Ramnagar Archives | News 24 Tass Marathi

मुंडवाड क्रॉसजवळ भीषण अपघात
वॅगनआर झाडावर आदळून चालकाचा जागीच मृत्यू

रामनगर / वार्ताहर

रामनगर–धारवाड रस्त्यावरील मुंडवाडा क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात वॅगनआर कार झाडावर आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील दोघे गंभीर जखमी झाले.

गोवा पणजी येथून अळणावरकडे निघालेली वॅगनआर कार (क्रमांक GA 05 BZ 323) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या अपघातात चालक अब्दुल (वय ५५, रा. पणजी, गोवा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारमध्ये समोर बसलेले दादू कौसर (वय ३०) आणि मागे बसलेली हीना कौसर (वय ३९, दोघेही रा. पणजी, गोवा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने रामनगर येथे प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील उपचारांसाठी त्यांना बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला आहे.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर सरकारी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

The post मुंडवाड क्रॉसजवळ भीषण अपघात appeared first on News 24 Tass Marathi.

अनमोड घाटात इनोव्हा कारमधील गोमांस जप्त
तस्करीचा गुन्हा उघडकीस ; चालक फरार

रामनगर / वार्ताहर

कर्नाटकातून गोव्यात बेकायदेशीरपणे नेले जात असलेले मोठ्या प्रमाणातील गोमांस रामनगर पोलिसांनी थरारक पाठलागानंतर जप्त केले. गुरुवारी अनमोड घाटात नियमित तपासणीदरम्यान GA 08 A 5193 या क्रमांकाच्या इनोव्हा कारला थांबण्याचा संकेत देताच चालकाने गाडीचा वेग वाढवत गोव्याच्या दिशेने पळ काढला.

याची माहिती तात्काळ धारबांदोडा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तस्करांनी पोलिसांना चकवा देत पुन्हा वाहन कर्नाटकाच्या दिशेने वळवले. दरम्यान, रामनगर पोलिसांनी सापळा रचून फिल्मी स्टाईलने गाडी ताब्यात घेतली. परिस्थितीचा अंदाज घेत चालक मात्र वाहन रस्त्याच्या कडेला सोडून जंगलात पसार झाला.

वाहनाची झडती घेतली असता त्यात १ टनांपेक्षा अधिक बेकायदेशीर गोमांस असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गाडी जप्त करून गुन्हा नोंदवला असून फरार चालक व वाहनमालकाचा शोध सुरू आहे.

The post अनमोड घाटात इनोव्हा कारमधील गोमांस जप्त appeared first on News 24 Tass Marathi.

नंदगड येथील अंगणवाडी सेविकेच्या खुनाचा उलगडा
आरोपी टेम्पोचालक पोलिसांच्या ताब्यात

रामनगर : तीनईघाट येथे सापडलेल्या नंदगड (ता. खानापूर) येथील अंगणवाडी सेविका अश्विनी बाबुराव पाटील (वय ५०, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, या प्रकरणात टेम्पो चालक शंकर पाटील (वय ३५) याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ ऑक्टोबर रोजी शंकर पाटील याने आपल्या टेम्पोमधून अश्विनी पाटील यांना कक्केरी येथे जत्रेला नेले होते. जत्रा आटोपल्यानंतर परतताना त्याने त्या “बीडी येथे सोडले” असा दावा पोलिसांसमोर केला होता. त्यावेळी नंदगड पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडून दिले होते. मात्र, काही दिवसांनी अश्विनी पाटील यांचा मृतदेह तीनईघाट येथील पुलाखालील पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

घटनेनंतर शंकर पाटील फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी रामनगर पोलिसांनी विशेष पथक तयार करून मोहीम सुरू केली. अखेर केवळ २४ तासांच्या आत पोलिसांनी त्याला नंदगड येथे अटक केली.

अश्विनी पाटील यांच्या खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शंकर पाटीलच या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या तो रामनगर पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पूर्ण उलगडा लवकरच होईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

The post नंदगड येथील अंगणवाडी सेविकेच्या खुनाचा उलगडा appeared first on News 24 Tass Marathi.

जवान शशिकांत बावा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
रामनगर / वार्ताहर

रामनगर येथील जवान शशिकांत बावा (वय ४४) यांचे सैन्यदलात सेवा बजावत असताना मंगळवार दि. २९ जुलै रोजी रात्री निधन झाले. त्यांचे पार्थिव विमानाद्वारे बेळगाव येथे गुरुवारी आणण्यात आले. त्यानंतर गुरुवारी ३१ जुलै रोजी रामनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थितीत रामनगर हद्दीपासून शिवाजी चौक तसेच बाजारपेठेतून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता यावेळी सेना दलाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. जोयडा तहसीलदार मंजुनाथ मन्नाली, चंद्रशेखर हरिहर, रामनगर पीएसआय नायक व कडून सलामी देण्यात यावेळी हजारो नागरिकांच्या आली.

The post जवान शशिकांत बावा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार appeared first on News 24 Tass Marathi.

रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला अपघात
रामनगर / प्रतिनिधी

रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अपघात टळल्याचा प्रकार रविवारी सकाळी लोंढा – कॅसलरॉक मार्गावर तिनई घाटाजवळ घडला. देवळीजवळील रेल्वेमार्गावर सकाळी झाड कोसळले. गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात ही बाब येताच त्याने रेल्वेमार्गावर एक किमी अंतर धावून गोव्याहून येणारी मालगाडी थांबविली. मात्र, धावताताना मार्गावर पडून तो जखमी झाला आहे.

