marathi sahitya samelan Archives | News 24 Tass Marathi

प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी
प्रा. डॉ. बी. एम. हिर्डेकर अध्यक्ष

बेळगांव : प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि शिवाजी विद्यापीठातील निवृत्त परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते.

कवीवर्य नारायण सुर्वे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त त्यांचे काव्यलेखन व कार्य तसेच गेल्या अकरा वर्षांपासून राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर अनेक अंगांनी हल्ले होत असून राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यघटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी लेखकांचीही आहे. म्हणून लोकशाहीवर होणारे हल्ले व लेखकांची जबाबदारी ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. संमेलनाचे उद् घाटन प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय महासचिव व लेखक डॉ. सुखदेवसिंग सिरसा, चंदिगड यांच्या हस्ते होणार आहे.

चार सत्रात हे संमेलन होणार आहे. सकाळी दहा वाजता पहिल्या सत्रात उद् घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये उद् घाटक व अध्यक्ष यांची भाषणे होतील. साडेबारा वाजता दुसरे सत्र होईल. त्यामध्ये अन्नपूर्णा महिला मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न कॉम्रेड अरुणा असफ आली पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार मुंबईतील सफाई कामगारांचे नेते कॉ. दीपक भालेराव यांना अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत भोजन होईल. त्यानंतरच्या तिसऱ्या सत्रात विशेष व्याख्यान होईल. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांचे नारायण सुर्वे यांचे काव्यविश्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे राहाणार आहेत.

चौथ्या सत्रात सायंकाळी पाच वाजता प्रगतिशील लेखक संघाच्या सदस्यांकडून नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन होणार आहे. संकल्पना व संहिता लेखन कॉ. अनिल आजगावकर यांचे आहे. या कार्यक्रमात प्रा. अशोक अलगोंडी, निला आपटे, मधु पाटील व रोशनी हुंद्रे यांचा सहभाग राहाणार आहे.

अध्यक्षीय समारोपानंतर संमेलनाची सांगता होणार आहे. कवीवर्य पद्मश्री कॉ. नारायण सुर्वे साहित्यनगरी, श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल प्रांगण) रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ, खानापूर रोड, बेळगांव येथे हे संमेलन होणार आहे. बैठकीस पदाधिकारी व बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

The post प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगुंदी येथे उद्या २० वे मराठी साहित्य संमेलन
बेळगुंदी ता. ३१ : बेळगुंदी येथे उद्या रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी, २० वे मराठी साहित्य संमेलन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज साहित्यनगरी मरगाई देवस्थान परिसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी, अनुवादकार, समीक्षक, साहित्यिक, पुणे या असणार आहेत. संमेलन चार सत्रात सकाळी ७.३० ते रात्री ६ वा.पर्यंत होणार आहे.

संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, संमेलनाचे उद्घाटन माननीय श्री. मोहन यल्लाप्पा मोरे माजी अध्यक्ष आरोग्य शिक्षण व स्थायी समिती जि. पं. बेळगाव यांच्याहस्ते होणार आहे, त्यानंतर स्वागताध्यक्ष माननीय डॉ. अरुण मारुती जाधव – प्राचार्य, आधार एज्युकेशन सोसायटी, बेळगांव उपस्थितांचे स्वागत करणार आहेत. पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे.

दुसऱ्या सत्रात प्रा. वैजनाथ महाजन, जेष्ठ समिक्षक सांगली यांच्या अध्यक्षतेखाली ‘वाचू आनंदे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये मा. श्री. चिंतामणी सहस्त्रबुद्धे, न्यूज ब्युरोचीप, सांगली, मा. शेखर जोशी, सहयोगी संपादक दै. सकाळ सांगली, मा. प्रा. संजय ठिगळे, माजी सदस्य मराठी विश्वकोश मंडळ, सांगली यांचा सहभाग असणार आहे.

दुपारी १.३० ते २.३० पर्यंत स्नेहभोजन होणार आहे. तिसऱ्या सत्रात मालगांव मिरज, येथील जि. पं. शाळेचे मुख्याध्यापक कवी श्री. गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. यामध्ये कवी श्री. मुबारक उमराणी, कवी सेंट ऑगस्टीन हायस्कूल, नेरुळ, नवी मुंबई व स्थानिक निवडक नवोदित कवी सहभागी होणार आहेत.

