police route march Archives | News 24 Tass Marathi

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडेबाजार – मार्केट परिसरात जलद कृती दलाचे पथसंचलन
सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च

विसर्जन मिरवणुकीसाठी जलद कृती दल सज्ज

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, शनिवारी खडेबाजार आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत जलद कृती दलाच्या (RAF) जवानांनी पथसंचलन केले. स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाने संवेदनशील भागातून हे संचलन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी RAFची १४० जवानांची तुकडी बेळगावात दाखल झाली आहे. तुकडी शहरात दाखल झाल्यापासून दररोज सकाळी आणि सायंकाळी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पथसंचलन केले जात आहे.

उत्सव काळात शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून व्यापक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान जलद कृती दलाचा वापर करण्यात येणार आहे.

RAFच्या अधिकारी आणि जवानांना बेळगाव शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, तसेच संवेदनशील ठिकाणांचा परिचय व्हावा, यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नियमित पथसंचलन केले जात आहे.

शनिवारी झालेल्या पथसंचलनात पोलीस आयुक्त प्रकाश निकम, उपायुक्त नारायण बरमणी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.

The post गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडेबाजार – मार्केट परिसरात जलद कृती दलाचे पथसंचलन appeared first on News 24 Tass Marathi.

गणेशोत्सवासाठी बेळगाव जिल्ह्यात चार हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त
सीसीटीव्ही ; ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करडी नजर

बेळगाव : यंदाच्या गणेशोत्सवासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. बेळगाव जिल्ह्यात आणि शहरात मिळून तब्बल चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.

बेळगाव शहर आणि जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा जिल्ह्यात एकूण साडेसहा हजाराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना होणार आहे.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक तालुक्यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे. संवेदनशील भागामध्ये जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच चक जिल्हा पोलीस मुख्यालयातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

“कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,”असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी वाहतुकीत बदल करण्यात येणार असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post गणेशोत्सवासाठी बेळगाव जिल्ह्यात चार हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त appeared first on News 24 Tass Marathi.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची विशेष तयारी

बेळगाव : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी बुधवारी बाजारपेठ परिसरात व्यापक पथसंचलन केले.

सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुरक्षितता कायम राहावी, या उद्देशाने हे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पथसंचलनात पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

हे पथसंचलन खडेबाजार, किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली आदी प्रमुख मार्गांवरून काढण्यात आले. पोलिसांच्या या हालचालीमुळे बाजारपेठ परिसरात सुरक्षा व्यवस्थेची जाणीव अधिक ठळकपणे दिसून आली.

यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. “बकरी ईदसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे. सर्व धर्मीय समाजांच्या भावना जपत सण शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनीही परस्पर सहकार्य, सहिष्णुता आणि शांतता राखावी,” असे त्यांनी सांगितले.

The post बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन appeared first on News 24 Tass Marathi.

रॅपिड ॲक्शन फोर्स – पोलिसांचे शहरात पुन्हा पथसंचलन
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने काल शुक्रवारी शहरामध्ये पुन्हा एकदा रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी पथसंचलन (रूट मार्च) झाले.

श्री गणेशोत्सव काळात बेळगाव मधील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांसह परगावचे नागरिक प्रचंड संख्येने गर्दी करत असतात. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने काल शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा शहरातील विविध मार्गांवर रॅपिड ॲक्शन फोर्स आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथसंचलन काढण्यात आले. या रूट मार्चला अर्थात पथसंचलनाला शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून प्रारंभ होऊन काकती वेस, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खुट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक मार्गे हेमुकलानी चौक येथे पथसंचलनाची सांगता झाली.

या पथसंंचालनात खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच., खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गावी, वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील आदींसह शहरातील इतर कांही पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, बेळगाव शहरातील नागरिकांनी श्री गणेश चतुर्थीसह श्री गणेशोत्सव शांततेने आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत या पद्धतीने सौहार्दपूर्णरित्या साजरा करावा. त्याचप्रमाणे सर्व नियमांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.

The post रॅपिड ॲक्शन फोर्स – पोलिसांचे शहरात पुन्हा पथसंचलन appeared first on News 24 Tass Marathi.