Kokan Archives | News 24 Tass Marathi

रायगड जिल्ह्यातून बेळगाव सीमाप्रश्नासाठी स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पत्रकारांनी एकजूट दाखवत दिला पाठिंबा

रायगड : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमावादाच्या प्रश्नावर न्याय मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील पत्रकारांनी सक्रिय सहभाग नोंदवून या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही भेट देऊन मोहिमेला अधिक बळ दिले जाणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार नरेश पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर विभागातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी सीमाभागातील पत्रकारांना उद्देशून आवाहन केले होते की, माध्यमांनी पुढाकार घेऊन हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित मुद्दा लवकर निकाली निघावा यासाठी प्रयत्न करावे. सुमारे ७० वर्षांपासून ४० लाखाहून अधिक मराठी भाषिक नागरिक या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकारांनी १ लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेऊन मोहीम राबविण्याचे ठरविले.

माणगाव शहरातून सुरू झालेल्या मोहिमेत आता म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यांतील पत्रकारही सहभागी झाले आहेत. माणगाव तालुका प्रेस क्लबच्या ज्येष्ठ पत्रकार पद्माकर उभारे यांच्या निवासस्थानी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गौतम जाधव यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार एकत्र येऊन स्वाक्षरी करून मोहिमेला अधिक बळ देत आहेत.

यासोबतच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (एमईएस) मराठी हक्क आणि सीमावादाच्या न्याय मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी नैतिक आणि ठोस पाठिंबा दर्शविला. पत्रकार नरेश पाटील यांनी उपस्थितांना मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली आणि मराठी बांधवांच्या हक्कासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. उपस्थित पत्रकारांनी त्याचे पालन करत स्वाक्षरी केली आणि मराठी अस्मिता व हक्कांसाठी ठाम संदेश दिला.

ही स्वाक्षरी मोहीम रायगड जिल्ह्यात वेगाने बळ घेत असून, तिचा संदेश सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. लोकही मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवत आहेत. लवकरच लातूर जिल्ह्यातही ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सीमावादाचा प्रश्न आता फक्त सीमाभागापुरता मर्यादित न राहता राज्यभर पसरत असून, माणगावातील पत्रकारांनी दाखविलेली एकजूट मराठी हक्कांच्या लढ्याला नवे बळ देणारी ठरत आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित पत्रकारांनी स्वाक्षरी करून एमईएसच्या मागणीला पाठिंबा दिला व मराठी बांधवांच्या हक्कासाठी एकजूट असल्याचा ठाम संदेश दिला. यावेळी सर्वांनी एकमुखाने या चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविलेल्या सर्व पत्रकारांचे नरेश पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले. मराठी अस्मिता आणि हक्कांच्या लढ्यात माणगावातील पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

विशेष म्हणजे, ही स्वाक्षरी मोहीम आता रायगड जिल्ह्यात वेगाने बळ घेत असून तिचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने पुढे येत आपला पाठिंबा दर्शवत आहेत. तसेच या चळवळीचा विस्तार होत असून लातूर जिल्ह्यातही लवकरच स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकूणच सीमावादाचा मुद्दा आता व्यापक पातळीवर पसरत असून त्याला वाढता जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एकूणच, सीमावादाचा प्रश्न आता केवळ सीमाभागापुरता मर्यादित न राहता राज्यभर पसरत असल्याचे स्पष्ट होत आहे. माणगावातील पत्रकारांनी दाखविलेली ही एकजूट आणि लढाऊ भूमिका मराठी हक्कांच्या लढ्याला नवे बळ देणारी ठरत असून, रायगड ते लातूर असा विस्तार घेत असलेली ही स्वाक्षरी मोहीम येत्या काळात अधिक व्यापक होऊन जनआंदोलनाचे रूप धारण करण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

The post रायगड जिल्ह्यातून बेळगाव सीमाप्रश्नासाठी स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी सन्मान यात्रेपूर्वी महाडच्या चवदार तळ्याला अभिवादन !
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने मराठी अस्मितेची जागृती आणि महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ‘मराठी सन्मान यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी २५ जानेवारी २०२६ रोजी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे व क्रांतीभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

महाड शहराच्या मध्यभागी असलेल्या चवदार तळ्याला सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. एकेकाळी अस्पृश्यांना या तळ्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह करून समाजातील सर्व घटकांसाठी पाण्याचा हक्क मिळवून दिला आणि २० मार्च १९२७ रोजी हे तळे सर्वांसाठी खुले झाले.