चौथ्या सत्रात कथाकथनकार श्री. शरद जाधव, धनगांव, पलुस – सांगली यांचे कथाकथन होणार आहे. यानंतर बेळगुंदी पंचक्रोशीतील सन २०२४ – २५ साली इयत्ता १० मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

संमेलन नगरीला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे, तर प्रवेशद्वाराला श्री रवळनाथ प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे.

संमेलनाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी, ग्रामस्थ पंच कमिटी, ग्रामपंचायत, महिला मंडळे, आमदार आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा, बालवीर विद्यानिकेतन, सेंट पॉल्स हायस्कूल, बेळगुंदी हायस्कूल बेळगुंदी, कन्या विद्यालय बेळगुंदी शिक्षकवृंद, विद्यार्थी – विद्यार्थीनी, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, सेवाभावी संस्था, सर्व प्रसारमाध्यमे, हितचिंतक बेळगुंदी, ता. बेळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

The post बेळगुंदी येथे उद्या २० वे मराठी साहित्य संमेलन appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर ग्रामीण साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ उत्साहात
बेळगाव / प्रतिनिधी

रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या एकविसाव्या येळ्ळूर ग्रामीण साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ येळ्ळूर येथील वाडी शाळेच्या पटांगणावर उत्साहात रोवण्यात आली. गोविंद टक्केकर यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवून संमेलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे मदन बामणे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख वक्ते अनंत लाड यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा ही वारसा हक्काप्रमाणे संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्यापर्यंत चालत आलेली आहे, असे प्रतिपादन केले.

मदन बामणे यांनी मराठी भाषा ही संस्कृतीचे दर्पण असून तिच्यातून मानवतावादी विचारांची उजळणी होत असल्याचे सांगितले. श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले. प्रास्ताविक जयंत मोटराचे यांनी मांडले, तर आभार राम पाखरे यांनी मानले. संमेलनाच्या तयारीला यामुळे अधिक वेग आला असून साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

The post येळ्ळूर ग्रामीण साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

उचगाव येथे २५ व्या मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी
ग्रंथदिंडी, साहित्यिकांच्या मांदियाळीत उद्या रंगणार संमेलन

उचगाव / वार्ताहर

विठ्ठल भक्तीच्या ओढीने वारकरी दरवर्षीच्या उत्कट भावनेने पंढरीची वारी करतात त्याच भावनेने उचगाव येथे उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी रसिक, वारकरी ,आवर्जून येतात त्यांच्या स्वागतासाठी उचगाव नगरी सज्ज झाली असून साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. गावात उत्साहाचे वातावरण असून उचगावच्या मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई च्या प्रांगणातील गांधी चौकामध्ये संमेलन स्थळी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. ग्रंथ दिंडी मार्गावर आणि ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आले आहेत .सीमा भागातील मराठी भाषेचे संवर्धन करणे ,साहित्यिक निर्माण करणे तसेच मराठी साहित्याचा प्रसार व्हावा या हेतूने उचगाव परिसरातील मराठी भाषिक गेली 24 वर्षे संमेलनाच्या माध्यमातून कार्यरत आहेत .संमेलनासाठी महाराष्ट्रातून दिग्गज साहित्यिक आणि बेळगाव, निपाणी ,चंदगड, खानापूर तालुक्यातील साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .संमेलनासाठी लोकमान्य मल्टी परपज सोसायटीचे संस्थापक ,चेअरमन आणि तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकूर यांची या संमेलनाला खास उपस्थिती राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ठीक साडेनऊ वाजता गांधी चौकातून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये वारकरी, सांप्रदायाचे भजनी मंडळ ,महिला भजनी मंडळ ,ढोल, ताशा ,झांजपथक, लेझीम तसेच परिसरातील शाळांचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी उचगाव पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक संघटनेचे सैनिक वेशभूषेमध्ये सामील होणार आहेत. ही ग्रंथदिंडी गणपत गल्ली मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कचेरी गल्लीतून संमेलन स्थळी येणार आहे.

