Bhudargad Archives | News 24 Tass Marathi

आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराने जिल्ह्यात खळबळ
भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील तब्बल ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी झुंजारराव खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित विश्वस्त, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत देवस्थान समितीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संगनमत करून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात, फसवणूक तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तपासात संबंधितांनी संगनमताने आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी तत्कालीन कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच इतर संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांना आरोपी करण्यात आले आहे.

आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे तसेच गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहाराची एकूण रक्कम ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

The post आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराने जिल्ह्यात खळबळ appeared first on News 24 Tass Marathi.

कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा
पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांवर ; नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

१० बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून, सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीची पातळी सध्या २२ फुटांवर पोहोचली असून, अवघ्या २४ तासांत नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.

नद्यांमधील वाढलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील १० बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये राजाराम बंधाऱ्याचाही समावेश आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून, या भागातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे तसेच पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून किंवा धोकादायक मार्गांवरून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

The post कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा appeared first on News 24 Tass Marathi.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची अक्कोळ येथे सदिच्छा भेट
निपाणी : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आनंदराव आबिटकर (रा. भुदरगड) यांनी अक्कोळ येथे सदिच्छा भेट दिली. सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांचे वंशज व दत्त संस्थान ट्रस्टी डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्री यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी पंतप्रतिमेचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला. याप्रसंगी प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील तसेच भुदरगड तालुक्यातील मंदिर अनुदान, सर्वसामान्यांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा आणि समाज उपयोगी सेवा यासाठी प्रभावी कार्यशैली असणारा युवा नेता म्हणून प्रकाश आबिटकर यांची ओळख आहे. त्यांचे लहान भाऊ आणि कोल्हापूर डीसीसी बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनीही काही महिन्यांपूर्वी डॉ. संजय पंत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती.

अक्कोळ ग्रामपंचायतीमार्फत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे, वीरेंद्र पाटील, रणजीत सदावर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. या भेटीप्रसंगी योगेश पाटील (बारवे), चंद्रकांत सुतार (गारगोटी), अनंत पवार (लिंगनूर), रामनारायण कुलकर्णी, दिलीप सदावर्ते, आप्पासो चिंचवाडे, रमेश कुलकर्णी, चंद्रकांत पाटील (कौलगे), सागर शिंदे (भुदरगड), अरुण दाभोळे (वाघापूर), श्रीपती सुर्यवंशी यांसह अनेक नागरिक उपस्थित होते

The post आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची अक्कोळ येथे सदिच्छा भेट appeared first on News 24 Tass Marathi.