक भिंत कोसळली
सुदैवाने जीवितहानी टळली

शहापूरातील नाथ पै चौक परिसरातील घटना

बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील शहापूर परिसरातील नाथ पै चौकाजवळ असलेल्या सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सततच्या पावसामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाला होता. तसेच पावसाचे पाणी भिंतीतून झिरपल्याने तिची मजबुती कमी झाली आणि अखेर संरक्षक भिंत अचानक कोसळली.

या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी सिद्धार्थ बोर्डिंगच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. परिसरात काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सततच्या पावसामुळे जुन्या आणि धोकादायक इमारती तसेच संरक्षक भिंतींची तातडीने तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

The post मुसळधार पावसाचा फटका; सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षक भिंत कोसळली appeared first on News 24 Tass Marathi.

मार्कंडेय नदीला पूर ; कडोलीसह परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली
बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, कडोलीसह नदीकाठच्या गावांतील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात, ऊस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीतील पाण्याची आवक वाढली आहे. मार्कंडेय नदीला आलेल्या पुराचा फटका कडोली, कंग्राळी खुर्द, आंबेवाडी, अलतगा, बेळगुंदी आणि हिंदलगा परिसराला बसला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने उभी पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी चिंतेत आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करण्यात आली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एसडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

नागरिकांनी नदीकाठावर जाणे, पुराच्या पाण्यात उतरणे किंवा सेल्फी काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

The post मार्कंडेय नदीला पूर ; कडोलीसह परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव परिसरात मुसळधार पाऊस
नद्या-जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ

बेळगाव : बेळगावसह खानापूर, निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यांत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा आदी नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठाही दोन फुटांनी वाढला आहे.

सततच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही भागांमध्ये सखल परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बुधवारी सकाळपासूनही पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयांतील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने मात्र नदीकाठच्या आणि पूरप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

The post बेळगाव परिसरात मुसळधार पाऊस appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्ह्यातील १६ गावे संपर्काबाहेर ; ८ पूल पाण्याखाली
पूरस्थिती गंभीर : अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

बेळगाव : महाराष्ट्रासह सीमाभागात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील १६ हून अधिक गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. चिकोडी उपविभागातील आठ छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

मुळंकी–दत्तवाड, कारदगा–भोज, अकोळ–सिदनाळ, जत्राट–भिवशी, बारवाड–कन्नूर आणि भोजवाडी–गजवरवाडी या जोडपुलांसह अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. बेळगाव आणि खानापूर तालुक्यांतही संततधार पाऊस सुरू असून, जुलैच्या पहिल्या सहा दिवसांत सरासरीपेक्षा १३४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्रातून कृष्णा नदीत सुमारे २८ हजार क्युसेक अतिरिक्त पाण्याची आवक झाली असून, जिल्ह्यातील कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, मलप्रभा आणि मार्कंडेय या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर किंवा त्यापेक्षा वरून वाहत आहेत. दूधगंगा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या शेतजमिनीत पाणी शिरले आहे.

निपाणी तालुक्यातील शिरडवाड गावातील ज्वारी, उडीद आणि सोयाबीनची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, निपाणी आणि चिकोडी तालुक्यांतील आठ प्रमुख पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

The post बेळगाव जिल्ह्यातील १६ गावे संपर्काबाहेर ; ८ पूल पाण्याखाली appeared first on News 24 Tass Marathi.

मुसळधार पावसामुळे बेळगाव, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील शाळांना उद्या बुधवारीही सुट्टी
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा आदेश

बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बुधवार, दि. ८ जुलै रोजी बेळगाव शहर व ग्रामीण, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुट्टी केवळ अंगणवाडी केंद्रे तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी लागू असून, इतर शैक्षणिक संस्थांबाबत कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.

The post मुसळधार पावसामुळे बेळगाव, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील शाळांना उद्या बुधवारीही सुट्टी appeared first on News 24 Tass Marathi.