याच पवित्र स्थळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष रवींद्र साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला तसेच सीमाप्रश्नी सीमावासीयांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची ग्वाही दिली. स्मारक समितीचे प्रशांत जाधव, दीपक घाडगे आणि प्रदीप सकपाळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना शुभम शेळके म्हणाले की, “ज्या बाबासाहेबांनी देशाची घटना लिहिली, त्याच संविधानावर विश्वास ठेवून सीमावासीय गेली सत्तर वर्षे लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सीमाप्रश्नी नक्कीच न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

कार्यकर्त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ तसेच ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

याप्रसंगी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महादेव पाटील, शिवाजी हवळाणाचे, मोतेश बारदेशकर, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, अशोक घगवे, श्रीकांत नांदूरकर, सुरज जाधव, सचिन दळवी, ॲड. वैभव कुट्रे, रायगड जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार नरेश पाटील, रमेश माळवी, भूपाल पाटील, महेंद्र जाधव, सुशांत देसाई, निखिल देसाई, प्रकाश हेब्बाजी आदी उपस्थित होते.

दरम्यान, सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी सुमारे २०० ते २२५ कार्यकर्ते किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन मराठी सन्मान यात्रेची औपचारिक सुरुवात करणार आहेत.

The post मराठी सन्मान यात्रेपूर्वी महाडच्या चवदार तळ्याला अभिवादन ! appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून
बेळगाव : मराठा मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत सुरुवातीला 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले त्याच बरोबर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्या नंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या व प्रत्येक मराठी माणूस ज्याला स्वराज्याची राजधानी मानतो त्या किल्ले रायगडावरून 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनी सुरू होणार आहे.

26 जानेवारी हा स्वतंत्र भारताचा लोकशाही दिवस मानला जातो व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेचा संविधान दिवस मानला जातो. याच संविधानाची सीमाभागात कर्नाटक सरकारने पायमल्ली गेली 70 वर्षे सुरू केलेली असून त्याची परिसीमा गाठलेली आहे.

युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या दिनांक 12 जानेवारीच्या बैठकीत मराठी सन्मान यात्रेच्या नियोजना संदर्भात बैठक पार पडली. ज्या कोणी कार्यकर्त्यांना या सन्मान यात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी 20 जानेवारी 2026 पर्यंत नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

कार्याध्यक्ष धनंजय पाटील – (7899094108) , सरचिटणीस मनोहर हुंदरे – (9945346640), उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर – (9741289806)

या बैठकीला अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे,उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर,अशोक घगवे,मोतेश बारदेशकर,सागर सांगावकर अभिजीत मजुकर, इंद्रजीत धामणेकर,सुधीर शिरोळे, रमेश माळवी,सुरज जाधव, राजू पाटील, अभिषेक कारेकर, प्रवीण नावगेकर, रिचर्ड अंथोनी, आदी उपस्थित होते.

The post मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून appeared first on News 24 Tass Marathi.

शिरोडा – वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले
तिघांचा मृत्यू ; एक जखमी

बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरु

शिरोडा / वार्ताहर

शिरोडा-वेळागर समुद्रात संध्याकाळी ४.४५ वाजता ८ पर्यटक बुडाले. त्यापैकी ४ जणांना वाचवण्यात आले; मात्र ३ जण मयत झाले आणि १ महिला गंभीर अवस्थेत शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील खानापूर, लोंढा आणि अळणावर येथील आठ जण वेळागर समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. या दुर्घटनेतील आठ जणांपैकी एका पर्यटकाला वाचवण्यात यश आले आहे.

मृत पर्यटकांमध्ये फरहान इरफान कित्तूर (वय ३४), इबाद इरफान कित्तूर (वय १३) आणि नमीरा आफताब अख्तर (वय १६) यांचा समावेश आहे. इसरा इम्रान कित्तूर (वय १७) वाचला आहे. बेपत्ता पर्यटकांमध्ये इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६), इक्वान इमरान कित्तूर (वय १५), फरहान मोहम्मद मणियार (वय २०) आणि जाकीर निसार मणियार (वय २३) यांचा समावेश आहे.

मृत आणि जखमी पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे :

फरहान इरफान कित्तूर (३४) – मयत

इबाद इरफान कित्तूर (१३) – मयत

नमीरा आफताब अख्तर (१६) – मयत

इसरा इम्रान कित्तूर (१७) – वाचले

बेपत्ता पर्यटक :

इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६)

इक्वान इमरान कित्तूर (१५)

फरहान मोहम्मद मणियार (२०)

जाकीर निसार मणियार (२३)

घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाच्या यंत्रणा सक्रिय असून, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

The post शिरोडा – वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले appeared first on News 24 Tass Marathi.