यानंतर गणेश पूजन उचगाव ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष बाळकृष्ण खाचो तेरसे यांच्याहस्ते होणार आहे. विठ्ठल रखुमाई पूजन मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर आणि अशोक कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. श्रीराम पूजन वेंकटेश शहापूरकर यांच्या हस्ते तर मळेकरणी देवीचे पूजन बाळकृष्ण नेसरकर यांच्या हस्ते होणार आहे. पालखी पूजन डॉ. सोनाली सरनोबत, ग्रंथ दिंडी पूजन बसवंत मायानाचे, ग्रंथ दिंडी उद्घाटन धनंजय जाधव, ग्रंथ दिंडी मिरवणूक शुभारंभ संजय सुंठकर, पुस्तक प्रदर्शन उद्घाटन शेखर हांडे, सभामंडपाचे उद्घाटन जयवंत बाळेकुंद्री, व्यासपीठाचे उद्घाटन राजू जाधव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन बाळाराम पाटील ,सरस्वती फोटो पूजन प्रेमानंद गुरव, ज्ञानेश्वर फोटो पूजन दिनकरराव पावशे या मान्यवरांच्या हस्ते हा पूजनचा कार्यक्रम पार पडणार आहे.

याबरोबरच चार सत्रातील साहित्यिकांचे विचार साहित्यिक मांडणार आहेत. तरी या संमेलनाला सर्व साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर,सेक्रेटरी एन.ओ.चौगले , कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी केले आहे.

The post उचगाव येथे २५ व्या मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी appeared first on News 24 Tass Marathi.

संमेलन पार पाडण्यासाठी उचगाववासीय सज्ज
उचगाव / वार्ताहर

उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २५ वे उचगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १८ जानेवारी रोजी दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत होणार आहे. हा सोहळा दिमाखात पार पाडण्यासाठी उचगाववासीय सज्ज झाले आहेत.

माऊली, जि. सांगली येथील इंद्रजीत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून पहिल्या सत्रात अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात पुणे येथील डॉ. संजय उपाध्ये हे विनोदी शैलीमध्ये विचार मांडणार आहेत. यावर्षीही दुपारी उचगावच्या मध्यवर्ती गणेश- विठ्ठल-रखुमाई मंदिरांच्या प्रांगणातील गांधी चौकात सर्वांना गोड भोजनाची व्यवस्था केली आहे. तिसऱ्या सत्रात कथाकथन होणार आहे. यावर्षी जयवंत’ आनंदा आवटे हे प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. चौथ्या सत्रात झी मराठी हास्यसम्राट फेम प्रा अजितकुमार कोष्टी यांच्या विनोदी कार्यक्रमाचा आनंद साहित्यप्रेमींना घेता येणार आहे.

या संमेलनाला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन उचगाव साहित्य संमेलन अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, सेक्रेटरी एन. ओ. चौगुले, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी केले आहे.

The post संमेलन पार पाडण्यासाठी उचगाववासीय सज्ज appeared first on News 24 Tass Marathi.

उचगाव येथे रविवारी २५ वे मराठी साहित्य संमेलन
नामवंत साहित्यिकांची लाभणार उपस्थिती

उचगाव / वार्ताहर

उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25 वे उचगाव मराठी साहित्य संमेलन येत्या रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी अनेक नामवंत आणि दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत होणार असून, या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उचगाव नगरीत ख्यातनाम साहित्यिक, कवी ,विचारवंत यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा हा सोहळा दिमाख्यात पार पाडण्यासाठी आता उचगाववासिय सज्ज झाले आहेत.

25 वे हे साहित्य संमेलन चार सत्रामध्ये होणार असून संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माऊली जिल्हा सांगली येथील इंद्रजीत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून पहिल्या सत्रात त्यांचे अध्यक्ष भाषण होणार आहे. इंद्रजीत देशमुख संस्थापक ,शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान ,घारेवाडी. माजी प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र राज्य अध्यात्मिक साधक, संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी संप्रदायाचे आचरण करते आहेत.

