Sawantwadi Archives | News 24 Tass Marathi

चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आंबोलीचा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित
पहिल्याच सप्ताहअखेर वर्षा पर्यटनाला वेग ; पर्यटकांची गर्दी अपेक्षित

आंबोली : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, घाटमार्गातील आणि परिसरातील इतर सर्व धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे आज, ४ जुलैपासून आंबोलीतील वर्षा पर्यटन हंगामाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

नैसर्गिक सौंदर्य, दाट जंगल आणि समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत यंदा ६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे जून महिनाभर पावसाने ओढ दिल्याने धबधबे कोरडेच राहिले होते. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. मुख्य धबधब्यासह घाटातील सर्व लहान-मोठे धबधबे आता दिमाखात कोसळत असून, संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे.

आजपासून सुरू झालेल्या पहिल्याच सप्ताहअखेर (वीकेंड) मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीकडे आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना मिळणार असून, हॉटेल, निवास व्यवस्था आणि अन्य व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

The post चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आंबोलीचा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित appeared first on News 24 Tass Marathi.

आंबोली घाटात कड्यावरून दोन भलेमोठे दगड कोसळले
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

आंबोली : आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ रविवारी सकाळी कड्यावरून दोन मोठे दगड कोसळल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर असलेल्या सुमारे ५० मीटर उंच कड्यावरून हे दगड अचानक घरंगळत खाली आले. यापैकी एक मोठा दगड रस्त्यालगतचा संरक्षक कठडा आणि लोखंडी रेलिंग तोडत खोल दरीत कोसळला, तर दुसरा दगड रस्त्यावरच अडकून राहिला.

दगड कोसळण्याच्या वेळी त्या ठिकाणी कोणतेही वाहन किंवा पर्यटक नसल्याने संभाव्य दुर्घटना टळली. अद्याप पावसाळी पर्यटन हंगामाला पूर्णपणे सुरुवात झालेली नसल्याने आणि रविवार असूनही पर्यटकांची गर्दी कमी असल्याने मोठी हानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष गलोली, लक्ष्मण जाडे, गौरव परब आणि सचिन चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच सावंतवाडी येथील पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घाट परिसरातील कड्यांवरून दगड कोसळण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे पर्यटक आणि वाहनचालकांनी घाटमार्गावरून प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

The post आंबोली घाटात कड्यावरून दोन भलेमोठे दगड कोसळले appeared first on News 24 Tass Marathi.

सावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा
कोल्हापूर : देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी मागणी ‘कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ’ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.​

प्रवासी संघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना म्हटले आहे की, सध्या मुंबई-पुणे-कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांदरम्यान रोज हजारो खाजगी वाहनांमुळे लाखो लीटर पेट्रोल व डिझेल वाया जात असून अब्जावधी रुपयांचे परकीय चलन देशाबाहेर जात आहे. ‘शक्तीपीठ महामार्ग’ सारख्या प्रकल्पांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात असले, तरी त्यामुळे भविष्यात परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी होणार नाही. याला उत्तम पर्याय म्हणून १) कोल्हापूर – आजरा – गडहिंग्लज – चंदगड – बेळगाव, २) सावंतवाडी – चंदगड – बेळगाव आणि ३) कोल्हापूर – वैभववाडी या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे नियोजन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवर जलद गतीने करून पुढील पाच वर्षांत ते प्रत्यक्ष पूर्ण करावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

The post सावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा appeared first on News 24 Tass Marathi.

आंबोली येथे दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
आंबोली / वार्ताहर

आंबोली कावळेसाद पॉईट येथील दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र सनगर (४५) या पर्यटकाचा मृतदेह सापडला असून आज एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक, सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दीडशे फूट खोल दरीतून हा मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आणि आला. कोल्हापूर येथून आंबोली येथील वर्षा पर्यटनासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी आले होते. यावेळी सायंकाळी ते कावळेसाद पॉईंट येथे गेले असता राजेंद्र सनगर हे फोटो काढीत असताना खोल दरीत कोसळले. अखेर अथक प्रयत्नानंतर सनगर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मूळचे पन्हाळा तालुक्यातील माले येथील सध्या राहणार, चिले कॉलनी येथील राहणारे राजेंद्र बाळासो सनगर, हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. कावळेसाद पॉईट येथे रोलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरल्याने ते दरीत कोसळले. लागलीच गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.

The post आंबोली येथे दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह सापडला appeared first on News 24 Tass Marathi.

आंबोली घाटात कोल्हापूरचा पर्यटक दरीत कोसळला
पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

आंबोली / वार्ताहर

मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर निसर्गरम्य कोकणात पर्यटनासाठी गर्दी वाढली आहे. मात्र, हवामानाचा अंदाज न आल्याने आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याने अपघातांच्या घटनाही समोर येत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना आंबोली घाटातील प्रसिद्ध कावळेसाद पॉईंटवर घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चिले कॉलनीचे रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र बाळासो सनगर (वय 45) हे आपल्या 14 सहकाऱ्यांसह वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे आले होते. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत असताना रेलिंगजवळ पडलेला रुमाल उचलण्यासाठी ते रेलिंगच्या पलीकडे गेले. त्यावेळी पाय घसरून ते खोल दरीत कोसळले.

या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आंबोली रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. मात्र, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तसेच, वाऱ्याचा जोर आणि धबधब्याच्या उलट्या प्रवाहामुळे बचावकार्य आणखीनच कठीण झाले आहे. राजेंद्र सनगर यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, रुमाल उचलण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे समजते.

सध्या स्थानिक प्रशासन,पोलीस आणि बचाव पथक मिळून शोध आणि बचावकार्यात गुंतले असून अंधार आणि खराब हवामानामुळे यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. या घटनेनंतर पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात असताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, रेलिंगच्या पलीकडे जाणे टाळावे आणि हवामानाची माहिती घेऊनच पर्यटन स्थळी जावे, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

The post आंबोली घाटात कोल्हापूरचा पर्यटक दरीत कोसळला appeared first on News 24 Tass Marathi.

पहिल्याच पावसात आंबोली घाटात कोसळली दरड
वाहतूक ठप्प ; घाटमार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आंबोली / वार्ताहर

आंबोली घाटातील चाळीस फूट मोरे परिसरात दरड कोसळून रस्त्यावर आली. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता ही घटना घडली. त्यामुळे या घाट मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत ही दरड बाजूला केल्यानंतर दुपारपासून वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

आंबोली परिसरात सलग तीन दिवस मान्सून पूर्व पाऊस कोसळत आहे. पहिल्याच पावसात घाटातील दरडी खाली आल्या. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. दरड कोसळल्याने घाट मार्गात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग प्राधिकरण चे अभियंता रुपेश कांबळी यांनी जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करून एका बाजूने वाहतूक पूर्ववत केली त्यानंतर जेसीबीने उर्वरित दरड हटविण्यात आली.

सलग तिसऱ्या वर्षी पावसाळ्यात एकाच ठिकाणी ही तिसरी घटना घडली आहे. दरम्यान आंबोली परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे घाटातील छोटे छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. घाट माथ्यावरील ब्रिटिशकालीन संरक्षक गटारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. घाट रस्ता करताना ब्रिटिशांनी घाटात दर्डी कोसळू नये यासाठी डोंगरावरच गटारी बांधली होती. मात्र माती दरड जाऊन ती भुजली आहेत त्यामुळे पाणी जाण्यास वाट नसल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

The post पहिल्याच पावसात आंबोली घाटात कोसळली दरड appeared first on News 24 Tass Marathi.