आंबोली येथे दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
आंबोली / वार्ताहर

आंबोली कावळेसाद पॉईट येथील दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र सनगर (४५) या पर्यटकाचा मृतदेह सापडला असून आज एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक, सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दीडशे फूट खोल दरीतून हा मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आणि आला. कोल्हापूर येथून आंबोली येथील वर्षा पर्यटनासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी आले होते. यावेळी सायंकाळी ते कावळेसाद पॉईंट येथे गेले असता राजेंद्र सनगर हे फोटो काढीत असताना खोल दरीत कोसळले. अखेर अथक प्रयत्नानंतर सनगर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मूळचे पन्हाळा तालुक्यातील माले येथील सध्या राहणार, चिले कॉलनी येथील राहणारे राजेंद्र बाळासो सनगर, हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. कावळेसाद पॉईट येथे रोलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरल्याने ते दरीत कोसळले. लागलीच गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.

The post आंबोली येथे दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह सापडला appeared first on News 24 Tass Marathi.

आंबोली घाटात कोल्हापूरचा पर्यटक दरीत कोसळला
पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

आंबोली / वार्ताहर

मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर निसर्गरम्य कोकणात पर्यटनासाठी गर्दी वाढली आहे. मात्र, हवामानाचा अंदाज न आल्याने आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याने अपघातांच्या घटनाही समोर येत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना आंबोली घाटातील प्रसिद्ध कावळेसाद पॉईंटवर घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चिले कॉलनीचे रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र बाळासो सनगर (वय 45) हे आपल्या 14 सहकाऱ्यांसह वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे आले होते. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत असताना रेलिंगजवळ पडलेला रुमाल उचलण्यासाठी ते रेलिंगच्या पलीकडे गेले. त्यावेळी पाय घसरून ते खोल दरीत कोसळले.

या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आंबोली रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. मात्र, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तसेच, वाऱ्याचा जोर आणि धबधब्याच्या उलट्या प्रवाहामुळे बचावकार्य आणखीनच कठीण झाले आहे. राजेंद्र सनगर यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, रुमाल उचलण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे समजते.

सध्या स्थानिक प्रशासन,पोलीस आणि बचाव पथक मिळून शोध आणि बचावकार्यात गुंतले असून अंधार आणि खराब हवामानामुळे यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. या घटनेनंतर पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात असताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, रेलिंगच्या पलीकडे जाणे टाळावे आणि हवामानाची माहिती घेऊनच पर्यटन स्थळी जावे, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

The post आंबोली घाटात कोल्हापूरचा पर्यटक दरीत कोसळला appeared first on News 24 Tass Marathi.

पहिल्याच पावसात आंबोली घाटात कोसळली दरड
वाहतूक ठप्प ; घाटमार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आंबोली / वार्ताहर

आंबोली घाटातील चाळीस फूट मोरे परिसरात दरड कोसळून रस्त्यावर आली. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता ही घटना घडली. त्यामुळे या घाट मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत ही दरड बाजूला केल्यानंतर दुपारपासून वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

आंबोली परिसरात सलग तीन दिवस मान्सून पूर्व पाऊस कोसळत आहे. पहिल्याच पावसात घाटातील दरडी खाली आल्या. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. दरड कोसळल्याने घाट मार्गात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग प्राधिकरण चे अभियंता रुपेश कांबळी यांनी जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करून एका बाजूने वाहतूक पूर्ववत केली त्यानंतर जेसीबीने उर्वरित दरड हटविण्यात आली.

सलग तिसऱ्या वर्षी पावसाळ्यात एकाच ठिकाणी ही तिसरी घटना घडली आहे. दरम्यान आंबोली परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे घाटातील छोटे छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. घाट माथ्यावरील ब्रिटिशकालीन संरक्षक गटारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. घाट रस्ता करताना ब्रिटिशांनी घाटात दर्डी कोसळू नये यासाठी डोंगरावरच गटारी बांधली होती. मात्र माती दरड जाऊन ती भुजली आहेत त्यामुळे पाणी जाण्यास वाट नसल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

The post पहिल्याच पावसात आंबोली घाटात कोसळली दरड appeared first on News 24 Tass Marathi.