ओमप्रकाश असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो रात्री रेल्वेमार्गावर गस्त घालून सकाळी परतत होता. त्याचवेळी मागे झाड कोसळल्याचा आवाज त्याला आला. त्याने मागे जाऊन पाहिले असता रेल्वेमार्गावर झाड कोसळल्याचे दिसले. विजेचा एक खांबही मोडून पडला होता. काही वेळातच गोव्याहून मालगाडी येणार होती. मोठा अपघात होण्याची शक्यता होती. झाड तत्काळ हटविणे शक्य नव्हते. त्यामुळे, त्याने क्षणाचाही विलंब न लावता कॅसलरॉकच्या दिशेने रेल्वेमार्गावरुन धावत जाऊन मालगाडी थांबविली. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला. मात्र, रेल्वेमार्गावरुन धावताना पडल्याने त्याचे दोन दात मोडले असून चेहऱ्यालाही जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी रामनगर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमी होऊनही पळत जाऊन रेल्वे थांबविल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

The post रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला अपघात appeared first on News 24 Tass Marathi.

अनमोड घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर
रामनगर / वार्ताहर

गोवा-बेळगाव महामार्गावरील अनमोड घाटातील गोवा हद्दीत असणारा डांबरी रस्ता शनिवारी पहाटे पावसामुळे खचल्याने अनमोड घाट मार्गे छोटी वाहने तसेच बस वगळता इतर वाहनांना बंद झाला आहे. सध्या येथे युद्धपातळीवर काम चालू असून सध्या खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. तर खचलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूनेही जेसीबीच्या साह्याने रस्ता रुंद करण्यात आला आहे. रस्त्याच्या खालील बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून, या कामासाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातून गोव्याला जाण्यासाठी सर्व वाहनांना अनमोड घाट मार्ग हा सर्व दृष्टीने सोयीस्कर तसेच जवळचा ठरत होता. पण महामार्गाचे काम सुरू केल्यापासून अनमोड मार्गाला जणू ग्रहणच लागल्याचे पाहावयास मिळत आहे.

इतकी वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्नाटक हद्दीत हा मार्ग बंद तरी पडत होता किंवा कामानिमित्त बंद पाडावा लागत होता ; परंतु प्रथमतःच गोवा हद्दीत सदर रस्ता खचल्यामुळे बंद करावा लागला आहे. तर बेळगाव मार्गे गोव्यात जाणारी अवजड वाहने कुसमळी पूल अजूनही अवजड वाहनांना तयार न झाल्याने अवजड वाहने जांबोटी मार्गे पाठवण्यात येतात; परंतु तोही मार्ग अरुंद असल्याने अवजड वाहने समोरून येणाऱ्या वाहनांना चुकवण्याच्या नादात रस्त्याच्या बाजूच्या मातीत रुतत आहेत. त्यामुळे तासनतास या मार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. तर तमिळनाडू, आंध्रप्रदेश, बंगळूर आदी भागांतून आलेली अवजड वाहने हुबळी, यल्लापूर, कारवारमार्गे गोव्याला जात आहेत. तर काही चुकून आलेली वाहने रामनगर जोयडा कारवारमार्गे जात आहेत.

The post अनमोड घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर appeared first on News 24 Tass Marathi.

अनमोड रस्ता खचल्याने वाहतुकीला धोका
रामनगर / प्रतिनिधी

बेळगाव महामार्गावरील अनमोड घाटात असणाऱ्या गोवा हद्दीतील डांबरी रस्त्याला गुरुवारी मध्यरात्री चर गेल्याचे निर्देशनास आले होते. यामुळे गोवा पीडब्ल्यूडी विभागाने सदर चर सिमेंटीकरण करून तात्पुरती दुरुस्ती केली होती. परंतु पावसाच्या जोरामुळे सदर चर पडलेल्या ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे फक्त एका बाजूनेच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सततच्या पावसाचा जोर सध्या वाढत चालला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहने गेल्यास या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे. बेळगावकडून गोव्याला जाणाऱ्या नागरिकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. या मार्गावरून नियमित स्वरूपात होणारी वाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

The post अनमोड रस्ता खचल्याने वाहतुकीला धोका appeared first on News 24 Tass Marathi.

असू नजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
रामनगर / प्रतिनिधी

जगलबेट कॅसलरॉक मार्गावरील असू नजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. बोरेगाळी क्रॉस येथे कुरवय येथून निघालेली दुचाकी आणि गोवा येथून दांडेली नजीक फणसोली येथे जाणारी कार यांच्यात हा अपघात घडला. यामध्ये कामरा येथील रहिवासी बालकृष्ण बिसो गावडा (वय 75) हे अपघातात ठार झाले. ते आपल्या पत्नी समवेत दुचाकी क्रमांक वरून जात असता भरधाव वेगातील कारने जोराची धडक दिली . बाळकृष्ण गावडा हा गंभीर जखमी झाल्याने त्याला 108 रुग्णवाहिकेतून प्रथम रामनगर येथे प्राथमिक उपचार केले नंतर बेळगाव येथील खाजगी हॉस्पिटल नेत असता त्याचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी जखमी झाल्याने तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे.

The post असू नजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on News 24 Tass Marathi.