दुसऱ्या सत्रात पुणे येथील डॉ. संजय उपाध्ये, हे एक हास्य दंगल विनोदी कार्यक्रम यावर ते आपल्या विनोदी शैलीमध्ये आपले विचार मांडणार आहेत. सालाबाद प्रमाणे यावर्षीही दुपारी उचगावच्या मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील ,गांधी चौकात सर्वांना गोड भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यानंतर तिसऱ्या सत्रात कथाकथन होनार आहे. उचगाव साहित्य संमेलनाचे विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण दरवर्षी विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून यावर्षी जयवंत आनंदा आवटे कुंडल ता. पलूस जिल्हा सांगली यांना निमंत्रण देण्यात आले आहे.ते प्रेक्षकांना खळखळून हसण्यास लावणारे हास्य कथाकथन कार्यक्रम सादर करणार आहेत.

तर चौथ्या सत्रामध्ये उचगावच्या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य साहित्य संमेलनाची सांगता ही हशांने केली जाते .यासाठी गेली 24 संमेलन हे चौथे सत्र विनोदी आणि हास्य असेच ठेवण्यात आले आहे. यावर्षीही या सत्रात विनोदी असे झी मराठी हास्य सम्राट फेम प्राध्यापक अजितकुमार कोष्टी, मुंबई हे उपस्थित राहणार असून या चौथ्या सत्रात त्यांचा हा विनोदी हशा ने भरलेल्या या कार्यक्रमाचा आनंद साहित्य प्रेमींना यावर्षी मिळणार आहे.

तरी या चार सत्रामध्ये होणाऱ्या या साहित्य पूर्ण अशा संमेलनाला बेळगाव,खानापूर ,चंदगड, निपाणी या सर्व तालुक्यातील साहित्य प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून या दिग्गज अशा साहित्यिक ,कवींच्या विचारांचा लाभ घ्यावा असे उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर,सेक्रेटरी एन.ओ. चौगुले, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी कळविले आहे.

The post उचगाव येथे रविवारी २५ वे मराठी साहित्य संमेलन appeared first on News 24 Tass Marathi.

उचगाव मराठी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांकडून साहित्यिक इंद्रजित देशमुख यांना संमेलनाचे निमंत्रण
उचगाव / वार्ताहर

उचगाव येथे रविवारी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २५ व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत देशमुख यावर्षी उपस्थित राहणार आहेत. उचगाव मराठी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी नुकतीच त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. त्यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करून ते या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. असे उचगाव मराठी साहित्य अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर यांनी ही माहिती दिली आहे.

बेळगाव सह चंदगड ,खानापूर व निपाणी तालुका आणि परिसरातील साहित्य रसिकांना उचगाव साहित्य संमेलना बाबत नेहमीच उत्सुकता लागू राहिली आसते. आता संमेलन चार दिवसांवर येऊन पोहोचले असून आयोजकांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून, संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. परिसरात आणि आता सर्वत्र संमेलनाची चर्चा सुरू आहे. रविवार दि. १८ जानेवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीला वेगा आला असून कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे .संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर राहू नये म्हणून याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी जाहिरात व जनसंपर्क कार्यक्रम, निधी,स्वागत मंडप, सजावट व अन्य व्यवस्था, ग्रंथ दिंडी, सांस्कृतिक, आरोग्य माहिती व प्रसारण,भोजन,अधि समित्यांची रचना करण्यात आली आहे. सर्व समित्या, समित्यांचे पदाधिकारी आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. ग्रंथदिंडीसाठी वारकरी, भजनी मंडळ ,लेझीम पथक, झांज पथक, ढोल ताशा पथक यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांची तयारी सुरू करण्यात आली आहे. ग्रंथ दिंडीत सहभागी होण्यासाठी परिसरातील शाळा व महाविद्यालये तसेच सर्व युवक मंडळांना कळविण्यात आले आहे. संमेलनातील साहित्यिक कार्यक्रमांची उंची दरवर्षी वाढत चालल्याने परिसरात एक आगळे वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. सारा गाव संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागला आहे .

अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, उपाध्यक्ष कृष्णाजी कदम पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई,सेक्रेटरी एन.ओ चौगुले यासह बी.एस होनगेकर, अशोक हुक्केरीकर, बबन देसाई, विनोद होनगेकर, संदीप होनगेकर, किसन लाळगे अंकूश पाटील सर्व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना करत आहेत. बेळगावच्या या परिसरात होणाऱ्या या संमेलनासाठी भव्य शामियाण्याची उभारणी करण्यासंदर्भात ही चर्चा करण्यात आली असून बेळगाव वेंगुर्ले रोडवरील अप्रोच रोड पासून ते संमेलन स्थळापर्यंत स्वागत कमानी या संदर्भात ही सभामंडप उभारणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना सूचना करण्यात आल्या आहेत.

गावातील प्राथमिक मराठी शाळा, मळेकरणी हायस्कूल, स्वामी विवेकानंद हायस्कूल मधील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग या संमेलनामध्ये असतो या संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला कवी, लेखक जवळून पाहता येतात. त्यांचे विचार ऐकायला मिळतात. यासाठी दरवर्षी विद्यार्थी वर्गाला सामावून घेऊन त्यांचे विचार ऐकण्याची संधी दिली जाते.परिणामी गेल्या २४ वर्षांमध्ये मुले मुली कविता करू लागले आहेत. शाळेत दिलेल्या विषयावर लेख, निबंध लिहिण्यात त्यांना सोपे झाले जात आहे. हे तर संमेलनाचे खरे फलित आहे असे मनोगत या भागातील अनेक पालक व ग्रामस्थातून व्यक्त होताना दिसत आहे .

वाचन संस्कृती वाढावी म्हणून संमेलनात येणारे पालक, शिक्षक, विद्यार्थी व साहित्य प्रेमी यांनी एक तरी पुस्तक खरेदी करावे या उद्देशाने अकादमी गेली २४ वर्षे सातत्याने पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. यावर्षीही प्रकाशकांना निमंत्रण देण्यात येत आहेत.

एकंदरीत या भागात उचगाव साहित्य संमेलनाचा दबदबा सुरू असून सर्वांच्या आता नजरा १८ जानेवारीच्या संमेलनाकडे लागून राहिले आहेत.

The post उचगाव मराठी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांकडून साहित्यिक इंद्रजित देशमुख यांना संमेलनाचे निमंत्रण appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्याची जबाबदारी मराठी माणसांचीच
बाळासाहेब देसाई यांचे प्रतिपादन

उचगाव येथे रौप्य महोत्सवी मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ उत्साहात

उचगाव / वार्ताहर

मराठी भाषा आणि संस्कृती वाढविणे आणि टिकविणे हे सर्वस्वी मराठी माणसांमध्ये आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ती वृद्धिंगत होत असल्याचे मनोगत लँड ट्रिब्युनलचे संचालक बाळासाहेब देसाई यांनी या मुहूर्तमेढ कार्यक्रम प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.उचगाव येथे उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25 व्या रौप्य महोत्सवी उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

उचगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील गांधीचौक उचगाव येथे हा मुहूर्तमेढ कार्यक्रम माजी मंडळ पंचायत सदस्य बी. एस. होनगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उचगाव ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष संभाजी कदम आणि माझी सदस्य रामा कदम यांच्या हस्ते मुहूर्तमेढचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक हुक्केरीकर, वामन कदम, शरद जाधव, अमृत पावशे, शरद होनगेकर, ग्रामपंचायत माजी सदस्या उषा होनगेकर, भाग्योदय महिला सोसायटीच्या संचालिका सुनिता होनगेकर ,दिलीप पावशे, अशोक गोंधळी, तरळे यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर यांनी केले. यावेळी मुहूर्तमेढचे पूजन सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अकादमीचे सेक्रेटरी श्री. एन. ओ. चौगुले यांनी यावर्षी उचगावचे साहित्य संमेलन हे रौप्य महोत्सवी संमेलन साजरे करत आहोत. पंचवीस वर्षाचा टप्पा या संमेलनाने पूर्ण केला असून आत्तापर्यंत दिग्गज असे साहित्यिक, कथाकार, कवी उचगावच्या या नगरीत येऊन गेले आहेत. आणि पुन्हा आता होणाऱ्या 25 व्या साहित्य संमेलनासाठी उचगाव नगरी सज्ज झाली आहे.आणी संमेलन संदर्भात सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.