शक्ती चक्रीवादळाचे किनारपट्टीवर संकट
मुंबई : पावसाळा सुरु होण्यापूर्वीच भारतावर नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होत आहे. भारतात तीव्र उष्णतेमध्ये समुद्राची हालचाल वाढल्याने देशात आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. याला ‘शक्ती’ असे नाव देण्यात आले आहे. ते दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २३ ते २८ मे दरम्यान ते चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. याचा परिणाम अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह भारतातील विविध राज्यांवर होऊ शकतो हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ २४ ते २६ मे दरम्यान किनाऱ्यावर आदळू शकते, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाने आधीच लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या निवेदनानुसार, १४ मे २०२५ रोजी ३ वाजता, तमिळनाडूच्या किनाऱ्यापासून नैऋत्य बंगालच्या उपसागरावर समुद्रसपाटीपासून १.५ किमी उंचीवर एक वरच्या हवेतील चक्राकार वारा तयार झाला आहे. १६ आणि १७ मे रोजी नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोकण क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. जर हे चक्रीवादळ आले तर त्याचा परिणाम ओडिशापासून बंगालपर्यंत दिसून येईल. शक्ती चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा, बंगाल आणि बांगलादेशातील किनारी भागावर होऊ शकतो. हे चक्रीवादळ बंगालच्या किनारी भागातून बांगलादेशातील खुलना येथे पोहोचू शकते.

आयएमडीने या भागांसाठी ‘येलो’ इशारा जारी केला आहे आणि रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्व-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे क्षेत्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात ढगदाळ वातावरणाची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागानुसार, या महिन्यात तीन दिवस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एकाचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळासारखी परिस्थिती निर्माण होईल. सरकारने स्थानिक प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने किनारी भागातील रहिवाशांना समुद्रात न जाण्याचे व भारतीय हवामान विभागानुसार, या महिन्यात तीन दिवस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एकाचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळासारखी परिस्थिती निर्माण होईल. सरकारने स्थानिक प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने किनारी भागातील रहिवाशांना समुद्रात न जाण्याचे व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

The post शक्ती चक्रीवादळाचे किनारपट्टीवर संकट appeared first on News 24 Tass Marathi.

खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत विहान कोरी याची विजेतेपदाला गवसणी
बेळगाव / प्रतिनिधी

स्विमर्स क्लब बेळगाव आणि अ‍ॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या विहान एस कोरी याने श्री दुर्गामाता कला, क्रीडा आणि संस्कृती मंडळाच्या विजयदुर्गा खुल्या सागरी जलतरण (ओपन वॉटर सी स्विमिंग) स्पर्धेतील आपल्या गटाचे विजेतेपद पटकावले आहे.

सदर स्पर्धा महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने जेआयएम स्विम अकादमी, रामनामाला, कोल्हापूर यांनी महाराष्ट्रातील विजयदुर्ग बीच येथे गेल्या २० एप्रिल २०२५ रोजी आयोजित केली होती. विहान एस. कोरी याने तिसऱ्या वयोगटातील २ कि.मी. सागरी जलतरण शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. विहान हा ऑलिंपिक आकाराच्या सुविधेने सुसज्ज असलेल्या बेळगाव येथील केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव येथे प्रशिक्षक उमेश कलघाटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि विनायक आंबेवाडीकर यांच्या देखरेखीखाली होण्याचा सराव करतो. त्याला आई-वडिलांसह डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे.

The post खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत विहान कोरी याची विजेतेपदाला गवसणी appeared first on News 24 Tass Marathi.

तिलारी घाटात कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी
बेळगाव : तिलारी घाटातून आता वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असून मालवाहू अवजड वाहने या मार्गांवरून जात असतात. शनिवारी सकाळी तिलारी घाटात एका वळणावर कंटेनर अडकल्याने दोन्ही बाजूना वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे सुमारे दोन तासाहून अधिक काळ वाहतूकीची कोंडी झाली.

वाहतूकीचे नियोजन करताना पोलिसांचीही दमछाक झाली. अखेर जेसीबीच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढण्यात आला. नंतर दोन्ही बाजूची वाहतूक खुली करण्यात आली.

आंबोली आणि चोर्लामार्गे अवजड वाहनांना सोडले जात नाही. त्यामुळे दहा टनाच्या वरील वाहतूक करणारी वाहने तिलारी मार्गे गोव्यात ये – जा करत असतात. त्यामुळे वारंवार तिलारी घाटात उद्भवणारी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

The post तिलारी घाटात कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी appeared first on News 24 Tass Marathi.