Madhya Pradesh Archives | News 24 Tass Marathi

मध्य प्रदेशात पिक-अप व्हॅन उलटून १२ मजूरांचा मृत्यू
वीस जण जखमी

मध्यप्रदेश : धार जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात पिक-अप वाहन उलटल्याने १२ मजूरांचा मृत्यू झाला असून सुमारे २० जण जखमी झाले आहेत. चिकलिया येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे साडेआठ वाजता मजुरांना घेऊन जाणारी पिक-अप गाडी अनियंत्रित होऊन उलटली. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक, सुमारे ३० हून अधिक मजूर प्रवास करत होते. गाडी उलटल्यानंतर अनेक जण तिच्या खाली दबले गेले, तर काहींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी इंदौर येथे हलवण्यात आले आहे.

धार जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अभिषेक चौधरी यांनी १२ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असून, जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

The post मध्य प्रदेशात पिक-अप व्हॅन उलटून १२ मजूरांचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव महापालिकेच्या शिष्टमंडळाचा इंदूर अभ्यासदौरा
स्वच्छता मोहिमेला मिळणार नवी दिशा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांचे शिष्टमंडळ भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाने तेथील घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेच्या आधुनिक पद्धती आणि नागरिकांचा सहभाग याबाबत सविस्तर माहिती घेतली.

महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते हणमंत कोंगाळी तसेच सर्व नगरसेवकांनी या अभ्यास दौर्‍यात सहभाग घेतला. इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेळगावच्या प्रतिनिधींना स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तांत्रिक उपाययोजना आणि जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. शिष्टमंडळातील सदस्यांनी इंदूरमधील कचरा–ते–संसाधन प्रकल्प, विभक्त कचरा संकलन प्रणाली, आणि शहराच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या अभ्यास दौऱ्यामुळे बेळगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी नवीन कल्पना मिळाल्या असून, इंदूरमधील सर्वोत्तम पद्धती बेळगावमध्ये राबविण्याचा मनोदय सदस्यांनी व्यक्त केला. शिष्टमंडळाचा हा दौरा बेळगावला स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

The post बेळगाव महापालिकेच्या शिष्टमंडळाचा इंदूर अभ्यासदौरा appeared first on News 24 Tass Marathi.