या मुहूर्तमेढ कार्यक्रमाला उचगाव मधील अनेक मान्यवर मंडळी तसेच प्राथमिक, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी होणाऱ्या या पंचविसाव्या उचगाव मराठी साहित्य संमेलनचा सोहळा मोठा दिमाख्यात साजरा करूया असे या कार्यक्रम प्रसंगी सर्वांच्या वतीने ठरविण्यात आले.

The post मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्याची जबाबदारी मराठी माणसांचीच appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगुंदी येथे १ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्य संमेलन
अध्यक्षपदी डॉ. उमा कुलकर्णी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगुंदी येथे येत्या शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी भव्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून हे संमेलन एकूण चार सत्रांत पार पडणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व नामवंत अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी भूषविणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

डॉ. उमा कुलकर्णी या मराठी साहित्यविश्वातील एक महत्त्वाच्या अनुवादक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी कन्नड साहित्यातील अनेक दर्जेदार साहित्यकृती मराठीत अनुवादित करून त्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांच्या अनुवाद कार्यात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांच्या साहित्याचाही समावेश आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना साहित्य अकादमीसह विविध मानाचे पुरस्कार लाभले आहेत. अनुवादासोबतच त्यांची काही स्वलिखित पुस्तकेही प्रकाशित झाली असून, त्या प्रामुख्याने अनुवाद साहित्यालाच अधिक प्राधान्य देतात.

अनुवाद करताना मूळ लेखकाची शैली, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि आशय अबाधित ठेवण्यावर त्यांचा विशेष भर असतो. अनुवाद ही केवळ भाषांतराची प्रक्रिया नसून विचारपूर्वक केलेले सर्जनशील कार्य आहे, असा त्यांचा ठाम दृष्टिकोन आहे. मूळ कृतीचा आशय व अर्थ प्रामाणिकपणे वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच त्यांच्या साहित्यसेवेचे मुख्य ध्येय आहे.

मूळच्या बेळगावच्या असलेल्या डॉ. कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव येथे झाला असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहापूर येथील सरस्वती विद्यालयात झाले आहे. सध्या त्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. बेळगुंदीतील या साहित्य संमेलनामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

The post बेळगुंदी येथे १ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्य संमेलन appeared first on News 24 Tass Marathi.

सातारा साहित्य संमेलनात शब्दगंध कवी मंडळ संघाच्या कवींची निवड
बेळगाव दि. ३० : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ संघाच्या कवींची निवड झाल्याने साहित्यप्रेमी व कवी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मराठी साहित्याच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि शतकपूर्व परंपरा लाभलेल्या या महत्त्वपूर्ण संमेलनात बेळगावातील कवी सहभागी होणार असल्याने ही बाब विशेष अभिमानास्पद मानली जात आहे.

दि. १ ते ४ जानेवारी दरम्यान सातारा येथे हे साहित्य संमेलन पार पडणार असून शनिवारी (दि. ३ जानेवारी) दुपारी आयोजित कवी कट्टा कविसंमेलनात शब्दगंध कवी मंडळ संघाचे कवी आपल्या कविता रसिकांसमोर सादर करणार आहेत.

या कविसंमेलनासाठी कडोली येथील ज्येष्ठ कवी व शब्दगंध कवी मंडळ संघाचे माजी अध्यक्ष बसवंत शहापूरकर, शब्दगंधचे सचिव कवी सुधाकर गावडे, कवी चंद्रशेखर गायकवाड तसेच कुद्रेमानी येथील कवी शिवाजी शिंदे यांची निवड झाली आहे. हे सर्व कवी आपल्या सशक्त शब्दशैली, सामाजिक जाणिवा आणि साहित्यिक योगदानासाठी परिचित आहेत.

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे शतकपूर्व साहित्य संमेलन म्हणून विशेष महत्त्वाचे मानले जात असून, अशा ऐतिहासिक संमेलनात बेळगावातील कवींचा सहभाग हा संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासाठी गौरवास्पद ठरत आहे. या निवडीमुळे बेळगावच्या साहित्यिक परंपरेचा राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटणार आहे.

शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने निवड झालेल्या सर्व कवींवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कवितांना साताऱ्यातील रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास साहित्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.

The post सातारा साहित्य संमेलनात शब्दगंध कवी मंडळ संघाच्या कवींची निवड appeared first on News 24 Tass Marathi.